येशूचे जीवन व उपाध्यपण
योहानाचा ऱ्हास, येशूची वृद्धि
इ. स. ३० च्या वसंत ॠतुत वल्हांडण सण साजरा केल्यावर येशू व त्याचे शिष्य यरूशलेम सोडतात. पण ते गालीलमधील त्यांच्या घरी परत न जाता यहुदीया येथे जातात व तेथे बाप्तिस्म्याचे कार्य करतात. हेच काम बाप्तिस्मा करणारा योहान वर्षभर करीत होता, आणि तो आताही शिष्य मिळवीत आहे.
खरे पाहता, येशू स्वतः कोणाचाही बाप्तिस्मा करीत नाही, तर त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याचे शिष्य तो करतात. योहानाकरवी केल्या जाणाऱ्या बाप्तिस्म्याची जी सूचकता होती की, यहुद्यांनी देवाच्या नियमशास्त्राविरूद्ध केलेल्या पापाचा पश्चाताप व्यक्त करणे हेच येशूच्या शिष्यांच्या बाप्तिस्म्याने देखील सिद्धिस नेले. तथापि, पुनरूत्थानानंतर येशू शिष्यांना अशा बाप्तिस्म्यासंबंधी सूचना देतो जो वेगळ्याच अर्थाचा आहे. ख्रिश्चनांचा बाप्तिस्मा हा एखाद्या व्यक्तिने आपले जीवन यहोवाच्या सेवेसाठी सादर करण्यास समर्पित केले असल्याचे चिन्ह दर्शविणारा आहे.
येशूच्या सेवेतील या सुरुवातीच्या घटनेपर्यंत पश्चातापी लोकांस शिक्षण देऊन बाप्तिस्मा देण्याचे काम योहान व येशू वेगवेगळ्या ठिकाणी पार पाडतात. पण योहानाच्या शिष्यांना हेवा वाटू लागतो व ते येशूसंबंधी तक्रारीच्या सुरात म्हणतात: “गुरूजी, पहा, तो बाप्तिस्मा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडेच जातात.’
पण ईर्ष्यायुक्त होण्याऐवजी, येशूच्या यशस्वी होण्याने योहानाला आनंदच होतो आणि त्याच्या शिष्यांनी देखील आनंदीत व्हावे असे त्याला वाटते. तो त्यांना स्मरण देतो: ‘मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्या पुढे पाठविलेला आहे असे मी म्हणालो होतो ह्याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहा.” त्यानंतर तो एका सुंदर उदहारणाचा वापर करून म्हणतो: ‘वधु ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.”
सहा महिन्याआधीच त्याच्या शिष्यांना येशूचा परिचय करून दिल्याने योहान, वराचा मित्र या नात्याने आनंदीत झाला होता. ह्यातीलच काही जण पवित्र आत्म्याने निवडून ख्रिस्ताच्या स्वर्गीय वधु वर्गातील सदस्य बनले. योहानाचा उद्देश ख्रिस्ताची सेवा यशस्वी होण्याकरिता मार्ग तयार करण्याचा असल्यामुळे त्याच्या आताच्या शिष्यांनी सुद्धा येशूचे अनुकरण करावे असे त्याला वाटते. या संबंधीच्या स्पष्टतेत योहान सांगतो: ‘त्याची वृद्धि व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे.”
ह्यानंतर लवकरच, योहानाला हेरोद राजामार्फत कैद करण्यात येते. हेरोद आपला भाऊ फिलिप्प ह्याची बायको हेरोदिया हिला आपणाकडे ठेवून घेतो आणि योहान ही त्याची वर्तणूक चुकीची असल्याचे जाहीरपणे सांगतो तेव्हा हेराद त्याला कैदेत टाकतो. योहान बंदिवान झाला आहे असे येशूला कळते तेव्हा तो व त्याचे शिष्य यहुदीया सोडून गालील येथे जातात. योहान ३:२२–४:३; प्रे. कत्ये १९:४; मत्तय २८:१९; २ करिंथकर ११:२; मार्क १:१४; ६:१७–२०.
◆ येशूच्या पुनरूत्थानाआधी व त्याचे पुनरूत्थान झालल्यावर त्याच्या मार्गदर्शनाखाली जे बाप्तिस्मे केले गेले त्यामागील अर्थसुचकता कोणती होती?
◆ आपल्या शिष्यांकरवीची तक्रार असमर्थनकारी आहे हे योहान कसे दाखवितो?
◆ योहानाला कैदेत का टाकण्यात येते?