‘देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली’
“देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीति केली तर आपणहि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे.”—१ योहान ४:११.
१. मार्च २३ रोजी सूर्य मावळल्यानंतर, संपूर्ण विश्वभरात लाखो लोक राज्य सभागृहांमध्ये व सभा होतात अशा इतर ठिकांणी एकत्र का जमतील?
रविवारी मार्च २३, १९९७ रोजी, सूर्य मावळल्यानंतर, संपूर्ण विश्वात, १,३०,००,००० पेक्षा अधिक लोक, यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या राज्य सभागृहांमध्ये व सभा होत असलेल्या इतर ठिकांणी जमतील यात काही शंका नाही. का बरे? कारण देवाने मानवजातीबद्दल दाखवलेले प्रीतीचे महान वक्तव्य त्यांच्या अंतःकरणास भिडले आहे. येशू ख्रिस्ताने असे म्हणून देवाच्या प्रीतीच्या त्या सर्वोत्कृष्ट पुराव्यावर लक्ष आकर्षित केले की, “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.
२. देवाने दाखवलेल्या प्रीतीला आपल्या प्रतिसादासंबंधाने आपले हित होईल अशा रीतीने कोणते प्रश्न आपण सर्वजण स्वतःला विचारू शकतो?
२ देवाने दाखवलेल्या प्रीतीचा आपण विचार करतो तेव्हा, ‘देवाने जे केले त्याबद्दल मी खरोखर कृतज्ञ आहे का? मी ज्या प्रकारे माझे जीवन व्यतीत करत आहे त्यावरून ती कृतज्ञता शाबीत होते का?’ असे स्वतःस विचारणे उचित आहे.
“देव प्रीति आहे”
३. (अ) देवाला प्रीती प्रदर्शित करणे असाधारण का नाही? (ब) त्याच्या सृष्टीच्या कार्यातून त्याचे सामर्थ्य व बुद्धी कशी प्रकट होते?
३ प्रीती प्रकट करणे ही देवासाठी असाधारण गोष्ट नाही कारण “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) प्रीती त्याचा प्रमुख गुण आहे. मानवी वस्तीसाठी पृथ्वीची निर्मिती करताना, डोंगर उभारणे व नद्या आणि समुद्रामध्ये पाणी एकत्र करणे, या गोष्टी त्याच्या शक्तीचे चकित करणारे प्रदर्शन होते. (उत्पत्ति १:९, १०) देवाने पाण्याचे व प्राणवायूचे चक्र कार्यरत केले तेव्हा, शिवाय, मानव जिवंत राहण्याकरता पचवू शकतील अशा अन्न पदार्थांमध्ये जमिनीतील रासायनिक घटकांचे रुपांतर करण्यासाठी त्याने अगणित सूक्ष्मजीव व विविध वनस्पती निर्माण केल्या तसेच पृथ्वी ग्रहावरील दिवसांच्या व महिन्यांच्या लांबीशी जुळण्यासाठी जैविक घड्याळ तयार केले तेव्हाही त्याची महान बुद्धी प्रकट झाली. (स्तोत्र १०४:२४; यिर्मया १०:१२) तरीसुद्धा, वास्तविक सृष्टीत देवाच्या प्रीतीचा सर्वात उल्लेखनीय पुरावा आहे.
४. वास्तविक सृष्टीत, देवाच्या प्रीतीचा कोणता पुरावा आपण सर्वांनी पाहावा व त्याची कृतज्ञता बाळगावी?
४ आपले केवळ पोषण होण्यासाठीच नव्हे तर आपल्याला आनंद देण्याकरता बनवलेल्या एखाद्या रसाळ, पक्व फळाचा आपण एक तुकडा तोंडात घेतो तेव्हा आपले रसनेन्द्रिय आपल्याला देवाच्या प्रीतीबद्दल सांगते. विस्मयकारक सूर्यास्त, एका निरभ्र रात्री चांदण्यांनी सजलेले आकाश, फुलांचे विविध प्रकार आणि उठावदार रंग, प्राण्यांच्या पिल्लांची मस्ती आणि स्नेह्यांचे प्रेमळ हास्य, या गोष्टींद्वारे आपले डोळे त्याचा स्पष्ट पुरावा पाहतात. आपले नाक, वासंतिक फुलांचा मधूर सुवास घेताना त्याच्या प्रीतीची जाणीव करून देते. खळखळून वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज, पक्ष्यांचे गीत आणि आपल्या प्रिय जनांचा आवाज आपण ऐकतो तेव्हा आपल्या कानांना त्याची जाणीव होते. एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला प्रेमळपणे आलिंगन देते तेव्हा आपल्याला त्या प्रीतीचा स्पर्श होतो. विशिष्ट प्राण्यांना पाहण्याची, ऐकण्याची किंवा घ्राणेंद्रिय शक्ती असते जी मानवांकडे नाही. पण देवाच्या प्रतिरुपात निर्मिलेल्या मानवजातीकडे देवाची प्रीती समजण्याची क्षमता आहे जी कोणत्याही प्राण्याकडे नाही.—उत्पत्ति १:२७.
५. आदाम आणि हव्वेप्रती यहोवाने आपली विपुल प्रीती कशी दर्शवली?
५ यहोवा देवाने पहिल्या मानवांना, आदाम आणि हव्वेला निर्माण केले तेव्हा, त्यांच्या आवतीभोवती त्याच्या प्रीतीचे पुरावे होते. त्याने एक बाग, म्हणजे, परादीस लावले होते व त्यात सर्व प्रकारची झाडे उगू दिली होती. त्यांना पाणी मिळण्याकरता त्याने एक नदी तयार केली होती आणि ती बाग मोहक पशू पक्ष्यांनी भरून टाकली. हे सर्व काही त्याने आदामाला व हव्वेला त्यांचे घर म्हणून दिले. (उत्पत्ति २:८-१०, १९) यहोवाने त्यांच्यासोबत आपल्या मुलांप्रमाणे, त्याच्या सार्वत्रिक कुटुंबाचे एक भाग या नात्याने व्यवहार केला. (लूक ३:३८) एदेन बाग एक नमुना म्हणून दिल्यामुळे, या पहिल्या मानवी दांपत्याच्या स्वर्गीय पित्याने त्यांना संपूर्ण पृथ्वीवर अशा प्रकारचे परादीस वाढवण्याची समाधानकारक नेमणूक दिली. सबंध पृथ्वी त्यांच्या संततीने व्यापणार होती.—उत्पत्ति १:२८.
६. (अ) आदाम आणि हव्वेने पत्करलेल्या बंडखोर मार्गाक्रमणाविषयी तुम्हाला कसे वाटते? (ब) एदेनमध्ये जे घडले त्यातून आपण धडा शिकलो व त्या ज्ञानाचा आपल्याला फायदा झाला आहे हे कदाचित कशावरून सूचित होऊ शकते?
६ पण, अल्पावधीतच, आदाम आणि हव्वेसमोर आज्ञाधारकतेची परीक्षा, एकनिष्ठेची परीक्षा आली. एकेक करून ते दोघेही त्यांच्यावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावाची गुणग्राहकता दाखवण्यास अपयशी ठरले. त्यांनी केलेले कृत्य धक्कादायक होते. ते क्षम्य नव्हते! परिणामतः, त्यांनी देवासोबतचा त्यांचा नातेसंबंध गमावला, त्यांना त्याच्या कुटुंबातून हाकलून लावण्यात आले व एदेनातून बाहेर घालवण्यात आले. त्यांच्या पापाचे परिणाम आपण अजूनही भोगत आहोत. (उत्पत्ति २:१६, १७; ३:१-६, १६-१९, २४; रोमकर ५:१२) पण जे काही घडले त्यातून आपण काही शिकलो का? आपण देवाच्या प्रीतीला कशाप्रकारे प्रतिसाद देत आहोत? आपण दररोज जे निर्णय घेतो त्यावरून आपण त्याच्या प्रीतीबद्दल गुणग्राहकता व्यक्त करतो हे दिसते का?—१ योहान ५:३.
७. आदाम आणि हव्वेने जे काही केले तरीसुद्धा यहोवाने त्यांच्या संततीला प्रीती कशी दाखवली?
७ देवाने आपल्या पहिल्या मानवी पालकांसाठी निर्माण केलेल्या सर्व गोष्टींबद्दल त्यांनी निखालस कृतघ्नता दाखवली असली तरी, यामुळे देवाची प्रीती दबून राहिली नाही. अद्याप न जन्मलेल्या मानवांवरील आणि आज जिवंत असलेल्या आपल्या सर्वांवरील दयेमुळे देवाने आदाम आणि हव्वेला त्यांचा मृत्यू होण्याआधी कुटुंब वाढवण्याची परवानगी दिली. (उत्पत्ति ५:१-५; मत्तय ५:४४, ४५) त्याने असे केले नसते तर आज आपल्यातील कोणाचाच जन्म झाला नसता. यहोवाने त्याच्या इच्छेच्या प्रगतिशील प्रकटनाद्वारे, जे कोणी विश्वास प्रकट करतील अशा आदामाच्या सर्व संततीकरता एक आशा देखील दिली. (उत्पत्ति ३:१५; २२:१८; यशया ९:६, ७) त्याच्या व्यवस्थेमध्ये अशा मार्गाचा समावेश होता ज्याद्वारे, सर्व राष्ट्रातील लोक आदामाने जे काही गमावले होते, विशेषकरून, देवाच्या विश्वव्यापी कुटुंबाचे स्वीकृत सदस्य या नात्याने असलेले परिपूर्ण जीवन प्राप्त करू शकत होते. हे त्याने खंडणीची तरतूद करण्याद्वारे केले.
खंडणी कशासाठी?
८. आदाम आणि हव्वेला मरावे लागले तरी त्यांच्या आज्ञाधारक संततीला मरावे लागणार नाही असा साधा नियम देव का देऊ शकत नव्हता?
८ मानवी जीवनाच्या रुपाने खंडणी मूल्य देण्याची खरोखरीच गरज होती का? देवाला असा एक साधा नियम देता आला नसता का, की आदाम आणि हव्वेला त्यांच्या बंडाळीसाठी मरावे लागले तरी देवाच्या अधीन राहणारी त्यांची सर्व मुले कायम जगू शकतील? अदूरदर्शी मानवी दृष्टिकोनातून हे समंजसपणाचे वाटू शकते. परंतु, यहोवाला “नीति व न्याय ही प्रिय आहेत.” (स्तोत्र ३३:५) आदाम आणि हव्वेला ते पापी बनल्यावर मुले झाली; यास्तव त्यांच्या मुलांपैकी कोणीही परिपूर्ण जन्मले नाही. (स्तोत्र ५१:५) त्या सर्वांना पापाचा वारसा मिळाला होता आणि पापाची शिक्षा तर मृत्यू आहे. यहोवाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असते तर, यामुळे त्याच्या विश्वव्यापी कुटुंबाच्या सदस्यांसमोर कोणते उदाहरण राहिले असते? तो त्याच्या स्वतःच्या धार्मिक दर्जांकडे दुर्लक्ष करू शकत नव्हता. न्यायीपणाच्या गरजांचा त्याने आदर केला. संबंधित वादविषयाला देवाने ज्या प्रकारे हाताळले त्यात कोणीही तर्कसंगतपणे चूक काढू शकत नव्हता.—रोमकर ३:२१-२३.
९. न्यायाच्या ईश्वरी दर्जानुसार, कोणत्या प्रकारच्या खंडणीची गरज होती?
९ पण मग, यहोवाला प्रेमळ अधीनता दाखवणाऱ्या आदामाच्या संततीला सोडवण्याकरता एक सोयीस्कर आधार कसा पुरवता येऊ शकत होता? जर एका परिपूर्ण मानवाने स्वतःला बलिदान म्हणून अर्पण केले तर न्यायानुसार त्या परिपूर्ण जीवनाचे मूल्य त्या खंडणीवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या पापांना झाकून टाकणार होते. आदाम, या केवळ एका मनुष्याचे पाप संपूर्ण मानवी कुटुंब पापी होण्याला कारणीभूत ठरत असल्यामुळे, जुळणारे मूल्य असलेल्या दुसऱ्या एका परिपूर्ण मानवाने वाहिलेले रक्त न्यायाच्या तराजूला समतोल राखू शकत होते. (१ तीमथ्य २:५, ६) पण असा मनुष्य कोठे सापडणार होता?
ती किंमत किती भारी होती?
१०. आदामाची संतती आवश्यक खंडणी देण्यास असमर्थ का होती?
१० पापी आदामाच्या संततीपैकी असा एकही जण नव्हता की जो आदामाने गमावलेल्या जीवनाच्या आशेला पुन्हा विकत घेण्याकरता आवश्यक असलेली गोष्ट पुरवू शकेल. “कोणाहि मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करिता येत नाही; किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही. त्याने सर्वदा जगावे, त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये, म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही; कारण त्याच्या जिवाची खंडणी इतकी मोठी आहे की तिची भरपाई करण्याचे नेहमी अपुरेच राहणार.” (स्तोत्र ४९:७-९) मानवजातीला बिन आशेचे वाऱ्यावर सोडून देण्याऐवजी स्वतः यहोवाने दयाळूपणे एक तरतूद केली.
११. उचित खंडणीसाठी लागणाऱ्या परिपूर्ण मानवी जीवनाची व्यवस्था यहोवाने कोणत्या मार्गाद्वारे केली?
११ यहोवा देवाने एखाद्या देवदूताला, आत्मा म्हणून जिवंत राहून पृथ्वीवर देह धारण करून मरणाचे केवळ नाटक करण्यासाठी पाठवले नाही. उलट, केवळ देव, सृष्टीकर्ताच ज्याची युक्ती करू शकेल अशा चमत्काराद्वारे त्याने, त्याच्या एका स्वर्गीय पुत्राची जीवनी शक्ती आणि व्यक्तिमत्त्वाचा नमुना, यहुदाच्या वंशातील हेलीची कन्या मरिया या स्त्रीच्या गर्भात स्थलांतरित केला. देवाची कार्यकारी शक्ती, म्हणजे त्याच्या पवित्र आत्म्याने आईच्या गर्भातील त्या लेकराच्या वाढीची जोपासना केली व परिपूर्ण मानव या नात्याने त्याचा जन्म झाला. (लूक १:३५; १ पेत्र २:२२) ईश्वरी न्यायाच्या गरजांचे पूर्णपणे समाधान देऊ शकणाऱ्या खंडणीसाठी आवश्यक असलेली किंमत याच मनुष्याकडे होती.—इब्री लोकांस १०:५.
१२. (अ) कोणत्या अर्थाने येशू देवाचा ‘एकुलता एक पुत्र’ आहे? (ब) खंडणी देण्याकरता देवाने याला पाठवणे, आपल्यावर त्याचे प्रेम आहे यावर कसा जोर देते?
१२ यहोवाने त्याच्या लाखोलाख स्वर्गीय पुत्रांपैकी कोणाला ही नेमणूक दिली? शास्त्रवचनांमध्ये ज्याचे वर्णन ‘एकुलता एक पुत्र’ असे केले आहे त्याला. (१ योहान ४:९) ही संज्ञा, मानव या नात्याने जन्म घेतल्यानंतर तो जे बनला त्याचे नव्हे तर त्याआधी स्वर्गामध्ये तो कोण होता त्याचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात आली आहे. यहोवाने इतर कोणाच्याही सहकार्याविना केवळ याचीच थेट निर्मिती केली आहे. तो सर्व सृष्टीत ज्येष्ठ आहे. इतर सर्व प्राण्यांना अस्तित्वात आणण्यासाठी देवाने याचाच उपयोग केला. आदाम जसा देवाचा पुत्र होता तसेच देवदूतही देवाचे पुत्र आहेत. पण येशूचे वर्णन “पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव” असे केले आहे. त्याचे वास्तव्य “देवपित्याच्या उराशी” असल्याचे म्हटले आहे. (योहान १:१४, १८) पित्यासोबतचा त्याचा नातेसंबंध घनिष्ठ, गोपनीय, नाजूक आहे. पित्याला मानवजातीबद्दल असलेल्या प्रीतीत त्याचाही भाग आहे. नीतीसूत्रे ८:३०, ३१ ही वचने, पित्याला आपल्या पुत्राबद्दल कसे वाटते आणि पुत्राला मानवजातीबद्दल कसे वाटते ते व्यक्त करतात: “मी त्याला [यहोवाला] नित्य आनंददायी होते [होतो]; त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे; . . . मनुष्यजातीच्या ठायी मी [यहोवाचा कुशल कारागीर, बुद्धीचे प्रत्यक्ष स्वरूप, येशू] आनंद पावे.” खंडणी देण्याकरता देवाने ज्याला पाठवले तो हाच सर्वात बहुमोल पुत्र होता. यास्तव, “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला” हे येशूचे विधान केवढे अर्थपूर्ण आहे!—योहान ३:१६.
१३, १४. इसहाकाला अर्पिण्यासाठी अब्राहामने दाखवलेल्या तयारीचा बायबल अहवाल, यहोवाने आपल्यासाठी जे केले त्याविषयी कोणती कदर बाळगण्यास आपल्याला मदत करतो? (१ योहान ४:१०)
१३ याचा अर्थ काय होतो ते समजण्यास आपली थोडीफार मदत होण्याकरता, येशू पृथ्वीवर येण्याच्या बऱ्याच काळाआधी, सुमारे ३,८९० वर्षांपूर्वी देवाने अब्राहामला ही सूचना दिली: “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.” (उत्पत्ति २२:१, २) अब्राहामाने विश्वासूपणे आज्ञा पाळली. स्वतःला अब्राहामच्या जागी ठेवा. तो तुमचा एकुलता एक पुत्र, तुमचा लाडका असता तर? होमार्पणासाठी लाकडं फोडताना, मोरियाच्या देशाला जाण्यासाठी अनेक दिवसांचा प्रवास करताना व तुमच्या मुलाला वेदीवर ठेवताना तुम्हाला कसे वाटले असते?
१४ एका दयाळू पालकाच्या मनात अशा भावना का येतात? उत्पत्ति १:२७ म्हणते, की देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरुपात निर्माण केले. प्रेम आणि दयेच्या आपल्या भावना, स्वतः यहोवाच्या प्रेम आणि दयेच्या भावनेसमोर अगदी मर्यादितरीत्या प्रतिबिंबित होतात. अब्राहामाच्या बाबतीत, देवाने हस्तक्षेप केला म्हणून इसहाकाचा वास्तविकपणे बली देण्यात आला नाही. (उत्पत्ति २२:१२, १३; इब्री लोकांस ११:१७-१९) परंतु, यहोवाच्या बाबतीत, त्याला आणि त्याच्या पुत्राला मोठी किंमत मोजावी लागणार होती तरीसुद्धा खंडणी देण्यापासून शेवटच्या घटकेपर्यंत तो मागे हटला नाही. देवाने जे काही केले ते त्याचे कर्तव्य म्हणून नव्हे तर, असाधारण अपात्री कृपेचे ते वक्तव्य होते. आपण याबद्दल पूर्णपणे कृतज्ञ आहोत का?—इब्री लोकांस २:९.
हे कशामुळे शक्य होते?
१५. या सद्य व्यवस्थिकरणात देखील, खंडणीचा प्रभाव लोकांच्या जीवनावर कसा पडला आहे?
१५ देवाने केलेल्या या प्रेमळ तरतुदीचा विश्वासाने स्वीकार करणाऱ्यांच्या जीवनावर खोल प्रभाव पडतो. पापामुळे ते पूर्वी देवापासून दूर होते. त्याचे वचन म्हणते त्याप्रमाणे ते “पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी” होते. (कलस्सैकर १:२१-२३) पण मग ‘देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे त्यांचा समेट झाला.’ (रोमकर ५:८-१०) आपल्या जीवनात परिवर्तन केल्यामुळे व ख्रिस्ताच्या बलिदानावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाने शक्य करून दिलेली क्षमा स्वीकारल्यामुळे, त्यांच्यावर शुद्ध विवेक बाळगण्याची कृपा झाली आहे.—इब्री लोकांस ९:१४; १ पेत्र ३:२१.
१६. लहान कळपाला खंडणीवरील विश्वासामुळे कोणते आशीर्वाद देण्यात येतात?
१६ पृथ्वीकरता असलेला यहोवाचा मूळ उद्देश पूर्णत्वास नेण्याच्या हेतुने त्याने यांच्यातील एका मर्यादित संख्येवर अर्थात लहान कळपावर, आपल्या पुत्रासोबत स्वर्गीय राज्यामध्ये त्याच्यासोबत राज्य करण्याची अपात्री कृपा केली आहे. (लूक १२:३२) यांना, ‘आमच्या देवासाठी राज्य व याजक होण्यासाठी सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून घेतले आहे व ते पृथ्वीवर राजे म्हणून राज्य करतील.’ (प्रकटीकरण ५:९, १०) प्रेषित पौलाने त्यांना लिहिले: “ज्याच्या योगे आपण अब्बा, बापा, अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो; आणि जर मुले तर वारीसहि आहो; म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहो.” (रोमकर ८:१५-१७) देवाने यांना आपले पुत्र या नात्याने दत्तक घेतल्यामुळे, आदामाने गमावलेल्या प्रिय नातेसंबंधाची त्यांना मान्यता मिळाली आहे; पण या पुत्रांना स्वर्गीय सेवांचे आणखी विशेषाधिकार दिले जातील—असे विशेषाधिकार जे आदामाला दिले नव्हते. म्हणूनच तर प्रेषित योहानाने म्हटले: “आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा.” (१ योहान ३:१) यांना देव केवळ आपले तत्त्वबद्ध प्रेमच (अगापे) नव्हे, तर खऱ्या मित्रांमध्ये असलेल्या बंधनाचे वैशिष्ट्य, अर्थात कोमल ममता (फिलिया) देखील व्यक्त करतो.—योहान १६:२७.
१७. (अ) खंडणीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना कोणती संधी देण्यात येते? (ब) “देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता” याचा त्यांच्यासाठी काय अर्थ होईल?
१७ येशू ख्रिस्तामार्फत जीवनासाठी देवाच्या उदार तरतुदीवर विश्वास ठेवणाऱ्या इतरांनाही, यहोवा, आदामाने गमावलेला बहुमोल नातेसंबंध प्राप्त करण्याची संधी देतो. प्रेषित पौलाने याचे स्पष्टीकरण असे केले: “सृष्टी [आदामाद्वारे आलेली मानव सृष्टी] देवाच्या पुत्राच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा [म्हणजे, ते त्या काळाची वाट पाहत आहेत जेव्हा, ख्रिस्तासोबत स्वर्गीय राज्याचे वारीस असलेले देवाचे पुत्र मानवजातीच्या वतीने सकारात्मक पाऊल उचलत आहेत हे स्पष्टपणे प्रकट होईल] अत्यंत उत्कंठेने करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली [मृत्यूची आशा बाळगून त्यांचा पापात जन्म झाला व स्वतःला मुक्त करण्याचा कोणताही मार्ग नव्हता], ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. सृष्टीहि स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या [देवाने दिलेल्या] आशेने वाट पाहते.” (रोमकर ८:१९-२१) त्या मुक्ततेचा काय अर्थ होईल? त्यांना पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वातून स्वतंत्र करण्यात आले आहे असा त्याचा अर्थ हाईल. ते मन व शरीराने परिपूर्ण होतील, परादीस त्यांचे गृह होईल आणि परिपूर्णतेचा आनंद लुटण्यासाठी व एकमात्र खरा देव यहोवाबद्दल त्यांची गुणग्राहकता व्यक्त करण्यासाठी त्यांना अनंतकाळचे जीवन लाभेल. हे सर्व काही कसे शक्य झाले? देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या खंडणी बलिदानाद्वारे.
१८. मार्च २३ सूर्यास्तानंतर, आपण काय करत असू व का?
१८ सा. यु. ३३ च्या निसान १४ रोजी, जेरूसलेममध्ये एका माडीवरील खोलीत, येशूने त्याच्या मृत्यूच्या स्मारकाची स्थापना केली. त्याच्या मृत्यूचा वार्षिक स्मरणोत्सव खऱ्या ख्रिश्चनांच्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना बनली आहे. स्वतः येशूने आज्ञा दिली: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९) १९९७ मध्ये हा स्मारक विधी मार्च २३ (या दिवशी निसान १४ ची सुरवात होते) रोजी सूर्यास्तानंतर होईल. त्या दिवशी या स्मारक विधीला उपस्थित राहण्यापेक्षा इतर कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य असू शकणार नाही.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ देवाने कोणकोणत्या मार्गांनी मानवजातीकरता विपुल प्रीती दाखवली आहे?
◻ आदामाच्या संततीसाठी खंडणी म्हणून एका परिपूर्ण मानवी जीवनाची आवश्यकता का होती?
◻ यहोवाने कोणती मोठी किंमत देऊन खंडणीची तरतूद केली?
◻ खंडणी काय शक्य करते?
[१० पानांवरील चित्र]
देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला