वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १/१ पृ. ४-७
  • चिन्ह—तुम्ही ते पाहिले आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चिन्ह—तुम्ही ते पाहिले आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • चिन्ह नवे जग जवळ असल्याचा पुरावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • “जगाचा शेवट” अगदी जवळ आला आहे!
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १/१ पृ. ४-७

चिन्ह—तुम्ही ते पाहिले आहे का?

“समुद्राच्या पृष्ठभागापासून अगदी खोलवर वर्तुळाकार नाकाची लांबचलांब पाणबुडी, वादळी हवेमुळे पृष्ठभागी खळवळणाऱ्‍या लाटांना दाद न देता, निवांत उभी आहे. पाणबुडीच्या डेकवरील एक दार उघडते आणि एक ३० फूट लांबीचे आणि ४ १/२ फूट जाडीचे रॉकेट बाहेर पडते व वर पृष्ठभागाकडे जाऊ लागते. पंख्यांच्या अश्‍वशक्‍तीद्वारा या रॉकेटला वर, वर ढकलले जाते. पण समुद्राच्या पृष्ठभागी पोहंचताच त्याच्या इंजिनाला स्फोटक वायुमिश्रणाच्या ठिणगीने पेटविले जाते आणि मोठ्या गर्जनेसह रॉकेट पाण्यातून बाहेर झेप घेते.”

पाणबुडीवरुन अस्रांचे जे दूरक्षेपण केले जाते तिचे हे वर्णन, रॉकेटस्‌, मिजायल्स ॲण्ड स्पेसक्राफ्ट या मार्टीन किनलिखित पुस्तकातून आहे, जे एका अशा प्राचीन भविष्यवादास अर्थ जोडते ज्यात भाकित होते की, “समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने” जगावर कठीण काळ येईल. (लूक २१:२५) प्रत्यक्षात, या दूरक्षेपणीय अग्निबाणसज्ज पाणबुड्याकडून केवढा मोठा धोका आज सर्वांसमोर ठाण मांडून आहे?

जेन्स फायटिंग शीप्स १९८६-८७ या पुस्तकाच्या आधारे ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया, व अमेरिका यांच्यापाशी अशा १३१ दूरक्षेपण अस्रांच्या पाणबुड्या लष्करी सेवेत आहे. कोणतेही शहर त्यांच्या टप्प्यापलिकडील नाही, आणि ही शुद्धशस्त्रे त्याच्या निशाणाच्या मैलभराच्या परिसातच आदळणार. काही तर स्वतःसोबत एवढी युद्धशस्त्रे बाळगून असतात की, “५,००० मैलांच्या टापूतील कोणाही राष्ट्रास सहज पूर्णपणे उद्‌ध्वस्त करता येईल,” असे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्‌ चे मत आहे. याहीपेक्षा अधिक वाईट म्हणजे, काहींचा असा दावा आहे की, एका दूरक्षेपण शस्त्रयुक्‍त पाणबुडीवर एवढे प्रचंड भांडार असते, जे सबंध पृथ्वीवरील जीवनावर एवढे मोठे संकट आणू शकते जे जणू अणूशस्त्राच्या हिवाळ्यासमान असेल! दूरवरच्या पाणबुड्यांवर नियंत्रण ठेवणे मुष्कीलीचे आहे. तर आता हा भयगंड समोर उभा आहे की जर एखाद्या पाणबुडीवर उतावळीकतेत एखादा अविचारी निर्णय घेतला तर एका सर्वनाशक अणूशस्त्र युद्धाचा स्फोट होईल.

अनेकांनी अशा भयग्रस्त संभाव्यतेचा संबंध येशूच्या भविष्यवादित चिन्हासोबत जोडला आहे. त्या चिन्हाची पूर्णता आमची पिढी अनुभवीत असण्याची शक्यता आहे का? वास्तविकता उत्तरते, होय. आणि याचाच अर्थ, अणुशस्त्र युद्धाच्या भयापासूनची सुटका जवळ आली आहे. (लूक २१:२८, ३२) एवढे आशावादी भविष्य सोबत असता, आम्ही आपणास निमंत्रण देतो की, या चिन्हाच्या पूर्णतेचे जे पुरावे हाती आहेत ते आपण विचारात घ्यावे. या चिन्हाचे काही चटकन लक्षात येणारे मुख्य भाग त्यांच्या आधुनिक पूर्णतेसह येथे देत आहोत.

“राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल.” (लूक २१:१०)

१९१४ पासून १०,००,००,००० पेक्षा अधिक लोक युद्धात मृत्युमुखी पडले आहेत. पहिल्या जागतिक महायुद्धाची सुरवात १९१४ मध्ये झाली होती व त्यात २८ राष्ट्रे सामील झाली होती, शिवाय त्या काळी ज्या अनेक युरोपियन प्रादेशिक वसाहती होत्या त्यांची यात मोजणी केलेली नाही. अगदीच थोडके देश तटस्थ राहिले होते. त्यात १,३०,००,००० पेक्षा अधिक जणांची हत्या झाली व २,१०,००,००० पेक्षा अधिक सैन्य जखमी झाले. यानंतर दुसरे जागतिक महायुद्ध झाले, जे त्याहीपेक्षा अनेक पटीने अधिक विध्वंसक ठरले. आणि याच्यानंतर? दक्षिण आफ्रिकेच्या द स्टार वर्तमानपत्राने लंडनच्या संडे टाइम्स पाक्षिकाचा हवाला देऊन, “वॉर्स ऑफ द वर्ल्ड” या लेखात म्हटलेः “जगभरातील राष्ट्रापैकी पाव हिश्‍यात अलिकडे युद्धक्षेत्रे माजली आहेत.”

“मोठे भूमिकंप . . . होतील.” (लूक २१:११)

स्टॅनफोर्ड येथील महाविद्यालयाचे प्राध्यापक गेर आणि शाह हे, त्यांचे पुस्तक, टेरा नॉन फर्मा यात ज्या १६४ “उल्लेखनीय भूकंपाची” यादी देऊन आहेत, जे गतकाळातील तीन हजार वर्षांच्या कालावधीत “सबंध जगभरात” घडले. या संख्येपैकी ८९ तर १९१४ पासून घडले, ज्यात १०,४७,९४४ लोकांची नोंदणीनुसार हानी झाली. या यादीमध्ये केवळ प्रमुख भूकंपाचा समावेश आहे. तसे पाहता टेरा नॉन फर्मा या पुस्तकाचे १९८४ मध्ये प्रकाशन झाल्यापासून चिले, रशिया आणि मेक्सिको या देशात प्रचंड हानीकारक भूकंप घडले, ज्यांच्या परिणामामुळे अधिक हजारो जन मृत्युमुखी पडले.

“जागोजागी . . . मऱ्‍या होतील.” (लूक २१:११)

१९१८ मध्ये एका प्राणघातक पिडेने मनुष्यजातीला घेरले होते. तिला स्पॅनिश फ्ल्यु म्हटले जाई व ती सेंट हेलिना बेटाशिवाय वस्ती असलेल्या प्रत्येक स्थळी पोहंचली होती व तिने चार वर्षांच्या महायुद्धापेक्षा कैकपटीने अधिक लोकांचे बळी घेतले. त्या काळापासून मध्यंतरात वैद्यकीय शास्त्राने केवढी महान प्रगति केली आहे; तरी सावळागोंधळ आहेच. लॅनसेट स्पष्टीकरण देतेः “नियमितपणे लैंगिकतेद्वारा संचलित होणारे आजार, (एस.टी.डी) हे त्या संसर्गजन्य रोगांच्या सर्वसाधारण पण लक्षवेधक गटात सामील झाल्याने वैद्यकीय इलाजात सावळागोंधळ झालेला आहे. . . . एकेकाळी लैंगिकतेच्या संसर्गित आजारांना सहज काबूत आणू असे वाटे पण अलिकडील वर्षात त्याने हातावर तुरी दिल्यासारखे दिसते.”

