वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ८/१ पृ. १६-२१
  • जीवनाचे ध्येय ऐक्याने जोपासणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवनाचे ध्येय ऐक्याने जोपासणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “जीवनाचे दान”
  • एक आनंदी ऐक्य
  • आता “दुसरी मेंढरे” सहभाग मिळवितात
  • स्मारकविधी—आणि नवा करार
  • सर्वांसाठी उपलब्ध असणारी “जीवनाची भाकर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व एकत्र करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • प्रभूचे सांज भोजन कसे साजरे करतात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • ‘मी तुम्हाला राज्य नेमून देतो’
    उपासनेतील ऐक्य
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ८/१ पृ. १६-२१

जीवनाचे ध्येय ऐक्याने जोपासणे

“सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी, तू जो एकच खरा देव त्या तुला, व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.”—योहान १७:३.

१. (अ) “सार्वकालिक जीवन” याबद्दल येशूने पहिल्या प्रथम कोणत्या प्रसंगी बोलणी केली? (ब) हे ध्येय कोणाला मिळविता येऊ शकत होते?

तो येतो. अगदी चोरपावली, नकळत, जणू रात्रीच्या अंधारात. तो आहे निकदेम. येशूने, इ.स. ३०च्या वल्हांडण समयी यरूशलेमात जी चिन्हे केली त्यामुळे या गृहस्थावर मोठी छाप पडली आहे. या परूशी गृहस्थास देवाचा पुत्र “सार्वकालिक जीवन” या प्रथमच लिखित संज्ञेचा उल्लेख करून हे उबदार वचन सांगतो: “देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१५, १६) मुक्‍त होणाऱ्‍या मानवजातीच्या जगाकरता केवढी भव्य संधि आता उघडत आहे! या ध्येयाची प्राप्ती व्हावी म्हणून गर्विष्ठ परूशी सुद्धा स्वतःला लीन करू शकत होता.

२. (अ) “सार्वकालिक जीवन” याबाबतीत येशूने आणखी कोणत्या परिस्थितीत बोलणी केली? (ब) जीवनदायी पाणी कोणास मिळू शकते?

२ यानंतर लवकरच येशू यरूशलेमाहून गालीलास येतो. मध्यंतरात तो शमरोनात एका विहीरीपाशी थांबतो आणि त्याचे शिष्य काही खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी जातात. एक स्त्री विहीरीवर पाणी घेण्यासाठी येते. येशू तिला म्हणतो: “मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल.” (योहान ४:१४) वस्तुतः यहुदी शमरोन्यांना तुच्छ लेखीत तर एवढी ही मोलवान आशा येशूने त्या स्त्रीला का वदविली? या स्त्रीच्या बाबतीत येशूला ठाऊक होते की तिला पाच पति होते व आता ती एका पुरुषासोबत अनैतिक संबंधात राहते जो की तिचा पति नाही. त्यामुळेच येशूने येथे जे काही म्हटले होते त्यावरून हे दिसते की जीवनदायी सत्याचे पाणी हे मानवजातीच्या जगातील सर्व तुच्छितांना, त्यांनी पश्‍चाताप दाखविला व आपले जीवन शुद्ध केले तर मिळू शकणार होते.—पडताळा कलस्सैकर ३:५–७.

३. (अ) कोणत्या प्रकारच्या ‘अन्‍ना’ची येशू शिफारस करतो? (ब) योहान ४:३४–३६ कसे पूर्ण होत आहे?

३ “सार्वकालिक जीवन”! या विषयावर येशू, त्याचे शिष्य परतल्यावर त्याला जेवण करण्याची विनंति करू लागले तेव्हा आणखी विस्तार करतो. तो त्यांना म्हणतो: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.” हे कार्य कोणते होते? येशू म्हणतो: “आपली नजर वर टाकून शेते पाहा. ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवितो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करतो.” अशी कापणी वाट पाहून होती, दीन शमरोन्यांमध्ये देखील व ती खरेपणाने आनंदीरित्या प्रत्ययास आली. याची अहवाल ग्वाही देतो. (योहान ४:३४–३६; प्रे.कृत्ये ८:१, १४–१७) सार्वकालिक जीवनासाठी असणारी ही कापणी आजही चालू आहे, त्याचे क्षेत्र मात्र सबंध जग आहे. येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना अद्याप प्रभूच्या कामात पुष्कळसे करण्याजोगे आहे.—मत्तय १३:३७,३८; १ करिंथकर १५:५८.

“जीवनाचे दान”

४. शब्बाथ पालनाविषयी येशू यहुद्यांना कसे उत्तर देतो?

४ एक वर्ष सरते. आता इ.स. ३१चा वल्हांडण सणाचा काळ आहे. आपल्या रिवाजानुसार येशू येरूशलेमात सणासाठी उपस्थित आहे. त्याने शब्बाथवारी बरे करण्याचे प्रेमळ कृत्य केले म्हणून यहुदी त्याल त्रास देण्यासाठी तेथे येतात. याबाबतीत येशू त्यांना कसे उत्तर देतो? तो म्हणतो: “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे.” या बोलण्यामुळे ते त्याला ठार मारण्याची खटपट करतात.—योहान ५:१७, १८.

५, ६. (अ) कोणत्या मोलवान ऐक्याचे येशू आता वर्णन करतो? (ब) येशूला “स्वतःचे जीवन” कोणत्या अर्थी आहे?

५ तथापि, येशू पुढे जाऊन एका बहुमोल ऐक्याबद्दल—एकतेबद्दल, जी त्याचा पिता व त्याजमध्ये आहे, त्याविषयी भाष्य करतो. तो म्हणतो: “कारण पिता पुत्राबद्दल कळवळा व्यक्‍त करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तुम्हाला आश्‍चर्य वाटावे म्हणून तो ह्‍याहून मोठी कामे त्याला दाखवील.” आपणाला पित्याने अभूतपूर्व सामर्थ्य बहाल केले आहे हे त्याने या प्रकाराने सूचित केले: “जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे.”—योहान ५:२०, २४.

६ होय, आपल्या अनुवंशिक पापीष्ठपणामुळे जे देवाच्या दृष्टीने “मेलेले” आहेत ते ‘देवाच्या पुत्राची वाणी ऐकून’ जिवंत होऊ शकतात. ते कसे काय? येशू म्हणतो: “कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायी स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले.” “स्वतःचे जीवन” हा शब्दप्रयोग “स्वतःमध्ये जीवनाचे दान” या पद्धतीनेही वापरता येईल. (योहान ५:२५, २६, रेफरन्स बायबल तळटीप.) अशाप्रकारे येशू मानवाला देवापुढे मान्यवर भूमिका प्राप्त करून देण्यास समर्थ आहे. यासोबत मृतावस्थेत निद्रावश असणाऱ्‍यांना तो पुनरूत्थान देऊन जीवन देऊ शकतो.—योहान ११:२५; प्रकटीकरण १:१८.

७. (अ) स्तोत्रसंहिता ३६:५, ९ आम्हाला देवाबद्दल काय सांगते? (ब) यहोवाने आपल्या सचोटी रक्षक पुत्रास कसे बहुमानित केले?

७ यहोवाला स्वतःचे जीवन नित्य राहिले आहे. त्याबद्दल असे लिखित आहे: “जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे.” (स्तोत्रसंहिता ३६:५, ९) पण आता पित्याने आपल्या सचोटी रक्षक पुत्राला मृतामधून “महानिद्रा घेणाऱ्‍यांतले प्रथमफळ” या अर्थी उठविले आहे. “स्वतःमध्ये जीवनाचे दान” असल्यामुळे येशूला पापांची क्षमा करण्याचे, न्याय करण्याचे व मृतांना सार्वकालिक जीवनाचा दृष्टिकोन राखून पुनरूत्थित करण्याचे सामर्थ्य लाभले आहे.—१ करिंथकर १५:२०–२२; योहान ५:२७–२९; प्रे.कृत्ये १७:३१.

एक आनंदी ऐक्य

८, ९. (अ) सार्वकालिक जीवनाचे ध्येय आम्ही कसे दृष्टिपथात ठेवू शकतो? (ब) सार्वकालिक जीवनाच्या बाबतीत देवाने काय व्यवस्था आखली आहे? (क) या आशीर्वादात कोणाला सहभाग मिळतो व कसा?

८ येशूचा शिष्य यहुदा आम्हाला सल्ला देतो: “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची मार्गप्रतीक्षा करीत सार्वकालिक जीवनासाठी आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा.” (यहूदा २१) सार्वकालिक जीवन—केवढे बहुमोल ध्येय! हे सार्वकालिक जीवन आमचा परिपूर्ण निर्माणकर्ता याच्या इच्छेनुरूप व त्याने आपल्या पुत्राद्वारे आखलेल्या व्यवस्थेनुरूप पूर्णतेचे असेल. सद्य व्यवस्थीकरणात बचावासाठी जे त्रासदायक काम मोठया कष्टाने करावे लागते तसे काही काम नव्या व्यवस्थेत नसणार. तेथे दुःख, आजार, अधर्म, भ्रष्टाचार व शिवाय मृत्यूही नसणार!—मीखा ४:३, ४; १ करिंथकर १५:२६.

९ या अभिवचनांच्या पूर्तीत कोणाला व कसा सहभाग मिळेल? येशूच्या यज्ञार्पणावर विश्‍वास राखणाऱ्‍यांना व त्या विश्‍वासानुरूपची इश्‍वरी कृत्ये आचरणाऱ्‍यांना तो मिळेल. या सर्वांचे इतर सह ख्रिश्‍चनांसोबत मिळून विश्‍वासाच्या ऐक्याचे जागतिक संघटन बनते.—याकोब २:२४; इफिसकर ४:१६.

१०. (अ) देवाच्या ‘कारभारा’त पहिली गोष्ट कोणती येते? (ब) यानंतर कोणत्या गोष्टीकडे हा “कारभार” वळतो?

१० देवाने आपल्या सदिच्छेमुळे “आकाशात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे” या करता “एका कारभाराची व्यवस्था” आखली. (इफिसकर १:८–१०) देवाच्या घरची ही व्यवस्था ख्रिस्ताच्या १,४४,००० सहवारीसांच्या एकत्रीकरणाने आरंभ होते. यांना “देव व कोकरा [येशू ख्रिस्त] यांच्यासाठी प्रथमफळ असे मानवातून विकत घेतलेले आहे.” यांना हजार वर्षांच्या कालावधीसाठी ख्रिस्ताबरोबर राजे व याजक या अर्थी सेवा सादर करता यावी म्हणून “पहिल्या [स्वर्गीय] पुनरुत्थानात” सहभाग मिळतो. यानंतर देवाकडिल कारभार “पृथ्वीवर जे आहे” त्याचे एकत्रीकरण करण्यास आरंभ करतो ज्यात प्रथमत: “सर्व राष्ट्रे, वंश, भाषा व लोक [यांचा] मोठा लोकसमुदाय” याचे एकत्रीकरण आहे. देवाचे हे सेवक “मोठ्या संकटातून” बाहेर पडून सार्वकालिक जीवनाचे भवितव्य राखून एका ‘नव्या पृथ्वी’त प्रवेश मिळवितील.—प्रकटीकरण १४:१, ४; २०:४,६; ७:४, ९–१७; २१:१, ४.

११. (अ) इफिसकर १:११ कोणत्या मोलवान ‘ऐक्या’विषयीची माहिती देते? (ब) या ‘ऐक्या’त असणाऱ्‍यांना योहान १५:४,५ कसे लागू होते?

