-
‘पुनर्स्थापनेचा काळ’ अत्यंत समीप!टेहळणी बुरूज—२००० | सप्टेंबर १
-
-
पण हे कार्य काही दिवसांत, काही सप्ताहांत अथवा काही महिन्यांत उरकण्यासारखे नव्हते. त्यासाठी बराच काळ लागणार होता. हे माहीत असूनही शिष्यांनी मागेपुढे न पाहता लगेच हे कार्य हाती घेतले. हे करत असताना राज्याच्या पुनर्स्थापनेची आशा त्यांनी आपल्या मनात प्रज्वलित ठेवली. त्यामुळेच तर पेत्र यरूशलेमेत एक मोठ्या समूहापुढे म्हणू शकला: “तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे; आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे; सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहंचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे.” (तिरपे वळण आमचे.)—प्रेषितांची कृत्ये ३:१९-२१.
-
-
‘पुनर्स्थापनेचा काळ’ अत्यंत समीप!टेहळणी बुरूज—२००० | सप्टेंबर १
-
-
पेत्राने त्या जनसमूहाला म्हटले त्याप्रमाणे, ‘येशूला स्वर्गात राहणे प्राप्त होते.’ याचा अर्थ, आपले राज्य सुरू होण्याआधी येशूला काही समयापर्यंत थांबून राहावे लागणार होते. त्याला १९१४ पर्यंत थांबावे लागले. त्या वर्षी देवाने त्याला राजा म्हणून नियुक्त केले व त्याला सत्ता बहाल केली. याशिवाय, यहोवा देव येशूला ‘पाठवणार’ असेही पेत्राने म्हटले होते. त्याचा अर्थ, यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यात येशू ख्रिस्त एक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. या गोष्टीला लाक्षणिक भाषेत, बायबल म्हणते: “सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र म्हणजे पुसंतान [अर्थात परमेश्वराचे राज्य ज्याचा राजा येशू ख्रिस्त आहे] ती [म्हणजे देवाची स्वर्गीय संघटना] प्रसवली; ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले.”—प्रकटीकरण १२:५.
-