वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 २/१ पृ. ३०-३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • मिळती जुळती माहिती
  • स्मारकविधीच्या काळात आपले परिक्षण करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • सर्वांसाठी उपलब्ध असणारी “जीवनाची भाकर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • ख्रिस्ताचा स्मारकविधी आपण का साजरा करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • प्रभूचे सांज भोजन कसे साजरे करतात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 २/१ पृ. ३०-३१

वाचकांचे प्रश्‍न

◼ प्रभुच्या सांजभोजनाच्या वार्षिक सोहळ्यात भाकर व द्राक्षारसाची सहभागिता केवळ थोडेच यहोवाचे साक्षीदार का घेतात?

याचे कारण हे की, यहोवाचे साक्षीदार, स्वर्गीय जीवनासाठी थोड्यांनाच पाचारण असून देवाच्या बाकीच्या विश्‍वासू सेवकांना पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचे वरदान मिळेल ह्‍या पवित्र शास्त्र शिक्षणाचा स्विकार करून आहेत. ही शिकवण ख्रिस्ती धर्मराज्यातील चर्चेसमध्ये शिकवल्या जाणाऱ्‍या शिकवणीपेक्षा भिन्‍न आहे.

चर्चेसनी बऱ्‍याच काळापासून ह्‍या शिक्षणाचा पुरस्कार केला आहे की, देवास संतुष्ट करणारे सर्व स्वर्गात जातील आणि बाकीचे सारे नरकाग्नीत जातील. पण पवित्र शास्त्र काही वेगळेच शिकविते. शास्त्रवचने हे स्पष्टरित्या दाखवितात की प्रेषितांसारखे केवळ थोडे ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करतील. हा “लहान कळप” असेल असे येशूने म्हटले. याची संख्या १,४४,००० असेल असे पवित्र शास्त्र म्हणते. (लूक १२:३२; प्रकटीकरण १४:३, ४) येशूने स्वर्गीय जीवनाचा मार्ग खुला केला त्या आधी देखील पुष्कळ लोकांनी यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली आणि त्यांनी त्याची मर्जी संपादिली व ते वारले. (मत्तय ११:११; इब्रीयांस १०:१९-२१) शिवाय “लहान कळप” याच्या निवडीनंतर लाखो जन खरे ख्रिस्ती झाले. “लहान कळप” याचे भागी नसणाऱ्‍या या सर्वांना पवित्र शास्त्र, पुनर्स्थापित झालेल्या नंदनवनमय पृथ्वीवर अनंतकाळच्या जीवनाचे भवितव्य समोर धरुन आहे. (स्तोत्रसंहिता ३७:२०, २९; प्रकटीकरण २१:४, ५) पण हे बाकीचे भाकर व द्राक्षारसाची सहभागिता का घेत नाहीत? प्रभुच्या सांजभोजनातील बोधचिन्हांची सहभागिता ज्यांना स्वर्गीय जीवनासाठी पाचारण देण्यात आले आहे आणि जे नवीन करारात आहेत अशांच्याच केवळ हक्काची आहे हे येशूने सूचित केले.

हे खरे की, देवाकडील क्षमा आणि सार्वकालिक जीवन, मग ते स्वर्गातील असो की नंदनवनमय पृथ्वीवरील असो, यासाठी येशूच्या यज्ञार्पणावर विश्‍वास ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे. हे ख्रिस्ताने योहान ६:५१-५४ मध्ये दाखवून दिलेः “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्‍या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ वाचेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती [मानवजातीच्या उद्धरलेल्या] जगाच्या जीवनासाठी आहे. . . . जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो त्याला सार्वकालिक जीवन आहे.”

येशूने हे भाषण आपल्या शिष्यांसमवेत आणखी इतरांना उद्देशून केले हे लक्षणीय आहे. हजारो जणांना अद्‌भुतरित्या भरविल्यानंतर दुसऱ्‍या दिवशी मोठा जमाव कफर्णहुमात येशूकडे आला. या समुदायासोबत संभाषण करताना येशूने योहान ६:५१-५४ मध्ये असणारे शब्द उद्‌गारले. अशाप्रकारे येशूने जेव्हा म्हटले की, तो ‘स्वर्गातून उतरलेली [लाक्षणिक] भाकर’ आहे आणि ही भाकर अरण्यात जो मान्‍ना लोकांनी खाल्ला त्यापेक्षा अधिक टिकाऊ जीवन प्रदान करु शकते, तेव्हा तो प्रामुख्यत्वे आपल्या शिष्यांसोबतच बोलत नव्हता.—योहान ६:२४-३४.

अरण्यातील त्या प्राचीन अनुभवाचा विचार करताना कोण कोण मिसरातून बाहेर पडून या अरण्यात आले होते ते विचारात घ्या. हे सहा लाख ‘इस्त्राएल लोक’ होते व यात मुलेबाळे वेगळीच होती व शिवाय “एक मोठा मिश्र समुदाय” देखील होता. हे सर्वजण पायीच आले. (निर्गम १२:३७, ३८; १६:१३-१८) या ‘मिश्र समुदायात’ असे मिसरी होते ज्यांनी इस्त्राएलांशी विवाह संपादिले होते आणि बाकीच्या इतर मिसऱ्‍यांनी आपणाला इस्त्राएलांसोबत राखले होते. अरण्यात जिवंत राहण्यासाठी इस्त्राएल लोक आणि “मिश्र समुदाय” या दोघांनाही मान्न्याची जरुरी होती. पण, “मिश्र समुदाया”ला इस्त्राएलांसारखेच हक्क होते का? नाही, त्यांना ते नव्हते. त्यांना इस्त्राएलांसोबत भक्‍ती करण्याची मुभा होती व शिवाय वचनयुक्‍त देशात प्रवेश मिळविण्याची आशा होती, तरी ते नियमशास्त्रानुसार राजे आणि याजक कधीच बनू शकत नव्हते. अशाप्रकारे खरोखरीचा मान्‍ना खाण्यामुळे प्रत्येकाला सारखेच हक्क मिळाले नाहीत.

हा फरक तुम्ही, येशूने योहान ६:५१-५४ मधील शब्द उच्चारल्यानंतर एका वर्षाने आपल्या शिष्यांसोबत जे बोलणे केले तेव्हा लक्षात आणला पाहिजे. या नंतरच्या प्रसंगी त्याचा देह व त्याचे रक्‍त याला सूचित करणारी भाकर व द्राक्षारस यांचे सेवन करण्याची नवी प्रथा तो लावून देत होता. प्रभुच्या सांजभोजन समारंभाची प्रस्थापना करतेवेळी येशूने आपल्या निकटवर्तीय शिष्यांना म्हटलेः “हा प्याला माझ्या रक्‍तात नवा करार आहे. ते रक्‍त तुम्हासाठी ओतिले जात आहे.” या प्रेषितांच्या छोट्या गटाला त्याने आणखी पुढे म्हटलेः “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले आहे तसे मीही तुम्हास नेमून देतो. ह्‍यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनावर बसून इस्त्राएलांच्या बारा वंशाचा न्याय करावा.”—लूक २२:२०, २८-३०.

आता या नंतरच्या शब्दाकडे लक्ष द्या व पाहा की, येशूचे शरीर व रक्‍त यांची सूचकता देणाऱ्‍या खरोखरीच्या भाकरीचे सेवन आणि द्राक्षारसाचे प्राशन ‘नव्या करारात’ असलेल्या शिष्यांनी करायचे आहे. हे लोक आणखी एका करारात समाविष्ठ होतील, जो येशूने स्वतः त्यांच्याशी केलेला आहे व तो आहे ‘त्याच्या राज्यात’ ते त्याच्यासोबत मिळून अधिपत्य गाजवतील. येथे येशू, जे “आमच्या देवासाठी . . . राज्य व याजक असे केले” जातील त्यांच्या संदर्भात बोलत होता. (प्रकटीकरण ५:१०) या स्वर्गीय राज्यात सहभागी होणाऱ्‍या १,४४,००० ना निवडण्याची सुरुवात देवाने पहिल्या शतकात केली. करिंथमधील ख्रिस्ती हे या गटातील होते, कारण यांचे वर्णन, ‘ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलाविलेले लोक’ असे करण्यात आले. (१ करिंथकर १:२; पडताळा रोमकर १:७; ८:१५-१७.) अशा “पवित्र जनां”नी बोधचिन्हांकित भाकर आणि “[येशूच्या] रक्‍ताने झालेला नवा करार” याचा अर्थ देणारा द्राक्षारस याची रसिकता दाखवून आदराने प्रभुच्या सांजभोजनात सहभागिता घ्यावयाची होती.—१ करिंथकर ११:२३-२६.

स्वर्गीय जीवनासाठी देवाने निवडलेल्या लोकांतील शेषांचा एक लहान गट आज पृथ्वीवर हयात आहे. “नव्या करारात” असलेल्या यांनाच वार्षिक स्मारकदिनी भाकर व द्राक्षारस या बोधचिन्हांची सहभागिता घेण्याचा हक्क आहे.

देवाच्या राज्य अधिपत्याखाली पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा राखणाऱ्‍या आजच्या सर्व ख्रिश्‍चनांना हे माहीत आहे की येशूच्या यज्ञार्पणावर विश्‍वास प्रदर्शित केल्यामुळे याची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. येशूने समुदायाला म्हटलेच होते की तो “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर” होता. (योहान ६:५१) तथापि, पृथ्वीवर राहण्याची आशा जोपासणाऱ्‍यांनी खरोखरीच्या स्मारक बोधचिन्हात सहभागिता घेतली पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही, कारण हे “नवा करार” आणि येशूबरोबर ‘त्याच्या राज्यात राजासनावर बसण्याच्या’ करारात नाहीत.

या कारणास्तव, पृथ्वीवरील आशा बाळगणारा हा मोठा समुदाय भाकर व द्राक्षारस यात सहभागिता घेत नाही. पण यामुळे येशूचे शरीर व रक्‍त यावर विश्‍वास वा रसिकता नाही असे प्रवर्तित होत नाही. खरे म्हणजे, येशूच्या यज्ञापर्णाविषयी गाढ रसिकता आणि आपणासमोर उभे असलेले इहलोकीचे आनंदमय भवितव्य यामुळेच ते दरवर्षी प्रभुच्या सांजभोजन सोहळ्याला आदरयुक्‍त निरिक्षक या अर्थाने उपस्थित राहण्याचा कटाक्ष राखतात. याद्वारे ते स्वतःपाशी असणारा विश्‍वास प्रदर्शित करतात आणि “लहान कळपा”चे शेष व “दुसरी मेंढरे” याचा प्रचंड समुदाय यात किती उबदार ऐक्य वास करून आहे याचा उघड पुरावा व्यक्‍त करतात.—योहान १०:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा