-
येशू कशा प्रकारे देवाचे नीतिमत्त्व उंचावतो?टेहळणी बुरूज—२०१० | ऑगस्ट १५
-
-
७. येशूजवळ कोणत्या अतिशय बहुमोल गोष्टी होत्या?
७ येशू नियमितपणे उपासनेच्या सभांना उपस्थित राहत असे. यावरून त्याला आध्यात्मिक गोष्टींविषयी किती आस्था होती हे दिसून येते. येशूजवळ परिपूर्ण बुद्धी होती. त्यामुळे, इब्री शास्त्रवचनांतून त्याने जे काही ऐकले, जे काही वाचले त्यातील शब्द न् शब्द त्याने आत्मसात केला असावा. (लूक ४:१६) याशिवाय, त्याच्याजवळ आणखी एक अतिशय बहुमोल गोष्ट होती. ती म्हणजे, सबंध मानवजातीसाठी बलिदान म्हणून अर्पण करण्याजोगे एक परिपूर्ण मानवी शरीर. आपल्या बाप्तिस्म्याच्या वेळी प्रार्थना करत असताना येशू कदाचित स्तोत्र ४०:६-८ यातील भविष्यसूचक शब्दांचा विचार करत असावा.—लूक ३:२१; इब्री लोकांस १०:५-१० वाचा.a
-
-
येशू कशा प्रकारे देवाचे नीतिमत्त्व उंचावतो?टेहळणी बुरूज—२०१० | ऑगस्ट १५
-
-
a या ठिकाणी प्रेषित पौल स्तोत्र ४०:६-८ या वचनांचा ग्रीक सेप्ट्यूजिन्ट अनुवादानुसार जसाच्या तसा उल्लेख करतो, ज्यात “तू माझ्यासाठी शरीर तयार केले” हे शब्द देखील आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या प्राचीन इब्री शास्त्रवचनांच्या हस्तलिखितांमध्ये हा वाक्यांश आढळत नाही.
-