वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ७/१५ पृ. २६-२७
  • सात्विक असल्यामुळे त्यांना प्रतिफळ मिळाले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सात्विक असल्यामुळे त्यांना प्रतिफळ मिळाले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अनपेक्षित आशीर्वाद
  • आनंदाचे कारण
  • योहानाचा जन्म होतो
  • समृद्ध प्रतिफळ मिळाले
  • अलीशिबाला बाळ होतं
    बायबलमधून शिकू या!
  • मार्ग तयार करणाऱ्‍याचा जन्म
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • स्वर्गाकडून संदेश
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ७/१५ पृ. २६-२७

सात्विक असल्यामुळे त्यांना प्रतिफळ मिळाले

यहोवा त्याच्या विश्‍वासू सेवकांना प्रतिफळ आणि आशीर्वाद देतो. त्यांना, देवाच्या उद्देशांची साध्यता पाहण्यासाठी काही काळ थांबून राहावे लागेल परंतु, त्याच्या आशीर्वादांचा अनुभव आल्यावर ते किती रोमांचकारी वाटते!

याच गोष्टीचे, दोन हजार वर्षांपूर्वी यहुदी याजक जखऱ्‍या आणि त्याची पत्नी अलीशिबा यांच्या बाबतीत जे झाले, त्याचे छानसे उदाहरण दिले आहे. ते दोघेही अहरोनाच्या कुळातील होते. देवाने, त्या इस्त्राएल लोकांना अभिवचन दिले होते की, जर त्यांनी त्याची सेवा विश्‍वासाने केली तर तो त्यांना अपत्य देऊन आशीर्वादीत करीन. त्याने म्हटले की, मुले ही धन आहेत. (लेवीय २६:९; स्तोत्र १२७:३) परंतु, जखऱ्‍या व अलीशिबा यांना मुले नव्हती, शिवाय ते उतारवयात होते.—लूक १:१-७.

शास्त्रवचने म्हणतात की, जखऱ्‍या व अलीशिबा ‘देवाच्या दृष्टीने नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधि पाळण्यात निर्दोष (सात्विक, NW) होते.’ (लूक १:६) त्यांची देवावर इतकी प्रीती होती की, त्यांना नीतिमान मार्गाचा पाठलाग करणे व त्याच्या आज्ञा पाळणे या गोष्टी ओझे आहे असे मुळीच वाटले नाही.—१ योहान ५:३.

अनपेक्षित आशीर्वाद

आपण सा. यु. पू. ३ च्या वसंत ऋतुच्या उत्तरार्धात किंवा उन्हाळ्याच्या पूर्वार्धात पुन्हा जाऊ या. हेरोद राजा यहुदीयात राज्य करीत आहे. एके दिवशी, जखऱ्‍या याजक यरुशलेमेच्या पवित्र मंदिरात प्रवेश करतो. अति पवित्रस्थानाच्या बाहेर लोक प्रार्थनेसाठी एकत्र झालेले असताना, तो सोनेरी वेदीवर धूप जाळतो. कदाचित ही दररोजच्या सेवेतील सर्वात आदरणीय गोष्ट असल्यामुळे, ती यज्ञार्पणानंतर केली जाते. एखाद्या याजकाला असे करण्याची सुसंधी, त्याच्या आयुष्यात केवळ एकदाच येत असावी.

जखऱ्‍याला त्याच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसत नाही. कारण, यहोवाचा देवदूत धूपवेदीच्या उजवीकडे उभा आहे! वृद्ध याजक जखऱ्‍या अस्वस्थ व भयभीत होतो. परंतु, देवदूत म्हणतो: “जखऱ्‍या भिऊ नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलीशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल, आणि तू त्याचे नाव योहान ठेव.” होय यहोवाने, अलीशिबा आणि जखऱ्‍याची कळकळीची प्रार्थना ऐकली आहे.—लूक १:८-१३.

देवदूत पुढे म्हणतो: “त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील. कारण तो प्रभूच्या [यहोवा, NW] दृष्टीने महान होईल. तो द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही, आणि आपल्या मातेच्या उदरापासून तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल.” योहान जन्मभर देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेला नासरी होणार होता. देवदूत पुढे म्हणतो: “बापांची अंतःकरणे मुलांकडे व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी [यहोवा, NW] सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल.”—लूक १:१४-१७.

जखऱ्‍या विचारतो: “हे मी कशावरून समजू? कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नीही वयातीत आहे.” देवदूत उत्तर देतो: “मी देवासमोर उभा राहणारा गब्रीएल आहे; आणि तुझ्याबरोबर बोलावयास व ही सुवार्ता तुला कळवावयास मला पाठविण्यात आले आहे. पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही; कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्‍वास ठेविला नाही.” जखऱ्‍या पवित्रस्थानातून बाहेर येतो, त्याला बोलता येत नाही, तेव्हा लोकांना वाटते की त्याला दर्शन झाले असावे. त्याला केवळ हातवारे व हावभाव करून त्याचे विचार व्यक्‍त करता येतात. त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी येतो.—लूक १:१८-२३.

आनंदाचे कारण

अभिवचन दिल्याप्रमाणे, अलीशिबाला आनंद करण्याचे कारण आहे. ती गरोदर राहते. वांझपणाचा अनादर दूर होतो. तिची नातलग मरीया, ही देखील हर्षित होते कारण, तोच गब्रीएल देवदूत तिला सांगतो: “पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभु देव [यहोवा, NW] त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल.” मरीया, “प्रभूची [यहोवा, NW] दासी” होण्यास तयार आहे.—लूक १:२४-३८.

तेव्हा मरीया, यहुदीयाच्या डोंगराळ प्रदेशातील शहरात राहणाऱ्‍या जखऱ्‍या आणि अलीशिबाच्या घरी घाईघाईने जाते. मरीयाच्या अभिवादनाचा आवाज ऐकल्यावर अलीशिबाच्या उदरातील बाळक उडी मारते. देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली, अलीशिबा मोठ्याने म्हणते: “स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली. जिने विश्‍वास ठेविला ती धन्य, कारण प्रभूने [यहोवा, NW] तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल.” मरीया आनंदाने याला प्रतिसाद देते. ती अलीशिबासोबत तीन महिन्यांसाठी राहते.—लूक १:३९-५६.

योहानाचा जन्म होतो

योग्य समयी, वृद्ध अलीशिबा आणि जखऱ्‍याला एक पुत्र होतो. आठव्या दिवशी, त्या बाळकाची सुंता करण्यात येते. त्याचे नाव जखऱ्‍या ठेवावे अशी नातलगांची इच्छा आहे परंतु, अलीशिबा म्हणते: “नको, ह्‍याचे नाव योहान ठेवावयाचे आहे.” अजूनही मुका असलेला तिचा पती याच्या सहमतात आहे का? एका पाटीवर तो लिहितो: “ह्‍याचे नाव योहान आहे.” तेव्हा लगेच जखऱ्‍याची जीभ मोकळी होते, आणि तो यहोवाचा धन्यवाद करीत बोलू लागतो.—लूक १:५७-६६.

आत्म्याने परिपूर्ण होऊन, हा हर्षित याजक भविष्यवाणी करतो. तो अशाप्रकारे बोलतो की जणू, ‘दाविदाच्या घराण्यात बलवान उद्धारक’—वचनदत्त मुक्‍तीदात्याला उंचावले आहे. तो, सर्व राष्ट्रांना आशीर्वादित करण्यासाठी एका संतानाविषयी अब्राहामासोबत केलेल्या कराराच्या सुसंगत आहे. (उत्पत्ती २२:१५-१८) मशीहाचा अग्रदूत या नात्याने, जखऱ्‍याचा चमत्कारीकरित्या जन्मलेला पुत्र, ‘प्रभूचे [यहोवा, NW] मार्ग सिद्ध करण्याकरिता त्याच्यापुढे’ चालेल. वर्षे जसजशी जात राहिली तसे योहान मोठा होऊ लागला व आत्म्यात दृढ होऊ लागला.—लूक १:६७-८०.

समृद्ध प्रतिफळ मिळाले

जखऱ्‍या आणि अलीशिबा, विश्‍वास आणि सहनशीलतेचे उत्तम उदाहरण होते. त्यांना देवावर थांबून राहावे लागले होते तरीही त्यांनी यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली, आणि त्यांना त्यांचे सर्वात मोठे आशीर्वाद, त्यांच्या उतारवयात मिळाले.

तरीही, जखऱ्‍या आणि अलीशिबाने किती आशीर्वादांचा आनंद लुटला! देवाच्या आत्म्याच्या प्रभावाखाली, दोघांनीही भविष्य वर्तवले. त्यांना, मशीहाचा अग्रदूत, बाप्तिस्मा करणारा योहान, याचे पालक आणि शिक्षक होण्याचा सुहक्क मिळाला. शिवाय, देवाने त्यांच्याकडे नीतिमान या दृष्टीने पाहिले. त्याचप्रमाणे, आज जे लोक ईश्‍वरी मार्गाचा पाठलाग करतात ते देवासमोर नीतिमान भूमिकेत उभे राहू शकतात व यहोवाच्या आज्ञेत सात्विकतेने चालल्यामुळे अनेक आशीर्वादित प्रतिफळ प्राप्त करू शकतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा