-
“अशिक्षित आणि सर्वसाधारण” माणसंदेवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
-
-
१८. मंडळीतल्या बांधवांनी एकमेकांची कशी मदत केली?
१८ यरुशलेममध्ये नवीनच स्थापन झालेल्या मंडळीत वाढ होऊन पाहता-पाहता त्यांची संख्या ५,००० पेक्षा जास्त झाली.d ते जरी वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे असले तरी ते “एकदिलाने आणि ऐक्याने” राहत होते. त्यांच्या विचारांमध्ये आणि मतांमध्ये एकता होती. (प्रे. कार्यं ४:३२; १ करिंथ. १:१०) त्यांनी त्यांच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देण्याची यहोवाला फक्त विनंतीच केली नाही; तर त्यांनी एकमेकांना आध्यात्मिक रितीने आणि गरज पडली तेव्हा रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठीही मदत केली. (१ योहा. ३:१६-१८) जसं की, योसेफ नावाचा शिष्य ज्याला प्रेषितांनी बर्णबा हे नाव दिलं होतं, त्याने आपली जमीन विकून सर्व पैसे उदारपणे दान केले. इतर ठिकाणांहून आलेले लोक यरुशलेममध्ये जास्त काळ राहू शकतील आणि त्यांच्या नवीन विश्वासाबद्दल आणखी शिकू शकतील, यासाठी हे पैसे वापरण्यात आले.
-
-
“अशिक्षित आणि सर्वसाधारण” माणसंदेवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
-
-
d इ.स. ३३ मध्ये यरुशलेम शहरात फक्त ६,००० परूशी आणि त्याहीपेक्षा कमी सदूकी असावेत. या दोन पंथांनी येशूच्या शिकवणींचा विरोध करण्याचं हेही एक कारण असावं.
-