११ “आकाशात . . . जे आहे” ते म्हणजे आत्म्याने अभिषिक्‍त असणारे देवाचे पुत्र येशूसोबत व त्याच्या पित्यासोबत निकटच्या नातेसंबंधाचा अनुभव घेतात. यांना येशूसोबत एकत्ररित्या देवराज्याचे “वतन” आहे. (इफिसकर १:११) फळ यावे म्हणून डहाळ्‌या जशा दाखलतेशी जडून असतात त्याप्रमाणेच ऐक्य राखावे म्हणून येशूने त्यांना प्रोत्साहन दिले. येशू ख्रिस्ताबरोबरचे हे अमूल्य नातेसंबंध राखल्याविना डहाळ्‌यांना “काही करता येत नाही.”—योहान १४:१०, ११, २०; १५:४, ५; १ योहान २:२७.

आता “दुसरी मेंढरे” सहभाग मिळवितात

१२. (अ) “दुसरी मेंढरे” याचे “लहान कळपा” सोबत काय नाते आहे? (ब) १ योहान २:१–६ प्रत्येक गटाच्या बाबतीत कसे लागू होते?

१२ पण मग, मागील ५० वर्षांत जगीक वृत्तीच्या “शेरडां”पासून ज्या लाखों मेंढरासमान लोकांना वेगळे करण्यात आले त्यांचे काय? (मत्तय २५:३१–४०) हे, ज्यांना राज्य देण्यात येते त्या येशूच्या “लहान कळपा”तील नाहीत. पण “दुसरी मेंढरे” या अर्थी ते अशा मोठ्या कळपाचे भाग बनतात जो पिता आणि पुत्र यांची सेवा ऐक्याने करतो. (लूक १२:३२; योहान १०:१६) प्रेषित योहान याची हमी देतो की, येशू ख्रिस्त हा “आपल्या [“लहान कळपा”तील सदस्यांच्या] पापांबद्दल प्रायश्‍चित आहे; आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याहि पापांबद्दल आहे.” अशाप्रकारे, मानवजातीच्या जगतातून गोळा करण्यात आलेल्या या ‘दुसऱ्‍या मेंढरां’ना सुद्धा देव आणि ख्रिस्त यांच्या बरोबर जुळवणी वा मोलवान ऐक्याचा आनंद घडू शकतो. योहानाने पुढे जे म्हटले त्याजशी हे अगदीच सुसंगत आहे: “जो कोणी त्याचे वचन पाळितो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखरी पूर्ण झाली आहे यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्याठायी ऐक्यात आहोत.” येशू या पृथ्वीवर जसा राहिला त्याचप्रमाणे प्रथम “लहान कळप” व नंतर “दुसरी मेंढरे” याजवर तसे राहण्याचे बंधन येते.—१ योहान २:१–६.

१३. (अ) योहान १७:२०, २१ मध्ये येशूने कशाविषयी प्रार्थना केली? (ब) ही याचना ख्रिस्ताच्या सहवारसदारांपुरती मर्यादित नाही हे कसे दिसते?

१३ अशाप्रकारे आज स्वर्गीय आणि पृथ्वीवरील वतनदारीचे दोन्ही वर्ग ‘पिता व त्याचा पुत्र यांच्या ऐक्यात’ आहेत—म्हणजे देवाचे कार्य उरकण्यात ते त्यांच्या पूर्ण सहमतात आहेत. येशूने प्रार्थिले: “त्या सर्वांनी [ऐक्यात] एक व्हावे. हे माझ्या बापा जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे.” ही ऐक्यता सह वारसदारांपुरतीच लागू होत नाही, कारण येशूचे शिष्य अर्थातच ‘यहोवाचे शरीर’ किंवा ‘यहोवाबरोबरील एकत्राचे वारीस’ होऊ शकत नाही. ते “एक” आहेत ते या अर्थी की मानवजातीच्या जगास साक्ष देताना ते यहोवा व ख्रिस्तासोबत एकाच अंतःकरण व मनाचे, सहकार्य देणारे आहेत.—योहान १७:२०, २१.

१४. स्वर्गीय वर्ग कोणत्या खास मार्गी ख्रिस्ताबरोबर ऐक्यात आहे व यामुळे त्यांना कशाची जाणीव होते?

१४ तथापि, स्वर्गीय वतनदारीसाठी अभिषेक झालेल्या वर्गाचे लोक आता एका खास मार्गी या एकतेचा आनंद उपभोगित आहे कारण यांना ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणाच्या मोलाच्या आधारावर जीवनासाठी नीतीमान ठरविण्यात आले आहे. यामुळेच त्यांचा आत्म्याने जन्म होऊन त्यांना ख्रिस्त येशूसोबत सहवारीस होण्याचे भवितव्य लाभते. पुत्र या अर्थी त्यांना घेतलेल्या दत्तकपणाविषयीची ते मंजूरी देऊन म्हणतात: “तो आत्मा [देवाची जननशील कार्यकारी शक्‍ती] आपल्या आत्म्याबरोबर [प्रबळ मानसिक विचार] साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत.”—रोमकर ३:२३, २४; ५:१; ८:१५–१८.

१५. पृथ्वीवरील जीवनाच्या भवितव्याची आशा असणाऱ्‍यांना वर्तमान व भावी काळ काय राखून आहे?

१५ पृथ्वीवरील जीवनाचे भवितव्य असणाऱ्‍यांना देवाबरोबरील मित्रत्वामुळे नीतीमान असे घोषित केले जाते. हेच प्राचीन काळच्या अब्राहाम, रहाब व इतरांच्या बाबतीत होते. ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राज्यकीर्दीत यांना ओघाओघाने मानवी पूर्णतेप्रत उंचावले जाईल की ज्यामुळे शेवटली परिक्षा संपल्यावर “सृष्टी स्वतः नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” मिळेल. (रोमकर ८:१९–२१; याकोब २:२१–२६) याद्वारे आज्ञाधारक मानवाना पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाकरता धार्मिक असे घोषित करण्यात येईल.—पडताळा योहान १०:१०; यशया ९:७; ११:१–९; ३५:१–६; ६५:१७–२५.

१६. (अ) “लहान कळप” व दुसरी मेंढरे” कोणत्या बाबतीत एकमेकांशी “एक” असल्याचे दाखवितात? (ब) पण योहान ३:३–५ केवळ “लहान कळप” याला का लागू होणारे आहे?

१६ “छोटा कळप” याचे वैयक्‍तिक सदस्य तसेच “दुसरी मेंढरे” यांचा महासमूह देवाच्या कार्यात अप्रतिम आनंद व्यक्‍त करतो. (लूक १२:३२; योहान १०:१६; तीत २:१३, १४) अभिषिक्‍तांपैकी बाकी उरलेले आता खूपच वयोवृद्ध झाले आहेत व त्यांनी ख्रिस्ती मार्गाक्रमणात वाढता अनुभव घेतला आहे तरी पण दोन्ही गट ख्रिस्ती व्यक्‍तिमत्व व आत्म्याच्या फळांचे उत्तम प्रदर्शन करतो. (इफिसकर ४:२४; गलतीकर ५:२२, २३) तरीपण यांच्यात एक फरक आहे जो येशूने निकदेमाला, सार्वकालिक जीवनाविषयीचे भाष्य करण्याआधी कळवला होता. त्याने म्हटले: “नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.” (योहान ३:३–५) तद्वत, देव ज्या बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिश्‍चनांना येशू सोबत त्याच्या राज्यात सहवारीस होण्याची हाक देऊन आहे अशांच्या बाबतीत आध्यात्मिकरित्या नव्याने जन्मण्याचा अनुभव येतो. (१ करिंथकर १:९, २६–३०) “दुसरी मेंढरे” यांना अशा नवजन्माची काही गरज नाही कारण पुनर्स्थापित अशा नंदनवनमय पृथ्वीवर राज्याची प्रजा या अर्थी सार्वकालिक जीवनाची प्राप्ती करणे हे त्यांचे ध्येय आहे.—मत्तय २५:३४, ४६ब; लूक २३:४२, ४३.

स्मारकविधी—आणि नवा करार

१७. (अ) जीवनाचे ध्येय राखणाऱ्‍या सर्वांनी देवाच्या लोकांसमवेत स्मारकविधिला का उपस्थित राहिले पाहिले? (ब) १९८५च्या स्मारक विधिच्या समारंभाबद्दल आम्हाला काय कळते?

१७ या वर्षी मार्च २४ रोजी यहोवाच्या साक्षीदारांनी येशूच्या मृत्यूचा स्मारकविधि जगभरात साजरा केला. यावेळी येशूने आपल्या पित्याच्या नामाच्या व उद्देशाच्या गौरवाप्रीत्यर्थ तसेच पापीष्ठ मानवजातीखातर आपले परिपूर्ण शरीर व जीवनी रक्‍त यांचे जे अर्पण वाहिले त्याकडे लक्ष वेधविले गेले. (१ करिंथकर ११:२३–२६) या आनंदी प्रसंगाकरता जीवनाचे ध्येय राखणारे (मग ते स्वर्गीय असो की पृथ्वीवरील) देवाचे लोक जगभरात हजर होते, गत वर्षी या प्रसंगाची उपस्थिती ७७,९२,१०९ इतकी होती. तथापि ज्यांनी स्मारकविधिची येशूचे शरीर व रक्‍त यांना सूचित असणारी भाकर व द्राक्षारसाची सहभागिता घेतली ते कवळ ९,०५१ इतकेच होते. पण मग इतके कमी का?

१८, १९. (अ) लूकाच्या २२व्या अध्यायात येशू कोणत्या करारांविषयी बोलतो? (ब) प्रत्येक करार कोणता उद्देश साध्य करतो? (क) मोशेकरवी प्रतिछायित, येशू हा “एकच मध्यस्थ” म्हणून कसा आहे?

१८ खरे म्हणजे, येशूने आपल्या मृत्यूच्या स्मारकविधीची स्थापना जेव्हा केली होती त्यावेळी काय म्हटले होते बरे? शिष्यांमध्ये भाकर वाटून दिल्यावर त्याने त्यांना याच पद्धतीने प्यालाही दिला व म्हटले: “हा प्याला माझ्या रक्‍तात नवा करार आहे. ते रक्‍त तुम्हासाठी ओतले जात आहे.” यानंतर त्याने त्यांना नव्या करारात घेण्याचे कारण स्पष्ट केले. तो म्हणाला: “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमण्याचा करार केला आहे तसाच मीही तुमच्याबरोबर करार करतो. तो असा की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनावर बसून इस्राएलांच्या बारा वंशाचा न्याय करावा.”—लूक २२:१९, २०, २८–३०.

१९ नव्या कराराबद्दल यिर्मया संदेष्ट्याने भाकित करून म्हटले होते की त्याद्वारे यहोवा आपल्या लोकांच्या पातकांची क्षमा करील म्हणजे ते निकट सान्‍निध्याद्वारे ‘यहोवाला ओळखतील.’ (यिर्मया ३१:३१, ३४) मोशे दैहिक इस्राएलांसोबत केलेल्या नियमशास्त्र कराराचा “मध्यस्थ” होता त्याप्रमाणेच येशू, देवाने आध्यात्मिक “देवाचा इस्राएल” सोबत केलेल्या ‘अधिक चांगल्या प्रकारातील कराराचा’ मध्यस्थ आहे. ख्रिस्तासोबत राज्याचे वारीस व्हावे म्हणून ज्यांना पाचारण केले आहे अशांची खंडणीकरवी मुक्‍तता होण्यासाठी ही योजना आहे. त्यांना याकरवी “सार्वकालिक वारशाचे अभिवचन” मिळते. (गलतीकर ३:१९, २०; ६:१६; इब्रीयांस ८:६; ९:१५; १२:२४) या खास पवित्र शास्त्रीय अर्थानुरुप ख्रिस्त येशू “देव व मनुष्ये यांच्यामधील एकच मध्यस्थ” आहे.—१ तिमथ्यी २:५, ६.

२०. (अ) स्मारकविधिच्या बोधचिन्हात कोण योग्यपणे सहभाग घेऊ शकतो? (ब) हे असे का?

२० तर मग, भाकर व द्राक्षारस या स्मारकविधिच्या बोधचिन्हात कोण योग्यपणे सहभाग घेऊ शकतो? ज्याला देव येशूच्या यज्ञार्पणाद्वारे नवीन करारात घेतो तो, तो एकमेव गट आहे. (स्तोत्रसंहिता ५०:५) या कराराचा उद्देश प्रथमतः येशूच्या १,४४,००० सहवारीसांनी मानवी जीवनात न्यायत्व मिळवावे आणि आपल्या जीवनाच्या हक्काचे यज्ञार्पण करून मग स्वर्गीय राज्यात घेतले जावे असा आहे. (रोमकर ४:२५; २ तिमथ्यी २:१०, १२) पण “दुसरी मेंढरे” यांच्याबद्दल काय?

२१. (अ) स्मारकविधीचे निरीक्षक या अर्थी “दुसरी मेंढरे” यांना कसा लाभ होतो (ब) स्मारक विधीचा समारंभ कशावर प्रकाशझोत टाकतो, आणी कोणता प्रश्‍न उद्‌भवतो?

२१ “दुसरी मेंढरे” वर्गाचे लोक नव्या करारात नाहीत व त्यामुळे ते सहभागिता घेत नाहीत. तरीपण आदराने निरीक्षण करणारे या अर्थाने स्मारक विधिच्या समारंभास उपस्थित असणाऱ्‍या त्या सर्वांना समृद्ध लाभ पोहचतो. आध्यात्मिक गोष्टींविषयीची त्यांची रसिकता ही, येशूने आपल्या पित्याला केलेल्या प्रार्थनेतील शब्दांच्या अनुषंगाने सूक्ष्म बनते. ते शब्द असे: “सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी जो तू एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताविषयीचे ज्ञान संपादित करावे.” (योहान १७:३) स्मारकविधीचा समारंभ येशूचे शरीर व रक्‍त यावर प्रकाशझोत टाकतो हे लक्षात घ्या. ख्रिस्ताचे यज्ञार्पित शरीर व रक्‍त सार्वकालिक जीवनाचे ध्येय जोपासणाऱ्‍या सर्वांकरता तेवढ्याच महत्वाचे आहे. पण ज्यांना नव्या करारात घेण्यात आले नाही व त्यामुळे जे स्मारकविधिच्या बोधचिन्हांची सहभागिता घेत नाहीत, त्या “दुसरी मेंढरे” यांच्याबाबतीत हे कसे खरे ठरते? यासाठी आपण पुढील लेख विचारात घेऊ.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ सार्वकालिक जीवनाच्या भवितव्याच्या समजावणूकीविषयी येशूने टप्याटप्याने कशी माहिती दिली?

◻ देवाने आपल्या “कारभारा” विषयी कशी हालचाल केली?

◻ “दुसरी मेंढरे” पिता, पुत्र व ख्रिस्ताच्या बंधूसोबत ‘ऐक्या’त आहेत असे का म्हणता येऊ शकते?

◻ केवळ, अभिषिक्‍त ख्रिस्ती स्मारकविधिच्या बोधचिन्हाची का सहभागिता घेतात?

[१९ पानांवरील चित्र]

“लहान कळप” आणि “दुसरी मेंढरे” “एक” वाक्यतेत आहेत—ते येशूने केल्याप्रमाणे देवाचे कार्य करतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा