-
निकदेम याच्याकडून धडा घ्याटेहळणी बुरूज—२००२ | फेब्रुवारी १
-
-
येशूने त्याच्या पृथ्वीवरील सेवेला सुरवात करून केवळ सहा महिनेच झाले होते तेव्हा निकदेमाने हे ओळखले की येशू ‘देवापासून आलेला शिक्षक’ आहे. सा.यु. ३० च्या वल्हांडण सणी, येशूने जेरूसलेममध्ये नुकत्याच केलेल्या चमत्कारांनी प्रभावित होऊन निकदेम रात्रीचा येशूकडे येऊन त्याच्यावर त्याचा विश्वास असल्याचे कबूल करतो. त्याला या शिक्षकाविषयी अधिक जाणूनही घ्यायचे होते. त्या वेळी, देवाच्या राज्यात प्रवेश करायला ‘नव्याने जन्म’ घेण्याची गरज आहे हे गहन सत्य येशू निकदेमाला सांगतो. या प्रसंगी येशू असेही म्हणतो: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१-१६.
निकदेमासमोर किती अद्भुत भविष्य! तो येशूचा जवळचा सहकारी बनू शकत होता आणि पृथ्वीवरील येशूच्या जीवनाचे विविध पैलू प्रत्यक्षात पाहू शकत होता. यहूद्यांचा शासक आणि इस्राएलमध्ये शिक्षक यानात्याने, निकदेमाला देवाच्या वचनाचे बऱ्यापैकी ज्ञान होते. येशू हा देवाने पाठवलेला शिक्षक आहे हे त्याने ओळखले यावरून त्याला सूक्ष्मदृष्टी असल्याचेही दिसून येते. निकदेमाला आध्यात्मिक गोष्टींबद्दल रस होता आणि तो अत्यंत नम्र मनुष्य होता. यहूद्यांच्या सर्वोच्च न्यायालयाचा सदस्य एका साध्या सुताराच्या मुलाला तो देवाने पाठवलेला आहे असे स्वीकारतो हे किती अवघड असावे! येशूचा शिष्य बनण्यासाठी हे सर्व गुण असणे महत्त्वाचे होते.
-
-
निकदेम याच्याकडून धडा घ्याटेहळणी बुरूज—२००२ | फेब्रुवारी १
-
-
सर्वात प्रथम, योहानाने सांगितले हा यहूदी नेता येशूकडे “रात्रीचा” आला होता. (योहान ३:२) एका बायबल विद्वानानुसार, “निकदेम येशूकडे रात्रीचा आला, त्याला भीती वाटत होती म्हणून नव्हे तर येशूसोबत त्याला निवांत बोलता यावे, लोकांची गर्दी नसावी म्हणून.” परंतु, योहानाने ज्या संदर्भात अरिमथाईकर योसेफ “येशूचा एक शिष्य असून यहूद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता” असे सांगितले त्यातच त्याने निकदेमाविषयी म्हटले की, तो “[येशूकडे] पहिल्याने रात्रीचा” आला होता. (योहान १९:३८, ३९) यामुळे, “यहूद्यांच्या भीतीमुळे” निकदेम येशूकडे रात्रीचा आला असण्याची शक्यता आहे कारण त्याच्या काळातील इतरांना येशूसोबत कोणतेही संबंध ठेवण्याची भीती होती.—योहान ७:१३.
-