वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lff धडा ४५
  • निष्पक्ष राहणं म्हणजे काय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निष्पक्ष राहणं म्हणजे काय?
  • कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आणखी जाणून घेऊ या
  • थोडक्यात
  • हेसुद्धा पाहा
  • विभाजित जगात आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • ‘ते जगाचे नाहीत’
    उपासनेतील ऐक्य
  • शेवटल्या काळातील तटस्थ ख्रिस्ती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • तटस्थ राहणं इतकं महत्त्वाचं का आहे? (मीख ४:२)
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
अधिक माहिती पाहा
कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
lff धडा ४५
धडा ४५. शाळेत एक लहान बहीण राष्ट्रगीत गाताना आदरपूर्वक उभी आहे, पण इतर विद्यार्थ्यांप्रमाणे ती छातीवर हात ठेवून ते गात नाही.

धडा ४५

निष्पक्ष राहणं म्हणजे काय?

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

येशूने आपल्या अनुयायांना शिकवलं की त्यांनी जगाचा भाग नसलं पाहिजे. (योहान १५:१९) याचा अर्थ त्यांनी निष्पक्ष राहिलं पाहिजे, म्हणजेच जगाच्या राजकारणात आणि युद्धांत कोणाचीही बाजू नाही घेतली पाहिजे. पण दररोजच्या जीवनात निष्पक्ष राहणं नेहमीच सोपं नसतं. कारण यामुळे लोक कधीकधी आपली टीका करतात किंवा आपल्यावर हसतात. पण असं असलं, तरी आपण निष्पक्ष राहण्याद्वारे यहोवा देवाला एकनिष्ठ कसं राहू शकतो?

१. खरे ख्रिस्ती मानवी सरकारांकडे कोणत्या दृष्टीने पाहतात?

खरे ख्रिस्ती सरकारचा आदर करतात. येशूने म्हटल्याप्रमाणे आपण “जे कैसराचं आहे ते कैसराला” देतो. याचा अर्थ आपण देशाचे कायदे पाळतो, जसं की आपण वेळच्या वेळी टॅक्स भरतो. (मार्क १२:१७) खरंतर बायबल सांगतं, की मानवी सरकारं आज यहोवाच्या परवानगीनेच राज्य करत आहेत. (रोमकर १३:१) त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात ठेवतो, की या सरकारांच्या अधिकाराला मर्यादा आहेत, म्हणजेच देवापेक्षा त्यांना कमी अधिकार आहे. शिवाय, मानवांच्या सगळ्या समस्या देवच त्याच्या स्वर्गीय राज्याद्वारे सोडवेल असा भरवसा आपल्याला आहे.

२. आपण निष्पक्ष आहोत हे आपण कसं दाखवू शकतो?

येशूप्रमाणेच आपणही राजकारणात भाग घेत नाही. येशू पृथ्वीवर असताना जेव्हा लोकांनी त्याचा एक चमत्कार पाहिल्यामुळे त्याला राजा बनवायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने त्यांना असं करू दिलं नाही. (योहान ६:१५) का बरं? कारण तो म्हणाला होता, “माझं राज्य या जगाचं नाही.” (योहान १८:३६) आपण येशूचे शिष्य असल्यामुळे आपणही त्याच्यासारखेच निष्पक्ष राहतो. हे आपण बऱ्‍याच मार्गांनी दाखवतो. जसं की आपण युद्धात भाग घेत नाही. (मीखा ४:३ वाचा.) तसंच, राष्ट्रीय प्रतीकांचा जसं की झेंड्याचा आपण आदर करत असलो, तरी आपण त्याची भक्‍ती करत नाही. (१ योहान ५:२१) यासोबतच, आपण कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा देत नाही आणि त्यांचा विरोधही करत नाही. तर या आणि अशा बऱ्‍याच मार्गांनी आपण दाखवतो की आपण देवाच्या सरकाराला म्हणजे त्याच्या राज्याला पूर्णपणे एकनिष्ठ आहोत.

आणखी जाणून घेऊ या

कोणकोणत्या परिस्थितींमध्ये निष्पक्ष राहणं कठीण जाऊ शकतं, आणि अशा परिस्थितींत यहोवाला आवडतील असे निर्णय आपण कसे घेऊ शकतो, याकडे आता लक्ष देऊ या.

एक माणूस निष्पक्ष राहतो. विरोधी पक्षाचे उमेदवार लोकांच्या जमावांशी बोलत असताना तो लक्ष देत नाही.

३. खरे ख्रिस्ती निष्पक्ष राहतात

याबाबतीत आपल्यासमोर येशूचं आणि त्याच्या शिष्यांचं खूप चांगलं उदाहरण आहे. रोमकर १३:१, ५-७ आणि १ पेत्र २:१३, १४ वाचा. मग व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

व्हिडिओ: खरे ख्रिस्ती निष्पक्ष राहतात—भाग १  (४:२८)

  • आपण सरकारी अधिकाऱ्‍यांचा आदर का केला पाहिजे?

  • आपण त्यांच्या अधीन आहोत हे आपण कोणत्या काही मार्गांनी दाखवू शकतो?

युद्ध चालू असताना, काही देश म्हणतात की आम्ही निष्पक्ष आहोत. पण युद्धात सामील असलेल्या दोन्ही देशांना ते मदत करतात. मग निष्पक्ष असण्याचा खरा अर्थ काय आहे? योहान १७:१६ वाचा. मग, व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

व्हिडिओ: खरे ख्रिस्ती निष्पक्ष राहतात—भाग २  (३:११)

  • निष्पक्ष राहण्याचा काय अर्थ होतो?

जर सरकारी अधिकाऱ्‍यांनी आपल्याला देवाच्या नियमांच्या विरोधात असलेलं काही करायला सांगितलं, तर काय? प्रेषितांची कार्यं ५:२८, २९ वाचा. मग, व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

व्हिडिओ: खरे ख्रिस्ती निष्पक्ष राहतात—भाग ३  (१:१८)

  • जर मानवांचा एखादा नियम देवाच्या नियमाच्या विरोधात असेल, तर आपण कोणाचा नियम पाळला पाहिजे?

  • तुम्ही अशा एखाद्या परिस्थितीचा विचार करू शकता का, ज्यात खरे ख्रिस्ती सरकारी अधिकाऱ्‍यांचा नियम पाळणार नाहीत?

४. कार्यांमध्येच नाही तर विचारांतही निष्पक्ष राहा

१ योहान ५:२१ वाचा. मग, व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

व्हिडिओ: खऱ्‍या ख्रिश्‍चनांना काय करण्यासाठी धैर्याची गरज आहे?—तटस्थ भूमिका घेण्यासाठी  (२:४९)

  • व्हिडिओमधल्या भावाने राजकीय पक्षाचा सदस्य बनायला किंवा झेंडावंदनासारख्या राष्ट्रीय समारंभात भाग घ्यायला का नकार दिला?

  • त्या भावाने जे केलं ते योग्य होतं असं तुम्हाला वाटतं का?

आणखी कोणत्या परिस्थितींमध्ये आपल्याला निष्पक्ष राहणं कठीण जाऊ शकतं? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

व्हिडिओ: टेहळणी बुरूज अंकातले धडे—विभाजित जगात आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवा  (५:१६)

  • दोन देशांमध्ये जेव्हा खेळांचे सामने होतात, तेव्हा आपण निष्पक्ष कसं राहू शकतो?

  • राजकीय नेत्यांच्या निर्णयांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो, तेव्हाही आपण निष्पक्ष कसं राहू शकतो?

  • राजकारणाबद्दलच्या बातम्यांमुळे किंवा या विषयावर बोलायची आवड असलेल्यांसोबत मैत्री केल्यामुळे आपल्याला निष्पक्ष राहणं का कठीण जाऊ शकतं?

चित्रं: १. एक संतप्त जमाव हातात बॅनर घेऊन नारे लावत आहेत. २. एक माणूस खेळाच्या सामन्यात झेंडा हातात घेऊन एका टीमला प्रोत्साहन देत आहे. ३. एक विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणत आहे. ४. एका सैनिकाने हातात मशीनगन घेतली आहे. ५. दोन राजकीय पक्षाचे उमेदवार वादविवाद करत आहेत. ६. एक स्त्री मतपेटीत आपलं मत टाकत आहे.

खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी कोणकोणत्या बाबतीत आपल्या विचारांत आणि वागण्या-बोलण्यात निष्पक्ष राहिलं पाहिजे?

कदाचित कोणी विचारेल: “तुम्ही झेंडावंदन का करत नाही, किंवा राष्ट्रगीत का गात नाही?”

  • तुम्ही त्यांना काय उत्तर द्‌याल?

थोडक्यात

खरे ख्रिस्ती आपल्या विचारांत आणि वागण्या-बोलण्यात निष्पक्ष राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात.

उजळणी

  • मानवी सरकारांबद्दल आपला काय दृष्टिकोन असला पाहिजे?

  • राजकारणाच्या बाबतीत आपण निष्पक्ष का राहतो?

  • कोणकोणत्या परिस्थितींमध्ये आपल्याला निष्पक्ष राहणं कठीण जाऊ शकतं?

ध्येय

हेसुद्धा पाहा

निष्पक्ष राहण्यासाठी आपल्याला कोणते त्याग करावे लागू शकतात?

यहोवाने कधीच आम्हाला एकटं सोडलं नाही  (३:१४)

निष्पक्ष राहणं कठीण जाईल अशा परिस्थितींसाठी कुटुंबं आधीच तयारी कशी करू शकतात?

सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तटस्थ राहा  (४:२५)

एका व्यक्‍तीसाठी सगळ्यात मोठा सन्मान कोणता आहे?

“परमेश्‍वर के लिए सबकुछ मुमकिन है”  (५:१९)

नोकरीसंबंधी निर्णय घेताना आपण जगाचे भाग नाही हे आपण कसं दाखवू शकतो?

“प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे” (टेहळणी बुरूज,  १ एप्रिल, २००६)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा