प्रीतीची दोन सर्वथोर वक्तव्ये
“देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो . . . त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.
१. “देव प्रीती आहे” या विधानाचा काय अर्थ होतो?
“देव प्रीती आहे.” प्रेषित योहानाने हे विधान दोनदा केले. (१ योहान ४:८, १६) होय, यहोवा देव जसा सूज्ञ, न्यायी व शक्तीमान आहे त्याच पद्धतीने तो प्रेममय देखील आहे. तो स्वतःच प्रीतीस्वरूप आहे. तो प्रीतीची सर्वांगपूर्णता व व्यक्तीमत्व आहे. तुम्ही स्वतःला विचारून पहा: ‘हे सत्य का आहे ते मला ठाऊक आहे का? देव स्वतः प्रीती आहे याबद्दल पुरावा वा उदाहरण देऊन स्पष्ट विवेचन मला सादर करता येईल का? याचा माझे जीवन व माझ्या हालचाली यावर कसा परिणाम झालेला आहे?’
२. देवाने आपल्या प्रेमाचे दृश्य वक्तव्य कसे दिले आहे?
२ यहोवा देवाने पृथ्वीवरील आपल्या मानवी निर्मितीच्या बाबतीत प्रेमाचा किती वर्षाव केला आहे बरे! आमचे सुंदर डोळे व त्यांची हालचाल, आमच्या हाडातील अद्र्भित स्वरूपाचा मजबूतपणा, आमच्या स्नायुंतील ताकद आणि स्पर्शाद्वारे जाणवणारी संवेदना यांचा जरा विचार करा. आम्हाला स्तोत्रकर्त्याच्या भावना प्रतिध्वनित करण्याचे खरेच कारण आहे: “भयप्रद व अद्र्भित रीतीने माझी घडण झाली आहे म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो.” तसेच उत्तुंग पर्वत, स्वच्छ पाण्याचा शांत खळखळणारा आवाज, वसंत ऋतुतील फुलांनी सज्ज असणाऱ्या बागा आणि दैदीप्यमान सूर्यास्त याही गोष्टींचा विचार करा. “हे यहोवा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली. तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.”—स्तोत्रसंहिता १३९:१४; १०४:२४.
३, ४. देवाच्या प्रेमाच्या वक्तव्याबद्दल इब्री शास्त्रवचने कोणती उदाहरणे पुरवितात?
३ देवाच्या प्रथम मानवी निर्मितीने बंड केले तेव्हा देवाच्या प्रीतीचे वक्तव्य थांबले नाही. उदाहरणार्थ, आपल्या वचनयुक्त ‘संताना’ करवी करण्यात आलेल्या तरतुदीचा फायदा मानवी संततीला मिळावा यासाठी देवाने त्या जोडप्याला मुले प्रसवण्याची अनुमति देऊन आपले प्रेम व्यक्त केले. (उत्पत्ती ३:१५) नंतर त्याने नोहाला मानवी वंश आणि इतर प्राण्याचे जीवन बचावू रहावे यासाठी तारु तयार करायला लावले. (उत्पत्ती ६:१३–२१) यानंतर त्याने अब्राहामावर आपली मोठी प्रीती व्यक्त केली. हा अब्राहाम यहोवाचा मित्र असे ओळखण्यात येऊ लागला. (उत्पत्ती १८:१९; यशया ४१:८) अब्राहामाच्या वंशजाला मिसरी दास्यापासून सोडवणूक देऊन देवाने आपल्या प्रेमाचे आणखी वक्तव्य दर्शविले. याबद्दल आम्ही अनुवाद ७:८ मध्ये वाचतो: “यहोवाने तुम्हाला पराक्रमी हाताने . . . बाहेर आणिले ह्याचे कारण हेच की, तुमच्यावर त्याचे प्रेम आहे.”
४ इस्राएलांनी कृतघ्नपणा दाखविला व ते वारंवार बंड करीत राहिले तरी देवाने त्यांना लागलेच त्यागिले नाही. त्याऐवजी तो त्यांना प्रीतीने आर्जवित राहिला: “फिरा, आपल्या वाईट मार्गावरून मागे फिरा. इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता?” (यहेज्केल ३३:११) तथापि यहोवा प्रीतीचे व्यक्तिमत्व असला तरी तो न्यायी व सूज्ञ आहे. त्याच्या लोकांनी आपल्या बंडखोरी द्वारे त्याच्या सहनशीलतेची परिसीमा गाठली! त्यांनी इतकी मजल गाठली की शेवटी “काही उपाय राहिला नाही” त्यामुळेच त्याने त्यांना बाबेलोनी दास्यात जाऊ दिले. (२ इतिहास ३६: १५, १६) तथापि, येथे देवाचे प्रेम कायमचे संपले नाही. ७० वर्षानंतर त्यांच्यातील शेष बचावून आपल्या मायदेशी परत जात आहे याकडे त्याने लक्ष दिले. कृपया १२६वे स्तोत्र वाचा व त्यात परतणाऱ्या लोकांना कसे वाटत होते ते पहा.
प्रेमाच्या सर्वथोर वक्तव्यासाठी तयारी करणे
५. देवाने आपला पुत्र या पृथ्वीवर पाठवला हे त्याच्या प्रेमाचे वक्तव्य होते असे का म्हणता येते?
५ पुढे इतिहासात यहोवाने आपले सर्वथोर प्रेम व्यक्त करण्याची वेळ आली. ते खरोखरी त्यागाचे प्रेम होते. याच्या तयारीप्रीत्यर्थ देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राचे जीवन स्वर्गातील आत्मिक वास्तव्यातून यहुदी कुमारी मरीयेच्या उदरी स्थलांतरीत केले. (मत्तय १:२०–२३; लूक १:२६–३५) यहोवा व त्याचा पुत्र यांजमध्ये जी खास जवळीक राहिली होती त्याची कल्पना करा. ज्ञानाच्या व्यक्तिमत्वात ज्याचे चित्र चितारण्यात आले त्या येशूच्या मानवी प्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वाबद्दल आम्ही वाचतो: “तेव्हा मी [देवा] पाशी कुशल कारागीर होते. मी त्याला नित्य आनंददायी होते. त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे.” (नीतीसूत्रे ८:३०, ३१) तर मग या एकुलत्या एका पुत्राने देवासमोरील आपली उपस्थिती सोडावी हा यहोवाकरता मोठा त्याग नव्हता का?
६. येशूच्या जीवनाच्या आरंभाला यहोवाने पितृत्वाची आस्था कशी राखली?
६ त्यामुळेच, आपल्या पुत्राची मानवी गर्भधारणा व त्यानंतरची त्याची वाढ निसंशये मोठ्या आस्थेने व काळजीपूर्वक निरिक्षीली असावी. देवाचा पवित्र आत्मा मरीयेवर छाया करत राहिला त्यामुळे वाढत असलेल्या गर्भाला कसलीही इजा होऊ शकली नाही. योसेफ व मरीया नावनिशीकरता बेथलहेमास जात आहेत हे यहोवाने पाहिले, त्यामुळे येशूचा जन्म मीखा ५:२च्या भविष्यवादाच्या पूर्णतेत तेथे होऊ शकला. आपल्या देवदूताकरवी देवाने योसेफाला, हेरोद राजाच्या घातकी योजनेविषयी सावधान करून त्याला त्याच्या कुटुंबासोबत मिसरात पळून जायला व हेरोदाचा मृत्यु होईपर्यंत तेथे राहायला लावले. (मत्तय २:१३–१५) येशूच्या वाढीविषयी देवाने आपली आस्था जारी ठेवली असावी. कारण १२ वर्षाचा झालेला येशू मंदिरातील शिक्षक व इतरांना प्रश्नोत्तराद्वारे आश्चर्यचकित करीत आहे हे पाहण्यात देवाला किती आनंद वाटला असावा!—लूक २:४२–४७.
७. येशूच्या उपाध्यपणात देवाला संतोष वाटत होता हे कोणत्या तीन घटनेद्वारे स्पष्ट होते?
७ अठरा वर्षांनी जेव्हा येशू बाप्तिस्मा घेण्यासाठी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे आला त्यावेळी यहोवा ते बघत होता. त्यावेळी त्याने आनंदाने आपला पवित्र आत्मा येशूवर पाठविला व म्हटले: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे. ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्तय ३:१७) देवाने येशूच्या उपाध्यपणाकडे पहात राहावे व पुत्राने आपल्या स्वर्गीय पित्याला सर्व स्तुती द्यावी हे बघणे केवढे सुखावह होते ते कोणाही ख्रिस्ती बापाला सहज कळेल. एके प्रसंगी येशूने आपल्या काही प्रेषितांना एका उंच डोंगरावर नेले. तेथे यहोवाने ख्रिस्ताला वैभवी दिमाखात प्रज्वलित बनविले आणि तो म्हणाला: “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे. ह्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्याचे तुम्ही ऐका.” (मत्तय १७:५) येशूने देवास त्याचे स्वतःचे नाम गौरविण्याविषयी याचना केली तेव्हा याचे उत्तर देताना तिसऱ्या खेपेला यहोवाची वाणी ऐकू आली. यहोवाने म्हटले: “मी ते गौरविले आहे व पुन्हाही गौरवीन.” ही वाणी बहुधा येशूसाठी झाली होती कारण त्याच्याबरोबर असणाऱ्या काहींना वाटले की कोणी दूत बोलला तर इतरांना वाटले की मेघगर्जना झाली.—योहान १२:२८, २९.
८. देवाच्या प्रीतीविषयी तुम्हाला कसे वाटते?
८ देवाने आपल्या पुत्राविषयी जी हालचाल केली व जी आस्था दाखवली त्याविषयी तुम्ही कसला निर्णय घ्याल? आपल्या एकुलत्या एका पुत्रावर देवाचे अतिशय प्रेम आहे हे आपल्याला सहजपणे कळते. हे ध्यानात राखून तसेच आपल्या एकुलत्या मुलाबद्दल कोणाही पालकाला कसे वाटेल त्याची जाण राखून पुढे जे घडले ते विचारात घ्या. ते आहे, येशूचे यज्ञार्पित मरण.
प्रीतीचे सर्वथोर वक्तव्य
९, १०. देवाने मानवजातीविषयी व्यक्त केलेले सर्वथोर प्रेम कोणते होते व याद्वारे कोणत्या शास्त्रवचनीय साक्षीला महत्व मिळते?
९ आमच्या स्वर्गीय पित्याला कळकळीची भावना आहे असे पवित्र शास्त्र दाखविते. त्याच्या इस्राएल लोकांविषयी आम्ही यशया ६३:९ मध्ये वाचतो: “त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला, त्याच्या स्वतःच्या संदेशवाहकाने त्यांचे तारण केले, त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करूणेने त्यांस उध्दरिले. पूर्वीचे दिवस त्याने त्यांचे लालनपालन केले.” तर मग, येशूचा ‘आक्रोश व अश्रु’ यामुळे यहोवाला किती अधिक यातना झाल्या असतील. (इब्रीयांस ५:७) येशूने अशी ही प्रार्थना गेथशेमाने बागेत केली. त्याला बंदिवान केले गेले, सर्वांची थट्टा सहन करावी लागली, मार व पीडा मिळाल्या, त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट दाबून बसविण्यात आला. या सर्व गोष्टी त्याचा प्रेमळ पिता बघत होता हे लक्षात घ्या. भारी वधस्तंभ आपणावर वाहून नेत असता येशू ठिकठिकाणी अडखळला हेही त्याला दिसले. सरतेशेवटी आपल्या मुलाला वधस्तंभावर खिळे ठोकलेल्या दशेत सुद्धा त्याला बघावे लागले. स्वतःच्या प्रिय पुत्राला होत असलेला त्रास व यातना देवाला निवारण करता आल्या असत्या हे आम्हाला विसरता येणार नाही. तरीपण यहोवाने येशूला इतका त्रास सहन करू दिला. देवाठायी भावना आहेत त्यामुळेच त्याने या सर्व गोष्टी न्याहाळण्याद्वारे त्याला पूर्वी कधीही झाल्या नसतील आणि पुढे कधी होणार नाहीत इतक्या यातना झाल्या असतील.
१० वरील सर्व गोष्टी लक्षात घेता आम्हाला येशूने निकदेमास म्हटलेल्या या शब्दात केवढा अर्थ भरलेला आहे ते चांगल्याप्रकारे कळू शकतो: “देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला; यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला र्सावकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) याच अर्थाचे, येशूचा प्रिय प्रेषित योहान याचेहि हे शब्द आहेत: “देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठविले [ते यासाठी की] तुमच्या आमच्या पापाचे प्रायश्चित व्हावे. ह्यावरून देवाची आपल्या वरील प्रीती प्रगट झाली.”—१ योहान ४:९, १०.
११. देवाने व्यक्त केलेल्या सर्वथोर प्रेमाची ठळकता प्रेषित पौल कशी सादर करतो?
११ तर आता प्रेषित पौलाने रोमकरांस पत्र ५:६–८ मध्ये यहोवा देवाने व्यक्त केलेल्या सर्वथोर प्रीतीविषयी या शब्दात का भर दिला ते तुम्हाला समजेलच. तो म्हणाला: “आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतीमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” आपला एकुलता एक पुत्र पृथ्वीवर पाठवून त्याला यातना व अत्यंत कठोर असे मरण पत्करावयास लावू देणे या करवी यहोवा देवाने सर्वथोर प्रीतीचे वक्तव्य वदविले.
दुसरे अप्रतिम वक्तव्य
१२, १३. (अ) येशूने व्यक्त केलेले प्रेम कोणत्या मार्गी अद्वितीय आहे? (ब) येशूच्या थोर प्रेमाकडे पौल कसे लक्ष वेधवितो?
१२ ‘पण मग,’ तुम्ही विचाराल, ‘प्रीतीचे दुसरे अप्रतिम वक्तव्य कोणते?’ येशू ख्रिस्ताने म्हटले “आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.” (योहान १५:१३) हे खरे की, मानवजातीच्या सबंध इतिहासात काहींनी इतरांसाठी आपल्या जीवनाची आहुति दिली. पण त्यांचे जीवन मर्यादित होते; ते कधी ना कधी मरणार होतेच. तथापि, येशू ख्रिस्ताच्याबाबतीत पाहता तो परिपूर्ण मनुष्य होता व त्याला जीवनाचा हक्क होता. इतर मानवजातीप्रमाणे त्याच्यावर अनुवंशिक मरण नव्हते आणि येशूने अनुज्ञा दिली नसती तर कोणालाहि त्याचे जीवन जबरदस्तीने घेता आले नसते. (योहान १०:१८; इब्रीयांस ७:२६) त्याचे हे शब्द आठवा: “तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही?”—मत्तय २६:५३; योहान १०:१७, १८.
१३ येशूने जे केले त्यात जे प्रेम समाविष्ट होते त्याची अधिक रसिकता वाढविण्यासाठी आपल्याला ही गोष्ट पहावी लागेल: तो विश्वाचा सार्वभौम सत्ताधीश व सार्वकाळचा राजा याचा निकटवर्ती व सहकर्मी या अर्थी होता. स्वर्गात आत्मिक प्राण्याच्या रूपात असलेले वैभवी अस्तित्व त्याने सोडले. तरीपण निस्वार्थ प्रेमाने येशूने, प्रेषित पौलाने म्हटले ते केले: “तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानिले नाही. तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले; आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण व तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.”—फिलिप्पैकर २:६–८.
१४. येशूच्या प्रेमाच्या थोर वक्तव्याबद्दल यशया संदेष्ट्याने कशी साक्ष दिली?
१४ हे प्रीतीचे वक्तव्य नव्हते का? ते निश्चितपणे तसे होते, पण तसे पाहता ते त्याचा स्वर्गीय पिता यहोवा देव याच्या नंतरचे होते. येशूने जे सर्व सहन केले त्याविषयी यशयाच्या ५३व्या अध्यायातील हे भविष्यवादित शब्द आम्हाला साक्ष देतात: “तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित [होता.] . . . खरोखर आमचे व्याधि त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पीडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला . . . त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले . . . आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यु पावला.”—यशया ५३:३–५, १२.
१५, १६. येशूसाठी तो मोठा त्याग होता हे त्याच्या कोणत्या शब्दावरून दिसते?
१५ येशूच्या मरणाशी जे सर्व संबंधित होते त्याला अनुलक्षून येशूने गेथशेमाने बागेत प्रार्थना केली: “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो.” (मत्तय २६:३९) हे शब्द उच्चारण्याद्वारे येशू कशाची विचारणा करीत होता? “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा” होण्यापासूल परावृत्त होण्याची इच्छा तो धरून होता का? (योहान १:२९) ते तसे नसावे, कारण येशूने वेळोवेळी आपल्या शिष्यांना, त्याला त्रास सहन करावा लागेल, मरावे लागेल व ते मरण कसे असणार तेही वारंवार सांगितले होते. (मत्तय १६:२१; योहान ३:१४) या कारणास्तव ही प्रार्थना करताना येशूच्या मनात काही वेगळेच असावे.
१६ येशूने, त्याच्यावर निंदेखोर असा जो आरोप लादला जाणार होता हे ताडले व त्याविषयी निश्चये काळजी लागून राहिली असावी. यहुद्यांच्या मते हा खूपच मोठा व वाईट गुन्हा होता. पण या खोट्या दोषारोपाबद्दल एवढी काळजी तरी का वाटावी? कारण त्या परिस्थितीत त्याला येणारे मरण त्याच्या स्वर्गीय पित्यावर निंदा आणणार होते. होय, धार्मिकतेवर प्रेम करणारा व अधर्माचा वीट मानणारा तसेच आपल्या पित्याचे नाम पृथ्वीवर गौरविण्याकरता आलेला देवाचा निष्कलंक पुत्र देवाच्या स्वतःच्याच लोकांकरवी यहोवा देवाची निंदा करणारा या अर्थी ठार मारला जाणार होता.—इब्रीयांस १:९; योहान १७:४.
१७. येशू ज्या स्वरुपाच्या मृत्यूस तोंड देऊन होता तो त्याच्यासाठी सत्वपरिक्षेचा का होता?
१७ अगोदर त्याच्या उपाध्यपणामध्ये येशूने म्हटले होते: “मला बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे व तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे.” (लूक १२:५०) आता त्याच्या बाप्तिस्म्याचा कळस होता. या कारणास्तव तो प्रार्थना करीत होता त्यावेळी त्याचा घाम रक्ताच्या थेंबात बदलला. (लूक २२:४४) शिवाय त्या रात्री त्याच्या खांद्यावर खूपच मोठे ओझे विसावलेले होते ज्याची कल्पना आमच्या विचारापलीकडे आहे. आपल्याला विश्वासू राहिलेच पाहिजे हे त्याला ठाऊक होते कारण अपयशी झाल्यास ती यहोवाच्या मुखात किती भयंकर चपराक बसणार! सैतान हेच म्हणणार की पहा, मीच बरोबर व यहोवा देव चूक आहे. परंतु येशू मरणापावेतो विश्वासू राहिल्यामुळे दियाबल सैतानाच्याच मुखात केवढी जबर चपराक बसली! याकरवी येशूने सैतानाला अति नीच व अत्यंत लबाडखोर असल्याचे सिद्ध केले.—नीतिसूत्रे २७:११.
१८. त्या रात्री येशू भयंकर त्रस्थतेत का होता?
१८ यहोवा देवाला आपल्या पुत्राच्या निष्ठावंतपणाबद्दल इतका आत्मविश्वास होता की येशू हा विश्वासू शाबीत होईल असे त्याने आधीच भाकित सुद्धा केले. (यशया ५३:९–१२) तरीही येशूला ठाऊक होते की त्याच्यावर सचोटी राखण्याचा भार आहे. त्याला अपयशी होता आला असते. त्याला पाप करता आले असते. (लूक १२:५०) त्या रात्री त्याचे स्वतःचे व सबंध मानवजातीचे चिरकालिक जीवन पणाला लागले होते. त्यामुळेच ती केवढी भयंकर त्रस्थता वाटली असावी! येशूने कमकुवत होऊन पाप केले असते तर आम्ही अपूर्ण प्राणिमात्र करतो त्याप्रमाणे इतरांच्या यज्ञार्पणाच्या आधारावर त्याला दयेविषयीची याचना करता आली नसती.
१९. आपल्या निस्वार्थ मार्गाक्रमणामुळे येशूने काय साध्य केले?
१९ तद्वत, इ.स. ३३च्या निसान १४ला येशूने दाखविलेली सहनशीलता अद्यापपर्यंत कोणाही मानवाला दाखविता आली अशा निस्वार्थ प्रेमाचे सर्वथोर वक्तव्य ठरली. हे निस्वार्थ प्रेम यहोवा नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय त्याने आपल्या मरणाद्वारे किती भव्य गोष्टी साध्य केल्या! त्याच्या मृत्युद्वारे तो “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा” ठरला. (योहान १:२९) त्याला अनुसरणाऱ्या १,४४,००० साठी त्याने राजे व याजक बनण्याचा व त्याच्यासोबत हजार वर्षे राज्य करण्याचा मार्ग खुला केला. (प्रकटीकरण २०:४, ६) या सोबत, “दुसरी मेंढरे” याचा “मोठा लोकसमुदाय” आज ख्रिस्ताच्या खंडणीकरवी लाभ मिळवीत आहे आणि या जुन्या व्यवस्थीकरणाच्या अंतामधून बचावण्याची आशा राखून आहे. हे लोक पृथ्वीच्या नंदनवनाचा आनंद उपभोगणाऱ्यात पहिले असणार. याचप्रमाणे येशूच्या करणीमुळे मानवजातीतील लाखोंचे पुनरूत्थान घडवले जाईल. यांनाही पृथ्वीतील नंदनवनात सार्वकाळचे जीवन अनुभवण्याची संधि असणार. (प्रकटीकरण ७:९–१४; योहान १०:१६; ५:२८, २९) खरेच, “देवाची [अभि] वचने कितीही असोत, त्याच्या ठायी [म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे] होय, असेच आहे.”—२ करिंथकर १:२०.
२० यहोवा देव व येशू ख्रिस्त यांनी आम्हासाठी प्रेमाची जी सर्वथोर वक्तव्ये केली त्याविषयी आम्ही कृतज्ञता दाखवावी हे योग्यच आहे. आम्ही याबद्दल त्यांचे खरेच ऋणी आहोत व जर आम्हाला त्यापासून पूर्ण तऱ्हेचा लाभ घ्यायचा आहे तर अर्थातच ती कृतज्ञता आम्ही व्यक्त करणे जरूरीचे आहे. आमचा पुढचा लेख याचे अत्यंत चांगले मार्ग कोणते आहेत ते दाखवील.
तुम्हाला आठवते का?
◻ देवाच्या प्रेमाची कोणती वक्तव्ये सर्व मानवजातीला दिसतात?
◻ आपल्या पुत्रावर त्रास ओढवत होता त्यावेळी यहोवालाहि यातना होत होत्या हे आम्हाला कसे कळते?
◻ ज्यांनी मानवाकरिता आपल्या जीवनाची आहुति दिली त्यापेक्षा येशूचे मरण कसे वेगळे ठरते?
◻ यहोवा व येशू यांनी दाखविलेल्या प्रेमामुळे आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा?
२०. यहोवा देव व येशू ख्रिस्त यांनी प्रेमाची जी दोन सर्वथोर वक्तव्ये सादर केली त्याविषयी आमचा प्रतिसाद कसा असावा?