वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 १०/८ पृ. १२-१४
  • मी आत्मसंरक्षण शिकावे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मी आत्मसंरक्षण शिकावे का?
  • सावध राहा!—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मार्शल आर्ट्‌स
  • शस्त्रांचा उपयोग
  • शस्त्रे—ईश्‍वरी दृष्टिकोन
  • सुज्ञान—शस्त्रांपेक्षा श्रेष्ठ
  • तुम्हाला हिंसेला तोंड द्यावे लागल्यास
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
सावध राहा!—१९९५
g95 १०/८ पृ. १२-१४

तरुण लोक विचारतात. . . .

मी आत्मसंरक्षण शिकावे का?

जेस्सी म्हणतो, “शाळेत एक खरोखर वाईट टोळी आहे. जर त्यांनी तुम्हाला शाळेच्या दालनात पाहिले व त्यांना तुमचे बूट, जाकीट किंवा पँट जरी हवी असेल तर ते खुशाल घेतात. तुम्ही तक्रार केली तर ते तुम्हाला पुन्हा गाठतील.”

हिंसेचा सामना करणे अनेक युवकांची जीवनशैली बनली आहे. युएसए टुडे या नियतकालिकाने म्हटले: “माध्यमिक शाळेतील दर पाच विद्यार्थ्यांपैकी अंदाजे एक विद्यार्थी पिस्तूल, चाकू, वस्तरा, सोटा, किंवा इतर एखादे शस्त्र नियमितपणे जवळ बाळगतो. अनेक जण तर शाळेला सुद्धा घेऊन जातात.” हायरो नामक किशोरवयीन मुलाला याची प्रत्यक्ष माहिती आहे. तो म्हणतो, “आमची शाळा [न्यूयॉर्क सिटीत] मेटल डिटेक्टर वापरणारी पहिली शाळा होती; पण यामुळे मुलांचे, चाकू व बंदूका जवळ बाळगणे थांबत नाही. ते या वस्तू आतमध्ये कसे घेऊन येतात हे मला माहीत नाही पण ते तसे करतात हे मात्र खरे आहे.”

साहजिकपणे, हल्ला होण्याची भीती अनेक युवकांना ते स्वतःचा बचाव कसे करू शकतील यावर विचार करायला लावते. लोला ही युवती म्हणते: “माझ्या शाळेतील एका मुलीला तिच्या कर्णफुलांसाठी भोसकून ठार मारण्यात आले तेव्हापासून शाळेत आत्मसंरक्षणाचे धडे देणे सुरू करण्यात आले. जवळजवळ प्रत्येकाने नाव नोंदवले.” इतर युवकांनी रासायनिक फवारे व इतर शस्त्रांचा अवलंब केला आहे. प्रश्‍न हा आहे, आत्मसंरक्षणाच्या पद्धती खरोखरच तुम्हाला सुरक्षित ठेवतात का?

मार्शल आर्ट्‌स

मार्शल आर्ट्‌समध्ये निपुण असलेले, नर्तकाच्या हालचालींप्रमाणे हवेत उलटसुलट लाथा व ठोसे मारताना टी. व्हीवर सतत दाखवत असतात. काही क्षणातच सर्व गुंड आडवे होतात. किती विलक्षण! मार्शल आर्ट्‌स एकमेव संरक्षण असल्याचे भासते. परंतु, वास्तविक पाहता, जीवन चित्रपटासारखे नाही. कराटेमध्ये अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या एका माणसाने म्हटले: “बंदूकीच्या एकाच गोळीने काम भागते. जर काही अंतरावर उभ्या असलेल्या व्यक्‍तीजवळ बंदूक असेल तर तुमची धडगत नाही. हालचाल करण्यासही जागा नसण्याइतके तुम्ही जवळ असलात तरी वाचण्याची आशा नाही.”

शिवाय, मार्शल आर्ट्‌समध्ये प्रवीण होण्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो व अनेक वर्षे कठीण प्रशिक्षण घ्यावे लागते हेसुद्धा लक्षात घ्या. तसेच, तुम्ही प्रशिक्षण घेत राहिला नाहीत, तर या कलात्मक हालचाली करण्याचे तुमचे नैपुण्य काही काळातच कमी झाल्यासारखे होईल. मुष्टियुद्धासारख्या आत्मसंरक्षणाच्या इतर प्रकारांबद्दलही असेच म्हणता येईल. याशिवाय, लढता येण्याची ख्याती असणे अनावश्‍यक लक्ष आकर्षित करू शकते. गुंड तुम्हाला आव्हान समजून तुमच्यासोबत लढण्याचे ठरवू शकतील.

परंतु, मार्शल आर्ट्‌स शिकण्यात याहूनही मोठा धोका समाविष्ट आहे. द इकॉनॉमिस्ट या नियतकालिकाने अलीकडेच असे वृत्त दिले: “सगळेच नसले तरी, अधिकतर मार्शल आर्ट्‌स, बौद्ध धर्म, टाओ मतवाद व कन्फुशियस मतवाद या तीन प्रमुख पूर्व आशियाई धर्मांशी अविभाज्यपणे संबंधित आहेत.” आणखी एक सूत्र अशी अधिक माहिती देते: “कराटे अंतर्गत केलेले सर्वकाही—प्रत्येक हालचाल, प्रत्येक भावनेचा—झेन पंथाच्या कोणत्या ना कोणत्या तत्त्वासोबत संबंध जोडता येतो.” झेन, हा धार्मिक चिंतनावर जोर देणारा बौद्ध धर्मातील पंथ आहे. २ करिंथकर ६:१७ मधील बायबलचे शब्द लक्षात घेता ही धार्मिक पार्श्‍वभूमी ख्रिश्‍चनांसाठी गंभीर समस्या उभी करते. त्यात म्हटलेले आहे: “‘त्यांच्यामधून [खोट्या उपासकांमधून] निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभू म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका’”

शस्त्रांचा उपयोग

परंतु, बंदूक किंवा चाकू जवळ बाळगण्याबद्दल काय? असे केल्याने तुम्हाला आत्मविश्‍वास वाटेल हे खरे. पण तुम्ही अनावश्‍यक जोखीमा घेऊ लागला किंवा संकटाला आमंत्रण देऊ लागला तर हा आत्मविश्‍वास प्राणघातक ठरू शकतो. बायबल ताकीद देते: “जो अरिष्टाच्या शोधात असतो त्याला तेच प्राप्त होईल.” (नीतिसूत्रे ११:२७) त्याचप्रमाणे तुमच्यावर अनपेक्षितपणे संकट आले असता शस्त्र उगारणे, नक्कीच झगड्याला आणखीन वाढवेल. तुम्ही ठार मारले जाऊ शकता—किंवा तुमच्या हातून कोणी ठार होईल. तुम्ही हिंसेचा मार्ग टाळू शकत असून तसे केले नाही तर जीवनाचा उगम, देव, तुमच्या कृतींना कोणत्या दृष्टिकोनातून पाहील?—स्तोत्र ११:५; ३६:९.

शस्त्रांच्या शक्‍तीचा उपयोग करण्याचा काही लोकांचा खरोखर इरादा नसतो हे मान्य आहे. ते केवळ त्रास देणाऱ्‍यांना धाक दाखवण्यास शस्त्र जवळ बाळगतात असे ते म्हणत असतील. तथापि आरोग्य (इंग्रजी) नियतकालिक म्हणते: “बंदूक वापरण्याचे प्रशिक्षण देणारे याजशी सहमत आहेत: तुम्ही बंदूक वापरणार नसल्यास ती घेऊ नका. फसवेपणाने बंदूक रोखणे काही हल्लेखोरांना घाबरवू शकते, पण इतर हल्लेखोर यामुळे आणखीनच चिडतील.”

रासायनिक फवाऱ्‍यांसारख्या “सुरक्षित” शस्त्रांबद्दल काय? काही ठिकाणी बेकायदेशीर असण्याशिवाय, या शस्त्रांत गंभीर उणीवा आहेत. मादक औषधांच्या धुंदीत असलेल्या एखाद्या हल्लेखोरास जागच्या जागी खिळवून टाकण्याऐवजी ती त्यास अधिकच संतप्त करण्यात सफल होतील. वाऱ्‍यामुळे ते रसायन हल्लेखोराच्या ऐवजी तुमच्या चेहऱ्‍यावर उडण्याचीही शक्यता आहे—अर्थात तुम्ही फवारा मारण्याचा पंप बाहेर काढू शकलात तर. तुम्हाला तुमचे खिसे किंवा पर्स चाचपडताना पाहून, तुम्ही बंदूक शोधत आहात या अंदाजाने कदाचित तो हल्लेखोर स्वतः काही आक्रमक हालचाल करण्याचे ठरवेल. एका गुप्त महिला पोलिसाने असे विवेचन मांडले: “मेस [एक प्रकारचा रासायनिक फवारा], किंवा इतर कोणतेही शस्त्र त्यावेळेस चालेलच याची खात्री नाही. अथवा तुम्ही ते वेळेवर काढू शकाल याचीही खात्री नाही. शस्त्रे एखाद्या प्रसंगावर कधीच उपाय नसतात. लोक त्यांच्यावर नको तेवढा विश्‍वास ठेवतात.”

शस्त्रे—ईश्‍वरी दृष्टिकोन

येशूच्या काळात हिंसेचे भय वास्तविक होते. त्याच्या अत्यंत प्रसिद्ध असलेल्या दृष्टान्तांपैकी, सामान्यपणे चांगल्या शोमरोन्याचा दृष्टान्त म्हणण्यात आलेल्या दृष्टान्तात हिंसक दरोड्याच्या घटनेचा वृत्तान्त होता. (लूक १०:३०-३५) जेव्हा येशूने त्याच्या शिष्यांना तलवार जवळ बाळगण्यास सांगितले, तेव्हा ते संरक्षणाच्या उद्देशाने नव्हते. वास्तविक पाहता, या गोष्टीने त्यास हे तत्त्व सांगण्यास प्रवृत्त केले: “तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.”—मत्तय २६:५१, ५२; लूक २२:३६-३८.

याच कारणास्तव, खरे ख्रिस्ती, त्यांच्या सोबत्यांना हानी पोहंचविण्यासाठी शस्त्र धारण करीत नाहीत. (पडताळा यशया २:४.) रोमकरांस १२:१८ मधील: “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा”, या सल्ल्याचे ते पालन करतात. याचा अर्थ आपण प्रतिकारच करू नये असा होतो का? अजिबात नाही!

सुज्ञान—शस्त्रांपेक्षा श्रेष्ठ

प्रत्येक कामासाठी जणू साधन असणाऱ्‍या युगात, कोणत्याही मानव-निर्मित शस्त्रापेक्षा अधिक प्रभावी असणारे स्वसंरक्षणाचे माध्यम तुमच्याजवळ आहे हे जाणून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. उपदेशक ९:१८ या वचनामध्ये, आपण वाचतो: “युद्धशस्त्रापेक्षा सुज्ञान श्रेष्ठ आहे.” हे सुज्ञान, काही लोक ज्यास “रस्त्यावर वावरणारे चतुर लोक” म्हणतात त्यांपेक्षा पुष्कळ अधिक आहे. ते बायबलचे तत्त्व लागू करणे आहे व अनेकदा ते तुम्हास सुरुवातीसच, हिंसक प्रसंग टाळण्यास मदत करते.

उदाहरणार्थ, ज्याने त्याच्या हिंसक शाळेचे आधी वर्णन केले तो हायरो, १ थेस्सलनीकाकरांस ४:११ मधील ‘स्वस्थ राहणे व आपापला व्यवसाय करणे, ह्‍यांची हौस तुम्हाला असावी’ या बायबलच्या शब्दांना लागू करण्याद्वारे संकटापासून चार हात दूरच राहतो. हायरो म्हणतो: “झगडा होणार हे माहीत असल्यास कोणतीही दखल न घेता घरी गेले पाहिजे. काही जण तिथेच घुटमळतात व नेमके तेव्हाच संकटात सापडतात.”

लोला ही तरुणी सांगते, “मी यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक आहे हे सर्वांना सांगणे माझ्यासाठी सर्वात चांगले संरक्षण आहे. लोक मला त्रास देत नाहीत कारण मी त्यांच्यासाठी धोकादायक ठरणार नाही हे त्यांना माहीत आहे.” या संबंधाने अधिक सांगताना एलीयू म्हणतो, “तुम्ही साक्षीदार आहात हे सांगणेच केवळ पुरेसे नसते. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे त्यांना लक्षात आले पाहिजे.” ख्रिश्‍चनांनी ‘जगाचे नसावे.’ (योहान १५:१९) परंतु, श्रेष्ठपणाची मनोवृत्ती दाखवली जाऊ नये म्हणून सावधगिरी बाळगा. (नीतिसूत्रे ११:२) एका युवकाने असे म्हटले: “दालनांतून चालताना, ती जागा तुमच्याच मालकीची आहे अशा डौलात चालू नका.” यामुळे चीड निर्माण होऊ शकेल. लूची नामक एक ख्रिस्ती युवती सांगते: “मी मनमिळावू आहे व मी माझ्या वर्गमित्रांसोबत बोलते; पण मी त्यांच्यासारखी मात्र अजिबात वागत नाही.”

