वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ३/१ पृ. १०-१५
  • रक्‍तपाती जगातील ख्रिस्ती तटस्थ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • रक्‍तपाती जगातील ख्रिस्ती तटस्थ
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवासोबत शांतीसंबंध जोपासणे
  • ख्रिश्‍चनांसाठी असणारा दर्जा
  • आधुनिक काळी
  • त्यांनी हातमिळवणी केली नाही
  • रक्‍तदोषापासून संरक्षण प्राप्त करणे
  • देवाप्रमाणे तुम्हीही जीवन मौल्यवान समजता का?
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • ‘ते जगाचे नाहीत’
    उपासनेतील ऐक्य
  • जीवनाच्या देणगीची उचित कदर बाळगा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • रक्‍ताविषयीचा इश्‍वरी आदर
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ३/१ पृ. १०-१५

रक्‍तपाती जगातील ख्रिस्ती तटस्थ

“जो कोणी मनुष्याचा रक्‍तपात करील त्याचा रक्‍तपात मनुष्याकडून होईल, कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा उत्पन्‍न केला आहे.”—उत्पत्ती ९:६.

१. एकोणिसशे चौदापासून घडत असलेल्या कोणत्या जागतिक घडामोडींनी मोठी काळजी निर्माण केली आहे?

रक्‍ताचा सागर! होय, १९१४ तील युध्दापासून लाखो लाख जिवांच्या रक्‍ताचे सिंचन झाले आहे. मग भवितव्य ते काय? १९४५ मध्ये दोन जपानी शहरांच्या उद्‌ध्वस्ततेमध्ये दोन लाख जिवांचा बळी घेतला व त्यातूनच एका नव्या हिंसक तत्वाचा उदय झाला ज्याचे नाव प्रबळ सत्तांनी अगदी योग्यपणे “MAD” (मिच्युअली ॲश्‍युअर्ड डिस्ट्रक्शन) असे ठेवले. याकरवीच अण्वस्त्राच्या साठ्यामुळे भीतीग्रस्तता निर्माण झाली कारण या आयुधाकरवी पृथ्वीचा कित्येक पटीने नाश केला जाऊ शकतो. पाणबुड्यांनीही अत्यंत क्रुर अशी शस्त्रास्त्रे सागरतळी नेली आहेत. अलिकडेच अंतराळ युध्दानेही धोक्यात आणखी भर घातली आहे. पण दहशतीने त्यांचे पाये हादरवून सोडले आहेत. मग या वेडेपणातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का?

२. या काळासंबंधाने येशूने कोणते भाकित केले व त्याने ख्रिश्‍चनांना कोणती हमी दिली?

२ होय आहे. पण हा काही राष्ट्रांनी निवडलेला मार्ग नाही. राष्ट्रांच्या भीतीग्रस्त स्थितीसंबंधाने येशूने भाकित केले होते: “तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यात चिन्हे होतील; आणि समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील. भयाने व जगावर येणाऱ्‍या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्ये मूर्च्छित होतील. आकाशातील बळे डळमळतील.” येशूने या भविष्यवादाचा समारोप “या सर्व होणाऱ्‍या गोष्टी चुकवावयास” समर्थ होणाऱ्‍या “जागृत राहा”णाऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या बाबतीत हमी देऊन व्यक्‍त केला.—लूक २१:२५, २६, ३६.

देवासोबत शांतीसंबंध जोपासणे

३. (अ) राष्ट्रे “या जगाच्या देवा”ची कशी आस्था जोपासत आहेत? (ब) या प्रकरणाचा यहोवा कसा शहनिशा करील?

३ अण्वस्त्रांच्या शस्त्रास्त्रांनी सज्ज असणारी राष्ट्रे जग स्वामित्वाच्या स्पर्धेत गुंतली आहेत व याचा शेवट जगाच्या विनाशात केवळ होऊ शकतो. हे या ‘जगाच्या देवाच्या’ आस्थेची पूर्णता करते. राष्ट्रे “यहोवा व त्याचा (ख्रिस्त),” जो सध्या स्वर्गात सिंहासनाधिष्ठ आहे त्यांच्या विरूध्द उभी ठाकली आहेत. यहोवा आज्ञा देईल तेव्हा हा ख्रिस्त या राष्ट्रांना लोखंडी राजदंडाने प्रहार करील. त्यावेळी या अभिवचनाची पूर्णता होईल: “शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकर तुडवील.”—२ करिंथकर ४:४; स्तोत्रसंहिता २:२, ६–९; रोमकर १६:२०.

४. आम्हाला देवासोबत कसे शांतीसंबंध जोपासता येतील?

४ पण, आम्ही, आमच्या बाबतीत, स्वतःला देवासोबत शांतीची जोपासना करीत राहण्याची इच्छा बाळगली पाहिजे. हे आम्हाला कसे जमेल? याविषयीची एक गोष्ट म्हणजे आम्ही मानवी जीवनाविषयी तसेच आमच्या नाडी व नसातून जे मोलवान रक्‍त वाहते त्याच्या पावित्र्याविषयीचा देवाचा दृष्टीकोण ग्रहण केला पाहिजे.

५. यहोवा अविचारी रक्‍तपाताचा बदला घेतो हे कोणती उदाहरणे सूचित करतात?

५ यहोवा हा मानवाचा त्याचप्रमाणे आमच्या शरीरास आरोग्य देणाऱ्‍या व आम्हास जिवंत ठेवणाऱ्‍या खेळत्या रक्‍तप्रवाहाचा निर्माता आहे. मानवी रक्‍त अविचारीपणे सांडले जावे हे देवाने केव्हाही उद्देशिले नाही. काईनाने पहिली हत्त्या घडवून आणल्यावर यहोवाने घोषित केले की हाबेलाचे रक्‍त बदला घेण्यासाठी ओरडत आहे. कालांतराने काईनाचा वंशज लामेख स्वतः एक मारेकरी झाला आणि यानेच काव्यमयरित्या असे म्हटले की कोणी त्याला घाय केल्यास त्या रक्‍तदोषाचा बदला घ्यावा. काही काळात ते भ्रष्ट जगत हिंसाचाराने भरले. यहोवाने महाजलप्रलय पाठवून मानवजातीच्या त्या पहिल्या जगाचा नाश केला. त्यातून केवळ शांतीप्रिय नोहा, ज्याच्या नावाचा अर्थ “विश्राम” आहे त्याचा आपल्या कुटुंबासमवेत बचाव झाला.—उत्पत्ती ४:८–१२, २३, २४; ६:१३; ७:१.

६. रक्‍तासंबंधाने देवाचा नियम कोणता आहे व तो कोणावर बंधनकारक आहे?

६ त्यावेळी यहोवाने नोहाला रक्‍तासंबंधी त्याला वाटणारी इच्छा व्यक्‍त केली. त्याने याचा कळस असे म्हणून केला: “जो कोणी मनुष्याचा रक्‍तपात करील त्याचा रक्‍तपात मनुष्याकडून होईल. कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा उत्पन्‍न केला आहे.” (उत्पत्ती ९:३–६) आजची सर्व मानवजात नोहाची वंशज आहे या कारणास्तव जीवनाविषयीच्या आदरावर जोर देणारी ही इश्‍वरी आज्ञा देवाची मर्जी प्राप्त करू इच्छिणाऱ्‍या सर्व मानवांवर बंधनकारक आहे. दहा आज्ञेतील सहाव्या आज्ञेनेही हेच म्हटले होते: “तू खून करू नको.” रक्‍तदोष योग्य हालचालीची व भरपाईची हाक देतो.—निर्गम २०:१३; २१:१२; अनुवाद २१:१–९; इब्रीयांस १०:३०.

७. (अ) यहोवाने इस्त्राएलांना युध्दाला जाण्याची आज्ञा करणे योग्य का होते? (ब) आज ख्रिश्‍चन कोणत्या युध्दात स्वतःला गुंतवून आहेत?

७ अशाप्रकारे रक्‍त सांडण्याविषयीची स्पष्ट व सक्‍त मनाई केली असताना यहोवाने इस्त्राएल राष्ट्राला युध्द करण्याची आज्ञा व अनुज्ञा का देऊ केली बरे? आम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की ते पवित्र युध्द होते ज्याच्या आधाराने यहोवा, जो सर्व पृथ्वीचा शास्ता, दुरात्म्यांची भक्‍ती करणाऱ्‍या राष्ट्रांचे उच्चाटन करीत होता. उदाहरणार्थ, कनानी लोकांनी अनधिकृतपणे वचनयुक्‍त देशात आपली वसाहत केली होती व ते आपल्या दुरात्मिक व अनैतिक जीवनाक्रमणाद्वारे देवाच्या पवित्र लोकांना धोकादायक ठरणार होते. या कारणामुळे इश्‍वरशासित युध्द करून यहोवाने त्या देशाला आपणातून त्या नीतीभ्रष्ट व दुराचारी लोकांना ‘ओकून टाकावयास’ प्रवृत्त केले. (लेवीय १८:१–३०; अनुवाद ७:१–६, २४) या कारणामुळे ख्रिश्‍चनांचे आजचे आध्यात्मिक युध्द न्याय्य ठरते.—२ करिंथकर १०:३–५; इफिसकर ६:११–१८.

८. अजाण रक्‍त सांडण्यावर देवाची नाराजी असते हे कशावरुन दिसते?

८ तथापि, यहोवाने तारतम्यहीन रक्‍तपाताला मर्जी दर्शविली नाही. या कारणास्तव यहुदाच्या एका राजाविषयी असे लिखित आहे: “मनश्‍शाने . . . निर्दोषी जनांचा मनस्वी संहार केला. एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत यरुशलेम रक्‍तमय केले.” मनश्‍शाने नंतर पश्‍चाताप व्यक्‍त केला व यहोवासमोर स्वतःला लीन बनविले तरी हा रक्‍तदोष त्याच्यावर व त्याच्या वंशावर राहिला. मनश्‍शाचा देवभिरु नातू योशिया राजा याने सरळ पावले उचलून देश स्वच्छ केला व खऱ्‍या भक्‍तीची पुनर्स्थापना केली. पण त्याला तो रक्‍तदोष काढून टाकता आला नाही. योशीयाचा पुत्र यहोयाकीमच्या कारकिर्दीत यहोवाने नबुखद्‌नेस्सर राजाला यहुदावर चढाई करण्यास लावून त्या राष्ट्रावर न्यायदंड आणला. “यहुदी लोकांस आपल्या समोरून घालवावे म्हणून निःसंशये हे सर्व यहोवाच्या आज्ञेने यहुदावर आले. मनश्‍शाने केलेल्या सर्व पापकर्मामुळे व त्याने निरपराध जनांचा रक्‍तपात केल्यामुळे असे झाले. त्याने यरुशलेम निरपराध जनांच्या रक्‍ताने भरुन टाकले म्हणून यहोवा क्षमा करीना.”—२ राजे २१:१६; २४:१–४; २ इतिहास ३३:१०–१३.

ख्रिश्‍चनांसाठी असणारा दर्जा

९. रक्‍तपाताविषयी येशूने ख्रिश्‍चनांसाठी कोणता दर्जा लावून दिला?

९ ख्रिस्ती धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त, रक्‍तपाताविषयी ख्रिश्‍चनांसाठी विशिष्ठ दर्जा आखून देणार अशी आम्हाला अपेक्षा धरता येईल. ते त्याने केले का? आपल्या मृत्युच्या स्मारकविधीची स्थापना केल्यावर शिष्यांनी सोबत दोन तरवारी घेतल्या आहेत हे येशूने जातीने पाहिले. याचा काय उद्देश होता? एका महत्वपूर्ण तत्वाची प्रस्थापना करावी व ते सर्व ख्रिश्‍चनांनी पाळावे याकरता. गेथशेमाने बागेत येशूला धरण्यासाठी शिपायांची तुकडी आली तेव्हा उतावळ्‌या पेत्राने तरवार उपसली व यहुदी प्रमुख याजकाचा दास मल्ख याचा कान छाटून टाकला. देवाच्या पुत्राच्या वतीने अशा प्रकारची लढत देणे उदात्त कृत्य नव्हते का? येशूला तसे वाटले नाही. त्याने दासाचा कान बरा केला व पेत्राला याचे स्मरण दिले की त्याच्या स्वर्गीय पित्याठायी त्याच्याकरता देवदुतांच्या सैन्याच्या बारा तुकड्या पाठविण्याएवढी क्षमता आहे. त्यावेळी येशूने एका मुलभूत तत्वाचा उवाच्च केला: “तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.” —मत्तय २६:५१–५३; लूक २२:३६, ३८, ४९–५१; योहान १८:१०, ११.

१०. (अ) योहान १७:१४, १६ व १८:३६ मध्ये कोणते महत्वपूर्ण तत्व प्रस्थापण्यात आले? (ब) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांसाठी कोणते मार्गाक्रमण तारणप्रदायक ठरले?

१० येशूने यहोवाला केलेल्या कळकळीच्या प्रार्थनेचे पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना स्मरण राहिले असावे. या प्रार्थनेत येशूने आपल्या शिष्यांबद्दल म्हटले होते: “जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.” पंतय पिलाताला येशूने स्पष्टीकरणार्थ जे उत्तर दिले तेही त्यांच्या स्मरणात राहिले असावे की, “माझे राज्य या जगाचे नव्हे. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून माझ्या शिपायांनी लढाई केली असती. परंतु माझे राज्य येथले नव्हे.” (योहान १७:१४, १६; १८:३६) त्या काळी यहुदी पक्ष आपसात शाब्दिकरित्या व रक्‍तपाताद्वारे भांडत होते. पण त्या क्रांतीमय मोहिमात येशूच्या शिष्यांनी भाग घेतला नाही. ते जवळजवळ ३० वर्षे यरुशलेमात थांबून राहिले. त्यानंतर त्यांनी येशूच्या भविष्यवादित चिन्हाची आज्ञा “डोंगराकडे पळून” जाण्याद्वारे मानली. त्यांची तटस्थ भूमिका व पलायन यांनी त्यांचे तारण घडविले.—मत्तय २४:१५, १६.

११, १२. (अ) कर्नेल्य व सिर्ग्य पौल विश्‍वासू बनल्यावर त्यांना कोणता निर्णय घ्यावा लागला? (ब) योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना कोठून मदत प्राप्त होणार होती? (क) हे आजच्याबद्दल काय सूचित करते?

११ काहीजण विचारतील, ‘कर्नेल्य जमादार तसेच कुप्र येथील सिर्ग्य पौल या लष्करी सुभेदाराबद्दल काय? हे लष्करात काम करणारे लोक नव्हते का?’ होय, त्यांनी ख्रिस्ती संदेश ग्रहण केला त्यावेळी ते त्या स्थितीत होते. तथापि, कर्नेल्य व इतरांनी आपल्या परिवर्तनानंतर काय केले याविषयी शास्त्रवचने आम्हाला सांगत नाहीत. सिर्ग्य पौल, जो स्वतः बुध्दीमान होता व जो ‘यहोवाच्या शिक्षणावरून थक्क झाला’ होता त्याने आपल्या नव्या विश्‍वासानुरूप लवकरच स्वतःची प्रापंचिक स्थिती पडताळली असावी व योग्य तो निर्णय घेतला असावा. कर्नेल्यानेही तेच केले असावे. (प्रे. कृत्ये १०:१, २, ४४–४८; १३:७, १२) त्यांनी कोणती कृति करावी याविषयी शिष्यांनी त्यांना काही सांगितले असावे याबद्दल काही अहवाल उपलब्ध नाही. देववचनाच्या स्वतःच्या अभ्यासाद्वारे स्वतःला काय करावे लागणार ते त्यांनी पाहिले होते.—यशया २:२–४; मीखा ४:३.

१२ याचप्रमाणे ख्रिस्ती तटस्थतेच्या अनुषंगाने उद्‌भवणाऱ्‍या वादविषयाच्या बाबतीत ख्रिश्‍चनांनी इतरांना स्वतःचे वैयक्‍तिक मतप्रदर्शन करू नये. प्रत्येकाने शास्त्रवचनीय तत्वांबद्दल त्यास प्राप्त झालेल्या समजावणूकीआधारे स्वतःचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्यास हवा.—गलतीकर ६:४, ५.

आधुनिक काळी

१३. पहिल्या जागतिक महायुध्दातील रक्‍तदोष टाळण्यासाठी पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी काय केले?

१३ जगातील दृश्‍यात पहिल्यांदाच सार्वत्रिक युध्द पेटले ते १९१४ वर्ष होते. राष्ट्रांचे बळ, मनुष्यबळ सुध्दा युध्दाच्या कामी लावण्यात आले. यहोवाच्या साक्षीदारांना त्या काळी पवित्र शास्त्र विद्यार्थी म्हणत त्यांनी रक्‍तदोष स्वतःवर आणण्याचे टाळण्यासाठी प्रशंसनीय प्रयत्न केले. त्यांचा कटु छळ झाला. असेच होणार असे येशूने म्हटले होते.—योहान १५:१७–२०.

१४, १५. (अ) दुसऱ्‍या जागतिक महायुध्दात यहोवाने कसे मार्गदर्शन दिले? (ब) तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांनी कोणते स्पष्ट स्वरूपाचे धोरण स्विकारले? (क) हे, जागतिक धर्माचे लोक जे करीत होते त्याच्या विरोधात कसे दिसले?

१४ जगव्याप्त झगड्याने १९३९ मध्ये पुन्हा उचल घेतली त्यावेळी यहोवाने आपल्या सेवकांना स्पष्ट स्वरूपाचे मार्गदर्शन दिले. युध्दाची घोषणा झाल्याच्या दोन महिन्याच्या आतच हे मार्गदर्शन द वॉचटावर याच्या नोव्हेंबर १, १९३९ अंकात “तटस्थता” या पवित्र शास्त्रीय अभ्यासाच्या अग्रलेखात प्रकाशित झाले. या लेखाचा समारोप अशा पध्दतीने करण्यात आला होता: “प्रभुच्या बाजूने असणारे सर्व जण लढणाऱ्‍या राष्ट्रांच्या बाबतीत तटस्थ राहतील. ते संपूर्णरित्या थोर इश्‍वरशासक व त्याचा राजा यांच्यासाठी असतील.”

१५ याचा काय परिणाम झाला? जागतिक बंधुवर्ग या नात्याने यहोवाच्या साक्षीदारांनी दुसऱ्‍या देशातील आपल्या बांधवांचा तसेच निरपराध लोकांचा रक्‍तपात करण्यापासून माघार घेतली. कॅथोलिक, प्रॉटेस्टंट, बौध्द आणि इतर एकमेकांची हफ़ा करण्यात गुंतले त्यावेळी येशूचे खरे शिष्य त्याने दिलेल्या या नव्या आज्ञेचे पालन करीत होते: “मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.”—योहान १३:३४.

१६. (अ) यहोवाच्या साक्षीदारांनी स्वतःच्या बाबतीत सत्‌शील ख्रिस्ती असल्याचे कसे दाखविले? (ब) देवाच्या गोष्टी देवाला देण्यात साक्षीदारांनी कशी पराकाष्ठा दाखवली आणि याचा कधी कधी काय परिणाम घडला?

१६ या ख्रिश्‍चनांनी कैसराचे ते कैसराला देऊ केले. सत्‌शील नागरिक या अर्थी त्यांनी देशाच्या कायद्यांचे पालन केले. (मत्तय २२:१७–२१; रोमकर १३:१–७) तथापि, त्यांनी प्रामुख्यत्वे आपले समर्पित जीवन व ख्रिस्ती उपासना या सहित देवाच्या हक्काच्या गोष्टी त्याला देऊ केल्या. या कारणास्तव देवाच्या हक्काच्या गोष्टींची कैसराने त्यांच्याकडून मागणी केली तेव्हा त्यांनी प्रे. कृत्ये ४:१९ व ५:२९ नुरुप हालचाल केली. ते रक्‍तपात घडवून आणण्याचे, लष्करातील मुलकी सेवा, बदली सेवा असो किंवा राष्ट्रीय ध्वजासारख्या प्रतिमेस वंदन करणे असो, विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी असे धोरण पत्करले की ज्यात हातमिळवणी नव्हती. अशा या भूमिकेमुळे काही प्रकरणात त्यांना हफ़ा पत्करावी लागली.—मत्तय २४:९; प्रकटीकरण २:१०.

त्यांनी हातमिळवणी केली नाही

१७. (अ) एका पुस्तकाच्या मते नाझींनी यहोवाच्या साक्षीदारांना कसे वागविले? (ब) आव्हानास तोंड देण्यात यहोवाचे साक्षीदार इतरांपेक्षा कसे वेगळे दिसले?

१७ ऑफ गॉड्‌स्‌ ॲण्ड मेन या अलिकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकाने म्हटले की, हिटलरच्या जर्मन साम्राज्यशाहीत यहोवाचे साक्षीदार हा असा एक धार्मिक गट होता ज्याला “अति कट्टर विरोधाचा” सामना करावा लागला. यहोवाच्या साक्षीदारांनी हातमिळवणी केली नाही. जर्मनीतील इतर धर्मगटांनी आपल्या लष्करी पुरोहितांचा मार्ग धरला व त्याकरवी जर्मन सत्तेस धार्मिक सेवा अर्पण करून “आपल्या उजव्या हातावर व कपाळावर” राजकारणी श्‍वापदाचे चिन्ह धारण केले. (प्रकटीकरण १३:१६) या लोकांनी कार्यहालचालीचा व पाठबळाचा आपला उजवा हात जर्मनच्या राजकारणी यंत्रसामग्रीकरता दिला आणि हिटलरचा गौरव करून व स्वस्तिक ध्वजास वंदन करून आपली भूमिका स्पष्ट केली.

१८. (अ) यहोवाचे साक्षीदार “राजकीय दृष्ट्या ‘तटथ’” होते की नव्हते याविषयीचा कोणता पुरावा आढळतो? (ब) हा ऐतिहासिक अहवाल आम्हा प्रत्येकावर कसा परिणामित होण्यास हवा?

१८ खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी येथे कोणती भूमिका ग्रहण केली होती? वर नमूद असणारा ग्रंथ म्हणतो: “केवळ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रतिकार दर्शविला. त्यांनी नखशिखात पवित्रा घेतला होता. याचा परिणाम असा झाला की त्यांच्यापैकीच्या अर्ध्यांना तुरुंगवास मिळाला व एक चतुर्थांशांची हफ़ा झाली. . . . ते (इतर धर्मींयांपेक्षा) वेगळेच आहेत म्हणजे जगीक प्रवृत्तीचे नाहीत; ते या अर्थी की या भौतिक जगाकडून ते बहुमान प्राप्त करण्याची इच्छा धरीत नाहीत व स्वतःला त्याचे सभासद करीत नाहीत. ते एका वेगळ्‌याच जगास–देवाच्या–अनुबंधित असल्यामुळे राजकारणी दृष्ट्या ‘तटस्थ’ आहेत. . . . ते हातमिळवणी पत्करीत वा करीत नाहीत. . . . लष्कराची सेवा करणे, मतदान करणे किंवा हिटलरला मानवंदना देणे या गोष्टी त्यांच्यासाठी देवाच्या दाव्यापेक्षा जगाच्या दाव्यांचा पत्कर करणे याचा अर्थ देणाऱ्‍या होत्या.” त्यांची शांतीची तसेच अहिंसाचारी मार्गाची जोपासना राजकीय बंद्यांच्या छावणीत सुध्दा दिसली. ती कशी? “तुरुंगाधिकाऱ्‍यांची दाढी वस्तऱ्‍याने करण्यासाठी केवळ साक्षीदारांना मुभा होती कारण त्यांच्याविषयीचा हा विश्‍वास होता की ते कोणाची हत्त्या करु शकत नाही.”

१९. यहोवाच्या साक्षीदारांनी येशूच्या धैर्यवान उदाहरणाचे कसे अनुकरण केले व कोणत्या परिणामासह?

१९ दुसऱ्‍या महायुध्द काळात यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती तटस्थतेविषयीचे अफ़ुतम उदाहरण ठरले. त्यांनी जगभरात एकजुटीने ‘जगाचे भाग नाहीत’ या येशूच्या उदाहरणाचे निर्भिडपणे अनुकरण केले आणि ख्रिस्ताप्रमाणे या रक्‍तपाती जगावर ‘विजय मिळविला.’—योहान १७:१६; १६:३३; १ योहान ५:४.

रक्‍तदोषापासून संरक्षण प्राप्त करणे

२०. (अ) खोट्या धर्मापासून दूर पळणे एवढे तातडीचे का आहे? (ब) आज खरा आश्रय केवळ कोठे सापडू शकेल?

२० धर्मयुध्दे, पवित्र युध्दे व चौकशी सत्रात निरपराधी रक्‍त सांडून धर्म संस्थांनी इतिहासाची पाने रक्‍तरंजित केली आहेत. त्यांनी रक्‍तपिपासू हुकुमशहांसोबत मेलमिलाफ केला. या हुकुमशहांनी यहोवाच्या साक्षीदारांना तुरुंगात व राजकीय छावण्यात अडकविले जेथे त्यापैकीचे बहुतेक ठार झाले. त्याबद्दल यांनी समाधान व्यक्‍त केले. ज्या नेत्यांनी साक्षीदारांवर गोळ्‌या झाडल्या व शिरच्छेद केला त्यांना यांनी स्वेच्छापूर्ण पाठबळ दिले. अशा या धर्मव्यवस्था यहोवाचे न्यायदंड चुकवू शकणार नाहीत. यास विलंब लागणार नाही. तसेच धार्मिकतेवर प्रेम करणाऱ्‍या लोकांनी खोट्या धर्मातून–रक्‍ताने डागलेल्या “मोठी बाबेल” मधून–बाहेर पडण्यास व देवाच्या संघटनेत आश्रय संपादण्यात विलंब करू नये.—प्रकटीकरण १८:२, ४, २१, २४.

२१. शरणपुरे या देवाकडील व्यवस्थेद्वारे कशाची पडछाया मिळते?

२१ आम्हापैकी बहुतेकांनी देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याआधी रक्‍तपात केला असावा वा आम्ही रक्‍तपाती धर्म वा राजकारणी व्यवस्थेचे सभासद राहिलेलो असू. या अवस्थेत आमची स्थिति इस्त्राएलातील त्या मनुष्यहफ़ा करणाऱ्‍यासारखी आहे ज्याच्याकडून अहेतूक पणे वध घडला. तो विशिष्ट अशा सहा शरणपुरांपैकी एखाद्या शहरात पळून जाऊ शकत होता व तेथे राहू शकत होता व त्याला इस्त्राएलाच्या महायाजकाच्या मृत्युनंतर तेथून मुक्‍ति मिळे. याचा आज हा अर्थ होतो की देवाचा प्रमुख याजक येशू ख्रिस्ताच्या कार्याचा स्विकार करणे व त्याच्या फायद्यांखाली स्वत:ला ठेवणे. येथे देवाच्या अभिषिक्‍त जनांच्या सहवासात राहून जेव्हा “रक्‍ताचा बदला घेणारा” सद्यकालीन ख्रिस्त येशू, देवाचा न्यायदंड रक्‍तदोषी लोकांवर बजावील तेव्हा आम्ही बचावू शकतो. देवाच्या संघटनेकडे धावणाऱ्‍या “मोठा लोकसमुदाय” याने तेथे, ख्रिस्त हा त्याच्या प्रमुख याजकाच्या पदानुसार ‘मरत’ नाही, म्हणजे मुक्‍तता घडविण्याचे कार्य पूर्ण करीत नाही तोपर्यंत राहिलेच पाहिजे.—गणना ३५:६–८, १५, २२–२५; १ करिंथकर १५:२२–२६; प्रकटीकरण ७:९, १४.

२२. यशया २:४च्या बाबतीत संयुक्‍त राष्ट्रसंघातील राष्ट्रे देवाच्या पवित्र राष्ट्रापेक्षा कशी भिन्‍न दिसतात?

२२ अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात असलेल्या संयुक्‍त राष्ट्र संघाच्या इमारतीवर यशया २:४ वर आधारलेले हे वचन तुम्हाला वाचावयाला मिळेल: “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील; आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युध्दकला शिकणार नाहीत.” पण या शब्दांनुरुप आज कोण वागत आहेत? संयुक्‍त राष्ट्रसंघ हे नुसते नाव असणाऱ्‍या संघटनेचे एकही सभासद राष्ट्र तसे करीत नाही. उलटपक्षी, तीस लाखांपेक्षा अधिक यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त “राष्ट्रा” ने केवळ, या रक्‍तपाती जगतात ख्रिस्ती तटस्थता कशी राखली जाऊ शकते हे अगदी स्पष्टरित्या प्रदर्शित केले आहे.

उजळणीचे प्रश्‍न

◻ आम्हाला देवाबरोबर शांतीसंबंध कसे जोपासता येतील?

◻ अविचारी रक्‍तपाताबद्दल यहोवाला काय वाटते?

◻ ख्रिस्ती तटस्थता या संज्ञेचा अर्थ काय?

◻ सचोटीविषयीची कोणती उत्तम उदाहरणे आम्हापाशी आहेत?

◻ तारणासाठी आम्हाला आश्रय कसा मिळू शकतो?

[१४ पानावरील चौकट]

विश्‍वास, धैर्य व सचोटीचा अहवाल

नाझी छळास तोंड दिलेल्या यहोवाच्या साक्षीदारातील सचोटीसंबंधाने न्यू रिलिजस मुवमेंट्‌स्‌: ए पर्सपेक्टिव फॉर अंडरस्टँडिंग सोसायटी या पुस्तकात पुढील विवेचने मांडण्यात आली:

“हातमिळवणी करण्यास नकार देण्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांनी नव्या समाजाच्या हुकुमशाही विचारधारेस आव्हान प्रस्तुत केले. हे आव्हान व सोबत तग धरुन राहण्यातील त्यांची कुवत यांनी नव्या समाजाच्या संस्थापकांना उद्विग्न करुन सोडले. जितका अधिक साक्षीदारांचा छळ होत गेला तितक्या अधिकपणे ते खरे ध्येयवादी आव्हान प्रस्तुत करीत गेले. त्या काळच्या छळ, त्रास, तुरुंगवास व थट्टा यांचा वापर कोणाही साक्षीदाराला नाझी तत्वापुढे नमण्यास प्रवृत्त करू शकला नाही, उलट छळकर्त्यांना ते जणू उलट चपराक बसण्यासारखे घडले.”

“निष्ठावंतपणाचा दावा करणाऱ्‍या या दोन प्रतिस्पर्ध्यात जणू शिकस्तीची चढाओढ लागली होती. नाझींच्या बाबतीत ते आपल्या हजारवर्षीय साम्राज्यशाहीविषयी कमी खात्रीचे व अल्प दृढतेचे होते तरी शारिरीक ताकदीवर साक्षीदारांविरूध्द आपली शर्थ करीत होते. पण साक्षीदार आपल्या मूळ तत्वाबद्दल निःशंक होते कारण त्यांचा विश्‍वास हाबेलाच्या काळापासून स्पष्टरित्या दिसत होता. नाझींना विरोधास दाबून टाकण्याकरता आणि आपल्या समर्थकांची खात्री पटविण्यासाठी वेळोवेळी ख्रिस्ती धर्मराज्याच्या पंथीयांपासून आपली भाषा व कल्पना उचलावी लागली तरी साक्षीदारांना आपल्या सर्व सदस्यांच्या निष्ठावंतपणाची, मरणापर्यंत पुरेपूर खात्री राहू शकली.”

ख्रिस्ती निष्ठावंतपणाची ही लढत ज्यावेळी संपेल तो दिवस खराच धन्यतेचा असेल. (रोमकर ८:३५–३९) त्यानंतर “शांतीचा राजपुत्र” वैभवी येशू ख्रिस्त याच्या राजवटीखाली “त्याच्या सत्तावृध्दीला व शांतीला अंत नसणार.”—यशया ९:६, ७.

[१५ पानावरील चौकट]

सचोटी राखणारे युवक

युरोपियन देशात एका निरिक्षकाने प्रसिध्द केलेल्या एका रोजनिशीतून पुढील उतारा घेण्यात आला आहे. तो हे सुचवितो की, ‘जगाचे भाग नाही’ या विषयासंबंधाने युवक साक्षीदारांनी केवढ्या निर्भिडपणे सामना दिला.—योहान १७:१४.

‘१९४५, मार्च १२: लष्करी कायद्याची सुनावणी झाली. आरोप: लष्करी सेवेचा नकार (त्यांच्या धर्म आत्म्यानुसार). यापैकीचा धाकटा, जो अद्याप २० वर्षांचा नव्हता त्याला १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा केली गेली. त्याच्यापेक्षा मोठ्याला मात्र देहांत शिक्षा सांगितली गेली व त्याला लागलेच त्याच्या गावी जाहीरपणे ठार मारावे व त्याकरवी त्याचे प्रतिबंधात्मक उदाहरण राहावे यासाठी आणण्यात आले. तो येथील १४वा बळी आहे. त्याच्या आत्म्यास शांति मिळो. याचे हे प्रकरण मला खूपच हेलावणारे वाटले. यहोवाच्या लोकांना तुम्ही अशी वागणूक देऊ नये. या मुलाबद्दल त्यांनी ताकीद देऊन सोडून न देता त्याला हुतात्मिक ठरविले. तो सुदृढ मुलगा होता. मला त्याच्याविषयी खूप वाईट वाटते.

‘दुपारी मला या युवकाच्या हफ़ेचा वृत्तांत समजला. ही हफ़ा भर बाजारात पुष्कळ लोकांच्या समोर करण्यात आली. रांगेतील शिपायापैकीच्या एकाने या हफ़ेच्या आधी लाज वाटून स्वतःलाच बंदुकीने उडविले. याचे कारण असे होते की, हफ़ा करणाऱ्‍या माणसाला याने मदत द्यावी असे अधिकाऱ्‍याने त्याला सांगितले होते. पण ते करण्याची त्याची इच्छा नव्हती. उलटपक्षी, त्याने स्वतःच्याच जीवनाचा अंत केला. हफ़ा होणारा मुलगा मोठ्या धैर्याने वारला. त्याने चकार शब्द तोंडावाटे काढला नाही.’

पुनरूत्थान प्राप्त झाल्यावर हे युवक किती आनंदी असतील बरे! यहोवाच्या नवीन व्यवस्थिकरणात असण्याचा हक्क गमाविण्यापेक्षा मरणाच्या नांगीचा अनुभव घेण्याची निवड केली याचा त्यांना आनंद वाटत राहील.—पडताळा होशेय १३:१४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा