ईश्वरी शिक्षणाच्या लाभांचा आनंद मिळवा
“तुला जे हितकारक ते मी परमेश्वर [यहोवा, न्यूव.] तुझा देव, तुला शिकवतो.” —यशया ४८:१७.
१. आम्ही ईश्वरी शिक्षणाचा अवलंब आमच्या जीवनात केल्यास, त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
यहोवा देव सर्व गोष्टी उत्तम प्रकारे जाणतो. विचार, शब्द किंवा कार्यामध्ये कोणीही त्याच्या पुढे जात नाही. निर्माणकर्ता असल्यामुळे, त्याला आमच्या गरजा ठाऊक आहेत व तो विपुल प्रमाणात त्या पुरवतो. आम्हाला कसे शिकवावे हे निश्चितच त्याला माहीत आहे. आम्ही ईश्वरी शिक्षणाचा अवलंब करतो तेव्हा, त्याचा आम्हा स्वतःला लाभ होतो व आम्ही खरा आनंद घेतो.
२, ३. (अ) देवाच्या प्राचीन काळच्या लोकांनी त्याचे आज्ञापालन केले असते तर त्यांना स्वतःला कसा लाभ झाला असता? (ब) ईश्वरी शिक्षणाचा अवलंब आज आम्ही आमच्या जीवनात केल्यास काय होईल?
२ ईश्वरी शिक्षण, देवाच्या सेवकांनी विपत्ती टाळून त्याचे नियम आणि तत्त्वांनुरूप वागण्याद्वारे जीवनाचा आनंद घ्यावा या त्याच्या उत्कट इच्छेला प्रकट करते. प्राचीन काळातील यहोवाच्या लोकांनी त्याचे ऐकले असते तर, त्यांनी समृद्ध आशीर्वादांचा आनंद घेतला असता, कारण त्याने त्यांना सांगितले होते: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर [यहोवा, न्यूव.] तुझा देव तुला शिकवतो, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते! मग तुझी शांती नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती.”—यशया ४८:१७, १८.
३ देवाच्या प्राचीन लोकांनी त्याच्या आज्ञांकडे व सुचनांकडे लक्ष दिले असते तर त्यांना स्वतःला लाभ झाला असता. बाबेलोन्यांकडून विपत्ती सहन करण्याऐवजी, त्यांनी नदीप्रमाणे पूर्ण, सखोल व अक्षय शांती आणि समृद्धतेचा आनंद घेतला असता. शिवाय, त्यांची नीतीमान कृत्ये समुद्राच्या लाटांप्रमाणे अगणित झाली असती. अशाचप्रकारे, आम्ही ईश्वरी शिक्षणाचा अवलंब केल्यास, त्याच्या अनेक लाभांचा आनंद घेऊ शकतो. त्यातील काही कोणते आहेत?
ते जीवनांमध्ये बदल करते
४. ईश्वरी शिक्षणाचा परिणाम अनेक लोकांच्या जीवनावर कसा होत आहे?
४ लोकांचे जीवन चांगले बनविण्याद्वारे ईश्वरी शिक्षण अनेकांना लाभ मिळवून देत आहे. यहोवाच्या शिक्षणाचा अवलंब करणारे, “देहाची कर्मे,” जसे की, अनैतिक वर्तन, मूर्तीपूजा, भूतविद्या, झगडे आणि ईर्ष्या यांचा त्याग करतात. त्याऐवजी, ते आत्म्याची फळे, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता आणि इंद्रियदमन याचे प्रदर्शन करतात. (गलतीकर ५:१९-२३) प्रेषित पौलाने इफिसकर ४:१७-२४ मध्ये दिलेला सल्ला देखील ते ऐकतात, तेथे त्याने समविश्वासूंना आर्जवले की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने आणि मानसिक अंधकाराने चालत आहेत त्याप्रमाणे चालू नये, ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत. बधिर अंतःकरणांनी चालू नये, ख्रिस्तासारखे लोक, ‘पूर्वीच्या आचरणासंबंधीचा जो जुना मनुष्य त्याचा त्याग करतात व मनाला प्रवृत्त करणाऱ्या शक्तीत ते नवे होतात.’ ते ‘नीतिमत्त्व व निष्ठावंतपणा ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करतात.’
५. लोक ज्यारीतीने चालत आहेत त्यावर ईश्वरी शिक्षणाचा कसा परिणाम होत आहे?
५ ईश्वरी शिक्षणाचा आणखी एक लाभ म्हणजे, ते आम्हाला देवाबरोबर कसे चालावे हे शिकवते. नोहाप्रमाणे, आम्ही यहोवाबरोबर चाललो तर, आमच्या महान शिक्षकाने तयार केलेल्या रुपरेषेप्रमाणे आम्ही जीवनाच्या मार्गाचे अनुसरण करतो. (उत्पत्ती ६:९; यशया ३०:२०, २१) प्रेषित पौलाने म्हटल्याप्रमाणे, परराष्ट्रीय लोक “भ्रष्ट मनाने चालत आहेत.” आणि त्यांच्या मनाने केलेले लिखाण देखील किती भ्रष्टतेचे असू शकते! पोंपई मधील भिंतीवर इतरांनी केलेल्या लिखाणाला पाहून, एका निरिक्षकाने स्वतः लिहिले: “हे भिंती, निरर्थक गोष्टी तुझ्यावर इतक्या कोरल्या आहेत तरी त्यांच्या वजनाने तू पडली नाहीस हे आश्चर्याचे आहे.” परंतु “यहोवाच्या शिक्षणात” व त्यामुळे शक्य होणारा राज्याचा प्रचार यात कोणत्याही निरर्थक गोष्टी नाहीत. (प्रे. कृत्ये १३:१२) त्या कार्याद्वारे, सत्याच्या प्रेमिकांना सुज्ञतापूर्वक कृती करण्यास मदत दिली जाते. देवाच्या उद्देशाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या पापमय स्थितीत चालत राहणे कसे थांबवले पाहिजे हे त्यांना शिकवले जाते. ते येथून पुढे मानसिकरित्या अंधःकारात नाहीत, शिवाय निरर्थक ध्येये प्राप्त करण्यासाठी त्यांची निरर्थक हृदये त्यांना प्रवृत्त करत नाही.
६. यहोवाच्या शिक्षणाला आमची आज्ञाधारकता व आमचा आनंद यामध्ये काय संबंध आहे?
६ यहोवा आणि त्याच्या व्यवहारासोबत संबंध ठेवण्यासाठी देखील ईश्वरी शिक्षणाचा आम्हाला लाभ होतो. असे ज्ञान आम्हाला देवाच्या जवळ नेते, त्याच्याविषयी आमची प्रीती वाढवते व त्याची आज्ञा पाळण्याच्या आमच्या इच्छेला ते वाढवते. पहिले योहान ५:३ म्हणते: “देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” येशूची शिकवण देवापासून असल्याकारणाने आम्ही त्याच्याही आज्ञा पाळतो. (योहान ७:१६-१८) अशी आज्ञाधारकता आमचे आध्यात्मिक धोक्यांपासून संरक्षण करून आमच्या आनंदात वाढ करते.
जीवनातील खरा उद्देश
७, ८. (अ) स्तोत्रसंहिता ९०:१२ आम्ही कसे समजले पाहिजे? (ब) आम्हाला सुज्ञ अंतःकरण कसे प्राप्त होऊ शकते?
७ ईश्वरी शिक्षण आम्ही आमच्या जीवनाचा वापर उद्देशपूर्ण रीतीने कसा करावा हे दाखविण्यासाठी हितकारक आहे. वस्तुतः ईश्वरी शिक्षण, आम्ही आमच्या दिवसांना खास मार्गाने कसे मोजू शकतो ते दाखवते. सत्तर वर्षाच्या आयुष्यमानात सर्व मिळून २५,५५० दिवस जगण्याची आशा असते. पन्नास वर्ष वयाच्या व्यक्तीने त्यापैकी १८,२५० दिवस आधीच व्यतीत केलेले आहेत, व त्याने आशा केलेले उरलेले ७,३०० दिवस त्याला निश्चितच फार कमी वाटतात. खासपणे, मग संदेष्टा मोशेने स्तोत्रसंहिता ९०:१२ मध्ये देवाला प्रार्थना का केली याची तो अधिक गुणग्राहकता बाळगू शकतो: “ह्याकरता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की, आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.” असे बोलण्यामागे मोशेचा काय अर्थ होता?
८ देव, प्रत्येक इस्राएलासाठी त्याच्या आयुष्यमानाचे ठराविक दिवस प्रगट करील असा मोशेच्या बोलण्याचा अर्थ नव्हता. स्तोत्रसंहिता ९० आणि ९ व १० वचनानुसार, इब्री संदेष्ट्याने हे ओळखले की ७० किंवा ८० वर्षाचे आयुष्यमान खरोखर फार कमी असेल. यास्तव, स्तोत्रसंहिता ९० मधील १२ वे वचन, मोशेच्या प्रार्थनापूर्वक इच्छेची स्पष्टता देते की, यहोवा त्याला व त्याच्या लोकांना ‘त्यांच्या वर्षातील दिवसाचे’ मूल्य ओळखण्यास आणि देवाने मान्यता दिलेल्या मार्गाने बुद्धीचा वापर करण्याचे दाखवो किंवा शिकवो. तर मग, आमच्याबद्दल काय? प्रत्येक मूल्यवान दिवसाची आम्ही कदर करतो का? आमचा महान शिक्षक, यहोवा देवाच्या गौरवासाठी प्रत्येक दिवस चांगल्याप्रकारे घालविण्याचा शोध घेण्याद्वारे आम्ही सुज्ञतेचे हृदय प्राप्त करतो का? ईश्वरी शिक्षण अगदी हेच करण्यासाठी आम्हाला मदत करते.
९. आम्ही आमचे दिवस यहोवाचे गौरव करण्यासाठी मोजण्यास शिकलो तर, कशाची अपेक्षा करू शकतो?
९ यहोवाचे गौरव करण्यासाठी आम्ही आमचे दिवस गणण्यास शिकलो तर, आम्ही ते मोजत राहण्यात बरोबर ठरू कारण ईश्वरी शिक्षण सार्वकालिक जीवनासाठी ज्ञान देते. येशूने म्हटले, “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) अर्थातच, उपलब्ध असलेले सर्व जगिक ज्ञान आम्ही प्राप्त केले तरी, त्यामुळे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार नाही. परंतु विश्वातील दोन प्रमुख व्यक्तींचे अचूक ज्ञान घेऊन ते आचरणात आणले आणि खरोखर विश्वास प्रगट केला तर सार्वकालिक जीवन आमचे होऊ शकते.
१०. शिक्षणाविषयी एक एन्सायक्लोपिडीया काय म्हणतो, व ईश्वरी शिक्षणाच्या लाभासोबत याची तुलना कशी होते?
१० आम्ही आधी कितीही काळ जगलो असलो तरी, ईश्वरी शिक्षणाचा हा उल्लेखनीय लाभ आपण आठवणीत ठेवू या: याचा अवलंब करणाऱ्यांच्या जीवनात ते एक खरा उद्देश देते. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडीया म्हणते: “शिक्षणाने लोकांना समाजातील चांगले सदस्य बनण्यासाठी मदत केली पाहिजे. शिवाय त्यांची सांस्कृतिक मिळकत आणि अधिक समाधानकारक जीवन जगण्याची गुणग्राहकता वाढविण्यासाठी देखील त्याने त्यांना मदत केली पाहिजे.” ईश्वरी शिक्षण, समाधानकारक जीवन जगण्यासाठी आमची मदत करण्यात हितकारक आहे. देवाचे लोक या नात्याने ते आमच्या आध्यात्मिक मिळकतीबद्दल आमच्यात अधिक गुणग्राहकता वाढवण्यात आणि आम्हाला ते समाजाचा उपयुक्त सदस्य बनवते, कारण जगभरातील लोकांच्या गरजा भागविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी ते आम्हाला मदत करते. असे का म्हटले जाऊ शकते?
जगव्याप्त शिक्षणाचा कार्यक्रम
११. उचित शिक्षणाच्या गरजेला थॉमस जॅफरसन यांनी कसे ठळकपणे मांडले?
११ ईश्वरी शिक्षण लोकांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करते, त्याच्यासारखा इतर कोणताही शिक्षणाचा कार्यक्रम नाही. लोकांच्या शिकवण्याच्या गरजेविषयी, अमेरिकेचे तिसरे अध्यक्ष थॉमस जॅफरसन यांनी निर्देशले होते. ऑगस्ट १३, १७८६ मध्ये त्यांचा मित्र आणि स्वातंत्र्याच्या घोषणेवर सह-सही करणाऱ्या जॉर्ज विथला जॅफरसन यांनी लिहिले: “लोकांमध्ये ज्ञानाचा प्रसार करणे हा आमच्या सर्व नियमावलीतील महत्त्वाचा नियम आहे असे मला वाटते. स्वातंत्र्य आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी दुसरा कोणताही पाया घालण्याची कल्पना आम्ही करू शकत नाही. . . . माझ्या मित्रा अजाण राहण्याविरुद्ध आवेशी मोहिमेची; आणि सामान्य लोकांना शिक्षण देण्यासाठी नियमाची स्थापना व सुधारणा याची घोषणा कर. आमच्या देशवासीयांना हे कळू दे की . . . जर आम्ही लोकांकडे दुर्लक्ष केले तर [शिक्षणासाठी] जो कर दिला जाईल तो आमच्यामध्ये उठणारे राजे, याजक आणि नामवंत लोकांना दिल्या जाणाऱ्या भागाच्या एक हजारअंशापेक्षा जास्त नसेल.”
१२. विश्वव्याप्त शिक्षणासाठी ईश्वरी शिक्षण अधिक यशस्वी आणि हितकारक कार्यक्रम आहे असे का म्हटले जाऊ शकते?
१२ धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांना अजाणतेत सोडून देण्याऐवजी, यहोवाचे शिक्षण त्यांच्या लाभासाठी विश्वव्यापी शिक्षणाचा कार्यक्रम पुरवते. पन्नास वर्षांपूर्वी दुसरे महायुद्ध जोराने चालले असता, अमेरिकेच्या एज्युकेशन रिकंस्ट्रक्शनच्या समितीने “विश्वव्यापी शिक्षणाची” तातडीची गरज ओळखली. ती गरज आजही अस्तित्वात आहे, परंतु विश्वव्यापी शिक्षणासाठी ईश्वरी शिक्षण केवळ एकच यशस्वी कार्यक्रम आहे. तो अधिक हितकारक देखील आहे कारण निराशेतून तो लोकांना उठवतो, आणि त्यांची नैतिक आणि आध्यात्मिक प्रगती करतो, जगाचा अभिमान, पूर्वग्रहापासून लोकांचे तो रक्षण करतो आणि सार्वकालिक जीवनाचे ज्ञान देतो. याहीपेक्षा अधिक म्हणजे, सर्व ठिकाणच्या लोकांना यहोवा देवाची सेवा करण्याचे शिकवण्याद्वारे या कार्यक्रमाचा त्यांना लाभ मिळतो.
१३. यशया २:२-४ची पूर्णता आज कशी होत आहे?
१३ आता देवाचे सेवक होण्याद्वारे, जनसमुदाय ईश्वरी शिक्षणाच्या लाभांचा आनंद घेत आहे. ते त्यांच्या आध्यात्मिक गरजा जाणतात आणि यहोवाचा दिवस समीप असल्याचे त्यांना माहीत आहे. (मत्तय ५:३; १ थेस्सलनीकाकर ५:१-६) आता देखील या “शेवटल्या दिवसात,” हे लोक सर्व राष्ट्रांमधून यहोवाच्या पर्वतावर शुद्ध उपासनेसाठी जात आहेत. व ती उपासना देवाच्या इच्छेच्या विरुद्ध असणाऱ्या सर्व उपासनेपेक्षा उच्च ठिकाणी दृढपणे स्थापण्यात आली आहे. (यशया २:२-४) तुम्ही यहोवाचे एक समर्पित साक्षीदार असल्यास, त्याची उपासना करून आणि ईश्वरी शिक्षणापासून लाभ मिळवण्यासाठी सतत वाढत असणाऱ्या समुदायातील तुम्ही एक आहात याचा तुम्हाला आनंद वाटत नाही का? “परमेशाचे स्तवन करा,” असे म्हणणाऱ्यामधील एक असणे किती आश्चर्यकारक आहे बरे.—स्तोत्र. १५०:६.
आमच्या आत्म्यावर हितकारक परिणाम
१४. पहिले करिंथकर १४:२० मधील पौलाच्या सल्ल्याचा अवलंब करणे का लाभाचे आहे?
१४ ईश्वरी शिक्षणाच्या लाभातील एक म्हणजे, ते आमच्या विचारसरणीवर व आत्म्यावर परिणाम करू शकते हा आहे. ते आम्हाला न्याय्य, शुद्ध, सद्गुण आणि प्रशंसनीय गोष्टींवर विचार करावयाला प्रवृत्त करते. (फिलिप्पैकर ४:८) यहोवाचे शिक्षण आम्हाला पौलाच्या सल्ल्याचे पालन करण्यास मदत करते: “दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.” (१ करिंथकर १४:२०) आम्ही या सल्ल्याचा अवलंब केल्यास, आम्ही दुष्टपणात ज्ञानाचा शोध करणार नाही. पौलाने हे देखील लिहिले: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत.” (इफिसकर ४:३१) हा सल्ला ऐकल्याने अनैतिकता तसेच इतर गंभीर पाप करण्याचे टाळण्यास आम्हाला मदत होईल. हे शारीरिक आणि मानसिकरीत्या हितकर असताना, देवाला आपण खूष करतो त्याच्या जाणीवेने ते आम्हाला विशेषपणे आनंद आणील.
१५. विचारात सद्गुणी राहण्यासाठी आम्हाला काय मदत करू शकते?
१५ आम्हाला सद्गुणी विचार राखावयाचे असल्यास, एक मदत म्हणजे, ‘नीतीला बिघडवणाऱ्या कुसंगतीला’ टाळणे, ही आहे. (१ करिंथकर १५:३३) ख्रिस्ती या नात्याने, आम्ही जारकर्मी, व्यभिचारी व वाईट कर्मे करणाऱ्यासोबत सहवास ठेवणार नाही. मग विषयासक्त गोष्टी वाचण्याद्वारे किंवा दूरदर्शनवर तसेच चल चित्रपटात त्यांना पाहण्याद्वारे आम्ही अशा लोकांसोबत संगती करू नये हे यथायोग्य आहे. हृदय कपटी असल्यामुळे, वाईट गोष्टी लगेचच त्यात जाऊ शकतात, व त्या पूर्ण करण्यासाठी सहजपणे मोहात पाडले जाऊ शकते. (यिर्मया १७:९) यास्तव, ईश्वरी शिक्षणाला लक्षपूर्वक ऐकण्याद्वारे अशा मोहांना आपण टाळू या. त्याचा “यहोवाच्या प्रेमिकां”च्या विचारसरणीवर “वाईटाचा द्वेष करा” या हितकारक प्रमाणात परिणाम होऊ शकतो—स्तोत्रसंहिता ९७:१०.
१६. देवाचे शिक्षण आम्ही दाखवत असलेल्या आत्म्यावर कसा परिणाम करू शकते?
१६ पौलाने त्याचा सहकारी, तीमथ्य याला सांगितले: “प्रभु तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुम्हाबरोबर [त्याची] कृपा असो.” (२ तीमथ्य ४:२२) देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तीमथ्य आणि इतर ख्रिश्चनांना प्रेरित करणाऱ्या शक्तीने प्रवृत्त होऊ द्यावे अशी प्रेषिताने इच्छा केली. देवाचे शिक्षण आम्हाला प्रेमळ, दयाळू, सौम्य आत्मा दाखविण्यास मदत करते. (कलस्सैकर ३:९-१४) आणि या शेवटल्या काळात ते (शिक्षण) त्या अनेकांपासून किती वेगळे दिसते! हे लोक गर्विष्ठ, कृतघ्न, ममताहीन, शांतताद्वेषी, हूड, विलासाची आवड धरणारे, खऱ्या ईश्वरी भक्तीपासून वियोग झालेले आहेत. (२ तीमथ्य ३:१-५) तथापि, ईश्वरी शिक्षणाच्या लाभांचा अवलंब आम्ही आमच्या जीवनात लागू करतो तसे, देवाला आणि आमच्या सहमानवांना आवडणारा आत्मा आम्ही दाखवत असतो.
मानवी नातेसंबंधात हितकारक
१७. नम्र सहकार्य का महत्त्वपूर्ण आहे?
१७ यहोवाचे शिक्षण, आम्हाला सहउपासकांसोबत नम्र सहकार्याच्या लाभांना पाहण्यास मदत करते. (स्तोत्रसंहिता १३८:६) आजच्या इतर लोकांप्रमाणे आम्ही धार्मिक तत्त्वांचे उल्लंघन करत नाही तर सहमत दाखवण्यास तयार असतो. उदाहरणार्थ, वडील वर्गाच्या सभेत हे नियुक्त पर्यवेक्षक सहमत दाखवण्याजोगे असल्यामुळे चांगला परिणाम घडतो. ही मनुष्ये, भावनांना तर्कावर वरचढ होऊ न देता किंवा ऐक्याचा अभाव पडू न देता सत्याच्या आस्थेसाठी शांतपणे बोलू शकतात. आपण सर्वजण ईश्वरी शिक्षणाचा अवलंब करत राहिल्यास, आम्ही आनंद घेत असलेल्या ऐक्याच्या आत्म्यापासून मंडळीच्या सर्व सदस्यांना लाभ मिळेल.—स्तोत्रसंहिता १३३:१-३.
१८. ईश्वरी शिक्षण सहविश्वासूंच्या बाबतीत कोणता दृष्टिकोन असण्यासाठी आम्हाला मदत करते?
१८ ईश्वरी शिक्षण आम्हाला आमच्या सहविश्वासूंबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवण्याच्या मदतीसाठी हितकारक आहे. येशूने म्हटले: “ज्याने मला पाठवले त्या पित्यापासून आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहान ६:४४) विशेषपणे, १९१९ पासून यहोवाने त्याच्या सेवकांना त्याचा न्यायदंड घोषित करू दिला, व या विश्वव्याप्त इशाऱ्यामुळे सैतानाच्या जागतिक व्यवस्थेला हालवून सोडले आहे. त्याचवेळी, देवभिरू मानवांना—“निवडक वस्तु”—राष्ट्रांपासून त्यांना वेगळे करण्यासाठी व यहोवाच्या उपासनेच्या घराला वैभवाने भरण्यासाठी अभिषिक्तांसोबत सहभाग घेण्यास देवाने त्यांना आकर्षिले होते. (हाग्गय २:७) अशा या देवाने आकर्षिलेल्या इष्ट जनांकडे आम्ही प्रिय सहकारी या नात्याने पाहिले पाहिजे.
१९. देवाचे शिक्षण, सहख्रिश्चनांसोबत असलेल्या वैयक्तिक समस्यांना सोडविण्याविषयी काय प्रकट करते?
१९ अर्थातच, आपण सर्वच अपरिपूर्ण असल्यामुळे, नेहमीच जीवन सुरळीत असणार नाही. पौल त्याच्या दुसऱ्या मिशनरी यात्रेस जाण्याच्या मार्गावर असताना, बर्णबाने मार्कला स्वतःबरोबर घेऊन जाण्याचे ठरवले होते. पौलाची यासाठी सहमती नव्हती, कारण मार्क “पंफुल्याहून आपणाला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही.” ह्यावरून त्यांच्यात “तीव्र मतभेद” झाला. बर्णबा मार्कला घेऊन कुप्रास गेला, तर पौलाने सीलाला सोबतीस घेऊन, तो सूरिया आणि किलिकिया ह्यामधून गेला. (प्रे. कृत्ये १५:३६-४१) नंतर ही पोकळी स्पष्टपणे भरून निघाली, कारण मार्क पौलासोबत रोममध्ये होता, त्याच्याविषयी प्रेषिताचे चांगले मत होते. (कलस्सैकर ४:१०) अशाप्रकारे, ईश्वरी शिक्षणाचा एक लाभ म्हणजे, मत्तय ५:२३, २४ व मत्तय १८:१५-१७ मधील येशूच्या सल्ल्याचा अवलंब करण्याद्वारे, ख्रिश्चनांमधील वैयक्तिक समस्या कशा सोडवाव्यात ते आम्हाला दाखवते हा आहे.
नेहमी हितकारक आणि विजयी
२०, २१. ईश्वरी शिक्षणाच्या आमच्या चर्चेने आम्हाला काय करण्यास प्रवृत्त केले पाहिजे?
२० ईश्वरी शिक्षणाचे काही लाभ आणि विजय याबद्दल आपण केलेल्या संक्षिप्त चर्चेवरून देखील, आमच्या जीवनात निरंतर त्याचा अवलंब करत राहण्याची गरज निसंशये, आम्ही सर्वच जण पाहू शकतो. यास्तव, प्रार्थनापूर्वक आत्म्याने आमच्या महान शिक्षकाकडून आपण सतत शिकत राहू या. लवकरच, ईश्वरी शिक्षण पूर्वीपेक्षा अधिक विजय मिळवील. ह्या जगाचे बुद्धिमान लोक आपला शेवटला श्वास घेतील तेव्हा ते विजयी होईल. (पडताळा १ करिंथकर १:१९.) आणखी, लाखो जण देवाची इच्छा शिकतील आणि त्याप्रमाणे आचरण करतील, तेव्हा सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या [यहोवा, न्यूव] ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. (यशया ११:९) आज्ञाधारक मानवजातीला याचा किती उदात्तपणे लाभ होईल व यहोवा हा विश्वाचा सार्वभौम आहे, याचे समर्थन केले जाईल!
२१ यहोवाचे शिक्षण नेहमी हितकारक आणि विजयी असेल. देवाच्या श्रेष्ठ पाठ्यपुस्तकाच्या अतिउत्साही विद्यार्थ्यासारखे होऊन त्याच्यापासून तुम्ही नेहमीच लाभ मिळवणार का? तुम्ही पवित्र शास्त्रानुरूप जीवन व्यतीत करून त्याच्या सत्याची इतरांसोबत सहभागिता करत आहात का? असे करत असल्यास, आमचा महान शिक्षक, सार्वभौम प्रभू यहोवाच्या गौरवास्तव मग ईश्वरी शिक्षणाच्या पूर्ण विजयाकडे तुम्ही पाहू शकता.
तुम्ही काय शिकला?
▫ ईश्वरी शिक्षणाचा कोणता परिणाम आमच्या जीवनावर झाला पाहिजे?
▫ यहोवाचे शिक्षण, शैक्षणिक गरजेला कसे पूर्ण करत आहे?
▫ ईश्वरी शिक्षणाचा आमच्या विचारसरणीवर आणि मनोवृत्तीवर कोणता हितकारक परिणाम होऊ शकतो?
▫ मानवी नातेसंबंधाच्या बाबतीत देवाचे शिक्षण कसे हितकारक शाबीत झाले आहे?
[१४ पानांवरील चित्रं]
ईश्वरी शिक्षण नोहाप्रमाणे, देवाबरोबर कसे वागावे ते आम्हाला दाखवते
[१६ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या पर्वतावर सर्व राष्ट्रामधून लोक येत आहेत