वैरभाव असणाऱ्या जगात सर्वोत्तम मित्रत्व टिकून राहते
“अनीतीकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, यासाठी की, ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हांस सार्वकालिक वस्तीस घ्यावे.”—लूक १६:९
१. नीतीसूत्रे १४:२० पृथ्वीवर येशू ख्रिस्ताच्या बाबतीत का लागू होऊ शकले नाही?
“गरीबाचा द्वेष त्याचा शेजारीही करतो. पण श्रीमंताला चाहणारे बहुत असतात.” (नीतीसूत्रे १४:२०) इस्राएलाच्या शलमोन राजाचे हे नीतीसूत्र, पृथ्वीवर सर्वात मोठा माणूस होऊन गेलेल्या, शलमोनापेक्षा थोर असणाऱ्या येशू ख्रिस्ताला लागू होऊ शकले नाहीत. येशूने भौतिक धनसंपत्तीद्वारे इस्राएलांना आपल्या निकट सहवासात आणले नाही. शिवाय खरे, टिकाऊ मित्रत्व पृथ्वीवरील संपत्तीवर आधारलेले नसते याची त्याला जाणीव होती.
२. येशूने आपल्या शिष्यांना कोणासोबत मित्रत्व जोडण्यास सांगितले व कोणत्या कारणास्तव?
२ हे खरे की, एकदा येशूने हे म्हटलेः “अनीतीकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, यासाठी की ते, नाहीसे हाईल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीस घ्यावे.” (लूक १६:९) पण जे “मित्र” येशूच्या मनात होते ते एक म्हणजे सर्व भौतिक धनसंपदेचा स्रोत यहोवा देव आणि विपुल श्रीमंत असणाऱ्या या पित्याचा पुत्र, म्हणजे तो स्वतःच, हे ते होते. आम्ही याच सूचनेचा आज अवलंब केल्यास आम्हाला येथे या पृथ्वीवर यहोवा देवाच्या सर्वोत्तम मित्रत्वाचा त्याचा निस्वार्थी पुत्र येशू ख्रिस्ताच्या माध्यमाने आनंद उपभोगता येईल.
३. हे स्वर्गीय मित्र आम्हाला कोणत्या “चिरकालिक वस्ती” मध्ये घेऊन जातील?
३ हे स्वर्गीय मित्र, त्यांच्याठायीच्या अमर जीवनामुळे आमचे कायमचे मित्र म्हणून राहू शकतात व ते आम्हाला “चिरकालिक वस्तीस” घेतील. “चिरकालिक वस्ती”ची ही ठिकाणे एकतर वर स्वर्गात सर्व पवित्र दिव्यदूतांसोबत आहे वा येथे खाली पृथ्वीवर पुनर्स्थापित झालेल्या नंदनवनातील आहे.—लूक २३:४३.
सर्वोत्तम मित्रत्वप्राप्तीची मान्यता
४. (अ) देवाचे मित्रत्व विकत घेता येउ शकते का, हे कोणते पवित्र शास्त्रीय उदाहरण दाखविते? (ब) आमच्या मालकी ठेव्याचा वापर आम्हाला कोणत्या योग्य मार्गाने करता येईल?
४ सर्वसमर्थ देव व त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त यांचे मित्रत्व पैशाद्वारे संपादता येत नाही. ही गोष्ट पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत हनन्या व सप्पीरा यांचे जे प्रकरण घडले त्यात स्पष्ट दिसते. त्यांनी किर्ती व बहुमान मिळविण्याचा जो प्रयत्न केला तसे न करता आम्हाला आमच्यापाशी असणारा भौतिक व सांपत्तिक ठेवा, यहोवा देव व येशू ख्रिस्त यांना पसंत वाटणाऱ्या मार्गाने वापरता येईल. (प्रे. कृत्ये ५:१–११) येशू ख्रिस्ताच्या म्हणण्याचा अगदी हाच अर्थ होता जेव्हा त्याने हे म्हटले होते: “आपली जागतिक संपत्ती स्वतःकरता मित्र मिळवण्यासाठी वापरा, ते अशासाठी की ती जेव्हा सरेल तेव्हा तुमचे चिरकालिक निवासस्थानी स्वागत होईल.”—लूक १६:९, न्यू इंटरनॅशनल व्हर्शन.
५. जक्कयाने कोणता मार्ग धरला व याचा काय परिणाम झाला?
५ येशू हे शब्द बोलला तेव्हा तो रोमी साम्राज्याचे जकातदार आणि इतर पाप्यांची मर्जी संपादण्याचा प्रयत्न करीत नव्हता. पृथ्वीवर आपणासाठी भौतिक संपत्ती प्राप्त करावी ही त्याची इच्छा नव्हती, कारण त्याने आधीच आपल्या शिष्यांना, वर स्वर्गात आपल्याकरता संपत्ति साठवा असे म्हटले होते. रोमी सरकारचा एक यहुदी जकातदार जक्कय याने मशीहा येशूच्या या सूचनेनुरुप कृति करण्याचे ठरविले व तशी त्याने जाहीर घोषणाही वदविली. जक्कयाने राज्य आस्थेच्या पाठबळासाठी ही जी कृति आचरली त्याबद्दल त्याच्या घरी आलेल्या नामवंत पाहुण्याने हे जाहीर केले: “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे.” (लूक १९:१–१०) “हरवलेले” यामध्ये स्वतः तो जकातदार होता.
६. जक्कयाला कशामध्ये प्रवेश मिळाला, पण कोणाचे चुकीचे उदाहरण आम्हाला ताकीद असे आहे?
६ अशाप्रकारे जक्कयाला, तो ज्या खास पाहुण्याचा सत्कार करीत होता त्याचा देव व पित्याच्या, सबंध विश्वातील सर्वोत्तम मित्रत्वप्राप्तीच्या मान्यतेत प्रवेश मिळाला. या जक्कयाने येशूला त्याच्या मृतातील पुनरुत्थानानंतर बघितले का, तसेच तो इ.स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या त्या संस्मरणीय दिवशी यरुशलेमात माडीवरील खोलीत सुमारे १२० शिष्यांसमवेत होता का याविषयी पवित्र शास्त्र अहवालात उल्लेख आढळत नाही. पण तो बहुधा, त्या घटनेनंतर लगेच ज्यांच्याबद्दलचा अहवाल कळविला गेला त्या ५,००० आत्म्याने जन्मलेल्या अभिषिक्त शिष्यांमध्ये एक असावा. (प्रे. कृत्ये अध्याय २ व ४; १ करिंथकर १५:१–६) हा जक्कय, आधी उल्लेखिलेल्या हनन्या व सप्पीरा यांच्यापेक्षा किती भिन्न ठरला! यरुशलेम मंडळीसोबत संबंध राखणाऱ्या त्या दोघांनी, आपण दिलेल्या दानाची खोटी किंमत सांगून स्वतःची ख्याति वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या अप्रामाणिकपणाबद्दल त्यांना जी शिक्षा मिळाली त्यामुळे त्यांना सर्वोत्तम मित्रत्व गमवावे लागले. ही आजच्या सर्व ख्रिश्चनांसाठी ताकीद आहे.—प्रे. कृत्ये ४:३४–५:११.
७. जगाचा वैरभाव असला तरी यहोवाचे साक्षीदार कोणत्या दुर्मिळ गोष्टीचा अनुभव घेत आहेत?
७ आज २० व्या शतकातील जगात वैरभाव असताही यहोवाचे साक्षीदार अस्तित्वात असणाऱ्या सर्वोत्तम मित्रत्वाचा अनुभव घेत आहेत. खरे पाहता, हजार पेक्षा अधिक विभाजित धर्मव्यवस्थांना हे अनुभवता येत नाही तर यांना तरी हा दुर्मिळ गुण का अनुभवण्यास मिळावा बरे? पुरावा व्यक्त करतो की यहोवाच्या साक्षीदारांनी महत्वपूर्ण असे काही तरी केले आहे जे ख्रिस्ती धर्म राज्यातील धर्माना करणे जमले नाही. एक गोष्ट म्हणजे साक्षीदार खोट्या धार्मिक व्यवस्थेतून बाहेर आलेले आहेत कारण त्यांना याची कल्पना आहे की या सर्वांचे मिळून खोट्या धर्माचे जागतिक साम्रज्य बनते ज्याला पवित्र शास्त्र मोठी बाबेल अशी संज्ञा देते. अर्थातच कोणा एका खोट्या धर्मातून बाहेर पडण्यामुळे एखादा सहजासहजी यहोवाच्या संस्थेत येत नसतो कारण तोच माणूस खोटया जागतिक धर्मसाम्राज्य व्यवस्थेच्या कोणा दुसऱ्या गटाशीही जाऊन मिळू शकतो.
८. मोठ्या बाबेलातून बाहेर पडण्याची आज्ञा आज थेटपणे कोणास लागू होते?
८ मोठ्या बाबेलातून बाहेर पडण्याची आज्ञा “माझ्या लोकांनो” यांना अनुलक्षून आहे हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे. (प्रकटीकरण १८:४) हे इश्वरी आव्हान, इब्री शास्त्रवचनांनुरुप देवाने बाबेल प्रेदशात बंदिस्त असणाऱ्या इस्राएलांना दिलेल्या आज्ञेशी सदृश्य आहे. (यशया ५२:११) यास्तव, “माझ्या लोकांनो” हे वर्णन थेटपणे, येशू ख्रिस्ताच्या आत्म्याने जन्मलेल्या व अभिषेक मिळालेल्या पृथ्वीवरील शिष्यांना लागू होते. १९१४–१८च्या पहिल्या जागतिक युद्ध काळात या अभिषिक्त जनांना जगाच्या राजकीय, लष्करी आणि न्यायलयीन घटकांकरवी बंदीत घालण्यात आले होते. या आध्यात्मिक शेषांचे काम बंद पाडावे हा त्यामागील उद्देश होता. लाक्षणिकपणे म्हणावयाचे झाल्यास हे शेष बंदिस्त अवस्थेत जखडले व त्यांनी यहोवाच्या सेवेतील हालचालीचे स्वातंत्र्य गमाविले.
९. मोठ्या बाबेलातून बाहेर पडण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांना किती दूरवर जावे लागले?
९ प्रकटीकरणाच्या १७व्या अध्यायात मोठ्या बाबेलास, सात डोकी आणि दहा शिंगे असलेल्या श्वापदावर आरुढ असणाऱ्या कळवंतीणीसमान दाखविले आहे. अगाधकुपात गेलेले व परत वर आलेले हे श्वापद, आधुनिक काळात जागतिक शांतीकरता असणाऱ्या संस्थेची म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाचे प्रतीक आहे. हा संघ लीग ऑफ नेशन्स, जी दुसरे जागतिक महायुद्ध सुरु होताच आगाधकुपात गेली तिचा वारसा आहे. यास्तव, जेव्हा यहोवाने, ज्यांना तो “माझ्या लोकांनो” असे म्हणतो त्या त्याच्या लोकांनी मोठ्या बाबेलातून बाहेर पडण्याच्या त्याच्या आज्ञेचे पालन केले तेव्हा काय केले? ते खोटया धर्माच्या त्या जागतिक साम्राज्यातून बाहेर पडलेच पण सोबत त्याचा राजकीय सहकारी, सध्याचा संयुक्त राष्ट्रसंघ याच्याही साम्राज्यातून स्वतःला बाहेर आणले.
१०. यहोवाच्या साक्षीदारांना आजच्या कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेशी कर्तव्य नाही व तसे का?
१० अभिषिक्त शेषांनी या व्यवस्थीकरणाच्या राजकारणी व लष्करी गोष्टींच्या बाबतीत कडक तटस्थता पाळली. (योहान १५:१९) विदेश्यांचे काळ १९१४ मध्ये संपले तेव्हा स्वर्गात स्थापन झालेल्या येशू ख्रिस्ताकरवीच्या देवाच्या राज्यासाठी ते निश्चल भूमिका ग्रहण करुन आहेत. देव राज्याच्या प्रतिकारार्थ लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली व त्याला पहिले जागतिक युद्ध १९१८ मध्ये संपल्यावर मोठया बाबेलने पुष्टी दिली. यास्तव ही मानवनिर्मित संघटना यहोवा देवाच्या तसेच आध्यात्मिक इस्राएलांच्या पृथ्वीवरील विश्वासू शेषांना सुद्धा ओंगळ व घृणित वाटते. त्यांचा यहोवाच्या राज्यावर विश्वास आहे, या राज्याची बदली म्हणून समजल्या जाणाऱ्या पृथ्वीवरील कोणाही संस्थेवर नाही. (मत्तय २४:१५, १६) असाच दृष्टिकोण नथीनीम आणि “शलमोनाच्या चाकराचे वंशज” याद्वारे सूचित असणाऱ्या आधुनिक काळच्या “मोठा लोकसमुदाय” याचा आहे.—प्रकटीकरण ७:९–१७; एज्रा २:४३–५८.
११. (अ) येशूच्या शिष्यांनी या जगाचे मित्र बनणे का चूक आहे? (ब) हे जग यहोवाच्या साक्षीदारांबद्दल कोणता दृष्टिकोन धरते, तरीपण ते कशाचा आनंदमय अनुभव घेत आहेत?
११ रोमी सुभेदार पंतय पिलात याजसमोर सुनावणीकरता उभे असताना येशूने त्याला म्हटले: “माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु आता माझे राज्य येथले नाही.” (योहान १८:३६) या कारणास्तव येशूच्या “सेवकांनी” वा शिष्यांनी या जगाचे मित्र होणे अगदीच चुकीचे आहे. आधी, येशूने आपल्या “सेवका” पैकीच्या पहिल्या सदस्यांना, ११ विश्वासू प्रेषितांना म्हटले होते की ते, ज्याचा दियाबल सैतान “अधिपति” आहे त्या या “जगाचे भाग नाही.” (योहान १४:३०; १५:१९; पडताळा २ करिंथकर ४:४.) या कारणास्तव जगाने त्यांचा द्वेष केला वा त्यांच्या सोबत वैरभाव प्रदर्शित केला. येशूच्या या २०व्या शतकाच्या शिष्यांनाही आपण वैरभाव व्यक्त करणाऱ्या जगात असल्याचे दिसते. असे असले तरी ते सबंध विश्वातील सर्वोत्तम मित्रत्वाचा म्हणजे “नवे आकाश व नवी पृथ्वी” या सहित असलेल्या भावी नीतीमान जगाच्या देवाबरोबरील मित्रत्वाचा अनुभव घेत आहेत.—२ पेत्र ३:१३.
१२. कोणी मोठी बाबेल व त्याच्या जागतिक मित्रांकडून बाहेर पडतो तेव्हा त्याला आपली भूमिका घेता येईल असे कोणते एकमेव ठिकाण राहते, पण यामुळे काय उद्भवू शकते?
१२ कोणी मोठी बाबेल आणि तिचे जागतिक सहकारी, महाव्यापार, राजकारण व लष्कर यातून बाहेर पडतो तेव्हा त्याला जाण्याचे केवळ एकच ठिकाण राहते. ते ठिकाण म्हणजे एकच जिवंत व खरा देव यहोवा याच्या सार्वत्रिक संघटनेची बाजू. यात मध्यंतराचे ठिकाण नाहीच. यामुळेच एखाद्याला या जगाचा वैरभाव सहन करण्याची गरज प्रस्तुत करते. जगाकडून वैरभाव मिळेल या भीतीनेच बहुतेकांना मोठी बाबेल व ज्याचा ती महत्वपूर्ण भाग आहे त्या जगाला सोडून देण्याचे धाडस होत नाही.
सर्वोत्तम मित्राकडून मिळणारे “नवे नाव”
१३. पहिल्या शतकातील येशूच्या शिष्यांना कोणत्या मान्यताप्राप्त नावाने संबोधिले गेले?
१३ देवाबरोबर जोपासलेली मैत्री आम्हाला यहोवाचे साक्षीदार या नावाने म्हणवून घेण्याचा आनंद देते. ख्रिस्ताच्या शिष्यांनी पहिल्या शतकात यहोवाचे साक्षीदार हे नाव धारण केले नव्हते हे खरे. पण त्यांनी सर्वांचा उत्तम मित्र याजसोबत जे नाते जोडले होते त्याचा कृपया विचार करा. प्रेषितांची कृत्ये ११:२६ कळविते: “शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात इश्वरी मान्यतेने मिळाले.” न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन ऑफ दी होली स्क्रिपचर म्हणते की त्यांना “ख्रिस्ती हे नाव . . . इश्वरी मान्यतने मिळाले” हे तुम्ही लक्षात घेतले असेल. “इश्वरी मान्यतेने” याकरता असणारा ग्रीक शब्द साधारण म्हणण्यापेक्षा अधिक माहिती देतो. विश्वातील सर्वोत्तम मित्राने “ख्रिस्ती” या नावाबद्दल आपली संमति कळविली होती.
१४. “ख्रिस्तीधर्मराज्य” या संज्ञेबद्दल काय म्हणता येईल, आणि कोणत्या प्रश्नांचा विचार होणे जरुरीचे आहे?
१४ “ख्रिश्चन” या संज्ञे मूधनच ख्रिस्तीधर्मराज्य ही संज्ञा उदयास आली, जी नामधारी ख्रिश्चनांना व त्यांच्या बहुविध धार्मिक पंथ व गटाच्या साम्राज्याला सूचित करते. अशाप्रकारे “ख्रिस्तीधर्मराज्य” हे नाव काही प्रेषितीय वा देवाच्या इच्छेनुरुपच्या ‘मान्यतेने’ देण्यात आले नाही. त्यामुळे आजची ही परिस्थिती पहिल्या शतकातील स्थितीपेक्षा अगदीच वेगळी आहे. वैरभाव असणाऱ्या आजच्या जगतात केवळ अस्सल ख्रिश्चनांनाच सर्वोत्तम मित्रत्व अनुभवता येते. तद्वत, हा मोठा प्रश्न आज उभा राहतो की, प्रेरित शास्त्रवचनाशी संलग्न असणारे अस्सल, खरे ख्रिश्चन आहेत का व यहोवा देव आणि येशू ख्रिस्त त्यांचे मित्र आहेत का? याबाबतीत स्वतः निवडण्यात आलेले देवाचे नाव, यहोवा, पणाला लागलेले आहे.
१५. कोणती परिस्थिती असल्यामुळे यहोवाने आता स्वतःकरता नाव करण्याची वेळ आली आहे व याबाबतीत त्याचे “आपल्या नावाकरता लोक” कोणता सहभाग राखून आहेत?
१५ ख्रिस्तीधर्मराज्याला आपल्या अनेक पंथासहित यहोवाच्या मित्रत्वाचा आनंद कसा अनुभवता येईल बरे? कारण त्याने येशू ख्रिस्ताच्या नावास पुढे सारले असून त्याचा स्वर्गीय पिता यहोवाच्या नावास जवळजवळ लुप्त केले आहे. तथापि, पवित्र शास्त्र भविष्यवादाच्या अनुषंगाने यहोवाने स्वतःचे नाव बनवावे अशी आता वेळ आलेली आहे. याकरताच, त्याचे नाव पुढे येण्यास हवे. याकरता तो आपल्या खऱ्या साक्षीदारांना, त्याच्या निवडलेल्या लोकांना, त्याच्या मित्रत्वाचा आनंद अनुभवणाऱ्यांचा वापर करील. पहिल्या शतकात येशू ख्रिस्ताचे प्रेषित व इतर प्रमुख अनुयायांच्या एका खास सभेत शिष्य याकोबाने म्हटले: “परराष्ट्रीयातून आपल्या नावाकरता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली हे शिमोनाने सांगितले आहे.”—प्रे. कृत्ये १५:१४.
१६, १७. ख्रिस्ती धर्मराज्याच्या पवित्र शास्त्र भाषांतर आवृत्तीत देवाच्या नामाबद्दल काय करण्यात आल्याचे दिसले, पण याबाबतीत न्यूवर्ल्ड ट्रान्स्लेशन बद्दल काय खरे आहे?
१६ ‘देवाच्या नावाकरता असणाऱ्या लोकांनी’ त्याचे मित्र असावेत व त्याचे इश्वरी नाम उचावून धरावे अशी अपेक्षा केली जाते. पण ख्रिस्तीधर्मराज्यात काय घडले आहे? त्यांच्या प्रसिद्ध पवित्र शास्त्र भाषांतरात यहोवाचे नाव काढून टाकून त्याऐवजी साधी पदवी टाकण्यात आली आहे. आजच्या प्रसिद्ध इंग्रजी आवृत्तीत देवाचे नाव नुसत्या चार वेळा आढळते! (निर्गम ६:३; स्तोत्रसहिता ८३:१८; यशया १२:२; २६:४, किंग जेम्स व्हर्शन) तसेच, इब्री शास्त्रवचनांच्या यहुदी भाषांतरात देवाचे नाव “प्रभू” याप्रकाराने टाकण्यात आले आहे. यहोवाचे नाव अशाप्रकाराने दाबून टाकणे हे त्याच्या मित्रांचे काम नव्हे.
१७ परंतु, १९५० या वर्षी न्यूवर्ल्ड ट्रान्स्लेशन ऑफ द होली स्क्रिपचर धार्मिक दृश्यात आले. या भाषांतराने देवाचे इश्वरी नाम मूळ इब्री पवित्र शास्त्रवचनात जितक्या वेळेला आढळते त्या सर्व ठिकाणी घातले. याशिवाय, न्यूवर्ल्ड ट्रान्स्लेशनने ते इश्वरी नाम ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनाच्या म्हणजे नव्या करारात प्रधान वचनातील योग्य जागी परत आणले—होय, २३७ वेळा. हे यहोवाच्या मित्रांचे कार्य होय.
१८. यशया ६२:२च्या अनुरोधाने देवाच्या लोकांनी १९३१ मध्ये कोणते पाउल उचलले, व त्यानंतर ते कोणती जबाबदारी पूर्ण करीत राहिले?
१८ यहोवाच्या मित्रांना यशया ६२:२ मधील शब्द खास आस्थेचे आहेत. देवाच्या समर्पित, बाप्तिस्मा घेतलेल्या व आत्म्याने अभिषिक्त झालेल्या मशीहाच्या अनुयायांच्या दृश्य संघटनेला उल्लेखून असणारे ते शब्द म्हणतात: “रा तुझी धार्मिकता पाहतील, सर्व राजे तुझे वैभव पाहतील. यहोवाच्या मुखाने ठेवलेल्या नव्या नावाने तुला हाक मारतील.” ते “नाव” आजच्या अभिषिक्त शिष्यांना ज्या आशीर्वादित परिस्थितीत एकत्र करण्यात आले आहे त्याला अनुलक्षून आहे. आणखी, ‘देवाच्या नामाचे लोक’ असण्यासाठी त्याच्या दृश्य संस्थेच्या शेष सदस्यांनी आपणाला हक्काने त्याच्या नावाने म्हणवून घेण्यास हवे, त्याचे नाव स्वतःवर धारण करण्यास हवे. या गोष्टीची सत्यता योग्य वेळी कळाली. यशया ६२:२ च्या अनुरोधाने १९३१ मध्ये कोलंबस, ओहायो येथील अधिवेशनात देवाच्या आत्म्याने जन्मलेल्या संघटनेने स्वतःवर “यहोवाचे साक्षीदार” हे नाव आनंदाने लावून घेतले. या उदाहरणास अनुसरुन, यहोवाच्या समर्पित लोकांच्या सर्व मंडळयांनी ते नाव स्वतःस लावून घेतले. ते नाव, जगाने त्याबद्दल वेगवेगळी भाकिते केली तरी आजतागायत टिकून आहे. प्रकटीकरण ३:१४ मध्ये वैभवी येशू ख्रिस्त स्वतःला “विश्वासू व खरा साक्षी” म्हणवितो. यामुळेच १९३१ च्या त्या संस्मरणीय वर्षापासून पुढे, त्याच्या शिष्याच्या पृथ्वीवरील मंडळयांनी त्या नावास इश्वरी मान्यतेने शोभायमान केले. तेव्हापासून त्यांनी त्या नावाला जागण्याची व ते सर्वत्र जाहीर करण्याची आपली जबाबदारी पराकाष्ठेने पार पाडली आहे. याचा परिणाम हा झाला की, यहोवाचे नाम—त्यांच्या सर्वोत्तम मित्राचे अद्वितीय नाव—सबंध पृथ्वीभरात सामोरे आणले गेले. आणि यहोवाने सुद्धा, आपल्या साक्षीदारांबरोबरचे स्वतःचे मित्रत्व आजतागायत टिकून आहे याचा अप्रतिम पुरावा दाखवला आहे.
१९. (अ) यहोवाचे समर्पित साक्षीदार जगाच्या वैरभावास का भीत नाहीत, आणि या सचोटी राखणाऱ्यांना हर्मगिद्दोनात कोणते प्रतिफळ मिळेल? (ब) आम्ही कशासाठी यहोवाचे उपकार मानावे व त्याची स्तुति करावी?
१९ यहोवा देव हा आमचा आहे तर आम्हास, त्याच्या समर्पित साक्षीदारा पुढे कोण उभे राहू शकेल व कोणास विजय मिळेल? (रोमकर ८:३१–३४) याकारणास्तव, आम्ही या शत्रू—जगाच्या वैरभावास मुळीच भीत नाही. यासाठीच, मशीही राज्याचे वकील वा राजदूत या नात्याने आम्ही मेंढरासमान लोकांच्या भेटी घेत आहोत व त्यांना बादशाही प्रमुख याजक येशू ख्रिस्त याच्याद्वारे यहोवा देवाशी समेट करण्याचे निमंत्रण देण्याचे चालूच ठेवून आहोत. (२ करिंथकर ५:२०) या कारणासाठी या जगाचा वैरभाव अभिषिक्त शेष व त्यांचे सोबती, “मोठा लोकसमुदाय” यांच्या विरुद्ध वाढत असला तरी सबंध विश्वातील यहोवा देवाबरोबरील सर्वोत्तम मित्रत्व निष्ठावंतपणे आपला टिकाव धरुन आहे. (प्रकटीकरण ७:९) त्याचे सचोटी रक्षणकर्ते या अर्थी हे मित्रत्व कधीच मोडणार नाही. खरे पाहता, या मित्रत्वाचे प्रदर्शन लवकरच, विलंब न लागता हर्मगिद्दोनात, “सर्व सत्ताधारी देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाई”त केले जाईल. (प्रकटीकरण १६:१४, १६) तेथे दियाबल सैतान, त्याचा दुरात्मासूह व त्याच्या पृथ्वीवरील सर्व दृश्य संघटनेसमोर यहोवा, युगायुगात असणारा प्रचंड व सर्वश्रेष्ठ विजय प्राप्त करुन आपले विश्वव्यापी सार्वभौमत्व गौरवील. यहोवाने आपले सुंदर मित्रत्व अद्याप ज्यांच्यासोबत टिकवून ठेवले आहे त्या आम्ही, मग, बचाव प्राप्त होण्याचे आणि त्याचा विजेता राजा येशू ख्रिस्त याच्याद्वारे मिळविलेला अतिश्रेष्ठ असा विजय स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याचे श्रेय मिळवू. (स्तोत्रसंहिता ११०:१, २; यशया ६६:२३, २४) यहोवा देवाने आपले हे मित्रत्व राखून ठेवले म्हणून आम्ही त्याचे मनःपूर्वक आभार मानतो व त्याची स्तुति करतो!—स्तोत्रसंहिता १३६:१–२६.
तुम्ही कशी उत्तरे द्याल?
◻ येशूने आपल्या शिष्यांना कोणते मित्रत्व संपादण्यास आर्जविले व त्यामुळे त्यांना कोणत्या “वस्तीस” घेतले जाईल?
◻ जग यहोवाच्या साक्षीदारांविषयी कोणता दृष्टिकोण धरुन आहे पण तरीही ते कोणत्या मित्रत्वाचा आनंद अनुभवतात?
◻ ‘देवाच्या नावाचे लोक’ त्याच्या नावासंबंधाने कोणती जबाबदारी पूर्ण करीत आहेत?
◻ यहोवाचे समर्पित साक्षीदार या जगाच्या वैरभावास का भीत नाहीत?
[९ पानांवरील चित्र]
जक्कयाला सबंध विश्वाच्या सर्वोत्तम मित्रत्वात घेतले गेले; हाच तुमचा अनुभव आहे का?
[१२ पानांवरील चित्र]
देव आपला सर्वोत्तम मित्र असावा याचा आनंद मानून यहोवाच्या साक्षीदारांनी १९३१ मध्ये त्याच्या अतुल्य नावाने स्वतःची ओळख देण्याचा ठराव संमत केला