वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ८/१ पृ. १८-२२
  • “अंतसमया”त जागृत राहणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “अंतसमया”त जागृत राहणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चलबिचलपणाविरुद्ध लढत द्या
  • कळकळीने प्रार्थना करा
  • देवाची संस्था तसेच तिचे कार्य यासोबत जडून राहा
  • स्व-परिक्षण करा
  • पूर्ण झालेल्या भविष्यवादांचे मनन करा
  • आपण विश्‍वास धरणारे बनलो त्यापेक्षा आपले तारण जवळ आले आहे
  • “जागृत राहा”!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवाच्या दिवसाकरता सिद्ध असा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “जागृत राहा”
    आमची राज्य सेवा—२०००
  • आपण जागृत राहात अर्थात विकर्षणे टाळत आहोत काय?
    आमची राज्य सेवा—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ८/१ पृ. १८-२२

“अंतसमया”त जागृत राहणे

“सावध असा, जागृत राहा, कारण तो समय केव्हा आहे हे तुम्हास ठाऊक नाही.” —मार्क १३:३३.

१. या “अंतसमया”त खळबळजनक घटना घडत असता आपली कोणती प्रतिक्रिया असावी?

या“अंतसमया”त खळबळजनक घटना घडत असता ख्रिस्तीजनांची प्रतिक्रिया कशी असावी? (दानीएल १२:४) त्यांना पेचात सोडून दिलेले नाही. या २०व्या शतकात पूर्ण होणाऱ्‍या संयुक्‍त चिन्हांचा भविष्यवाद येशू ख्रिस्ताने उच्चारला तेव्हा त्याने अशा विविध घटना सांगितल्या ज्यामुळे १९१४चा समय अद्वितीय बनला. “अंतसमया”च्या दानीएलने दिलेल्या भविष्यवादाची तसेच ज्या भयप्रेरित घटना घडतील त्याची जाणीव राखून येशूने, आपली उपस्तिथी व व्यवस्थीकरणाची समाप्ती याच्या मोठ्या भविष्यवादाची समाप्ती आपल्या शिष्यांना “जागृत राह”ण्याचे सांगून केली.—लूक २१:३६.

२. आध्यात्मिक रितीने जागृत राहण्याची एवढी का गरज आहे?

२ पण जागृत का असावे? कारण ही मानवजातीतील सर्वात अधिक विनाशकारी वेळ आहे. या काळात ख्रिश्‍चनांनी आध्यात्मिक निद्रा घेतल्यास ते खूपच घातक ठरेल. आम्ही आत्मसंतुष्ट बनलो, किंवा आमची अंतःकरणे जीवनातील काळज्या व चिंता यांनी भारावू दिली तर ते खूप धोक्याचे ठरेल. लूक २१:३४, ३५ मध्ये येशू ख्रिस्ताने आम्हाला हा इशारा दिला होताः “तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्‍या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल.”

३, ४. (अ) देवाचा क्रोधाचा दिवस लोकांवर एकाएकी “पाशाप्रमाणे” येईल असे येशूने जे म्हटले त्याचा काय अर्थ होतो? (ब) वस्तुतः देव पाश रचीत नसल्यामुळे तो दिवस सर्वसाधारण लोकांना अनपेक्षितपणे गाठील असे का असेल?

३ यहोवाचा दिवस ‘पाशाप्रमाणे अकस्मात येईल’ हे येशूने चांगल्या कारणास्तव म्हटले. पाश हा नेहमी सरकत्या गाठीने सज्ज असतो. त्याद्वारे पक्षी आणि सस्तन प्राणी पकडले जातात. या पाशाला एक चाप असतो आणि पाशात येणारा अडखळून तो चाप ओढतो. मग पाश बंद होतो आणि भक्ष्याला धरले जाते. हे सर्व एकाएकी घडते. याचप्रमाणे, येशूने म्हटले की, आध्यात्मिक दृष्ट्या अक्रियाक असणाऱ्‍यांना देवाच्या “क्रोधाच्या दिवशी” मोठे आश्‍चर्य वाटून ते एकाएकी धरले जातील.—नीतीसूत्रे ११:४.

४ तर मग, यहोवा तो पाश लोकांसाठी तयार ठेवीत आहे का? नाही, लोकांनी बेसावध व्हावे व मग त्यांना अचानक गाठून नष्ट करावे यासाठी तो वाटत बघत बसलेला नाही. परंतु तो दिवस सर्वसाधारण लोकांना पाशसारखा गाठील, कारण ते देवाच्या राज्याला परमप्राधान्य देत नसणार. ते आपल्याच मताने जीवनाचा मार्ग आक्रमीत आहेत. त्यांच्या सभोवार ज्या घटना घडत आहेत त्यांच्या अर्थाकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. पण यामुळे देवाचा आराखडा बदलत नाही. त्याने हिशोब घेण्याची स्वतःची वेळ ठरविली आहे. तरीपण आपल्या करूणेमुळेच तो या भावी न्यायदंडाविषयी लोकांना बजावत आहे; त्यांना तो अजाण स्थितीत राहू देत नाही.—मार्क १३:१०.

५, ६. (अ) येणाऱ्‍या न्यायाचा दृष्टिकोण राखून निर्माणकर्त्याने मानवप्राण्यांसाठी कोणती प्रेमळ तरतूद पुरविली आहे, पण याचा कोणता सर्वसाधारण परिणाम दिसत आहे? (ब) आम्हास जागृत राहता येण्यासाठी कोणता गोष्टींचा आपण विचार करणार आहोत?

५ ही आगाऊ सूचना करणे ही, थोर निर्मात्याची प्रेमळ तरतूद आहे. येथे त्याच्या लाक्षणिक पादासनी असणाऱ्‍या मानव प्राण्यांच्या कल्याणाबद्दलची चिंता त्याला आहे. (यशया ६६:१) जेथे त्याचे पाय विसावलेले आहे असे म्हणण्यात आले आहे तेथील रहिवश्‍यांची तो प्रेमाने काळजी वाहतो. याच कारणामुळे तो आपल्या ऐहिक वकील आणि राजदूतांमार्फत समोर उभ्या असलेल्या घटनांबद्दलची ताकीद पुरवितो. (२ करिंथकर ५:२०) तथापि, इतका इशारा दिल्यावर सुद्धा त्या घटना मानवजातीवर, तिने जणू पाशात पाय घातल्याप्रमाणे अनपेक्षितपणे येऊन थडकतील. ते का? कारण बहुतांशी लोक आध्यात्मिकपणे निद्रावश आहेत. (१ थेस्सलनीकाकर ५:६) फारच थोडे लोक त्या इशाऱ्‍याचे श्रवण करतात आणि अशांनाच देवाच्या नव्या जगात बचावून जाता येईल.—मत्तय ७:१३, १४.

६ तर मग, ज्यांचा बचाव व्हावयाचा आहे, अशांमध्ये आपण असावे असे आपय्लाला वाटते तर आपल्याला कसे जागृत राहता येईल? यासाठी आवश्‍यक असणारी मदत यहोवा स्वतः पुरवीत आहे. आपल्याला करता येतील अशा सात गोष्टींची आपण नोंद घेऊ या.

चलबिचलपणाविरुद्ध लढत द्या

७. चलबिचलपणाबद्दल येशूने कोणता इशारा दिला?

७ पहिली गोष्ट, आपल्याला चलबिचलपणाविरुद्ध लढत द्यावयाची आहे. येशूने मत्तय २४:४२, ४४ मध्ये म्हटलेः “जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” येशूने येथे जी भाषा वापरली ती हे सूचित करते की, या कठीण काळी बराचसा चलबिचलपणा असेल, आणि हा विचलीतपणा नाशास कारणीभूत ठरू शकतो. नोहाच्या काळी लोक पुष्कळ गोष्टी करण्यात गुंतले होते. याचा परिणाम हा झाला की, या विचलीत झालेल्या लोकांनी, काय घडत आहे त्याची ‘दखल घेतली नाही’ आणि जलप्रलय येऊन त्याने सर्वांस वाहवून नेले. या कारणासाठीच येशूने ही ताकीद दिलीः “तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल.”—मत्तय २४:३७-३९.

८, ९. (अ) जीवनातील सर्वसाधारण गोष्टींचा पाठपुरावा आम्हाला घातकपणे कसा विचलीत करू शकतो? (ब) पौल तसचे येशूने कोणता इशारा आम्हाला दिला आहे?

८ येशूने लूक २१:३४, ३५ मध्ये जो इशारा दिला होता त्यामध्ये खाणे, पिणे तसेच चरितार्थ चालविण्याविषयीची चिंता या सर्वसाधारण गोष्टींबद्दलची तो चर्चा करीत होता, हे लक्षात घ्या. या गोष्टी लोकांना सर्वसाधारण अशाच आहेत आणि त्या प्रभू येशूच्या शिष्यांनाही जरुरीच्या आहेत. (पडताळा मार्क ६:३१.) खरे म्हणजे या सर्व गोष्टी साळसूद दिसतात, पण यांना अधिक वाव दिला तर मग याच गोष्टी आम्हात चलबिचलपणा निर्माण करतात, त्या आम्हाला गुंतवून ठेवतात आणि आम्हामध्ये घातक अशी आध्यात्मिक गुंगी आणतात.

९ या कारणास्तव, जीवनाच्या सर्वसाधारण गोष्टीत आपण इतके गढून जाऊ नये की, सर्वात महत्त्वपूर्ण असणारी गोष्ट म्हणजे ईश्‍वरी संमती मिळविणे याकडे दुर्लक्ष होईल. या गोष्टीत गढून न जातात त्यांचा पाठपुरावा आमचा उदरनिर्वाह होण्याइतकाच होऊ द्यावा. (फिलिप्पैकर ३:८) त्यांनी आमच्या राज्य आस्थांना अभ्राच्छादित करू नये. रोमकर १४:१७ म्हणते त्याप्रमाणे “खाणे व पिणे यात देवाचे राज्य नाही; तर नीतीमत्त्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळणारा आनंद ह्‍यात आहे.” येशूचे हे शब्द देखील लक्षात घ्या की, “तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील.” (मत्तय ६:३३) आणखी, लूक ९:६२ मध्ये येशूने हे घोषित केलेः “जो कोणी नांगरालाहात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही.”

१०. आपण आपली नजर ध्येयावर सरळ ठेवली नाही तर कोणता धोका संभवू शकतो?

१० लाक्षणिकपणे म्हणावयाचे झाल्यास, एकदा का आम्ही नांगरायला सुरवात केली की, आम्ही सरळ रेषा धरली पाहिजे. जो शेतकरी मागे पाहत नांगरतो, तो सरळ नांगरु शकत नाही. त्याची चलबिचल झालेली असते आणि तो सहजपणे आपल्या मार्गावरुन ढळतो किंवा कशाने तरी मध्येच अडखळतो. आपण त्या लोटाच्या बायकोसारखे होऊ नये, जिने मागे बघितले आणि आपली सुरक्षा गाठली नाही. आम्ही आपली नजर सरळ आपल्या ध्येयावर ठेवावी. हे करण्यासाठी आम्ही चलबिचल वृत्तीविरुद्ध लढत दिली पाहिजे.—उत्पत्ती १९:१७, २६; लूक १७:३२.

कळकळीने प्रार्थना करा

११. विचलीत होण्याच्या धोक्याबद्दल आम्हास ताकीद दिल्यावर येशूने काय म्हटले?

११ तथापि जागृत राहण्यासाठी आम्हाला आणखी काही करता येणे शक्य आहे. दुसरा महत्त्वाचा मार्ग हा की, कळकळीने प्रार्थना करणे. जीवनातील सर्वसाधारण गोष्टींद्वारे विचलीत न होण्याचा इशारा दिल्यावर येशूने हा सल्ला दिलाः “तुम्ही तर या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.”—लूक २१:३६.

१२. कोणत्या प्रकारच्या प्रार्थनेची गरज आहे व त्याचा काय परिणाम घडू शकतो?

१२ अशाप्रकारे आमच्या परिस्थितीत धोका निर्माण होण्याबद्दल तसेच आमची जागृत राहण्याची गरज याविषयी सर्व प्रसंगी प्रार्थना केली पाहिजे. यामुळेच आपण देवाजवळ प्रार्थनाशील वृत्तीने आणि कळकळीने जाऊ. पौल रोमकर १२:१२ मध्ये असे म्हणतोः “प्रार्थनेत तत्पर राहा.” तसेच इफिसकर ६:१८ मध्ये आम्ही असे वाचतोः “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. आणि ह्‍या कामी पूर्ण तत्परतेने . . . जागृत राहा.” ही काही, इतक्या महत्त्वाची नसलेली किंवा किरकोळ अशी बाब नाही. खरे तर, आमचे अस्तित्वच धोक्यात आहे. यास्तव, आम्हाला ईश्‍वरी मदत मिळावी म्हणून मोठ्या कळकळीने प्रार्थना करावयास हवी. (पडताळा इब्रीयांस ५:७.) हे केल्यामुळेच आम्हाला स्वतःला यहोवाच्या बाजूला ठेवता येईल. हे साध्य करण्यासाठी, “सर्व प्रसंगी प्रार्थना करीत . . . राहा,” हा सल्ला अनुसरण्याशिवाय दुसरा लाभाचा मार्ग नाही. याद्वारे यहोवा आम्हाला सतत जागृत दृष्टि देत राहील. तर मग, प्रार्थनेत तत्पर असणे हे किती महत्त्वाचे आहे बरे!

देवाची संस्था तसेच तिचे कार्य यासोबत जडून राहा

१३. जागृत राहण्यासाठी कोणत्या प्रकारचा सहवास जरुरीचा आहे?

१३ जगावर येणाऱ्‍या गोष्टी चुकविण्याची आमची इच्छा आहे. आम्हाला मनुष्याच्या पुत्रासमोर, त्याच्याकडील संमतीदर्शक स्थानावर उभे राहावयाचे आहे. यासाठी जी तिसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती आहेः यहोवाच्या ईश्‍वरशासित संघटनेस अतूटपणे जडून राहा. ती संस्था व तिच्या कार्यहालचाली याजसोबत आम्ही स्वतःला बिनशर्तपणे जडवून ठेवण्यास हवे. हे केल्यामुळेच आम्ही जागृत राहणारे ख्रिस्ती लोक आहोत अशी आपली ओळख न चुकता मिळू शकेल.

१४, १५. (अ) कोणत्या कामात मग्न राहिल्यामुळे आपल्याला जागृत राहण्याची मदत मिळेल? (ब) प्रचाराचे कार्य केव्हा संपेल हे कोणाच्या इच्छेवर आहे आणि त्या कार्याबद्दल आपल्याला कसे वाटले पाहिजे? (क) मोठे संकट येऊन गेल्यावर जेव्हा आपण केल्या गेलेल्या प्रचाराच्या कार्याचा आढावा घेऊ तेव्हा आम्हाला काय दिसेल?

१४ याजशी संबंधित असणारी चवथी अशी गोष्ट आहे की, जी आपल्याला जागृत राहण्यासाठी मदत करू शकेल. आम्ही या व्यवस्थीकरणाचा येणारा नाश घोषित करणाऱ्‍या लोकांमध्ये असावयास हवे. या जुन्या व्यवस्थीकरणाचा संपूर्ण शेवट हा, “राज्याची ही सुवार्ता” सर्वसमर्थ देवाची इच्छा आहे तेवढ्या प्रमाणापर्यंत गाजविली जात नाही तोपर्यंत येऊच शकत नाही. (मत्तय २४:१४) हे प्रचाराचे काम पूर्ण झाले आहे की नाही हे ठरविण्याचे काम यहोवाच्या साक्षीदारांचे नाही. हा हक्क यहोवाने आपल्याकडे राखून ठेवला आहे. (मार्क १३:३२, ३३) तथापि, आम्ही पूर्वी करीत होतो त्यापेक्षा अधिक परिश्रमाने व जरुर भासेल तर अधिक काळ, मानवजातीला जे सर्वोत्तम सरकार लाभू शकते त्याची म्हणजे देवाच्या राज्याची घोषणा करण्याचा आम्ही निश्‍चय राखून आहोत. या कार्यातील आमची नेमणूक पार पाडीत असतानाच “मोठे संकट” याचा उद्रेक होईल. (मत्तय २४:२१) यानंतर सर्व भावी काळात, बचावलेले मागे बघून अत्यंत आनंदाने अंतःकरणपूर्वक ही ग्वाही देतील की येशू ख्रिस्त हा खोटा संदेष्टा नव्हता. (प्रकटीकरण १९:११) प्रचाराचे कार्य हे त्यात भाग घेणाऱ्‍यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक प्रमाणात उरकले गेलेले असणार.

१५ मग, जेव्हा हे काम देवाच्या पूर्ण समाधानात उरकले गेले असेल तेव्हा त्यावेळी पूर्वी कधी नव्हते इतके अधिक जण या कामात सहभागी असल्याचे दिसून येईल. या भव्या कामात आपल्याला सहभाग मिळू शकला याची केवढी धन्यता त्यावेळी आपल्याला वाटेल! प्रेषित पेत्र ही हमी देतो की, “कोणाचा नाश व्हावा अशी [यहोवाची] इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चाताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) यासोबतच आज, सर्वसमर्थ देवाची क्रियाशील शक्‍ती मोठ्या उत्कटपणे कार्य करीत आहे आणि यहोवाचे साक्षीदार हे आत्म्याने प्रेरित असणारे कार्य पुढे चालूच ठेवण्याचा निर्धार राखून आहेत. या कारणास्तव, यहोवाच्या संस्थेशी जडून राहा आणि तिच्या जाहीर सेवकपणात भाग घेत राहा. हे तुम्हाला जागतृ राहण्यास मदत देणारे ठरेल.

स्व-परिक्षण करा

१६. आम्ही आमच्या सध्याच्या आध्यात्मिक स्थितीचे स्व-परिक्षण का केले पाहिजे?

१६ जागृत राहण्यासाठी आम्हाला करता येण्याजोगी अशी पाचवी गोष्ट आहे. आम्ही प्रत्येकाने वैयक्‍तिकरित्या आमच्या सद्य स्थितीसंबंधाने स्वतःचे परिक्षण केले पाहिजे. हे पूर्वीपेक्षा आता अगदी उचित आहे. आम्ही निर्धाराने कोणाच्या बाजूला उभे आहोत हे सिद्ध करण्याची गरज आहे. गलतीकरांस पत्र ६:४ मध्ये पौलाने म्हटलेः “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परिक्षा करावी.” हे स्व-परिक्षण पौलाच्या १ थेस्सलनीकाकर ५:६-८ शब्दांच्या सहमतात करुन पहाः “आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात, आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात; परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे, विश्‍वास व प्रीती हे उरस्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.”

१७. आपले स्व-परिक्षण करीत असता, आपण कोणते प्रश्‍न स्वतःला विचारुन पहावेत?

१७ मग, आता आमच्याविषयी काय? आम्ही शास्त्रवचनाच्या प्रकाशात स्वतःचे परिक्षण करून बघतो तेव्हा आम्ही जागे असून तारणाचे शिरस्त्राण धारण करून आहोत असे दिसते का? आम्ही जुन्या व्यवस्थीकरणापासून स्वतःला निश्‍चितार्थाने वेगळे केले असून आता त्यांच्या कल्पनांना थारा देत नाही अशा व्यक्‍ति आम्ही आहोत का? आम्हाठायी देवाच्या नव्या जगाचा आत्मा खरेपणाने आहे का? हे व्यवस्थीकरण कोठे जात आहे याची आम्हास पूर्ण जाणीव आहे का? असे असेल तरच यहोवाचा दिवस आम्हाला रात्रीच्या चोराप्रमाणे अकस्मात गाठणार नाही.—१ थेस्सलीनकाकर ५:४.

१८. आम्ही आणखी कोणते प्रश्‍न विचारण्याची गरज आहे व काय केले पाहिजे?

१८ उलटपक्षी, आमचे स्व-परिक्षण आम्ही स्वतःसाठी सुंदर, इच्छातृप्तीचे व आरामशीर जीवनाक्रमण साधण्याची धडपड करीत असल्याचे दाखवते का? आमचे आध्यात्मिक डोळे भारावले असून ते झोपेने निद्रावश होत आहेत असे आम्हाला आढळले आहे तर काय? आम्ही स्वप्ननगरीत कोणा जगीक लहरीमागे धावतो का? तर मग, आपण आत्ताच जागे होऊ या!—१ करिंथकर १५:३४.

पूर्ण झालेल्या भविष्यवादांचे मनन करा

१९. आपण कोणकोणते भविष्यवाद पूर्ण झाल्याचे पाहिले आहेत?

१९ आता आपण सहाव्या गोष्टीकडे येत आहोत, जी आपल्याला जागृत राहण्यास साहाय्यक ठरेलः या शेवटल्या काळी ज्या भविष्यवादांची पूर्णता झाली आहे अशांवर मनन करणे. विदेश्‍यांच्या काळाची समाप्ती झाल्यापासून आपण आता ७८ वर्षे पुढे आलो आहोत. आपण मागे तीन चतुर्थांश शतकाकडे बघता आम्हाला एकामागून एक भविष्यवाद खरे ठरले आहेत हे पाहता येतील—खऱ्‍या भक्‍तिची पुनर्स्थापना; अभिषिक्‍त शेषांची त्यांच्या सोबत्यांसह मुक्‍तता होऊन त्यांची आध्यात्मिक नंदनवनात पुनर्स्थापना होणे; राज्याच्या सुवार्तेचा प्रचार जगव्याप्त प्रामणात होणे; मोठा लोकसमुदाय दृष्टीपथात येणे. (यशया २:२, ३; अध्याय ३५; जखर्या ८:२३; मत्तय २४:१४; प्रकटीकरण ७:९) यहोवाचे थोर नाम व त्याचे विश्‍वव्यापी सार्वभौमत्व उंचावले जात आहे; तसेच जो लहान त्याचे सहस्र आणि जो क्षुद्र त्याचे महान राष्ट्र होत आहे आणि हे सर्व यहोवा आपल्या समयी त्वरेने घडवीत आहे. (यशया ६०:२२; यहेज्केल ३८:२३) याखेरीज, योहानाने प्रकटीकरणात पाहिलेले दृष्टांत कळसाला पोहंचण्याच्या बेतात आहेत.

२०. यहोवाच्या साक्षीदारांना कोणती पूर्ण खात्री आहे, आणि ते खरोखरी कोण असल्याचे सिद्ध झाले आहे?

२० यामुळेच, यहोवाच्या साक्षीदारांना, १९१४ पासून घडणाऱ्‍या जागतिक घडामोडींची अचूक समज आता खात्रीने समजली आहे. अशी ही समज झाल्यामुळेच ते सर्वसमर्थ देवाच्या हातातील एक उपकरण खरेपणाने बनले आहेत. यांना या लक्षवेधी काळात खरेपणाने ईश्‍वरी संदेशाची घोषणा करण्याची नेमणून मिळाली आहे. (रोमकर १०:१५, १८) होय, यहोवाने या अंतसमयाबद्दल सांगितलेली वचने खरी ठरली आहेत. (यशया ५५:११) यामुळेच, आम्हाला आपले कार्य, देवाच्या आणखी अभिवचनांची येशू ख्रिस्तामार्फत पूर्णता होईपर्यंत, करीत राहण्याची चालना मिळाली पाहिजे.

आपण विश्‍वास धरणारे बनलो त्यापेक्षा आपले तारण जवळ आले आहे

२१. आध्यात्मिक दृष्ट्या जागे राहण्यासाठी कोणती सातवी मदत आपल्याला आहे?

२१ शेवटी, आम्हास जागृत ठेवण्यामध्ये असलेली सातवी मदतः आम्ही विश्‍वास ग्रहण केला तेव्हापेक्षा आमचे तारण आता खूपच जवळ आले आहे हे लक्षात ठेवावे. अधिक महत्त्वाचे ते हे की, यहोवाचे सार्वत्रिक सार्वभौमत्व आणि त्याच्या नामाचे पावित्र्य हे अधिक जवळ आले आहे. या कारणामुळे जागृत राहण्याचे अधिकच अगत्य आहे. प्रेषित पौल लिहितोः “समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे; कारण आपण विश्‍वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्याजवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आले.”—रोमकर १३:११, १२.

२२. आमच्या तारणाची समीपता आम्हावर कशी परिणामित होण्यास हवी?

२२ आमचे तारण इतके जवळ आले असताना आम्ही जागे राहिलेच पाहिजे! यहोवा आपल्या लोकांसाठी या अंतसमयामध्ये जे जे करीत आहे त्याबद्दलच्या आवडीवर आम्ही आमच्या कोणा व्यक्‍तिगत किंवा जगीक आस्थेला वरचढ होऊ देऊ नये. (दानीएल १२:३) आम्ही पूर्वीपेक्षा अधिक सोशिकता दाखवली पाहिजे, म्हणजे देवाच्या वचनाने आम्हासाठी जो स्पष्ट मार्ग आखून दिलेला आहे त्यापासून आमची मार्गभ्रष्टता होणार नाही. (मत्तय १३:२२) हे जग आता शेवटल्या दिवसात आहे याचा पुरावा स्पष्ट दिसत आहे. लवकरच याचे अस्तित्व नाहीसे होईल व त्याची जागा धार्मिकतेचे नवे जग घेईल.—२ पेत्र ३:१३.

२३. यहोवा आम्हाला कोणत्या मार्गांनी मदत देत राहील; आणि यामुळे कोणते आशीर्वाद मिळतील?

२३ यास्तव, आपण सर्वतोपरीने जागृत राहू या! आम्ही काळाच्या ओघात कोठे आलो आहोत याची जाणीव पूर्वीपेक्षा अधिक ठेवली पाहिजे. लक्षात ठेवा की, यहोवा या प्रकरणाबद्दल कधीही झोपी जाणार नाही. उलट, तो या अंतसमयात आम्हाला जागृत व दक्ष ठेवण्यास आमची मदत करीत राहील . रात्र सरत आली आहे. दिवस जवळ येत आहे. तर सावध असा! लवकरच, जेव्हा यहोवाचे मशीही राज्य यहोवाच्या या पृथ्वीसंबंधी असणाऱ्‍या अभिवचनाची पूर्णता करील तो सर्वांगपूर्ण दिवस आम्हास अनुभवण्यास मिळेल!—प्रकटीकरण २१:४, ५.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ देवाच्या क्रोधाचा दिवस लोकांवर “पाशाप्रमाणे” येईल असे जेव्हा येशूने म्हटले तेव्हा त्याचा काय अर्थ होत होता?

▫ आम्ही चलबिचलपणाविरुद्ध का लढत द्यावी, आणि हे आम्हाला कसे करता येईल?

▫ जागृत राहण्यासाठी कोणत्या प्रकारच्या प्रार्थनेची गरज आहे?

▫ कोणत्या प्रकारचा सहवास महत्त्वपूर्ण आहे?

▫ आम्ही आमच्या आध्यात्मिक स्थितीचे का स्व-परिक्षण करावे?

▫ आम्हाला जागृत राखण्यासाठी भविष्यवाद कोणता कार्यभाग पूर्ण करतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा