-
खंडणीमुळे आपले जीवन वाचते —ते कसे?टेहळणी बुरूज—२०१० | ऑगस्ट १५
-
-
देवाच्या क्रोधापासून वाचणे
४, ५. देवाचा क्रोध सध्याच्या दुष्ट जगावर आहे हे कशावरून सिद्ध होते?
४ बायबलमधून व मानवजातीच्या इतिहासात घडलेल्या भयंकर घटनांवरून दिसून येते की आदामाने पाप केले तेव्हापासून देवाचा क्रोध मानवजातीवर ‘राहिला आहे.’ (योहा. ३:३६) आजवर कोणताही मनुष्य मृत्यूपासून सुटलेला नाही यावरून हे सिद्ध होते. मानवांवर एकापाठोपाठ एक येणाऱ्या संकटांपासून त्यांचे संरक्षण करण्यास सैतानाचे प्रतिस्पर्धी शासन पूर्णपणे असमर्थ ठरले आहे. आणि कोणतेही मानवी सरकार आपल्या सर्व नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास समर्थ नाही. (१ योहा. ५:१९) म्हणूनच, आजपर्यंत मानवजात युद्ध, गुन्हेगारी आणि गरिबी यांनी पिडलेली आहे.
-
-
खंडणीमुळे आपले जीवन वाचते —ते कसे?टेहळणी बुरूज—२०१० | ऑगस्ट १५
-
-
७ प्रेषित पौलाने म्हटले की येशू “आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.” (१ थेस्सलनी. १:१०) यहोवा शेवटच्या वेळी आपला क्रोध व्यक्त करेल तेव्हा पश्चात्ताप न करणाऱ्या पापी लोकांचा सदासर्वकाळासाठी नाश होईल. (२ थेस्सलनी. १:६-९) या क्रोधापासून कोण वाचेल? बायबल म्हणते: “जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.” (योहा. ३:३६) होय, सध्याच्या दुष्ट जगाचा अंत जवळ येईल, तेव्हा जिवंत असलेल्यांपैकी जे येशूवर व खंडणी बलिदानावर विश्वास ठेवतात अशा सर्वांचा देवाच्या क्रोधापासून बचाव होईल.
-