वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • सीडर सोहळ्यापासून ते तारणापर्यंत
    टेहळणी बुरूज—१९९१ | फेब्रुवारी १
    • १३, १४. येशूचे रक्‍त कसे जीवन वाचविणारे व तारणासाठी जरुरीचे आहे? (इफिसकर १:१३)

      १३ आजसुद्धा तारणाच्या बाबतीत रक्‍त समाविष्ट आहे व ते येशूचे ओतलेले रक्‍त आहे. “यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता,” तेव्हा येशूने मोठ्या लोकसमुदायाला म्हटलेः “जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्‍त खरे पेय आहे.” (योहान ६:४, ५४, ५५) यावेळी, सर्व यहुदी श्रोत्यांच्या लक्षामध्ये, येणारा वल्हांडण सण व मिसरात वापरण्यात आलेले रक्‍त यांचा विचार आला असावा.

      १४ येशू यावेळी प्रभुच्या सांज भोजनामध्ये वापरल्या जाणाऱ्‍या बोधचिन्हांची चर्चा करीत नव्हता. ख्रिश्‍चनांसाठी हा नवा समारंभ या प्रसंगाच्या एक वर्षाने स्थापण्यात आला. त्यामुळे इ. स. ३२ मध्ये ज्या शिष्यांनी येशूचे ते बोलणे ऐकले होते त्यांना त्यावेळी याविषयी काहीच माहीत नव्हते. तथापि, तेव्हा येशू हे दाखवीत होता की, सार्वकालिक तारणप्राप्तीसाठी त्याचे रक्‍त जरुरीचे होते. पौलाने स्पष्टता केलीः “त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे . . . त्याच्या रक्‍ताच्या द्वारे खंडणी भरुन मिळविलेली मुक्‍ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.” (इफिसकर १:७) येशूच्या रक्‍ताच्या आधारावर मिळालेली क्षमाच आम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकते.

  • सीडर सोहळ्यापासून ते तारणापर्यंत
    टेहळणी बुरूज—१९९१ | फेब्रुवारी १
    • १५. मिसरातील इब्री लोकांसाठी कोणते तारण व हक्क शक्य होते, पण कोणते नव्हते? (१ करिंथकर १०:१-५)

      १५ प्राचीन मिसरात केवळ मर्यादित स्वरुपाचे तारण समाविष्ट होते. ज्यांनी मिसर सोडले त्यापैकी कोणालाही निर्गमनानंतर चिरकाल जीवनाची हमी देण्यात आली नाही. हे खरे की, देवाने लेव्यांची राष्ट्रासाठी याजक या अर्थी व यहुदाच्या वंशातील काहींची ऐहिक राजे म्हणून नेमणूक केली, पण हे सर्व मर्त्य होते. (प्रे. कृत्ये २:२९; इब्रीयांस ७:११, २३, २७) जो “मिश्र समुदाय” मिसरातून निघाला होता त्यालाही हे हक्क नव्हते, त्याला इब्री लोकांसोबत मिळून वचनयुक्‍त देशापर्यंत जाण्याची व देवाची भक्‍ती करीत साधारण रुपाचे जीवन जगण्याची आशा होती. तथापि, यहोवाच्या ख्रिस्ती-युगाआधीच्या सेवकांना ही आशा राखण्यासाठी आधार होता की, जेथे मानवजातीने राहावे असा देवाचा हेतू आहे त्या या पृथ्वीवर अविनाशी जीवन जगण्याचा आनंद कधी ना कधी त्यांना उपभोगता येईल. हे येशूने योहान ६:५४ मध्ये जे अभिवचन दिले आहे त्याच्या सहमतात असेल.

      १६. कोणत्या प्रकारची तारणप्राप्ती लाभावी यासाठी देवाच्या प्राचीन सेवकांनी आशा धरली?

      १६ देवाने आपल्या प्राचीन सेवकांपैकीच्या काहींना, पृथ्वीची निर्मिती वसाहतीसाठी करण्यात आली असून तिजमध्ये धार्मिक सदासर्वदा वास करतील हे प्रेरित लिखाण करण्यासाठी वापरले. (स्तोत्रसंहिता ३७:९-११; नीतीसूत्रे २:२१, २२; यशया ४५:१८) पण जर, खरे उपासक वारले तर त्यांना हे तारण कसे लाभणार? यांना देवाकरवी परत जीवन लाभून ते पृथ्वीवर परत येण्याद्वारे. याचे उदाहरण पाहता, ईयोबाने ही आशा व्यक्‍त केली की, त्याची आठवण ठेवली जाईल व त्याला परत जीवनासाठी बोलावले जाईल. (ईयोब १४:१३-१५; दानीएल १२:१३) अशाप्रकारे तारणाचा एक पैलू हा की, पृथ्वीवर सार्वकालिक जीवन मिळविणे.—मत्तय ११:११.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा