सुवर्ण नियम अद्याप कायदेशीर आहे का?
शुद्ध सोने कधीच काळवंडत नाही. या कारणास्तव सोन्याच्या अलंकारांना किंमत असते व ते बहुमोल ठरतात. दागिन्यांची जरी मोडतोड झाली तरी सोनार त्यांना वितळवून नव्या घडवणूकीचे नवे अलंकार तयार करतो, कारण सोन्याची मूळ किंमत तीच राहते.
याचप्रमाणे, येशूने जरी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सुवर्ण नियमाची घोषणा केलेली असली तरी त्याचे मोल कमी झालेले नाही. त्याची पारख करून किंवा त्याच्या कायदेशीरपणाची हेतुमूलकता ओळखून तो आज आम्हासाठी केवढ्या मोलाचा आहे याची अधिक चांगली आवड आम्हाठायी असेल.
“याकरता, ज्या सर्व गोष्टी लोकांनी तुम्हाकरिता कराव्यात म्हणून तुमची इच्छा आहे, त्याच तुम्ही त्यांच्याकरिता करा,” हा सुवर्ण नियम विदित केल्यावर येशूने पुढे म्हटलेः “कारण, नियमशास्त्र व संदिष्टशास्त्र यांचे सार हेच आहे.” (मत्तय ७:१२, न्यू.व.) याची, येशूच्या शिष्यांनी तसेच इतर श्रोत्यांनी कशी समज करून घेतली?
“नियमशास्त्र व संदिष्टशास्त्र यांचे सार”
“नियमशास्त्र” याचा संदर्भ पवित्र शास्त्रातील पहिली पाच पुस्तके, उत्पत्ती ते अनुवाद यांच्याशी आहे. ही पुस्तके, यहोवाने दुष्टाईचे निर्मूलन करण्यासाठी ज्या संतानाचा उद्भव करण्याचे उद्देशिले तो प्रकट करतात. (उत्पत्ती ३:१५) पवित्र शास्त्राच्या या आरंभीच्या पुस्तकात नियमशास्त्र किंवा अशा कायद्यांचा संच आहे जो यहोवाने इ. स. पूर्वी १५१३ मध्ये सिनाय पर्वतावर मोशेद्वारे इस्राएल राष्ट्राला दिला होता.
ईश्वरी नियमशास्त्राने इस्राएलांना, सभोवतालच्या विदेश्यांपासून, मूर्तिपूजक राष्ट्रांपासून वेगळे केले होते; व यहोवाच्या कृपेचा अवमान होईल अशा कोणाही कृत्यात हातमिळवणी करण्याची मनाई होती. ते त्याचा असा खास निधि होते व आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांनी असेच राहणे आवश्यक होते. (निर्गम १९:५; अनुवाद १०:१२, १३) पण देवाशी असलेल्या त्यांच्या कर्तव्यांसोबत मोशेद्वाराचे हे नियमशास्त्र, इस्राएलांनी आपणामध्ये राहात असलेल्या विदेश्यांचेही भले करावे या जबाबदारीचा उल्लेख करून होते. उदाहरणार्थ, त्यात म्हटले होतेः “तुमच्या बरोबर राहणाऱ्या परदेशीय मनुष्यास तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा; आणि त्याजवर आपल्यासारखीच प्रीती करा. कारण तुम्हीही मिसर देशात परदेशीय होता. मी यहोवा, तुमचा देव आहे.” (लेवीय १९:३४) इस्राएली राजांच्या कारकिर्दीत विदेश्यांनी, यरुशलेमातील देवाच्या मंदिराची बांधणी इत्यादि कामाचा विशेष हक्क अनुभवला.—१ इतिहास २२:२.
इस्राएलांना देण्यात आलेल्या नियमशास्त्राने व्यभिचार, खून, चोरी व लोभ या गोष्टींना सक्त मनाई दर्शविली होती. या आज्ञांसोबत दुसरी काही आज्ञा असली तरी “तिचाही सारांश यात असेल कीः ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर.’” प्रेषित पौल पुढे म्हणतो की, “प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करीत नाही, म्हणून प्रीती ही नियमशास्त्र पूर्णपणे पाळणे आहे.”—रोमकर १३:९, १०.
जर नियमशास्त्राने सुवर्ण नियमाचा मूळ पाया रोविलेला होता तर मग, “संदिष्टशास्त्र” याबाबत काय?
इब्री शास्त्रवचनातील भविष्यवादित पुस्तकेही तशाच प्रकारे सुवर्ण नियमाचा कायदेशीरपणा पुरवितात. ती आम्हास दाखवितात की, यहोवा हा असा देव आहे जो बिनचूकपणे आपला हेतू पुरा करतो. त्याचे विश्वासू लोक, जरी अपूर्णावस्थेत असले आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करीत राहण्यात प्रयत्नशील राहतात व आपल्या चुकांबद्दल खरा पश्चाताप व्यक्त करतात अशांना तो आशीर्वादित करतो. “आपणास धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा, दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा; जुलम्याला ताळ्यावर आणा, अनाथाचा न्याय करा, विधवेचा कैवार घ्या.”—यशया १:१६, १७.
देवाच्या लोकांनी देवविषयक तसेच इतरांच्या बाबतीत चांगले ते केले तेव्हा यहोवाने त्यांना आपल्या पाठिंब्याची हमी दिलीः “यहोवा म्हणतोः ‘न्यायाचे पालन करा, धर्माचरण करा, . . . जो मानव हे करतो व जो मानवपुत्र यास धरून राहतो, . . . तो धन्य.”—यशया ५६:१, २.
ख्रिस्त आपल्या मंडळीचे मार्गदर्शन करतो
ख्रिस्त हा, नियमशास्त्राची व संदिष्टशास्त्राची पूर्णता करण्यासाठी आला होता, व त्याच्या काळापासून यहोवाच्या युगादिकाळाचा संकल्प प्रगतीपथावर आहे. (मत्तय ५:१७; इफिसकर ३:१०, ११, १७-१९) मोशेकरवीच्या जुन्या नियमशास्त्र कराराचे स्थान नवीन कराराने घेतले, जो यहुदी व विदेशी अभिषिक्त ख्रिश्चनांना एकसमान कवटाळतो. (यिर्मया ३१:३१-३४) तरीसुद्धा, आमच्या दिवसातील ख्रिस्ती मंडळी अजूनही सुवर्ण नियमाचे पालन करते. या नियमाच्या कायदेशीरपणास अंगिकारण्याचे भक्कम कारण हे की, ख्रिस्त हा स्वतःच आधुनिक ख्रिस्ती मंडळीचा क्रियाशील मस्तक आहे. त्याने आपल्या सूचनांत फेरबदल केलेला नाही. त्याचा प्रेरित सल्ला अद्याप चांगला आहे.
पृथ्वीवरुन जाण्याआधी येशूने आपल्या शिष्यांना ही आज्ञा दिली होती की, त्यांनी सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य बनवावे व त्यांना ‘जे काही त्याने शिष्यांना आज्ञापिले आहे ते सर्व पाळावयास शिकवावे.’ या सूचनेत सुवर्ण नियम अंतर्भूत आहे. येशूने शिष्यांना ही खात्री दिलीः “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”—मत्तय २८:१९, २०.
लूक ६:३१ मध्ये लिखित आहे त्यानुसार येशूने हे आज्ञापिले होतेः “लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा.” दुसऱ्यांसाठी हितकारक असणाऱ्या गोष्टी करण्यात पुढाकार घेऊन येशूने आपले केवढे उत्तम उदाहरण ठेवले!
पृथ्वीवरील आपल्या उपाध्यपणाच्या काळात, लोकांना कोणकोणत्या गोष्टी निमूटपणे सहन कराव्या लागत आहेत ते येशूने बारकाईने न्याहाळले व त्याला लोकांचा कळवळा वाटला. आपल्या एका प्रचार फेरीत त्याने मोठ्या लोकसमुदायाला बघितले व त्यांची त्याला करुणा आली. पण नुसताच कळवळा वाटू देण्यापेक्षा त्याने पुढे होऊन त्यांची तरतूद केली. ती कशी? एका अतिशय प्रभावी प्रचार मोहिमेची योजना आखून की, ज्यायोगे त्याचे शिष्य लोकांच्या घरापर्यंत पोहंचतील. त्यांने त्यांना म्हटलेः “ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा.” या कार्यास त्याचे पाठबळ आहे व त्याच्यावर त्याच्या पित्याचा आशीर्वाद आहे हे येशूच्या पुढील शब्दांवरुन स्पष्ट दिसतेः “जो तुम्हास स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारितो. . . . आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजितो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही.”—मत्तय ९:३६–१०:४२.
सुवर्ण नियम हा इतरांकरिता विधायक हालचाल करण्याची सूचना करतो हे येशूने दुसऱ्या प्रसंगी केलेल्या वक्तव्यावरुन दिसून येते. तो म्हणालाः “जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करतात. तुम्ही तर आपल्या वैऱ्यावर प्रीती करा व त्यांचे बरे करा, . . . म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल.” (लूक ६:३२, ३३, ३५) अनुषंगिकपणे, अद्याप आपले कायदेशीर मोल राखून असलेल्या सुवर्ण नियमाचे पालन करण्यामुळे, आम्हास परिचित नसणाऱ्या लोकांसाठी भले तेच करण्यात पुढाकार घेण्याचे उत्तेजन मिळत राहते.
अद्याप बंधनकारक, अद्याप क्रियाशील
सुवर्ण नियम अद्याप कायदेशीर, बंधनकारक आहे याची अधिक प्रचिती, जो कोणी तो पाळून चालतात त्यांच्या वास्तविक अनुभवावरुन येऊ शकतो. जे ख्रिस्ती आपली नित्याची वागणूक देवाकडील नियमांच्या एकवाक्यतेत राखतात त्यांना त्यात मोठा आनंद वाटतो व वेळोवेळी अनपेक्षित आशीर्वादांचा लाभ होत राहतो. एका वैद्यकीय केंद्रात एक ख्रिस्ती स्त्री जात असे, तेथील कर्मचाऱ्यांशी ती नेहमी आदराने व सहानुभूतीपूर्वक वागत असे, त्यामुळे तिला अनेक प्रकारे फायदा झाला. शिवाय तेथील परिचारिका व डॉक्टर्स तिची काळजी घेण्यात केवढे अधिक करीत असत.
यहोवाचे साक्षीदार राज्य सभागृह उभारणी प्रकल्पाच्या जलदगती कामात सहभागी होतात त्यांचाही अनुभव सुवर्णनियमाच्या कायदेशीरपणाची पुष्टी देतो. जेथे बांधकाम उभारले जाणार त्या सभोवतालच्या परिसातील लोकांस योजनेची पूर्व माहिती देण्यास प्रेमळ पूर्वभेट देण्यामुळे त्यांच्याकडून विधायक प्रतिसाद मिळत राहतो. पूर्वी विरोध करणाऱ्या लोकांना यामुळे हे दिसून येते की हे तर त्यांच्या शेजाऱ्यांच्या हिताचे तेच करतात, शिवाय देवाचे लोक त्यांच्या कामात एकमेकांचे सहकार्य करीत असल्याचे त्यांना प्रत्यक्ष दिसते. याचा परिणाम काहींनी बांधकामाच्या कामात मदत केली, अनेकांनी तर लागणारा माल पुरविण्यात साहाय्य केले.—पडताळा जखर्या ८:२३.
लंडन, इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका इराणी साक्षीदाराने दुकानात जाऊन काही खाद्यपदार्थ विकत घेतल्यावर ग्राहक परदेशी आहे म्हणून दुकानदाराने त्याची थट्टा केली. यामुळे चलबिचल न होता त्या साक्षीदाराने मोठ्या आदराने व कुशलतेने दुकानदाराला स्पष्ट केले की तो एक यहोवाचा साक्षीदार आहे व तो कोणाही इतर राष्ट्रीयांबद्दल द्वेष बाळगून नाही. उलट, तो आपल्या सर्व शेजाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पवित्र शास्त्रीय संदेश देतो. याचा काय परिणाम दिसला? दुकानदाराने साक्षीदाराच्या खाद्यपदार्थांच्या मागणीस सढळ हाताने पुरे केले.
हे खरे की, हा सुवर्ण नियम अशा छोट्या दयाळूपणाच्या कृत्यांपुरताच मर्यादित नाही. हे तर निर्विवाद आहे की, यहोवाचे साक्षीदार या नियमाच्या अनुकरणात जगव्याप्तपणे जे सर्व काही उत्तम करीत आहेत त्यामध्ये, आपल्या शेजाऱ्यांच्या घरी नियमितरित्या जाऊन त्यांना देव राज्याचा संदेश कळविण्याचेही समाविष्ट आहे.
सुवर्ण नियमाच्या आधाराने जगणे
सुवर्ण नियमाचा अवलंब करणे याचा अर्थ इतरांकडे आपले लक्ष देणे होय. तो एक विधायक मार्गदर्शक आहे. आपल्या सभोवती असणाऱ्यांचे भले करण्यासाठी तुम्हाला संधी शोधावी लागेल. पुढाकार घ्या, काळजी दाखवा व त्यांजमध्ये व्यक्तीगत रस घ्या! (फिलिप्पैकर २:४) असे केल्याने तुम्ही समृद्ध आशीर्वादांची कापणी कराल. तुम्ही येशूचा सल्ला अनुसरणारे ठराल की, “तुमचा उजेड लोकांसमोर असा पडू द्या की, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय ५:१६) तुम्ही जितक्या अधिकपणे यहोवाचा शोध घेत राहाल व सुवर्ण नियमानुसार आपले दैनंदिन जीवन व्यतित कराल तितक्या अधिकपणे तो तुम्हाला प्रतिफळ देणारा ठरेल.—इब्रीयांस ११:६.
[५ पानावरील चौकट]
‘योग्य उत्तर देणे’
डोंगरावरील प्रवचनात येशूने “नियमशास्त्र व संदिष्टशास्त्र” याचा संदर्भ घेतला. इब्री शास्त्रवचनाचा तिसरा भाग असे लिखाण आहे ज्यात स्तोत्रे व नीतीसूत्रासारखी काव्यमय लिखाणे आहेत. (मत्तय ७:१२; लूक २४:४४) यातही देवाचे सूज्ञान सामावलेले आहे.
उदाहरणार्थ, नीतीसूत्रांनी प्राचीन इस्राएलातील न्यायधिशांना हा इशारा दिला होताः “‘तू धार्मिक आहेस,’ असे जो दुर्जनास म्हणतो, त्याला लोक शाप देतील, रा त्याचा तिटकारा करतील. पण जे दुर्जनास ठपका देतील त्यांचे बरे होईल, त्यांस चांगला आशीर्वाद मिळेल. जो योग्य उत्तर देतो तो जणू काय ओठांचे चुंबन देतो.”—नीतीसूत्रे २४:२४-२६.
कोणा न्यायाधिशाने लाच घेऊन किंवा नातलगाविषयी पक्षपात दाखविला, आणि दुर्जनाला सज्जन असे घोषित केले तर तो आपल्या पदावर राहण्यास योग्य नाही हे इतरांना कळून येईल. शिवाय, “राष्ट्रे” देखील त्याने न्यायाचा विपरीत अवलंब केला हे ऐकून त्याच्याविषयी आपला तिटकारा दाखवतील! उलटपक्षी, न्यायाधिशाने निर्भिडपणे दुर्जनाचे खंडण केले व त्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने योग्य उत्तर दिले तर त्याला लोकांचा आदर व प्रेम जिंकता येईल. मग, लोक त्याच्यावर “चांगला आशीर्वाद” यावा असेच इच्छितील. ते नीतीसूत्र पुढे म्हणतेः “जो योग्य उत्तर देतो तो जणू काय ओठांचे चुंबन देतो.”
हे चुंबन परस्परातील आदर संबोधित करते—सल्ला देणारा व जे त्याच्याकडील योग्य वाग्दंड अनुसरतात त्यांच्यामधील. ज्याला वाग्दंड दिलेला आहे तोच सरळ मनोवृत्तीने प्रतिसाद व्यक्त करून न्यायाधिशांविषयी आपली आत्मीयता दाखवील. नीतीसूत्रे २८:२३ म्हणतेः “जिव्हेने खुशामत करणाऱ्यांपेक्षा वाग्दंड करणाऱ्याचे अंती आभार मानतात.” यास्तव, आज मंडळीत वडील म्हणून काम पाहणाऱ्यांनी मैत्री किंवा कौटुंबिक नातेसंबंधाला त्यांचा निर्णय विपरीत बनवण्यात आड येऊ देऊ नये. आवश्यक असणारा सल्ला योग्य व तडकपणे दिल्यामुळे वडीलजन मंडळीचा आदर मिळवतील.