वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १०/१५ पृ. ५-८
  • भय—आता सर्वसामान्य पण सर्वकाळासाठी नाही!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भय—आता सर्वसामान्य पण सर्वकाळासाठी नाही!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • युद्धाचे उचित भय
  • पृथ्वीची आणि तिच्यावरील जीविताची आणखी नासाडी
  • हे आणखी बिकट होईल की सुधारेल?
  • तुम्ही वेळ निघून गेल्यावर विचार करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • “जगाचा शेवट” अगदी जवळ आला आहे!
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • यहोवाचे भय धरा व त्याच्या पवित्र नामाचे गौरव करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • “ह्‍या गोष्टी केव्हा होतील ते आम्हास सांगा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १०/१५ पृ. ५-८

भय—आता सर्वसामान्य पण सर्वकाळासाठी नाही!

देवाच्या वचनाच्या विद्यार्थ्यांना, भय इतके सर्वसामान्य आहे याबद्दल आश्‍चर्य वाटत नाही. यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या सेवेत विस्तृत प्रमाणात प्रचार केल्याप्रमाणे, आपण मानव इतिहासातील एका उल्लेखनीय काळात जगत असल्याचा भरमसाठ पुरावा मिळतो. तुम्हाला माहीत आहे, की हा काळ सार्वत्रिक भयामुळे उल्लेखनीय आहे. पण खूप काळाआधी येशूने आपल्या काळास चिन्हित केले किंवा त्याकडे अंगुली दर्शवली. त्याच्या उपस्थितीबद्दल आणि व्यवस्थीकरणाच्या समाप्तीबद्दल किंवा ‘युगाच्या समाप्तीबद्दल’ त्याच्या शिष्यांनी त्याला विचारलेल्या प्रश्‍नांचे तो उत्तर देत होता.—मत्तय २४:३.

येशूने जे भाकीत केले त्याचा काही भाग येथे दिला आहे:

“राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल; मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मऱ्‍या येतील व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील.”—लूक २१:१०, ११.

‘भयंकर उत्पातांविषयी’ त्याने केलेल्या विवेचनाची तुम्ही नोंद घेतली का? त्यानंतर त्याच उत्तरामध्ये येशूने भयाबद्दल आणखी एक महत्त्वाची आलोचना केली जिचा परिणाम तुमच्यावर किंवा तुमच्या प्रिय जनांवर थेट व निर्णायकरीत्या असू शकेल. परंतु त्याकडे लक्ष देण्याआधी, आपण शेवटल्या दिवसांमध्ये राहात आहोत याबद्दल आणखी काही पुराव्यांची संक्षिप्त उजळणी करू या.—२ तीमथ्य ३:१.

युद्धाचे उचित भय

सैनिकी संघर्षांनी पृथ्वीच्या पुष्कळ भागांचा नाश केला आहे. उदाहरणार्थ, अलीकडील मध्य पौर्वात्य संघर्षाच्या अंताला जळत ठेवलेल्या तेलाच्या विहिरींना, जिओ नावाच्या एका नियतकालिकाने “मानवाने पीडित झालेली सर्वात मोठी पर्यावरणाची आपत्ती” असे नाव दिले. युद्धांनी कोट्यावधी लोकांना ठार मारले किंवा अपंग केले आहे. पहिल्या जागतिक महायुद्धातील लाखो सैनिकांच्या आणि नागरिकांच्या मृत्यूव्यतिरिक्‍त, ५.५ कोटी लोक दुसऱ्‍या जागतिक महायुद्धात ठार मारले गेले. जगाचा अंत नजीक असल्याच्या चिन्हाचा भाग म्हणून “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल” असे येशू म्हणाला होता याची आठवण करा.

संपूर्ण जातीचा किंवा लोकांचा नाश म्हणजेच, जातीयसंहार करण्याच्या मानवाच्या प्रयत्नांकडेही आपण दुर्लक्ष करू शकणार नाही. लाखो अर्मेनियन, कॅम्बोडियन, यहुदी, रवांडन, युक्रेनियन आणि इतर लोकांच्या मृत्यूने, २० व्या शतकादरम्यान मानवजातीच्या थक्क करणाऱ्‍या रक्‍तपातात आणखी भर घातली आहे. धार्मिक अतिमार्गी जेथे जातीय द्वेषाला उत्तेजन देतात तेथे ही कत्तल सतत चालू आहेच. होय, युद्धे अजूनही पृथ्वीला मानवी रक्‍ताने रक्‍तरंजित करत आहेत.

आधुनिक युद्धे, लढाई झाल्यानंतरही अनेक लोकांना बळी पाडतात. उदाहरणार्थ, सुरुंगांच्या अविचारीपणे होत असलेल्या पेरणीचा विचार करा. मानवी हक्कांची टेहळणी, या संशोधन संघटनेच्या एका अहवालानुसार, “संपूर्ण जगभरातील नागरिकांना सुमारे दहा कोटी स्फोटकांची भीती आहे.” ज्या युद्धामध्ये अशा प्रकारच्या स्फोटकांचा उपयोग करण्यात आला होता ती युद्धे समाप्त होऊन कैक वर्षे उलटून गेली तरी ती स्फोटके निरपराध पुरुष, स्त्रिया आणि मुलांना घातक ठरतात. असे म्हटले जाते, की प्रत्येक महिन्यांत ६० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये हजारो लोक स्फोटकांमुळे अपंग होतात किंवा ठार मारले जातात. जीवघेण्या किंवा गंभीर दुखापत करणाऱ्‍या भीतीला पद्धतशीररीत्या का काढले जात नाही बरे? “स्फोटके काढून टाकण्याच्या कार्यहालींमध्ये प्रत्येक दिवशी जितके सुरुंग निकामी केले जातात त्यापेक्षा अधिक प्रमाणात ते पेरले जातात, म्हणूनच मृतांची संख्या सतत वाढत आहे,” अशी द न्यूयॉर्क टाईम्सने नोंद केली.

१९९३ च्या त्या वृत्तपत्रकातील लेखाने अहवाल दिला, की ही स्फोटके विकणे एक व्यापार झाला जो “वर्षाला $२० कोटी मिळवून देतो.” असा व्यापार करणाऱ्‍यांमध्ये, “४८ राष्ट्रांतील सुमारे १०० कंपन्या आणि सरकारी एजन्सी आहेत” ज्या “३४० विविध प्रकारच्या स्फोटकांची निर्यात करतात.” मुलांना आकर्षित करण्यासाठी काही स्फोटके खेळण्यांप्रमाणे बनवली जातात, किती अघोर कृत्य! अपंग करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी मुद्दामहून मुलांना लक्ष्य बनवले जाते याची जरा कल्पना करा! “दहा कोटी प्राणघातक स्फोट करणारे यंत्र” असे शीर्षक असलेल्या एका अग्रलेखाने दावा केला, की स्फोटकांनी रासायनिक युद्ध, जीवाणुयुद्ध किंवा आण्विक युद्धाने केले त्यापेक्षा “अधिक लोकांना अपंग केले आहे किंवा ठार मारले आहे.”

पण जगाच्या बाजारपेठेत प्राणघातक वस्तूंपैकी केवळ सुरुंगच विकले जात नाहीत. शस्त्रांचे लालची व्यापारी संपूर्ण जगभरात अब्जावधी रुपयांची उलाढाल होत असलेला व्यापार करत आहेत. संरक्षण माहितीच्या केंद्राने प्रकाशित केलेल्या द डिफेन्स मॉनिटर या नियतकालिकाने असा अहवाल दिला: “गेल्या संपूर्ण दशकात [एका प्रमुख राष्ट्राने] $१३५ अब्ज किंमतीची शस्त्रे निर्यात केली.” याच शक्‍तिशाली राष्ट्राने “आश्‍चर्यचकित करणारी $६३ अब्ज शस्त्रांची विक्री, सैनिकी बांधकाम आणि १४२ राष्ट्रांना प्रशिक्षण देण्याची मान्यता देखील दिली.” अशा प्रकारे भावी युद्धासाठी आणि मानवी दुःखासाठी बीज पेरले जात आहेत. द डिफेन्स मॉनिटर नुसार “केवळ १९९० या वर्षामध्ये, युद्धामध्ये शस्त्रांचा उपयोग करण्यासाठी ५० लाख लोकांना प्रशिक्षण देण्यात आले, $५० अब्जापेक्षा अधिक खर्च करण्यात आले आणि २.५ लाख लोक ठार झालेत ज्यांमध्ये बहुतेक नागरिकच होते.” त्या वर्षानंतर ज्या असंख्य युद्धांच्या उद्रेकामुळे आणखी लाखो लोक भयभीत झाले आणि मरण पावले त्यांचा तुम्ही विचार करू शकता!

पृथ्वीची आणि तिच्यावरील जीविताची आणखी नासाडी

प्राध्यापक बॅरी कॉमनर ताकीद देतात: “मला वाटते, की जर पृथ्वीवरील हे प्रदूषण असेच होत गेले आणि त्याची कोणीही पर्वा केली नाही तर मानवी जीवनाकरता असलेली या ग्रहाची पात्रता हळूवारपणे नाश होईल.” ते पुढे म्हणाले, की खरी समस्या ही अज्ञानता नसून हेतुपुरस्सर स्वार्थ ही आहे. आपला न्यायी आणि प्रेमळ देव, अशी परिस्थिती अनिश्‍चितपणे सहन करून आपल्यामध्ये प्रदूषणाची भीती वाढत राहण्यासाठी आपल्याला वाऱ्‍यावर सोडून देईल असे तुम्हाला वाटते का? पृथ्वीची नागवणूक, या ग्रहाची नागवणूक करणाऱ्‍यांचा जाब घेण्याची व त्यानंतर ईश्‍वरी पुनर्वसनाची मागणी करते. येशूने ‘जगाच्या शेवटाविषयी’ त्याच्या शिष्यांना दिलेल्या उत्तरात त्याने ज्याविषयी सांगितले त्याचा हा एक भाग आहे.

देव हा जाब कशाप्रकारे घेईल याचा विचार करण्याआधी आपण मानवी अहवालांचे पुढे परीक्षण करू या. मानवाच्या भ्रष्टीकरणाची आंशिक यादी देखील दुःखित करणारी आहे: आम्लवृष्टी आणि संपूर्ण जंगलाचा सत्यानाश करणारी लोभी जंगलतोडीची कृत्ये; आण्विक कचरा, विषारी रसायने आणि कच्चा मैला निष्काळजीपणे टाकून देणे; संरक्षक ओझोन थर दुर्बल होणे; आणि वनस्पती औषधांचा आणि कीटनाशकांचा निष्काळजी वापर.

वाणिज्य हित, नफा मिळवण्यासाठी इतर मार्गांनी पृथ्वीची नासाडी करत आहेत. दररोज पुष्कळ टन कचरा नद्यांमध्ये, समुद्रांमध्ये, हवेत आणि जमिनीवर टाकला जातो. शास्त्रज्ञ, अंतरिक्षातील केरकचऱ्‍याने आकाश अस्वच्छ करीत आहेत आणि तसे म्हटले तर तो कचरा नंतर स्वतः सावडतही नाहीत. पृथ्वी ही अंतरिक्षातील कचऱ्‍याच्या ढीगाने फार वेगाने घेरली जात आहे. पृथ्वी नैसर्गिक प्रक्रियेने स्वतःचे नविनीकरण करू शकेल अशा प्रकारे देवाने तिला बनवले नसते, तर आपल्या ह्‍या पार्थिव गृहाने जीवनाला आधार दिला नसता व त्याने स्वतःहून केलेल्या कचऱ्‍यात मानव केव्हाचाच गुदमरून गेला असता.

मानव स्वतःचे देखील प्रदूषण करतो. तंबाखू आणि इतर मादक पदार्थांच्या दुरुपयोगाचे उदाहरण घ्या. अमेरिकेत, अशा प्रकारच्या पदार्थांच्या दुरुपयोगाला “राष्ट्राची प्रमुख आरोग्य समस्या” असे नाव दिले आहे. यासाठी त्या राष्ट्राला दर वर्षी $२३८ अब्ज खर्च करावे लागतात, त्यापैकी $३४ लाखो अब्ज “अनावश्‍यक [जी टाळता येऊ शकते] आरोग्य निगा” यावर खर्च केले जातात. तुम्ही ज्या राष्ट्रात राहता तेथे जीवित हानीच्या रूपात तंबाखूसाठी किती किंमत द्यावी लागते याबद्दल तुमचा काय विचार आहे?

अनेकांनी योग्य असल्याचा आग्रह धरलेल्या अनिर्बंधित आणि विचलित जीवनशैलींनी, घाबरवून टाकणारे प्राणघातक लैंगिकरित्या संक्रमित आजार उत्पन्‍न केले आहेत ज्यामुळे पुष्कळांना अकाली मृत्यू आला. मोठमोठ्या शहरातील वृत्तपत्रातील मृत्यूलेख स्तंभांमध्ये, वयाच्या ३० व्या किंवा ४० व्या वर्षीच मरण पावल्यांची संख्या वाढत चालली आहे असे निरीक्षणात आले. का बरे? कारण त्यांच्या नाशकारक सवयींनी त्यांना मृत्यूला बळी पाडले. लैंगिक आणि इतर आजारांमधील ही घातक वाढ येशूच्या भविष्यवाणीशी देखील जुळते कारण त्याने म्हटले होते की “जागोजाग मऱ्‍या येतील.”

परंतु सर्वात वाईट प्रदूषण तर मानवाच्या मनाचे आणि वृत्तीचे किंवा मनोवृत्तीचे आहे. आतापर्यंत सांगितलेल्या सर्व प्रदूषणाच्या रूपांची तुम्ही उजळणी केल्यास, त्यांतील बहुतेक प्रदूषित मनामुळे झाले आहे हे खरे नव्हे का? रोगट मनांनी, खून, बलात्कार, चोऱ्‍या व एक व्यक्‍ती दुसऱ्‍या व्यक्‍तीवर करते अशा इतर प्रकारच्या हिंसेच्या रूपांत जो नाश करतात तो पहा. तसेच दरवर्षी जे लाखो गर्भपात केले जातात ते मानसिक आणि आध्यात्मिक प्रदूषणाचे चिन्ह आहेत हे अनेकांना माहीत आहे.

आपण तरुणांच्या मनोवृत्तीत पुष्कळ काही पाहतो. पालकीय आणि इतर अधिकारांचा अनादर, कौटुंबिक बिघाड आणि कायदा व व्यवस्थेच्या अवज्ञेला हातभार आहे. अधिकाराबद्दल हितकर भयाच्या उणिवेचा थेट संबंध तरुणाच्या आध्यात्मिकतेच्या उणिवेशी आहे. यास्तव, उत्क्रांतीवाद, नास्तिकवाद आणि विश्‍वासाचा नाश करणाऱ्‍या इतर कल्पना यासाठी मोठ्या प्रमाणात दोषी आहेत. यासोबत, धार्मिक शिक्षक देखील दोषास पात्र आहेत कारण त्यांनी आधुनिक आणि “उचित” असे स्वीकारले जाण्याच्या प्रयत्नात जाणूनबुजून देवाच्या वचनाकडे पाठ फिरवली आहे. ते आणि जगाच्या ज्ञानामुळे प्रभावित झालेले इतर, विरोधाभासात्मक मानवी तत्त्वज्ञान शिकवतात.

परिणाम आज स्पष्ट दिसतात. लोक, देवाच्या आणि सहमानवाच्या प्रीतीने प्रवृत्त होत नाहीत तर स्वार्थ आणि द्वेषाने प्रवृत्त होतात. त्याचे वाईट प्रतिफळ, सर्वत्र दिसणारी अनैतिकता, हिंसा आणि हताशा हे आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे, या गोष्टींमुळे इमानदार लोकांमध्ये भीती उत्पन्‍न होते, यामध्ये मानव स्वतःचा आणि ग्रहाचाही नाश करील अशा भयाचाही समावेश आहे.

हे आणखी बिकट होईल की सुधारेल?

भयासंबंधी नजीकच्या भवितव्यामध्ये काय राखले आहे? भय वाढतच राहील; की त्याच्यावर मात केली जाईल? येशूने त्याच्या प्रेषितांना काय म्हटले याची आपण पुन्हा एकदा नोंद घेऊ या.

नजीकच्या भवितव्यात असलेल्या एका गोष्टीकडे त्याने अंगुली दर्शवली—मोठे संकट. हे पाहा त्याचे शब्द: “त्या दिवसांतील संकटानंतर लागलेच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल; मग पृथ्वीवरील सर्व जातींचे लोक शोक करितील; आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील.”—मत्तय २४:२९, ३०.

तेव्हा, मोठ्या संकटाची सुरवात लवकरच होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. इतर बायबल भविष्यवाण्या सूचित करतात की मोठ्या संकटाचा पहिला भाग, संपूर्ण पृथ्वीवरील खोट्या धर्माचा बदला हा असेल. त्यानंतर आत्ताच उल्लेखलेले धक्कादायक विकास होतील ज्यामध्ये कोणत्यातरी प्रकारच्या स्वर्गीय घटनेचा समावेश असेल. कोट्यावधी लोकांवर त्याचा काय परिणाम होईल?

येशूच्या उत्तराच्या समांतर असलेल्या एका अहवालाचा विचार करा जेथे आपल्याला भविष्यसूचक विस्तारीत विवेचने मिळतात:

“तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्‍यांत चिन्हे घडून येतील, आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा ह्‍यांच्या गर्जनेने राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील; भयाने व जगावर कोसळणाऱ्‍या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील. आकाशातील बळे डळमळतील.”—लूक २१:२५, २६.

ते आपल्यासमोर आहे. परंतु तेव्हा सर्वच लोक मरणोन्मुख होईपर्यंत घाबरी होणार नाहीत. उलटपक्षी, येशू म्हणाला: “ह्‍या गोष्टींस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे.”—लूक २१:२८.

हे उत्तेजक शब्द त्याने त्याच्या खऱ्‍या शिष्यांना उद्देशून म्हटले. भयाने बेशुद्ध किंवा गर्भगळीत होण्याऐवजी, मोठ्या संकटाचा शेवट जवळ येऊन ठेपलेला आहे हे माहीत असूनही त्यांची डोकी वर करण्याचे त्यांच्याकडे कारण होते. का बरे त्यांना भय वाटत नाही?

कारण या संपूर्ण ‘मोठ्या संकटातून’ उत्तरजीवी असतील असे बायबल स्पष्टपणे सांगते. (प्रकटीकरण ७:१४) याचे अभिवचन देणारा वृत्तान्त म्हणतो, की उत्तरजीवी लोकांपैकी आपण एक असलो तर देवाकडून येणाऱ्‍या अतुल्य आशीर्वादांचा आनंद लुटू शकतो. तो अहवाल समारोपाला अशी खात्री देतो की येशू “त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ नेईल; आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.”—प्रकटीकरण ७:१६, १७.

अशा आशीर्वादांचा आनंद लुटतात त्यांना—आणि यांच्यामध्ये आपला देखील समावेश होऊ शकतो—आज लोक ज्या भयाने पीडित होत आहेत ते भय नसेल. तरीही, त्यांना कोणत्याच प्रकारचे भय नसेल असा याचा अर्थ होत नाही कारण एक चांगले आणि सुदृढ भय असल्याचे बायबल दाखवते. ते कोणते आहे आणि त्याचा आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे याबद्दल पुढील लेखात सांगितले आहे.

[८ पानांवरील चित्रं]

यहोवाचे उपासक येणाऱ्‍या नव्या जगाची आनंदाने वाट पाहत आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा