नेतृत्व करणाऱ्यांच्या आज्ञेत राहा
“तुम्ही, आपणामध्ये नेतृत्व करणाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे असे समजून ते तुमच्या जिवांकरता जागृत राहतात.”—इब्रीयांस १३:१७.
१. ख्रिस्ती देखरेख्यांच्या कामापासून आपल्याला कसा फायदा मिळतो?
या “अंतसमया”त यहोवाने आपल्या संस्थेमध्ये देखरेखे पुरविले आहेत. (दानीएल १२:४) ते मेंढरासमान लोकांची काळजी घेण्यात पुढाकार घेतात. त्यांची देखरेख उत्साहवर्धक आहे. (यशया ३२:१, २) याखेरीज देवाच्या कळपाला ममतेने वागणूक देणाऱ्या वडीलांकरवीच्या प्रेमळ देखरेखीमुळे सैतान व त्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणापासून संरक्षण दिले जाते.—प्रे. कृत्ये २०:२८-३०; १ पेत्र ५:८; १ योहान ५:१९.
२. काहींनी प्रेषित पौलाविषयी कोणता ग्रह धरला होता, पण वडीलांविषयी कोणता दृष्टीकोण धरणे योग्य आहे?
२ पण तुमचा वडीलांविषयीचा दृष्टीकोण कसा आहे? तुम्ही आपल्या अंतःकरणात असे म्हणता का, ‘मला काही समस्या आली तरी मी मंडळीतील इतर कोणाही वडीलांकडे मुळीच जाणार नाही, कारण मला त्यापैकी कोणाविषयीही भरवसा वाटत नाही’? तसे आहे तर तुम्ही त्यांचे अपूर्णत्व मोठे करून दाखविता की नाही? प्राचीन करिंथमध्ये काही लोकांनी प्रेषित पौलाविषयी असे म्हटले होतेः “त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत, परंतु त्याचे स्वरुप पाहू गेल्यास ते दुर्बळ व त्याचे भाषण तुच्छवत् आहे.” तरीही, देवाने पौलाला सेवकपण सोपवून दिले होते व त्याचा “विदेशी लोकांचा प्रेषित” म्हणून उपयोग केला. (२ करिंथकर १०:१०; रोमकर ११:१३; १ तीमथ्य १:१२) यास्तव, आम्ही ही आशा करतो की, तुम्हालाही त्या एका भगिनीसारखे वाटू लागेल, जिने असे म्हटलेः “आपल्याला जगात सर्वात उत्तम असा वडीलांचा वर्ग आहे. जेव्हा गरज असते तेव्हा ते नेहमी मदतीसाठी हजर असतात.”
त्यांना आज्ञाधारक का रहावे?
३. आम्ही प्रदर्शित करणाऱ्या आत्म्यासोबत प्रभूने रहावयाचे आहे तर आम्ही ख्रिस्ती सहमेंढपाळाविषयी कोणता दृष्टीकोण राखावा?
३ वस्तुतः ख्रिस्ती सहमेंढपाळाची तरतुद ही थोर मेंढपाळ यहोवा देवाकडून करण्यात आली असल्यामुळे, आम्ही त्यांच्याविषयी कोणता दृष्टीकोण राखावा अशी त्याची इच्छा आहे असे तुम्हाला वाटते बरे? यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाखाली देखरेख करणाऱ्या प्रेमळ देखरेख्यांकडून जे पवित्र शास्त्र आधारीत मार्गदर्शन देण्यात येते ते आम्ही अनुसरावे असे देव खचितच अपेक्षितो. तेव्हा ‘प्रभु आमच्या आत्म्यासोबत राहील,’ आम्हाला शांती अनुभवता येईल व आमची आध्यात्मिकदृष्ट्या उभारणी होईल.—२ तीमथ्य ४:२२; पडताळा प्रे. कृत्ये ९:३१; १५:२३-३२.
४. इब्रीयांस पत्र १३:७ चे आम्हाला कसे व्यक्तीशः अनुकरण करता येईल?
४ पौलाने आर्जविलेः “ज्यांनी तुम्हामध्ये पुढाकार घेतला, ज्यांनी तुम्हास देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा. त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.” (इब्रीयांस १३:७) आरंभीच्या ख्रिस्ती लोकांमध्ये प्रेषितांनी प्रथम पुढाकार घेतला होता. आज, आपल्यामध्ये हा पुढाकार यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळातील सदस्य, इतर अभिषिक्त देखरेखे आणि “मोठा लोकसमुदाय” यामधील पुरुष देखरेखे घेत असल्याचे दिसते. (प्रकटीकरण ७:९) अर्थातच, आम्हाला त्यांची बोलण्याची ढब, उभे राहण्याची पद्धत किंवा इतर शारीरिक लक्षणे यांचे अनुकरण करण्याचे सांगण्यात आलेले नाही, तरी त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करून आम्ही आपली वर्तणूक सुधारण्यास हवी.
५. आज पृथ्वीवर ख्रिस्ती मंडळीची काळजी वाहण्याची प्रमुख जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली आहे, व ते कोणत्या गोष्टीच्या पात्रतेचे आहेत?
५ आज पृथ्वीवर आमच्या आध्यात्मिक गरजांची काळजी करण्याची जबाबदारी प्रमुखपणे “विश्वासू व बुद्धिमान दास” याला सोपविण्यात आली आहे. त्याचा प्रतिनिधी, नियमन मंडळ जगभराच्या देव-राज्य प्रचार कार्याच्या अनुषंगाने पुढाकार घेते व संयोजन करते. (मत्तय २४:१४, ४५-४७) या आत्म्याने अभिषिक्त असणाऱ्या वडीलांना खासपणे आध्यात्मिक नियंत्रक असे समजता येऊ शकते, कारण इब्रीयांस १३:७ असेही वाचण्यात येतेः “तुम्हावर नियंत्रण करणाऱ्यांना आपल्या ध्यानात ठेवा.” (किंग्डम इंटरलिनियर) आता ६३,००० पेक्षा अधिक मंडळ्या व ४०,१७,००० पेक्षा अधिक राज्य घोषक असल्यामुळे १२ सदस्यांचे मिळून बनलेल्या नियमन मंडळाला ‘प्रभुच्या कामात करण्याजोगे खूप’ आहे. (१ करिंथकर १५:५८) त्यांच्या देव-प्रणीत नेमणूकीमुळे ते आमचे पूर्ण सहकार्य मिळण्याच्या पात्रतेचे आहेत. हे, पहिल्या शतकातील नियमन मंडळाप्रमाणेच आहे, ज्यांना आरंभीच्या ख्रिश्चनांचे सहकार्य मिळत होते.—प्रे. कृत्ये १५:१, २.
६. यहोवाच्या लोकांच्या लाभासाठी वडील कोणत्या गोष्टी करतात?
६ देखरेख्यांना मंडळीच्या आध्यात्मिक गरजांची काळजी वाहण्यासाठी आत्म्याकडून नियुक्ती मिळाली आहे. (प्रे. कृत्ये २०:२८) स्थानिक मंडळीच्या क्षेत्रात राज्याच्या संदेशाचा प्रचार होत आहे याकडे ते लक्ष देतात. हे शास्त्रवचनीय दृष्ट्या लायक असणारे पुरुष प्रेमळ मार्गाने आध्यात्मिक मार्गदर्शनही देतात. ते आपल्या आध्यात्मिक बंधु-भगिनींना बोध करतात, सांत्वन देतात आणि साक्ष देतात की जेणेकडून त्यांना देवासमोर नीटपणे चालता येईल. (१ थेस्सलनीकाकर २:७, ८, ११, १२) लक्षात येण्याआधी कोणी चुकीचे पाऊल घेतल्यास त्याला हे “सौम्यतेने” सुधारणूक देतात.—गलतीकर ६:१.
७. पौलाने इब्रीयांस १३:१७ मध्ये कोणती सूचना दिली?
७ अशा प्रेमळ देखरेख्यांना सहकार्य देण्यासाठी आमचे अंतःकरण उचंबळून येते. हे योग्यच आहे कारण पौलाने हे लिहिलेः “तुम्ही, आपणामध्ये नेतृत्व करणाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे असे समजून ते तुमच्या जिवांकरता जागृत राहतात. हे त्यांनी आनंदाने करावे, शोकाने करू नये; हे शोकाने करणे तुम्हास हितकारक नाही.” (इब्रीयांस १३:१७) या सूचनेचा आम्ही कसा अर्थ घ्यावा?
८, ९. (अ) इब्रीयांस १३:१७ च्या अनुषंगाने, नेतृत्व करणाऱ्यांच्या आज्ञेत का राहिले पाहिजे? (ब) आमच्या आज्ञाधारकपणामुळे व अधीनतेमुळे कोणते चांगले परिणाम दिसतील?
८ आम्हावर आध्यात्मिक रितीने देखरेख ठेवणाऱ्यांची आज्ञा मानावी असे पौल म्हणतो. आम्ही या सहमेंढपाळांच्या “अधीन,” नम्र असावयास हवे. ते का? कारण ‘ते आमच्या जिवांकरता [म्हणजे देवास आम्ही समर्पण केलेल्या जीवनाविषयी] जागृत राहतात.’ पण ते कसे “जागृत राहतात”? येथे आ.ग्रू.प्ने.ओ या ग्रीक क्रियापदाचे जे वर्तमानकालीन कार्यकारी रुप वापरण्यात आले आहे त्याचा शब्दशः अर्थ होतो की, हे वडील अक्षरशः “झोप घेत नाहीत.” यामुळे आम्हाला त्या कुरणातील मेंढपाळाची आठवण होते जो मेंढरांना रात्रीच्या धोक्यापासून संरक्षण मिळावे यासाठी आपली झोप सोडून देतो. देवाच्या कळपाची प्रार्थनापूर्वक रितीने काळजी करण्यात किंवा कोणा समविश्वासूला आध्यात्मिक मदत देण्यामध्ये वडील कधीकधी जागरणही करतात. त्यांच्या या विश्वासू सेवेविषयी आम्हाला किती मोल वाटले पाहिजे! आम्ही यहूदाच्या काळातील त्या “अभक्त माणसां”सारखे निश्चितच होऊ इच्छिणार नाही, जे देवाकरवी गौरव किंवा सन्मान मिळालेल्या अभिषिक्त ख्रिस्ती वडीलांचे ‘प्रभुत्व तुच्छ लेखीत होते व या थोर जनांची निंदा करीत होते.’—यहूदा ३, ४, ८.
९ आम्ही ख्रिस्ती देखरेख्यांच्या आज्ञेत राहिलो नाही व अधीन नसलो तर यहोवाला ते बरे वाटणार नाही. यामुळे या देखरेख्यांचे ओझे वाढेल व मग ते आम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या हानिकारक ठरू शकेल. आम्ही सहकार्य न दिल्यास वडीलांना त्यांची कर्तव्ये शोकाने किंवा निराशेने पार पाडावी लागतील व मग, यामुळे आमचा ख्रिस्ती कार्यातील आनंद लोपला जाईल. पण आमच्या आज्ञाधारकतेमुळे व अधीनतेमुळे ईश्वरी भक्तीची वाढ होते व आमच्या विश्वासास बळकटी येते. ‘आम्ही दाखवणाऱ्या आत्म्यासोबत प्रभु राहील,’ आणि मग अशा सहकार्य, शांती व ऐक्याच्या वातावरणात आनंद वाढत राहतो.—२ तीमथ्य ४:२२; स्तोत्रसंहिता १३३:१.
१०. १ तीमथ्य ५:१७ नुसार जे अध्यक्ष चांगले काम चालवितात ते सन्मानास का योग्य आहेत?
१० आपण मंडळीच्या वडीलांना आज्ञाधारक व अधीन राहणे याचा अर्थ आम्ही लोकांना संतुष्ट करणारे आहोत असा नाही. हे अशास्त्रीय आहे, कारण पहिल्या शतकातील ख्रिस्ती दासांना आपल्या धन्यांची आज्ञा “मनुष्यास संतोषविणाऱ्या नोकरांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नका, तर सालस मनाने यहोवाची भीती बाळगून” मानण्याची सूचना केली होती. (कलस्सैकर ३:२२; इफिसकर ६:५, ६) जे देखरेखे ‘चांगले काम करतात व बोलण्यात व शिक्षणात परिश्रम घेतात’ अशांना, ते देववचनावर आधारीत देत असलेल्या शिक्षणामुळे सन्मान दिला जाण्यास हवा. पौलानेही तेच लिहिलेः “जे वडील अध्यक्षतेचे चांगले काम चालवितात, विशेषेकरून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य मोजले जावे. कारण शास्त्र म्हणतेः ‘बैल मळणी करीत असता त्याला मुसके बांधू नको; आणि कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे.’”—१ तीमथ्य ५:१७, १८.
११. एखाद्या वडीलाला “दुप्पट सन्मान” कसा मिळू शकतो, पण त्याने काय करायचे टाळले पाहिजे?
११ इतरांच्या आध्यात्मिक आस्थेची काळजी घेणाऱ्यांना भौतिक मदत उचितपणे दिली जाऊ शकते हे पौलाच्या आत्ताच अवतरीत करण्यात आलेल्या शब्दांवरुन सूचित होते. तथापि, याचा अर्थ, वडीलांना पगार दिला जावा असा नाही, तसेच त्यांनी हक्काने “दुप्पट सन्माना”ची मागणी करावी हेही उचित नाही. तो मंडळीच्या सभासदांकडून उत्स्फुर्ततेने मिळू शकेल, पण वडीलांनी आपल्या नेमणूकीचा सत्ताप्राप्तीसाठी किंवा भौतिक संपदेसाठी कधीच वापर करू नये. त्याने स्वतःचे गौरव करण्याचा कधीही प्रयत्न करू नये तसेच भौतिकदृष्ट्या समृद्ध असणाऱ्यांशीच आपला सहवास राखून इतरांकडे दुर्लक्ष होऊ देता कामा नये. (नीतीसूत्रे २५:२७; २९:२३; यहूदा १६) उलटपक्षी, देखरेख्याने देवाच्या मंडळीचे पालन “स्वेच्छेने, द्रव्यलोभाने नव्हे, तर उत्सुकतेने’ केले पाहिजे.—१ पेत्र ५:२.
१२. काय लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला आम्हामध्ये नेतृत्व करणाऱ्यांच्या आज्ञा मानण्यात मदत मिळू शकेल?
१२ देवाने स्वतः वडीलांची तरतुद केली आहे हे आपण लक्षात ठेवल्यास आम्हाला नेतृत्व करणाऱ्यांना आज्ञाधारक राहण्याची व सन्मान देण्याची मदत मिळेल. (इफिसकर ४:७-१३) खरे म्हणजे, ही माणसे आत्म्याने नियुक्त केलेली आहेत आणि देवाची संस्था यहोवाच्या साक्षीदारांच्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान राखून असल्यामुळे आम्ही ईश्वरशासित व्यवस्थेसाठी आपली कृतज्ञता व आदर दाखविण्याची इच्छा निश्चितच बाळगली पाहिजे. आम्हामध्ये नेतृत्व करणाऱ्यांच्या आज्ञा मानण्यात व अधीन राहण्यात आपण स्वतः प्रथम आपले चांगले उदाहरण घालून दिल्यास त्याद्वारे नव्या लोकांना हीच वृत्ती वाढविण्याची मदत देता येईल.
यांच्या सेवेची का कदर बाळगावी?
१३. (अ) जग व देवाची संस्था यामध्ये नेतृत्वाविषयीचे कोणते भिन्न दृष्टीकोण अस्तित्वात आहेत? (ब) आम्हामध्ये जी माणसे नेतृत्व करीत आहेत अशांविषयी आत्मविश्वास प्रदर्शित करण्याची कोणती सबळ कारणे आहेत? (क) कष्टाळू वडीलांच्या अपूर्णता मोठ्या करून दाखविण्याऐवजी आम्ही काय करावे?
१३ जगात नेतृत्वाचा सहसा प्रतिकार करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. एका वक्त्याने म्हटल्याप्रमाणे, “शिक्षणाच्या वाढत्या पातळीमुळे कौशल्य-बुद्धि इतकी वाढली आहे की, अनुयायांना नेतृत्व दाखविण्याची शक्यता कमी झाली आहे.” पण अशाप्रकारचे स्वैराचारी विचार देवाच्या संस्थेत दिसत नाहीत तसेच आम्हामध्ये नेतृत्व करणाऱ्या पुरुषांविषयी आत्मविश्वास बाळगण्याची सबळ कारणे आहेत. उदाहरणार्थ, जे शास्त्रवचनीय गरजा पुऱ्या करतात अशांनाच वडील या नात्याने नियुक्ती मिळते. (१ तीमथ्य ३:१-७) त्यांना दयाळू, प्रेमळ आणि साहाय्यक बनण्याची तालीम मिळालेली आहे, पण सोबत ते यहोवाचे नीतीमान दर्जे उंचावून धरण्यात दृढ आहेत. ‘सुशिक्षणाने बोध करावयास . . . समर्थ व्हावे’ म्हणून वडीलजन ‘दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्याला धरुन राहण्याचे’ शास्त्रीय सत्य आचरतात. (तीत १:५-९) खरे म्हणजे, आम्ही सर्व अपूर्ण आहोत म्हणून आम्ही त्यांची मानवी अपूर्णता मोठी करून दाखवू नये. (१ राजे ८:४६; रोमकर ५:१२) त्यांच्या मर्यादेमुळे विचलित होऊन त्यांची सूचना कमी मोलाची मानण्यापेक्षा आपण वडीलांकडून येणारे पवित्र शास्त्रीय मार्गदर्शन देवाकडून येणारे असे स्वीकारू या.
१४. १ ले तीमथ्य १:१२ च्या अनुरोधाने वडीलाने स्वतःला नेमून दिलेल्या सेवेविषयी कोणता दृष्टीकोण धरावा?
१४ गुणग्राहकता बाळगणाऱ्या प्रेषित पौलाने म्हटलेः “ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभु ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो . . . मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले.” (१ तीमथ्य १:१२) या सेवेमध्ये प्रचारकार्य व समविश्वासूंची सेवा समाविष्ट होती. कोणा देखरेख्याला पवित्र आत्म्याद्वारे मेंढपाळ म्हणून सेवा करण्याची नियुक्ती मिळाली असली तरी यामुळे आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे वाटू देऊ नये, कारण प्रत्यक्षात तो स्वतः सुद्धा देवाच्या मेंढरापैकीचा एक असून कळपाचा भाग आहे. (१ पेत्र ५:४) याऊलट, मंडळीचा मस्तक, येशू ख्रिस्त याने त्याला कळपाच्या सदस्यांची काळजी करण्यासाठी योग्य समजले आणि देवाने त्याला ज्ञान, सूज्ञता व समज पुरवून यासाठी पात्र बनवले म्हणून त्याने कृतज्ञ राहिले पाहिजे. (२ करिंथकर ३:५) वडीलाला जर देवाकडून लाभलेल्या हक्काविषयी कृतज्ञ राहण्याचे कारण आहे तर मग, मंडळीच्या इतर सदस्यांनी त्याच्याद्वारेचे उपाध्यपण वा सेवा याविषयी गुणग्राहकता दाखवली पाहिजे.
१५. पौलाने १ थेस्सलनीकाकर ५:१२, १३ मध्ये दिलेल्या सूचनेचा सारांश काय आहे?
१५ या शेवटल्या काळी देवाने जी संस्था उभारली आहे तिजबद्दल यहोवाचे साक्षीदार कृतज्ञ आहेत; आणि हीच कृतज्ञता वडीलांचा आदर करण्याची चालना देते. आमच्या लाभास्तव ते जी व्यवस्था करतात त्याला पूर्ण सहकार्य देण्यात आम्ही आनंद मानावा. पौलाने म्हटलेः “बंधुजनहो, आम्ही तुम्हास विनंती करतो की, तुम्हामध्ये जे श्रम करतात, प्रभुमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करतात, त्यांचा तुम्ही मान करावा; आणि त्यांच्या कामामुळे त्यांस प्रेमाने अत्यंत मान द्यावा.” (१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३) या सूचनेचा अवलंब केल्यामुळे आनंद व यहोवाचे आशीर्वाद येतात.
सूचनेचा अवलंब त्वरेने करा
१६, १७. विवाहासंबंधाने वडील कोणती सूचना देतील, व ती अनुसरल्यामुळे काय होते?
१६ पौलाने तीताला ‘बोध कर व सर्व अधिकाराने दोष पदरी घाल,’ असे आर्जविले. (तीतास २:१५) याचप्रमाणे देवाचे प्रतिनिधी आम्हास पवित्र शास्त्राची तत्त्वे व कायदे याकडे निरवितात. यहोवाची संस्था व नियुक्त वडीलांडून मिळणाऱ्या सूचना व मार्गदर्शनाचा अवलंब करण्याचे जे वारंवार स्मरण दिले जाते ते स्वीकारण्याची सबळ कारणे आहेत.
१७ उदाहरणार्थ, वडीलवर्ग एखाद्या ख्रिश्चनाला “केवळ प्रभुमध्ये लग्न करा” या सूचनेचा अवलंब करण्याचे आर्जवितील. (१ करिंथकर ७:३९; अनुवाद ७:३, ४) कोणा बाप्तिस्मा न झालेल्यांसोबत विवाहबद्ध होण्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतील हे त्यांनी दर्शविले असेल. शलमोन राजानेही विदेशी बायका करून गंभीर पातक केले. या बायकांनी त्याचे अंतःकरण खोटया दैवतांकडे लावून त्याला यहोवापासून दूर नेले. (१ राजे ११:१-६) वडीलांनी कदाचित हेही स्पष्ट केले असावे की, एज्राने यहुदी पुरुषांना त्यांच्या मूर्तिपूजक बायका घालवून देण्यास सांगितले व शिवाय नेहम्यानेही म्हटले की, विश्वासात नसणाऱ्यांबरोबर विवाहबद्ध होणारे ‘देवाचे अपराधी होतात व गंभीर पातक करतात.’ (नेहम्या १३:२३-२७; एज्रा १०:१०-१४; पहा द वॉचटावर, मार्च १५, १९८२, पृ. ३१; नोव्हेंबर १५, १९८६, पृ. २६-३०.) प्रेमळ वडीलांद्वारे दिलेल्या शास्त्रवचनीय सूचनेचा अवलंब करण्यामुळे आशीर्वाद तसेच यहोवाला संतुष्ट केल्याचे समाधान मिळते.
१८. पौलाने १ करिंथकर ५:९-१३ मध्ये जे लिहिले त्याचा विचार करता, आमच्या कोणा कौटुंबिक सदस्यास बहिष्कृत करण्यात आले असल्यास आमची प्रतिक्रिया कशी राहावी?
१८ वडीलांद्वारे जो न्यायदान विषयक निर्णय जाहीर केला जातो त्याचाही आदर करणे योग्य आहे. पौलाने करिंथ येथील ख्रिश्चनांना म्हटलेः “बंधु म्हटलेला असा कोणी जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी किंवा वित्त हरण करणारा असला तर अशांची संगत धरू नये. त्याच्या पंक्तीस बसू नये.” त्यांनी “आपणामधून त्या दुष्टाला बाहेर घालवा”वे अशी सूचनाही त्यांना देण्यात आली. (१ करिंथकर ५:९-१३) पण, तुमचा नातेवाईकच बहिष्कृत झाला आहे असे समजा, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? कौटुंबिक गोष्टीची काळजी करण्यात थोडा संपर्क ठेवण्याची जरूरी असली तरी बहिष्कृत नातेवाईकासोबत सर्व प्रकारचा आध्यात्मिक सहवास तोडून टाकणे चांगले. (पहा द वॉचटावर एप्रिल १५, १९८८, पृ. २६-३१.) निश्चितपणे, देव व त्याच्या संस्थेला दाखविलेला निष्ठावंतपणा याने आम्हाला देखरेख्यांच्या न्यायी निर्णयाचा आदर करण्याचे उत्तेजन द्यावे.
१९. आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या चुकीचा मार्ग धरला आहे असे वडीलांनी आम्हाला दाखवले तर आम्ही काय करावे?
१९ जीवनाच्या अरुंद मार्गावर राहाणे सोपे नाही. यासाठी देवाच्या वचनात दिलेले तसेच देवाच्या संस्थेत मेंढपाळकत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या लोकांकरवीचे मार्गदर्शन आम्ही अनुसरले पाहिजे. (मत्तय ७:१३, १४) आम्ही आपल्या वाहनात बसून एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना चुकीचे वळण घेतले असल्यास आमची कृती सुधारण्यासाठी हालचाल केलीच पाहिजे. तसे न केल्यास आम्ही आमच्या इच्छित स्थळी पोहोचणार नाही. याचप्रमाणे, आम्ही, कोणा अविश्वासूसोबत सहवास ठेवू लागून आध्यात्मिकदृष्ट्या चुकीचा मार्ग धरला आहे हे वडीलांनी आम्हाला दाखवले आहे तर त्यांच्या शास्त्रवचनीय सूचनेचा आम्ही त्वरेने अवलंब करू या. आम्ही “यहोवावर भाव” खराच प्रदर्शित करीत आहोत हे दाखविण्याचा हा एक मार्ग असेल.—नीतीसूत्रे ३:५, ६.
लहान गोष्टीतही आदर दाखवा
२०. वडीलांकरवी लहान गोष्टीत देखील दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाविषयी आदर दाखविण्यासाठी कोणते प्रश्न आम्हाला साहाय्य देऊ शकतील?
२० वडीलांद्वारे दिल्या जाणाऱ्या लहान गोष्टीत देखील आपण आदर दाखविण्याची गरज आहे. यासाठी आपण विचारू शकतोः ‘वडीलांनी आम्हाला अमूक एका आजारी बांधवाला भेट देण्यास सांगितले किंवा कोणा नव्या व्यक्तीला क्षेत्रकार्यात तालीम देण्यास सांगितले तर मी त्याला सहकार्य देतो का? सभेच्या सर्व नेमणूका मी त्वरेने स्वीकारून त्यांची उत्तम तयारी करतो का? अधिवेशनात जागा राखून ठेवण्याविषयी, पेहराव इत्यादि गोष्टींबद्दल जेव्हा मार्गदर्शन देतात तेव्हा मी त्यास चांगला प्रतिसाद देतो का? राज्य सभागृहाची स्वच्छता करण्याविषयी, क्षेत्र सेवेचा अहवाल लागलेच घालण्याविषयी किंवा सभेला वेळेवर येण्याविषयी ते आम्हाला विचारणा करतात तेव्हा आम्ही सहकार्य दाखवितो का?’
२१. वडीलांस आदर दाखविण्यामुळे आमच्या लक्षात येशूचे कोणते शब्द येतील?
२१ आमच्या सहकार्याची मंडळीच्या देखरेख्यांना मोठी कदर वाटते व त्याचा परिणाम अधिक चांगलेपणात होतो. आम्ही लहान गोष्टीत आदरयुक्त व सहकार्य दाखवत राहिल्यास आम्हाला येशूचे हे शब्द ध्यानात येत राहतीलः “जो अगदी अल्प गोष्टीविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे.” (लूक १६:१०) आम्हास विश्वासू गणले जावे हे निश्चितपणे वाटते.
प्रेमळ देखरेखीस प्रतिसाद देत राहा
२२. विश्वासू दास व मंडळीतील वडील याकरवी जी प्रेमळ देखरेख पुरविली जाते त्याद्वारे कोणते लाभ परिणामित होतात?
२२ विश्वासू दास तसेच मंडळीतील वडील यांजकरवीच्या प्रेमळ देखरेखीमुळे जे लाभ परिणामित होत आहेत त्यावरुन यहोवाचे समृद्ध आशीर्वाद त्याच्या पार्थिव संस्थेवर आहेत हे सिद्ध होते. याचप्रमाणे वडीलांकरवीचे कुशल मार्गदर्शन त्यांची क्षमता पाजळते व आम्हामध्ये ऐक्य घडवून आणते. हे राज्य आस्थेची वाढ करण्यात अधिक एकाग्र तसेच यशस्वी प्रयत्नात परिणामित होते. खरेच, आम्ही नेतृत्व करणाऱ्यांच्या देखरेखीला दाखवीत असलेला रसिकतापूर्ण प्रतिसादाचा एक सरळ प्रत्यय, देव आमचे प्रचाराचे व शिष्य बनविण्याचे कार्य आशीर्वादित करीत आहे यामध्ये दिसतो. (मत्तय २८:१९, २०) वडीलांना दिलेले सहकार्य आम्हाला नव्या व्यवस्थीकरणातील चिरकालिक जीवनासाठी आमची तयारी करते.
२३. १ ले योहान ५:३ च्या अनुषंगाने आम्हास काय करण्याची चालना लाभावी?
२३ आमचे यहोवावर प्रेम आहे तर मग त्याच्या आज्ञांचे पालन करणे ही काही नाखुशीची गोष्ट नसणार. प्रेषित योहानाने लिहिलेः “देवावर प्रीती करणे म्हणजे आपण त्याच्या आज्ञा पाळणे हे आहे; आणि त्याच्या आज्ञा भारी नाहीत.” (१ योहान ५:३) निष्ठावंत ख्रिस्ती यहोवाची आज्ञा आनंदाने मान्य करतात आणि त्याने ज्यांच्यावर मंडळीची देखरेख सोपविली आहे त्यांच्याशी सहकार्य करण्यास पुढे होतात. आम्ही देवाच्या संस्थेत आहोत व आम्हामध्ये “मनुष्यातील दाने” आहेत हे किती धन्यतेचे आहे! (इफिसकर ४:८) तर मग, देव आपल्या लोकांना मार्गदर्शन देत आहे हा पूर्ण आत्मविश्वास राखून आपण, ज्यांना यहोवाच्या साक्षीदारांमध्ये नेतृत्व करण्याचा हक्क देण्यात आला आहे अशांच्या नेहमी आज्ञेत राहू या.
तुमचे विवेचन काय आहे?
◻ आम्हामध्ये नेतृत्व करणाऱ्यांच्या आज्ञेत का असावे?
◻ कष्टाळू वडीलांद्वारे जी सेवा सादर करण्यात येते त्याविषयी आमची प्रवृत्ती कशी असावी?
◻ वडीलांनी दिलेल्या सूचनांचा लगेच अवलंब का करावा?
◻ प्रेमळ देखरेखीस आमचा भावपूर्ण प्रतिसाद कोणते लाभ देतो?
[२५ पानांवरील चित्रं]
पौलाला सुवार्तेचा प्रचार करण्यात आणि आपल्या समविश्वासू बांधवांची सेवा करण्यात आनंद वाटला. मग, एक वडील या अर्थी तुम्हाला देवाकडून सेवेचा जो हक्क मिळालेला आहे त्याविषयी तुम्ही कृतज्ञ आहात का?
[२६ पानांवरील संक्षिप्त आशय]
तुम्ही सभेच्या नेमणूका स्वीकारून, राज्य सभागृह स्वच्छ करण्यात मदत करून, आपल्या क्षेत्रकार्याचा अहवाल त्वरीत देऊन आणि इतर मार्गाने वडीलांना सहकार्य देता का?