तसे तर इतरही संसर्गजन्य साथीचे रोग आहेत, ज्यांच्यावर अद्याप आधुनिक वैद्यकीय औषधांना आपला ताबा बसविता आला नाही, जसे की, कॅन्सर (कर्करोग), व कोरोनरी आर्टरी (रक्‍तवाहिन्यात खराबी झाल्यामुळे होणारे) हृदयविकार यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फॅमिली प्रॅक्टीस या मासिकाने या दुसऱ्‍या रोगाबद्दल म्हटलेः “हे एक नवीन अपूर्व संकट आहे . . . पहिल्या महायुद्धानंतरच्या काळातील समाजातील दुषित वातावरणाचे हे परिणाम आहेत.” ब्रिटनमध्ये हृदयरोग आणि रक्‍तदाब वाढणे हे मृत्युसंख्या वाढण्यामागील मुख्य कारणे आहेत, असे कारडिओव्हॅसक्युलर अपडेट—इनसाईट इनटू हार्ट डिजीज या पुस्तकाच्या आधारे कळते. ते पुढे म्हणतेः “याच्यावर नियंत्रण साधण्यात फारच थोडी प्रगति साध्य झाली आहे.”

प्रगतिपर राष्ट्रात, आजही लक्षावधी लोक मलेरिया, झोपेचा आजार, बिल्हाजेरिया व यासारख्या इतर अनेक रोगांनी पिडीत आहेत. अधिक वाईट गोष्ट ही की, अतिसार (डायरिया) हा जगभरात घोर प्राणघातक ठरला आहे. मेडिसिन इंटरनॅशनल हे मासिक स्पष्ट करते की, “असे अनुमान काढण्यात आले की, आशिया, आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकेतील बालवर्ग व लहान लेकरे यात ५० कोटींना अतिसार जडतो आणि दर वर्षाला ५ ते १८ दशलक्ष बालके या भयानक पीडेस बळी पडतात.”

“जागोजागी दुष्काळ [अन्‍नटंचाई] . . . होईल.” (लूक २१:११)

अन्‍नटंचाई साधारणपणे युद्धाच्या सोबतीत असते. पहिले जागतिक महायुद्ध याला अपवाद नव्हते. त्याची सुरवात होताच भयानक दुष्काळ पडला. आणि त्यानंतर? एक खास पत्रक द चॅलेंज ऑफ इंटरनॅशनलीझम—फॉर्टी इयर्स ऑफ युनायटेड नेशन्स (१९४५-१९८५) यात म्हटले आहेः “१९५० मध्ये १६,५०,००० लोक अयोग्य व अपुऱ्‍या आहाराचे शिकार होते, तर १९८३ मध्ये हा आकडा २२,५०,००० वर पोहंचला; म्हणजेच ६ कोटींची त्यात भर पडली, किंवा ३६ टक्के वाढ झाली.” आफ्रिकेत अलिकडेच अवर्षणामुळे केवढा महान व उद्‌ध्वस्त करणारा दुष्काळ पडला होता. “एका वर्षात,” न्यूजवीक मासिक म्हणतेः “सुमारे १० लक्ष इथोपियन खेडूत आणि ५ लक्ष सुदानी लेकरे मेली.” इतर देशातही हजारो, हजारोंच्या संख्येने मेली.

“भयंकर उत्पात व मोठी चिन्हे आकाशातून होतील. तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यात चिन्हे होतील, आणि समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्रे पृथ्वीवर घाबरी होऊन पेचात पडतील. भयाने व जगावर येणाऱ्‍या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्ये मूर्च्छिंत होतील.” (लूक २१:११, २५, २६)

पहिल्या जागतिक महायुद्धाने काही नवीन व भयानक शस्त्रे सादर केली. आकाशातून विमाने आणि हवाई-जहाजे खालच्यांवर बॉम्बचा आणि गोळ्यांचा मुसळधार वर्षाव करू लागली. याहीपेक्षा अत्यंत भयानक प्रकार, की दुसऱ्‍या जागतिक महायुद्धात असहाय्य नागरिकांवर वरुन गोळ्यांचा एवढेच नव्हे तर दोन ॲटम बॉम्बचाही वर्षाव करण्यात आला.

समुद्रातही एक नवीन भयानक दृश्‍य दिसत आहे. पहिल्या महायुद्धाच्या सुरवातीस पाणबुड्या अगदी कःपदार्थ वाटत होत्या; पण तेच दुसऱ्‍या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत त्यांनी दहा हजारांपेक्षा अधिक जहाजांना बुडविले. “व्यापारी जहाजे तसेच [प्रवासी] बोटींनाही कोणाही प्रकारचा इशारा न देता या नवीन आणि भयानक ‘संपूर्ण युद्ध’ पद्धतीतील एक भाग म्हणून उद्‌ध्वस्त केले जाई,” असे नॉर्मन फ्रेडमन आपल्या सबमरीन डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट या पुस्तकात म्हणतात.

[७ पानांवरील चौकट]

चिन्ह—याचा काय अर्थ होतो?

या २० व्या शतकाच्या ऐतिहासिक प्रकाशात चिन्ह पडताळून पाहिल्यानंतर लक्षावधी लोकांस त्याच्या परिपूर्णतेची खात्री पटलेली आहे. (मत्तय २४ व मार्क १३ हे अध्यायही पहा.) १९१४ ची ही पिढी चिन्हांकित पिढी आहे, हीच ती पिढी जी येशूच्या शब्दांच्या द्वितीय पूर्णतेत गोविलेली आहे की, “सर्व गोष्टी पूर्ण होत तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.” (लूक २१:३२) “सर्व गोष्टी” यात, मनुष्यजातीची, सद्य गुंतागुंतीच्या परिस्थितीतून व हरप्रकारच्या अडचणींतून सुटका होणे हेही समाविष्ट आहे.

येशूने त्याच्या अनुयायांना ही हमी दिली की, “या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा नीट उभे रहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमची मुक्‍तता समीप आली आहे. . . . तसेच या गोष्टी होताना पहाल तेव्हा देवाचे राज्य जवळ आले आहे असे समजा.” देवाचे राज्य जे अखिल जगावर अधिकार चालविणारे अतिमनुष्य सरकार आहे, ते या पृथ्वीचे रुपांतर गोर्लाधव्याप्त नंदनवनात करील. यास्तव, जसे चिन्ह हे खरे ठरले त्याच खात्रीने सुटका ही नक्की येणार!—लूक २१:२८, ३१; स्तोत्रसंहिता ७२:१-८.

आपण कदाचित हे भविष्यवादित चिन्ह अद्याप विचारात घेतले नसेल. आम्ही आपणास उत्तेजन देतो, यापुढेही देववचनांचे संशोधन सतत करीत राहा. तसे केल्यानेच मानवजातीकरता देवाचे जे हेतु आहेत त्यांची अधिक चांगली ओळख होईल. याप्रकारे आपण शिकाल की, ज्यांची तो पृथ्वीवर स्थापित होणाऱ्‍या नंदनवनात प्रवेश मिळविण्याकरता ‘मुक्‍तता’ करणार अशांकडून यहोवा देव काय अपेक्षित असतो.—स्तोत्रसंहिता ३७:१०, ११; सफन्या २:२, ३; प्रकटीकरण २१:३-५.

आज अनेकांच्या मते दूरक्षेपण अग्नीबाण सुसज्ज पाणबुड्या जगातील महत्त्वपूर्ण जहाजे आहेत. अग्नीबाणवाहक वेगवान पाणबुड्या, विमानवाहू बोटी आणि इतर युद्धनौकातूनही नाशकारक शस्त्रे मोठ्या प्रमाणात संग्रहीत असतात. जेन्स फायटींग शिप्स १९८६-८७ नामे पुस्तकानुसार, ९२९ पाणबुड्या, ३० विमानवाहू बोटी, ८४ टेहळणीच्या वेगवाने युद्धनौका, ३६७ विनाशिका, ६७५ लढाऊ गलबते, २७६ कॉर्व्हटस्‌, २,०२४ वेगवान हल्ला करणाऱ्‍या जहाजांचा ताफा शिवाय इतर हजारो लष्करी जहाजे ५२ राष्ट्रांच्या संचलित लष्करी सेवेत आहेत. यांनाच जोडून त्या असंख्य सुरुंग पेरणाऱ्‍या नावा आहेतच. यापूर्वी कधीही मनुष्याकरवी समुद्रात एवढ्या भयानक “गर्जना” झाल्या नव्हत्या.

मनुष्याने “सूर्य, चंद्र व तारे” यांच्याही क्षेत्रात प्रवेश केला आहे. दूरक्षेपण अग्नीबाण शस्त्रे, त्यांच्या निशाणावर मारा करण्याआधी, प्रथम अंतराळात झेप घेऊन मग खाली कोसळतात. विविध प्रकार व आकारांच्या यानांनी सूर्यमालिकेत प्रवेश मिळविला आहे. शिवाय त्याहीपलिकडे शिरकाव मिळवीत आहे. राष्ट्रे आपली संपूर्ण भिस्त पृथ्वीसभोवताली भ्रमण करीत असलेल्या मनुष्य निर्मित उपग्रहावर ठेवून आहेत. नौकानयन शास्त्राचे व हवामान शास्त्राचे उपग्रह त्यांना त्यांच्या दूरक्षेपण अग्नीबाणांचा अचूक मारा करण्यात सहाय्यक होत आहेत. दळणवळण व हेरगिरी करणाऱ्‍या उपग्रहांचाही सर्रास उपयोग केला जात आहे. मायकल शाहीन द आर्म्स्‌ रेस नामे आपल्या पुस्तकात म्हणतातः “उपग्रह हे बलाढ्य सत्तांच्या लष्करी बळांचे डोळे, कान व ध्वनी बनले आहेत.”

अगदी अलिकडील उदाहरण पाहता, लिबियावरील हवाई हल्ला. ॲव्हीएशन वीक ॲण्ड स्पेस टेक्नॉलॉजी मासिक अहवाल देतेः “अमेरिकेने . . . या हल्ल्याच्या पूर्वतयारीत आणि आधीच्या तपशीलवार चर्चेत उपग्रहाद्वारे काढलेल्या फोटोंचा उपयोग केला. संरक्षण खात्याच्या हवामान तपासणीच्या उपग्रहाने या हल्ल्याकरता सोईस्कर हवामान कधी असेल याची माहिती पुरविली व लष्कराच्या दळणवळण अंतराळ यानाने मार्गदर्शन आणि नेतृत्व केले.” लष्करी उपग्रहांनी महत्त्वाची कामगिरी बजावली हे पाहून दोन्ही बलाढ्य बाजू आज उपग्रह विरोधक शस्त्रांनी सिद्ध आहेत. अंतराळात प्रचंड शस्त्रसाठा ठेवण्याची सोय करीत असल्याचे एका बाजूच्या “स्टार वॉर” कार्यक्रमावरुन स्पष्ट दिसत आहे. प्रत्यक्षात, या बलाढ्य शक्‍ती अंतराळ युद्धाची सुरवात करतील की नाही हे केवळ काळच सांगेल.

जसे पूर्वभाकित आहे त्यानुसार मध्यंतरीच्या काळातः “भयाने व जगावर येणाऱ्‍या गोष्टीची वाट पाहण्याने मनुष्ये मूर्च्छिंत होत” आहेत. गुन्हेगारी, अतिरेकता, आर्थिक दर्जाचे कोसळणे, रासायनिक प्रदुषण, अणूशक्‍तीचे प्रकल्प उभारल्यामुळे त्यांच्या किरणांकरवी उद्‌भवणारी विषारी वलये शिवाय अणुशक्‍ती युद्धाचे भय, ही सर्व “भय” याची कारणे आहेत. ब्रिटनमधील न्यू स्टेटमन्स्‌ हे मासिक म्हणतेः “देशातील अर्ध्यापेक्षा अधिक युवकांना वाटते की, अणुशस्त्र युद्ध त्यांच्याच हयातीत होईल; आणि ७० टक्के हा विश्‍वास बाळगतात की, ते एक ना एक दिवस होणारच.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा