वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ११/१५ पृ. ४-७
  • मृत कोठे आहेत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मृत कोठे आहेत?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्वर्गात कोण जातात?
  • स्वर्गात जात नाहीत असे
  • मृत्यूमध्ये झोपी जाणे
  • आपल्या पूर्वजांसाठी नवे जीवन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • स्वर्गास कोण जातात व का?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • आपल्या मृत प्रियजनांचे काय होते?
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • तुमचे मृत प्रियजन त्यांना तुम्ही पुन्हा पाहू शकाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ११/१५ पृ. ४-७

मृत कोठे आहेत?

“पृथ्वी ही एक बाजारपेठ आहे; स्वर्ग आमचे घर आहे,” असे पश्‍चिम ॲफ्रिकेतील योरूबा म्हणतात. ही कल्पना अनेक धर्मांमध्ये पुनः पुनः ऐकवली जाते. ते हीच कल्पना आणून देते की पृथ्वी एका बाजारपेठेसारखी आहे जेथे आम्ही थोड्या वेळेसाठी भेट देतो आणि मग निघून जातो. या विश्‍वासानुसार, मृत्यूनंतर आम्ही आमच्या घरी, स्वर्गात जातो.

काही जण स्वर्गात जातात याविषयी बायबल जरूर शिकवण देते. येशू ख्रिस्ताने त्याच्या विश्‍वासू शिष्यांना सांगितले: “माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. . . . मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; ह्‍यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.”—योहान १४:२, ३.

सर्वच चांगले लोक स्वर्गात जातात किंवा स्वर्ग हे मानवजातीचे घर आहे असा येशूचा म्हणण्याचा अर्थ नाही. पृथ्वीवर राज्य करण्यासंबंधी काहींना स्वर्गात घेतले जाते. यहोवा देवाला माहीत होते, की मानवी सरकार पृथ्वीवर कधीही यशस्वीपणे कामकाज सांभाळू शकणार नाही. याचकारणास्तव, त्याने एका स्वर्गीय सरकाराची किंवा राज्याची व्यवस्था केली जी काही काळाने पृथ्वीचा ताबा घेईल आणि त्याने सुरवातीला उद्देशिले होते त्याप्रमाणे तिचे एका नंदनवनात रूपांतर करील. (मत्तय ६:९, १०) येशू देवाच्या राज्याचा राजा असेल. (दानीएल ७:१३, १४) मानवजातीतून इतरांना त्याच्यासोबत राज्य करण्यासाठी निवडले जाणार होते. बायबलने भाकीत केले होते, की स्वर्गात घेतले जाणारे ‘आमच्या देवासाठी राज्य आणि याजक’ असतील आणि ते ‘पृथ्वीवर राजे म्हणून राज्य करतील.’—प्रकटीकरण ५:१०, NW.

स्वर्गात कोण जातात?

या स्वर्गीय शासकांना जी भारी जबाबदारी घ्यावी लागणार त्याचा विचार केल्यावर, त्यांना काही आवश्‍यक गोष्टी काटेकोरपणे पूर्ण कराव्या लागतील यात काही शंका नाही. स्वर्गात जाणाऱ्‍यांना यहोवाचे अचूक ज्ञान असणे जरूरीचे आहे व त्यांनी त्याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. (योहान १७:३; रोमकर ६:१७, १८) त्यांना येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवणे आवश्‍यक आहे. (योहान ३:१६) तरीही, आणखी पुष्कळ गोष्टी यात सामील आहेत. त्यांना देवाने त्याच्या पुत्राद्वारे बोलावलेले व निवडलेले पाहिजे. (२ तीमथ्य १:९, १०; १ पेत्र २:९) याशिवाय, त्यांनी ‘नव्याने जन्मलेले,’ देवाच्या पवित्र आत्म्याने अभिषेक झालेले बाप्तिस्मा प्राप्त ख्रिस्ती असणे आवश्‍यक आहे. (योहान १:१२, १३; ३:३-६) तसेच त्यांनी मृत्यूपर्यंत देवासोबत सत्वनिष्ठा राखली पाहिजे.—२ तीमथ्य २:११-१३; प्रकटीकरण २:१०.

आजपर्यंत जितके कोट्यावधी लोक जिवंत राहून मरण पावले त्यांनी या आवश्‍यकता पूर्ण केल्या नाहीत. अनेकांना सत्य देवाबद्दल शिकण्याची फारच कमी संधी होती. इतरांनी कधीच बायबल वाचले नाही व त्यांना येशू ख्रिस्ताबद्दलची थोडीफार किंवा काहीच माहिती नाही. आज पृथ्वीवरील खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये सुद्धा काहींनाच स्वर्गीय जीवनासाठी देवाने निवडले आहे.

परिणामी, स्वर्गात जाणाऱ्‍यांची संख्या सापेक्षतेने कमी असू शकते. येशूने अशा लोकांना “लहान कळप” म्हणून संबोधले. (लूक १२:३२) नंतर, प्रेषित योहानाला असे प्रकट करण्यात आले, की ख्रिस्ताबरोबर स्वर्गामध्ये राज्य करणारे, “पृथ्वीवरून विकत घेतलेले” लोक यांची संख्या, केवळ १,४४,००० इतकी असेल. (प्रकटीकरण १४:१, ३; २०:६) पृथ्वीवर एकेकाळी जिवंत असलेल्या लक्षावधी लोकांसोबत तुलना केल्यावर, ही संख्या निश्‍चितच कमी आहे.

स्वर्गात जात नाहीत असे

स्वर्गात जात नाहीत अशांचे काय होते? काही धर्म शिकवतात त्याप्रमाणे ते चिरकाल यातनेच्या ठिकाणी दुःख भोगत आहेत का? मुळीच नाही, कारण यहोवा हा प्रीतीचा देव आहे. प्रेमळ पालक त्यांच्या मुलांना अग्नीत टाकत नाहीत, त्याचप्रमाणे यहोवा अशाप्रकारे लोकांना पीडा देत नाही.—१ योहान ४:८.

मृत पावलेल्या पुष्कळांसाठी, पृथ्वीवरील नंदनवनात पुनरूत्थानाची आशा आहे. बायबल म्हणते, की यहोवाने पृथ्वीवर “लोकवस्ती” व्हावी म्हणून ती निर्मिली. (यशया ४५:१८) स्तोत्रकर्त्याने म्हटले: “स्वर्ग तर परमेश्‍वराचा [यहोवा, NW] आहे; पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.” (स्तोत्र ११५:१६) स्वर्ग नव्हे तर पृथ्वी मानवजातीचे कायमस्वरूपी निवासस्थान होईल.

येशूने भाकीत केले: “कबरेतील सर्व माणसे त्याची [येशू, “मनुष्याचा पुत्र”] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२७-२९) ख्रिस्ती प्रेषित पौलाने याची खात्री दिली: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरूत्थान होईल अशी . . . आशा मी देवाकडे पाहून धरितो.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५) वधस्तंभावर येशूने एका पश्‍चात्तापी गुन्हेगाराला, पुनरूत्थानाद्वारे पार्थिव नंदनवनात जीवनाचे अभिवचन दिले.—लूक २३:४३.

तर मग पृथ्वीवर ज्यांचे पुनरूत्थान होणार आहे अशांची सध्याची स्थिती काय आहे? येशूच्या सेवाकार्यातील एक घटना आम्हाला या प्रश्‍नाचे उत्तर देण्यास मदत करते. त्याचा मित्र लाजर मरण पावला होता. येशू त्याचे पुनरूत्थान करण्यास जाण्याआधी, त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले: “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवावयास जातो.” (योहान ११:११) अशाप्रकारे येशूने मृत्यूची तुलना, स्वप्नाविना गाढ निद्रेसोबत केली.

मृत्यूमध्ये झोपी जाणे

मृत्यूमध्ये झोपी जाण्याच्या या विचारासोबत इतर शास्त्रवचने मेळ घालतात. मानवाचा जीव अमर आहे आणि तो मृत्यूनंतर आत्मिक क्षेत्रात जातो असे ते शिकवत नाहीत. उलट, बायबल म्हणते: “मृतांस तर काहीच कळत नाही; . . . त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत; . . . ज्या अधोलोकाकडे [कबर] तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्‍तीप्रयुक्‍ती, बुद्धी व ज्ञान यांचे नाव नाही.” (उपदेशक ९:५, ६, १०) शिवाय, स्तोत्रकर्त्याने म्हटले की मनुष्य “आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याचवेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.”—स्तोत्र १४६:४.

ही शास्त्रवचने हे स्पष्ट करतात, की मृत्यूत झोपी गेलेले आम्हाला पाहू किंवा ऐकू शकत नाहीत. ते आशीर्वाद किंवा संकट आणण्यास असमर्थ आहेत. ते स्वर्गात नाहीत वा पूर्वजांच्या समाजात नाहीत. ते निर्जीव, अस्तित्वविरहीत आहेत.

देवाच्या योग्य समयी, मृत्यूमध्ये झोपी जाणाऱ्‍यांना आणि जे त्याच्या स्मरणात आहेत त्या सर्वांना, पृथ्वीवरील नंदनवनात जीवन देऊन उठवले जाईल. ती पृथ्वी, मानवजात आता ज्या प्रदूषणाचा, पीडांचा व समस्यांचा अनुभव घेत आहे त्या सर्वांपासून स्वच्छ केलेली असेल. तो किती आनंदाचा समय असेल! त्या नंदनवनात त्यांना अनंतकालिक जीवनाची आशा असेल, कारण स्तोत्र ३७:२९ आम्हाला याची हमी देते की: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”

[६ पानांवरील चौकट]

मी मृतांची उपासना करण्याचे सोडून दिले

“मी लहान होतो तेव्हा, माझे बाबा त्यांच्या मृत बाबांना नियमितपणे अर्पणे करीत तेव्हा मी त्यांना मदत करत असे. एके प्रसंगी माझे बाबा जेव्हा एका भयानक आजारातून बरे झाले, तेव्हा कौल घालणाऱ्‍या एका माणसाने त्यांना सांगितले, की आजारातून बरे झाल्याची गुणग्राहकता दाखवण्यासाठी त्यांनी त्यांच्या मृत वडिलांना एका बकऱ्‍याचा बळी, याम नावाचे कंद, कोला नावाचे कठीण कवचाचे फळ व पेय दिले पाहिजे. शिवाय त्याने माझ्या बाबांना सल्ला दिला की त्यांनी त्यांच्या मृत पूर्वजांना पुढे कोणतेही आजार व संकटे टाळण्यास विनंती करावी.

“बलिदानासाठी ज्या गोष्टी लागणार होत्या त्या सर्व माझ्या आईने विकत आणल्या. हे बलिदान कार्य माझ्या आजोबांच्या कबरेजवळ होणार होते. स्थानिक रीतीनुसार आमच्या घराजवळच ती कबर होती.

“बलिदान पाहण्यासाठी मित्रांना, नातेवाईकांना व शेजाऱ्‍यांना आमंत्रण देण्यात आले. माझे बाबा, प्रसंगानुरूप पोषाख घालून, कबरेकडे तोंड करून एका खुर्चीवर बसले. त्या कबरेवर पुष्कळ बकऱ्‍यांच्या कवट्या होत्या ज्यांना आधीच्या अर्पणात बली देण्यात आले होते. त्या कवट्यांना एका रांगेत लावले होते. मला एका बाटलीतून एका लहानशा पेल्यात द्राक्षारस ओतून बाबांना देण्याचे काम दिले होते. आणि माझे बाबा तो द्राक्षारस जमिनीवर अर्पण म्हणून ओतत होते. बाबांनी त्यांच्या वडिलांचे नाव तीन वेळा घेतले आणि भवितव्यातील संकटातून मुक्‍ती प्राप्त होण्यासाठी प्रार्थना केली.

“त्यानंतर कोला फळे अर्पिण्यात आली व मग बकरा कापून, शिजवून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी तो खाल्ला. मीही तो खाल्ला आणि मग ढोल वाजवताना म्हटलेल्या गाण्यावर नाचलो. माझ्या बाबांचे वय झाले असले तरी ते चांगले व उत्साहाने नाचले. अंतराअंतराने त्यांनी, उपस्थित असलेल्या सर्वांवर, आशीर्वाद द्यावा अशा त्यांच्या पूर्वजांकडे प्रार्थना केल्या आणि माझ्यासहित तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी त्या प्रार्थनांना ईस, म्हणजे, ‘तथास्तु’ असे म्हटले. मी माझ्या बाबांकडे बारकाईने व कौतुकाने पाहत होतो आणि त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होतो जेव्हा मी मृत पूर्वजांची भक्‍ती करण्यासाठी मोठा होईन.

“इतकी अर्पणे केली असतानाही आमच्या कुटुंबात शांती आली नाही. माझ्या आईला तीन मुलगे आणि तीन मुली असल्या तरी त्यातील एकही मुलगी अधिक काळासाठी जिवंत राहिली नाही; सर्व मुली लहानपणीच वारल्या. पुन्हा एकदा माझी आई गरोदर होती तेव्हा माझ्या बाबांनी, ते मूल सुरक्षित जन्मावे म्हणून त्या बाळासाठी पुष्कळ मोठमोठी अर्पणे दिली.

“आईने आणखी एका मुलीला जन्म दिला. दोन वर्षांनंतर ते मूल आजारी पडून मेले. माझ्या बाबांनी कौल लावणाऱ्‍या माणसाचा सल्ला घेतला. त्याने सांगितले की एक शत्रु या मृत्यूला कारणीभूत होता. मुलीच्या ‘आत्म्याने’ प्रतिहल्ला करण्यासाठी एक जळते लाकूड, दारूची एक बाटली आणि एक लहान कुत्र्याचे पिल्लू अर्पण करण्यासाठी हवे आहे असे त्या माणसाने म्हटले. ते जळते लाकूड कबरेवर ठेवून, दारू कबरेवर शिंपडायची होती आणि त्या लहान कुत्र्याच्या पिल्लाला कबरेजवळ जिवंत पुरायचे होते. मृत मुलीच्या आत्म्याला बदला घेण्यास जागे करण्यासाठी हे सर्व करणे आवश्‍यक होते.

“मी दारुची बाटली आणि जळते लाकूड कबरेकडे नेले, आणि बाबांनी त्या लहान पिल्लाला उचलून घेतले. त्यानंतर त्या कौल घालणाऱ्‍या माणसाने सांगितल्याप्रमाणे ते पिल्लू पुरण्यात आले. आम्हा सर्वांना वाटले की सात दिवसांच्या आत मृत मुलीचा आत्मा, ज्या व्यक्‍तीने तिचा अकालीन मृत्यू घडवून आणला त्याचा नाश करील. परंतु दोन महिने झाले आणि आमच्या वसाहतीमध्ये कोणीही मेल्याची बातमी आली नाही. आणि माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला.

“त्या वेळी मी १८ वर्षांचा होतो. लागलीच थोड्या दिवसांनी माझी यहोवाच्या साक्षीदारांसोबत भेट झाली. त्यांनी मला शास्त्रवचनातून दाखवले, की मृत लोक जीवितांचे बरे किंवा वाईट करू शकत नाहीत. देवाच्या वचनाचे ज्ञान माझ्या अंतःकरणात मुळावत गेल्यामुळे, मी माझ्या बाबांना सांगितले की मी त्यांना येथून पुढे मृतांना अर्पणे करण्यात साथ देऊ शकणार नाही. सुरवातीला ते माझ्यावर अतिशय क्रोधित झाले कारण त्यांचे म्हणणे असे होते की मी त्यांना सोडून दिले. परंतु त्यांनी, मी माझ्या नव्या विश्‍वासाचा त्याग करू इच्छित नाही हे पाहिल्यावर, यहोवाच्या माझ्या उपासनेला विरोध आणला नाही.

“एप्रिल १८, १९४८ रोजी, मी माझ्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेतला. तेव्हापासून, मी यहोवाची सेवा अधिक आनंदाने व समाधानाने करीत आहे आणि जे आपल्याला किंवा इतरांना इजा करू शकत नाहीत अशा मृत पूर्वजांची भक्‍ती करणाऱ्‍यांना त्यातून मुक्‍त होण्यास मदत करीत आहे.”—नायजेरिया, बेनिन शहरातील जे. बी. ओमीग्बे यांच्या सौजन्याने.

[७ पानांवरील चित्रं]

मृतांना पुनरूत्थित केले जाईल तेव्हा पृथ्वीवरील नंदनवनात आनंदीआनंद असेल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा