-
वाचकांचे प्रश्नटेहळणी बुरूज—२००३ | सप्टेंबर १५
-
-
वाचकांचे प्रश्न
“आपणामध्ये जीवन” असणे, याचा काय अर्थ होतो?
बायबलमध्ये, येशू ख्रिस्ताला “आपणामध्ये जीवन” असणे आणि त्याचे अनुयायी ‘यांच्यामध्ये जीवन’ असणे याविषयी म्हटले आहे. (योहान ५:२६; ६:५३, पं.र.भा.) परंतु या दोन्ही शास्त्रवचनांचा एकच अर्थ नाही.
-
-
वाचकांचे प्रश्नटेहळणी बुरूज—२००३ | सप्टेंबर १५
-
-
एक वर्षानंतर, येशूने आपल्या श्रोत्यांना उद्देशून असे म्हटले: “मी तुम्हांस खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे मांस खाल्ले नाही व तुम्ही त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हांमध्ये जीवन नाही; जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो, त्याला सर्वकाळचे जीवन आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन.” (योहान ६:५३, ५४, पं.र.भा.) येशू येथे, ‘तुम्हामध्ये जीवन असण्याची’ तुलना “सर्वकाळचे जीवन” प्राप्त करण्याशी करतो. ‘तुम्हामध्ये जीवन असणे’ यासारख्या व्याकरणाचे वाक्यांश ग्रीक शास्त्रवचनांत इतरत्रही आढळतात. त्याची दोन उदाहरणे, ‘आपणामध्ये मीठ असू देणे’ आणि ‘योग्य प्रतिफळ [भरपाई] आपल्याठायी भोगणे’ ही आहेत. (मार्क ९:५०; रोमकर १:२७) या उदाहरणांतील हे वाक्यांश, इतरांना मीठ देण्याच्या शक्तीला किंवा कोणाला तरी भरपाई देण्याच्या शक्तीला सूचित करत नाहीत. तर, त्यातून आंतरिक पूर्णता सूचित होते. यास्तव, योहान ६:५३ येथे वापरण्यात आलेला ‘तुम्हांमध्ये जीवन’ असणे या वाक्यांशाचा अर्थ, जीवनाची पूर्णता प्राप्त करणे असा होतो.
येशूने आपल्या अनुयायांविषयी बोलताना, त्यांच्यामध्ये जीवन आहे असे म्हटले तेव्हा त्याने आपले शरीर व रक्त यांचा उल्लेख केला. नंतर, प्रभूच्या सांज भोजनाची स्थापना करताना येशू पुन्हा आपले शरीर आणि रक्त यांविषयी बोलला आणि म्हणाला, की त्याच्या अनुयायांना, बेखमीर भाकर व द्राक्षारस या बोधचिन्हांचे सेवन करण्यासाठी एका नवीन करारात सामील केले जाईल. याचा अर्थ असा होतो का, की यहोवा देवाबरोबर ज्यांचा नवा करार झाला आहे त्या अभिषिक्त ख्रिश्चनांनाच फक्त जीवनाची पूर्णता प्राप्त करता येते? नाही. दोन्ही घटनांमध्ये एक वर्षाचे अंतर होते. योहान ६:५३, ५४ मध्ये लिहून ठेवण्यात आलेले येशूचे शब्द ज्यांनी ऐकले त्यांना, ख्रिस्ताचे शरीर व रक्त यांना चित्रित करणाऱ्या बोधचिन्हांसह होणाऱ्या वार्षिक सणाविषयी कसलीच माहिती नव्हती.
योहान अध्याय ६ नुसार, येशू पहिल्यांदा आपल्या शरीराची तुलना मान्नाशी करत म्हणतो: “तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गांतून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.” येशूचे रक्तासह असलेले शरीर, खऱ्या मान्नापेक्षा श्रेष्ठ होते. कसे? त्याचे शरीर “जगाच्या जीवनासाठी” देण्यात आले होते व यामुळे सार्वकालिक जीवन प्राप्त करणे शक्य झाले.a यास्तव, योहान ६:५३ मधील ‘तुम्हांमध्ये जीवन’ असणे हा वाक्यांश, स्वर्गात अथवा पृथ्वीवर सार्वकालिक जीवन प्राप्त करणाऱ्यांना लागू होतो.—योहान ६:४८-५१.
ख्रिस्ताच्या अनुयायांना ‘स्वतःमध्ये जीवन’ किंवा जीवनाची पूर्णता केव्हा प्राप्त होते? जेव्हा राज्याचे अभिषिक्त वारीस असलेल्यांना, अमर आत्मिक प्राणी म्हणून स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थित केले जाते तेव्हा. (१ करिंथकर १५:५२, ५३; १ योहान ३:२) येशूची “दुसरी मेंढरे” त्याच्या हजार वर्षांच्या राजवटीच्या शेवटी जीवनाची पूर्णता प्राप्त करतील. तोपर्यंत त्यांची परीक्षा घेतलेली असेल, ते विश्वासू साबीत होतील आणि परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी त्यांना धार्मिक घोषित केले जाईल.—योहान १०:१६; प्रकटीकरण २०:५, ७-१०.
[तळटीप]
a अरण्यात, इस्राएली लोक आणि “एक मोठा मिश्र समुदाय,” अशा दोघांनाही जिवंत राहण्याकरता मान्ना खावा लागला. (निर्गम १२:३७, ३८; १६:१३-१८) तसेच, सदासर्वकाळ जगण्यासाठी, सर्व ख्रिश्चनांनी, मग ते अभिषिक्त असोत अथवा नसोत, येशूने बलिदानाद्वारे दिलेल्या शरीराच्या व रक्ताच्या सुटका करणाऱ्या शक्तीवर विश्वास ठेवून स्वर्गीय मान्ना खाल्ला पाहिजे.—टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, १९८९, पृष्ठे ३०-१ पाहा.
[३१ पानांवरील चित्रे]
सर्व खरे ख्रिश्चन ‘स्वतःमध्ये जीवन’ असू देऊ शकतात
-