चिन्ह केवळ गतकालीन इतिहास नव्हे
मध्यपूर्वेतील यरुशलेम परिसात एक ऐतिहासिक, कुतुहुल निर्माण करणारे स्थळ आहे जे आजच्या विचारवंतांना त्याकडे लक्ष पुरविण्याची मागणी करते. तो एक असा उंचवटा आहे ज्याच्यावर, पहिल्या शतकातील रोमी इतिहासकार टॅसीटस यांच्या शब्दात उल्लेख करावयाचा म्हणजे, “प्रचंड धनाढ्य मंदिर” उभे होते. आज मंदिराच्या इमारतीचा एकही इमला तेथे सापडत नाही तर केवळ व्यासपीठ मागे उरले आहे. तेच आज एका अशा भविष्यवादित चिन्हाच्या सत्यतेबाबतची साक्ष देते ज्याचा आपणावर परिणाम होत आहे.
पुराणवस्तु संशोधकांनी या मंदिर व्यासपीठाच्या दक्षिण भागात अनेक वस्तुंचा शोध लाविलेला आहे. द बायबल ॲण्ड आर्किऑलॉजी नामे पुस्तकात जे. ए. थॉमसन म्हणतातः “सर्वात चित्तवेधक शोध तो होता ज्यात, हेरोदाच्या काळात बांधकामासाठी वापरलेले मोठमोठे दगड सापडले, जे इ.स. ७० मधील यरुशलेमाच्या नाशाच्या वेळी मंदिराच्या चबुतऱ्यावरुन खाली टाकले असावेत.”
यरुशलेमाचा व त्यामधील मंदिराच्या नाशाचे भाकित, ते प्रत्यक्षात घडण्याच्या ३७ वर्षे आधी करण्यात आले होते. तिघा इतिहासकारांनी येशू ख्रिस्ताच्या त्या शब्दांची नोंद केली आहे की, “पाडला जाणार नाही असा दगडावर दगड येथे राहणार नाही.” (लूक २१:६; मत्तय २४:१, २; मार्क १३:१, २) यानंतर जे संभाषण झाले ते आज आम्हा सर्वांवर होय, तुम्हावरही व्यक्तीगत परिणाम करणारे आहे.
“गुरुजी,” त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “ज्या काळी या गोष्टी होणार त्या काळाचे चिन्ह काय?” येशूच्या मते मंदिराचा नाश होण्याआधीचा काळ युद्धे, धरणीकंप, अन्नटंचाई आणि मऱ्या या गोष्टींनी चिन्हांकित होणार होता. “सर्व गोष्टी पूर्ण होत तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही,” अशी पुस्तीही त्याने जोडली.—लूक २१:७, १०, ११, ३२.
त्या पिढीला या “चिन्ह” याच्या पूर्णतेचा अनुभव आला का? होय. पवित्र शास्त्र, एक “मोठा दुष्काळ” पडल्याचे तसेच तीन धरणीकंपांचा, त्यांच्यापैकी दोन “मोठे भूकंप” घडल्याचा उल्लेख करते. (प्रे. कृत्ये ११:२८; १६:२६; मत्तय २७:५१; २८:१, २) प्रापंचिक इतिहासानुसार त्या काळात इतरही भूकंप व दुष्काळ घडल्याचा उल्लेख आहे. तो युद्धकाळही होता, त्यांच्यापैकी दोन युद्धे रोमी सैन्यांनी यरुशलेम रहिवाशांसोबत लढविली. यरुशलेमास दुसऱ्या वेळी जो वेढा पडला होता त्यामुळे भयानक दुष्काळ व मरी पसरली होती; जी इ.स. ७० मध्ये शहराचा व मंदिराचा नाश होईपर्यंत चालू होती. ज्या स्थळी मंदिर उभे होते ते यरुशलेमातील स्थळ, पहिल्या शतकातील त्या भयानक घटनांचा एक मूक साक्षीदार म्हणून उभे आहे.
‘केवढे चित्तवेधक!’ असे कोणीही म्हणून जाईल, ‘पण हे सर्व मजवर कसे परिणाम करणारे ठरते?’ ते या अर्थी की, हे चिन्ह, केवळ एक गतकालीन इतिहास नव्हे. त्याची केवळ काही अंशी पहिल्या शतकात पूर्णता झाली. उदाहरणार्थ, येशूने अशाही काळाबद्दल भाकित केले होते ज्यात मनुष्ये “सूर्य, चंद्र व तारे यातील चिन्ह” यामुळे व “समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने” भयभीत होतील. चिन्हमधील या भागाची पूर्तता, “देवाचे राज्य” जे सरकार या जगाच्या सर्व अरिष्टापासून कायमची सुटका पुरवील ते अगदी जवळ आल्याचे चिन्ह असेल.—लूक २१:२५-३१.
अशा गोष्टी पहिल्या शतकात घडल्या नाहीत. आज, १,९०० वर्षांनंतरही मानवजात अद्याप युद्धे, भूकंप, अन्नटंचाई व मऱ्यापासून सुटका मिळविण्यासाठी थांबून आहे. या कारणास्तव “चिन्ह” याची संपूर्ण द्वितीय पूर्णता होण्याचे अद्याप बाकी आहे. या गोष्टी लक्षात घेऊनच प्रकटीकरणाचे पुस्तक अशी भविष्यवादित चित्रे दाखविते, जी या चिन्हाशी जुळती आहेत. तरीही या चित्रांचे लिखाण यरुशलेमाच्या नाशानंतर झालेले आहे. (प्रकटीकरण ६:१-८) अशाप्रकारे, आता हा प्रश्न उद्भवतो की, हे चिन्ह आमच्या दिवसात पाहण्यात आले का?