तुम्ही कसा पेहराव करता हेही महत्त्वपूर्ण आहे. एक युवक म्हणतो, “लक्ष आकर्षित करणारे कपडे न घालण्याविषयी मी सावध असतो. चांगले दिसण्यासाठी मला सर्वात महागड्या प्रतीचे कपडे घालणे जरूरीचे नाही असा माझा निष्कर्ष आहे.” मर्यादशील पेहराव करण्याचा बायबलचा सल्ला अनुसरणे, तुम्हाला इतरांचे लक्ष न वेधण्यास व संकटाना टाळण्यास मदत करील.—१ तीमथ्य २:९.

तुम्हाला हिंसेला तोंड द्यावे लागल्यास

संकटे टाळण्याचा प्रयत्न करूनही तुम्हाला हिंसेचा सामना करावा लागला तर? प्रथम, नीतिसूत्रे १५:१ मधील तत्त्व लागू करण्याचा प्रयत्न करा: “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.” शाळेत असताना तरुण एलीयूने असेच केले. तो म्हणतो: “कधीकधी भांडखोरपणाने बोललेल्या गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. पुष्कळ वेळा, तुम्ही ज्याप्रकारे प्रतिक्रिया दाखवता तेच संकटाला कारणीभूत ठरते.” “वाइटाबद्दल वाइट अशी कोणाची फेड” करण्यास नकार दिल्यामुळे, तुम्ही परिस्थितीला हाताबाहेर जाण्यापासून रोखू शकता.—रोमकर १२:१७.

परंतु, व्यवहारचातुर्य निष्फळ ठरते तेव्हा मात्र तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जर तरुणांच्या एखाद्या टोळीने तुम्हाला तुमचे महागडे बूट किंवा तुमच्या मालकीच्या इतर बहुमोल वस्तू मागितल्या, तर त्या देऊन टाका! तुमच्याजवळ असलेल्या वस्तूंपेक्षा तुमचे जीवन कितीतरी अधिक मोलवान आहे. (लूक १२:१५) मारामारी होणे अटळ आहे असे दिसल्यास, तेथून चालू लागा—त्याहूनही उत्तम म्हणजे तेथून पळून जा! ‘भांडण पेटण्यापूर्वी तेथून निघून जावे’ असे नीतिसूत्रे १७:१४ म्हणते. (पडताळा लूक ४:२९, ३०; योहान ८:५९.) पळ काढणे अशक्य असल्यास, होता होईल तसा हिंसा टाळण्याचा प्रयत्न करण्याशिवाय तुम्हाला पर्याय राहणार नाही. काय घडले ते नंतर तुमच्या पालकांना सांगण्यास विसरू नका. कदाचित ते तुमची काही मदत करू शकतील.

बायबलने पूर्वभाकित केल्याप्रमाणे, आपण हिंसक काळात राहत आहोत. (२ तीमथ्य ३:१-५) परंतु, बंदूक जवळ बाळगणे किंवा कराटेचे डावपेच शिकणे तुम्हाला अधिक सुरक्षित बनवणार नाही. चौकस राहा. संकटाला तोंड द्यावे लागते तेव्हा ईश्‍वरी सुज्ञानाचा उपयोग करा. सर्वात मुख्य म्हणजे यहोवावर भरवसा व विश्‍वास ठेवा. स्तोत्रकर्त्याप्रमाणे तुम्ही देखील आत्मविश्‍वासाने प्रार्थना करू शकता: ‘जुलमी मनुष्यापासून तू मला सोडवशील.’—स्तोत्र १८:४८.

[१३ पानांवरील चित्रं]

मार्शल आर्ट्‌स, ख्रिश्‍चनांसाठी उपाय नाहीत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा