वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ‘पुनर्स्थापनेचा काळ’ अत्यंत समीप!
    टेहळणी बुरूज—२००० | सप्टेंबर १
    • पण हे कार्य काही दिवसांत, काही सप्ताहांत अथवा काही महिन्यांत उरकण्यासारखे नव्हते. त्यासाठी बराच काळ लागणार होता. हे माहीत असूनही शिष्यांनी मागेपुढे न पाहता लगेच हे कार्य हाती घेतले. हे करत असताना राज्याच्या पुनर्स्थापनेची आशा त्यांनी आपल्या मनात प्रज्वलित ठेवली. त्यामुळेच तर पेत्र यरूशलेमेत एक मोठ्या समूहापुढे म्हणू शकला: “तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्‍चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे; आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्‍याला त्याने पाठवावे; सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहंचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे.” (तिरपे वळण आमचे.)—प्रेषितांची कृत्ये ३:१९-२१.

      देवाचे राज्य सुरू होईल तेव्हा सर्व गोष्टी “पूर्वस्थितीला पोहंचण्याचा काळ” येईल. आणि त्यावेळी देवाकडून “विश्रांतीचे समय” येतील. हे पूर्वस्थितीला पोहंचणे अथवा पुनर्स्थापना दोन टप्प्यांत होईल. प्रथम आध्यात्मिकरित्या पुनर्स्थापना होईल जी आजही काही प्रमाणात होत आहे. त्यानंतर, सबंध पृथ्वीची पुनर्स्थापना होईल. याचा अर्थ, एका नवीन सुंदर जगाची पुनर्स्थापना होणार.

  • ‘पुनर्स्थापनेचा काळ’ अत्यंत समीप!
    टेहळणी बुरूज—२००० | सप्टेंबर १
    • येशू ख्रिस्ताच्या आज्ञेनुसार सर्व राष्ट्रांतील लोकांना आध्यात्मिक शिक्षण देण्याचे काम त्यांनी मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे. (मत्तय २८:२०) आणि त्यांचा संदेश ऐकून बऱ्‍याच लोकांनी आपल्या जीवनात मोठे बदल केले हा त्यांच्यासाठी खरोखरच एक सुखद अनुभव आहे. एकेकाळी पाश्‍वी वृत्ती असलेल्या लोकांनी “क्रोध,” “निंदा,” “शिवीगाळ,” आणि यासारख्या इतर वाईट सवयी असलेले आपले जुने व्यक्‍तिमत्त्व काढून टाकले आणि नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण केले आहे. हे नवीन व्यक्‍तिमत्त्व “आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवे केले जात आहे.” अशाप्रकारे संदेष्ट्यांचे हे शब्द आध्यात्मिकदृष्ट्या पूर्ण झाले आणि आताही पूर्ण होत आहेत: “लांडगा [जो मनुष्य पूर्व लांडग्यासारखा वागायचा] कोकराजवळ [नम्र स्वभावाच्या लोकांजवळ] राहील, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील.”—कलस्सैकर ३:८-१०; यशया ११:६, ९.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा