पवित्र शास्त्र स्वतःच परस्परविरोधी मते मांडते का?
“खोटे बोलणे देवास अशक्य आहे.” पवित्र शास्त्र घोषित करते. (इब्रीकर ६:१८) मग त्याचे पुस्तक परस्पर विरोधी मतांनी व अर्थपूर्ण तफावतींनी भरलेले राहून सुद्धा त्यास देवाचे वचन असे कसे म्हटले जाऊ शकते? कधीच नाही. ‘मग या तफावती का?’ असेच तुम्ही विचाराल.
शतकानुशतके मेहनतीने हस्त लिखिताने प्रती केलेल्या पुस्तकात व ज्याची त्या दिवसातील प्रसिद्ध भाषेत भाषांतर करण्याची गरज भासली अशा पुस्तकात अपेक्षिले जाते त्याप्रमाणे काही लिखाणाचे अंतर नकळत येणार. परंतु अशा प्रकारच्या मोकळीकीने पवित्र शास्त्राचा अधिकार व त्याचा प्रेरितपणा यावर शंकेचे काहूर राहात नाही. काळजीपूर्वक परिक्षणाने, वरकरणी दिसणारी परस्पर विरोधी मते प्रामाणिक पर्याय दाखवू शकतात. बहुदा सर्वजण, जे लोक पवित्र शास्त्र स्वतःच परस्पर विरोधी मते दर्शवून आहे असे म्हणतात त्यांनी सखोल परिक्षण केलेले नसते. तर यांनी, ज्यांना पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवण्याची इच्छा नाही व त्याला आपल्या जीवनावर प्रभुत्व गाजवू देण्याची इच्छा नाही अशांच्या मताचा स्विकार केलेला असतो. “ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते,” असा इशारा नीतीसूत्रे १८:१३ मध्ये पवित्र शास्त्र देते.
काही जण काही वेळेस असा आक्षेप घेतात की पवित्र शास्त्र लेखक नेहमीच संख्यांच्या, घटनांचा अनुक्रम, अवतरणाचा शब्दप्रयोग व इत्यादि बाबतीत सहमत दाखवीत नाहीत. परंतु विचार कराः तुम्ही, एखादी घटना समक्ष पाहणाऱ्या साक्षीदारांना, त्यांनी काय पाहिले होते ते लिहिण्यास सांगितले तर सर्वांचा अहवाल शब्दात व बारीक सारीक गोष्टींत संपूर्णपणे सुसंगत असणार का? तसे झालेच तर लेखकात संगनमत होते याचा संशय तुम्हाला येणार नाही का? तद्वत, पवित्र शास्त्र लेखकांना त्यांची स्वतःची भाषा व शैली निवडण्याचा देवाने वाव दिला पण त्याचवेळी त्याची कल्पना व समर्पक वस्तुस्थिती अचूकपणे व्यक्त केली जात आहे हे तो न्याहाळत होता.
आधीच्या लिखाणाच्या अवतरणात नवीन लेखकांची गरज व उद्देश भरुन काढण्यास मूळ विधानात, त्याचा मुलभूत अर्थ व विचार तसाच राखून साधारण फेरबदल करता येतो. घटनांचा अहवाल एकत्रित करण्याबद्दल तेच म्हटले जाऊ शकते. एक लेखक कटाक्षाने ऐतिहासिक क्रम अनुसरेल तर दुसरा प्रसंग त्याच्या कल्पनेस अनुरुपपणे उपयोगात आणील. एखादा भाग वगळणे हे पण लेखकाचा दृष्टीकोण व अहवालाच्या मध्यवर्ती कल्पनेप्रमाणे असणार. यानुसारच, मत्तय येशूने बऱ्या केलेल्या दोन अंध माणसाविषयी बोलतो त्याचवेळी मार्क व लूक हे केवळ एकाचा उल्लेख करतात. (मत्तय २०:२९-३४; मार्क १०:४६; लूक १८:३५) मत्तयाचा अहवाल विसंगत नाही. तो केवळ संख्येच्या बाबत चाणाक्ष होता, तथापि, मार्क व लूकने येशूचे संभाषण ज्या एकास लागू होते त्यावर जोर दिला.
कालगणना करण्याच्या पद्धतीत देखील तेथे वेगळेपणा होता. यहुदी राष्ट्र दोन पंचांगाचा उपयोग करीत होते—एक पवित्र पंचाग व ऐहिक किंवा शेतीचे पंचाग—प्रत्येकाची सुरुवात वर्षाच्या वेगवेगळ्या समयातून होई. एकाच घटनेविषयीचा दिवस व महिना संदर्भित करण्यात विसंगत असणारे लेखक कदाचित वेगवेगळ्या पंचांगास उपयोगात आणीत असावेत. पूर्वेकडील लेखक क्वचितच अपूर्णांक वापरीत, ते वर्षाचा भाग पूर्ण वर्ष म्हणून उपयोगात आणीत. ते जवळचा पूर्णांक वापरीत. उदाहरणार्थ, उत्पत्तीच्या ५ व्या अध्यायात मिळणाऱ्या वंशावळीच्या अहवालाची दखल घ्या.
“विसंगतीं”चा मेळ घालणे
पण, पवित्र शास्त्रात अशी वचने नाहीत का जी इतर वचनांच्या अगदी उलटच सांगतात? पवित्र शास्त्रावर टीका करणाऱ्यांनी अवतरीत केलेल्या काहींचा आपण येथे विचार करू.
योहान ३:२२ मध्ये आम्ही असे वाचतो की येशू “बाप्तिस्मा करीत होता.” त्यानंतर थोड्या पुढे, म्हणजे, योहान ४:२ मध्ये “येशू स्वतः बाप्तिस्मा करीत नव्हता” असे अहवाल सांगतो. परंतु इतर शास्त्रवचने निर्देश करतात त्याप्रमाणे येशूचे शिष्य त्याच्या नामात व त्याच्या मार्गदर्शनाखाली अक्षरशः बाप्तिस्मा करीत होते. हे व्यावसायिक लोक व त्यांचे सचीव विशिष्ट पत्र लिहिल्याचा दावा जसे दोघेही करू शकतात त्यासारखे आहे.
आता आणखी एक वचन म्हणजे, उत्पत्ती २:२ मध्ये अहवाल असे कथित करतो की देव “त्याच्या सर्व कृत्यापासून” विसावा पावला. येशूने योहान ५:१७ मध्ये केलेले विधान याच्या विरोधात असल्याचे दिसून येते. तेथे येशूने म्हटले की, “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे.” संदर्भ दाखवितो की, उत्पत्तीमधील अहवाल ठामपणे देवाच्या भौतिक निर्मिती कार्याबद्दल सांगत आहे. तथापि, येशू मानवजातीसंबंधाने देव दाखवीत असलेले इश्वरी मार्गदर्शन व काळजी याविषयीच्या देवाच्या कार्यास आपल्या विधानात संबोधित होता.
अजून एक वाटणारी विसंगति निर्गम ३४:७ चा यहेज्केल १८:२० सोबतचा पडताळा केल्यास आढळते. पहिले वचन म्हणते, देव “वडीलांच्या अधर्माबद्दल पुत्रपौत्रांचा समाचार” घेईल. आणि नंतरचे वचन म्हणते की, “मुलगा बापाच्या पातकांचा भार वाहणार नाही.” ही वचने परस्पर विरोधी का वाटतात? कारण त्याचा मागचापुढचा संदर्भ विचारात घेतला नाही म्हणून. सभोवारचा मजकूर व परिस्थितीचे परिक्षण करुन पहा. मग हे सुस्पष्ट होते की जेव्हा देवाने म्हटले की शासन केवळ वडीलांवर नव्हे तर पुत्र व पौत्रावर येते त्यावेळी तो इस्त्राएल, राष्ट्र या नाते त्याच्याविरूद्ध पाप करतील तर त्याचा परिणाम दास्यत्वात नेण्यात होईल हे तो दाखवीत होता. उलटपक्षी, मुलगा बापाच्या पातकाबद्दल जबाबदार नाही असे म्हणत असता तो वैयक्तीक हिशोब देण्याबद्दल बोलत होता.
येशूच्या जन्माबद्दलचे अहवाल जे मत्तय १:१८-२५ व लूक १:२६-३८ मध्ये आहेत त्यातही तफावत आढळू शकते. परंतु, ते विसंगति दाखवितात का?
तुम्ही एकाच प्रसिद्ध व्यक्तीची दोन आत्मचरित्रे कधी वाचलीत का? होय, तर ती चरित्रे भिन्नत्वात असतात पण ती अटळपणे परस्परविरोधी नसतात हे तुमच्या लक्षात आले का? बहुदा, ते लेखकाच्या मतप्रणालीनुसार किंवा त्याने उपयोगात आणलेल्या मूळ कागदपत्रामुळे असतात. तसेच ते लेखकास त्याच्या सादरतेत काय निवेदित करण्यास महत्वाचे वाटते त्यावर अवलंबून असते. तो कोणता कोन साधत आहे आणि कोणत्या समूहाला अनुलक्षून तो लिखाण करीत आहे त्यावर हे अवलंबून असते. अशाप्रकारे विदेशी वाचकांना ध्यानात ठेवून लिहिलेला अहवाल यहुदी वाचक, ज्यांनी अगोदरच विशिष्ठ वस्तुस्थिती स्विकारली व त्यांना समजली होती त्यात तफावत असणार.
हे पवित्र शास्त्रातील काही थोडे उदाहरणादाखल भाग आहेत जे काळजीपूर्वक पृथ्थकरणाच्या अभावी एक दुसऱ्याच्या विसंगतीमध्ये असल्याचे वाटतात. परंतु लेखकाचे दृष्टीकोन व सभोवारचा संदर्भ लक्षात ठेवून काळजीपूर्वक परिक्षण करू तर ते विसंगति असणारे असे मुळीच नाहीत, पण याला केवळ अधिक संशोधनाची गरज असते. बहुतेक लोक हे जरूरीचे परिश्रम घेण्यात मागे पडतात. या कारणास्तव त्यांना, “पवित्र शास्त्र स्वतःच परस्पर विरोधी मते मांडते” असे अगदी सहजपणे म्हणता येते.
आमच्या आत्मविश्वासास योग्य
देवाच्या पवित्र आत्म्याने पवित्र शास्त्र लेखकांना त्याचा अहवाल लिहिण्यास पुष्कळ मुभा दिली. (प्रे. कृत्ये ३:२१) अशाप्रकारे, त्यांना भारदस्त व त्यांनी जे काही पाहिले त्याचे हुबेहुब चित्र सादर करता आले. त्यांची भिन्नता, त्यांची विश्वसनीयता व नैपुण्य शाबीत करते व लबाडी व संगनमत याचा आरोप ठेवण्यास जागा राहात नाही. (२ पेत्र १:१६-२१) लेखक आपल्या सादरतेच्या पद्धतीत भिन्न असले तरी सर्व जण एकाच दिशेने निर्देश करतात व त्याचा एकच उद्देश होताः यहोवा देव मानवजातीला हर्षित बनविण्यासाठी काय करील व देवाची मर्जी संपादण्यास मानवाने काय केलेच पाहिजे हे लोकांस दाखविणे.—नीतीसूत्रे २:३-६, ९.
पवित्र शास्त्र आमच्या विचारसरणीस आर्जविणारे आहे. ते पूर्णतयः सुसंगत आहे. ते परस्पर विरोधी मते दर्शवीत नाही. सर्व ६६ पुस्तके (किंग जेम्स आवृत्तीनुसार १,१८९ अध्याय किंवा ३१,१७३ वचने) आमच्या सर्वस्वी आत्मविश्वासास योग्य आहेत. होय, तुम्ही पवित्र शास्त्रावर खरेपणाने भाव ठेवू शकता.
[६ पानावरील चौकट]
पवित्र शास्त्र “विसंगति” तुम्हास आढळलीच तर हे असू शकेल काः
◆ तुम्ही विशिष्ठ ऐतिहासिक वस्तुस्थिती किंवा पूर्वीच्या प्रथा याविषयी अजाण आहात?
◆ तुम्ही सभोवारचा संदर्भ विचारात घेण्यात मागे पडलात?
◆ तुम्ही लेखकाचा दृष्टीकोण दुर्लक्षिला आहे?
◆ तुम्ही चुकीच्या धार्मिक कल्पनांचा पवित्र शास्त्र जे म्हणते त्यासोबत मेळ घडविण्याचा प्रयत्न करीत आहात?
◆ तुम्ही बिनचूक नसलेले किंवा कालबाह्य पवित्र शास्त्र भाषांतर उपयोगात आणीत आहात?
[७ पानांवरील चित्रं]
येशूने दोन अंध व्यक्तींना बरे केले असे मत्तयाने म्हटले. मार्क व लूकने एकाचा उल्लेख केला. हे विसंगत आहे का?