-
श्रीमंत मनुष्य व लाजरसर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
-
-
येशू सांगतोः “कोणीएक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे. त्याच्या दरवाज्याजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरुन खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.”
-
-
श्रीमंत मनुष्य व लाजरसर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
-
-
हा गर्विष्ठ श्रीमंत मनुष्यांचा वर्ग सर्वसाधारण गरीब लोकांकडे अत्यंत तुच्छतेने पाहतो. त्यांना ʽअम्ह․ʼआʹरेटस् वा धरतीचे [मातीचे] लोक संबोधतो. अशा रितीने हे धार्मिक पुढारी ज्यांना यथायोग्य आध्यात्मिक पोषक अन्न व अधिकार नाकारतात, त्या लोकांना, दरिद्री लाजर चित्रित करतो. त्यामुळे फोडांनी भरलेल्या लाजराप्रमाणे, आध्यात्मिक रोगट व केवळ कुत्र्यांच्या सहवासास योग्य असे मानून सर्वसाधारण लोकांना तुच्छ लेखण्यात येते. पण लाजर वर्गाच्या लोकांना आध्यात्मिक पोषणाची भूक व तहान असल्यामुळे, श्रीमंत मनुष्याच्या मेजावरून आध्यात्मिक अन्नाचे मिळतील ते अर्धे-मुर्धे तुकडे मिळण्याच्या इच्छेने ते दरवाजाजवळ आले आहेत.
-