वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • खरे ख्रिस्ती कोण आहेत हे कसं ओळखायचं?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
    • ३. खरे ख्रिस्ती आज कोणत्या कामात व्यस्त आहेत?

      येशूने आपल्या शिष्यांना एक काम सोपवलं होतं. “त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करायला . . . पाठवलं.” (लूक ९:२) सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी फक्‍त त्यांच्या उपासनेच्या ठिकाणीच नाही, तर इतर सार्वजनिक ठिकाणी आणि लोकांच्या घरोघरी जाऊनही देवाच्या राज्याबद्दल शिकवलं. (प्रेषितांची कार्यं ५:४२; १७:१७ वाचा.) त्याच प्रकारे, आज खरे ख्रिस्तीसुद्धा जिथे जिथे लोक भेटू शकतील अशा सर्व ठिकाणी जाऊन त्यांना बायबलमधली सत्यं सांगतात. त्यांचं लोकांवर प्रेम असल्यामुळे ते बायबलमधला आशेचा आणि सांत्वनाचा संदेश सांगण्यासाठी आपला वेळ आणि शक्‍ती आनंदाने खर्च करतात.—मार्क १२:३१.

  • आनंदाच्या संदेशाचा प्रचार कसा केला जात आहे?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
    • आनंदाच्या संदेशाचा प्रचार कसा केला जात आहे?

      लवकरच यहोवा त्याच्या राज्याद्वारे आपल्या सगळ्या समस्या काढून टाकणार आहे. ही खरंच खूप आनंदाची बातमी आहे आणि ती सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. येशूने आपल्या अनुयायांना सांगितलं की त्यांनी आनंदाचा हा संदेश सगळ्यांना सांगितला पाहिजे. (मत्तय २८:१९, २०) आज यहोवाचे साक्षीदार येशूच्या या आज्ञेचं कशा प्रकारे पालन करत आहेत?

      १. मत्तय २४:१४ मधले शब्द आज कसे पूर्ण होत आहेत?

      येशूने सांगितलं होतं, की “राज्याचा हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल.” (मत्तय २४:१४) हे महत्त्वाचं काम करायला यहोवाच्या साक्षीदारांना खूप आनंद वाटतो. आम्ही जगभरात १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये लोकांना आनंदाचा संदेश सांगत आहोत. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे काम करण्यासाठी खूप मेहनत आणि चांगली योजना करावी लागते. आणि यहोवाच्या मदतीशिवाय हे काम करणं शक्यच नाही.

      २. आम्ही आनंदाचा संदेश लोकांपर्यंत कसा पोहोचवतो?

      आम्हाला जिथे कुठे लोक भेटतात तिथे आम्ही त्यांना आनंदाचा संदेश सांगतो. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांप्रमाणेच आम्हीही “घरोघरी” प्रचार करतो. (प्रेषितांची कार्यं ५:४२) अशा प्रकारे पद्धतशीरपणे प्रचार केल्यामुळे आम्हाला दर वर्षी लाखो लोकांना भेटणं शक्य होतं. पण लोक नेहमी घरी भेटतातच असं नाही. म्हणून आम्ही बऱ्‍याच सार्वजनिक ठिकाणीही प्रचार करतो. खरंतर, यहोवाबद्दल आणि लवकरच तो काय करणार आहे याबद्दल दुसऱ्‍यांना सांगण्यासाठी आम्ही नेहमी संधी शोधत असतो.

      ३. आनंदाच्या संदेशाचा प्रचार करायची जबाबदारी कोणाची आहे?

      आनंदाचा संदेश सांगायची जबाबदारी प्रत्येक खऱ्‍या ख्रिश्‍चनाची आहे. आम्ही ही जबाबदारी खूप गांभीर्याने घेतो. आमच्या प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे आम्ही शक्य होईल तितक्या जास्त प्रमाणात प्रचाराचं काम करतो. कारण हा लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न आहे हे आम्हाला माहीत आहे. (१ तीमथ्य ४:१६ वाचा.) या कामासाठी आम्हाला पैसे मिळत नाहीत. कारण बायबलमध्ये सांगितलंय, “तुम्हाला फुकट मिळालंय, तुम्हीही फुकट द्या.” (मत्तय १०:७, ८) सगळेच लोक आमचा संदेश ऐकतात असं नाही. तरीपण आम्ही हे काम करतच राहतो, कारण प्रचार करणं हा आमच्या उपासनेचा एक भाग आहे आणि त्यामुळे यहोवाला आनंद होतो.

      आणखी जाणून घेऊ या

      जगभरात प्रचार करण्यासाठी आम्ही यहोवाचे साक्षीदार कशी मेहनत घेत आहोत आणि यहोवा आम्हाला कशी मदत करतो याबद्दल जास्त जाणून घेऊ या.

      १. कोस्टारिका इथे डोंगराच्या उतारावर यहोवाचे साक्षीदार एका माणसाला प्रचार करत आहेत. २. अमेरिकेतल्या एका बंदरावर यहोवाचे काही साक्षीदार मच्छिमारांना प्रचार करत आहेत. ३. बेनिनच्या एका गावात दोन यहोवाचे साक्षीदार एका माणसाला प्रचार करत आहेत. ४. थायलंडमधल्या एका तरंगत्या बाजारात एक साक्षीदार एका स्त्रीला प्रचार करत आहे. ५. याप बेटावर मोठ्या दगडी चाकासमोर दोन यहोवाचे साक्षीदार एका स्त्रीला प्रचार करत आहेत. ६. दोन यहोवाचे साक्षीदार स्वीडनमध्ये एका कॅनलजवळ एका स्त्रीला प्रचार करत आहेत.

      जगभरातलं प्रचाराचं काम: (१) कोस्टारिका, (२) अमेरिका, (३) बेनिन, (४) थायलंड, (५) याप बेट, (६) स्वीडन

      ४. सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मेहनत घेतो

      जगातल्या सगळ्या भागांत राहणाऱ्‍या लोकांपर्यंत आनंदाचा संदेश पोहोचवण्यासाठी यहोवाचे साक्षीदार खूप प्रयत्न करतात. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

      व्हिडिओ: “पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत” प्रचार  (७:३३)

      • यहोवाचे साक्षीदार प्रचार कामासाठी जी मेहनत घेतात त्यात तुम्हाला कोणती गोष्ट विशेष वाटते?

      मत्तय २२:३९ आणि रोमकर १०:१३-१५ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

      • आम्ही जे प्रचाराचं काम करतो त्यावरून आमचं लोकांवर प्रेम आहे हे कसं दिसून येतं?

      • जे आनंदाच्या संदेशाचा प्रचार करतात त्यांच्याबद्दल यहोवाला कसं वाटतं?—१५ वं वचन पाहा.

      ५. आम्ही देवाचे सहकारी आहोत

      यहोवा आमच्या प्रचाराच्या कामाचं मार्गदर्शन करत आहे. कितीतरी अनुभवांमधून ही गोष्ट दिसून आली आहे. उदाहरणार्थ, न्यूझीलंड या देशात पॉल नावाचा एक भाऊ दुपारच्या वेळी घरोघरी प्रचार करत होता. तेव्हा त्याला एक स्त्री भेटली. त्याच दिवशी सकाळी, त्या स्त्रीने यहोवाचं नाव घेऊन त्याला प्रार्थना केली होती, की कोणीतरी तिच्या घरी येऊन तिला देवाबद्दल सांगावं. पॉल म्हणतो, “याच्या फक्‍त तीन तासांनंतर, मी तिच्या दारावर उभा होतो.”

      १ करिंथकर ३:९ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

      • न्यूझीलंडच्या आणि इतरही अनुभवांवरून कसं दिसून येतं, की यहोवा आज प्रचार कामाचं मार्गदर्शन करत आहे?

      प्रेषितांची कार्यं १:८ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

      • प्रचाराचं काम पूर्ण करण्यासाठी यहोवाच्या मदतीची गरज का आहे?

      तुम्हाला माहीत होतं का?

      आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या आमच्या सभेत, प्रचार कसा करायचा हे शिकवलं जातं. तुम्ही जर या सभांना गेला असाल, तर तिथे शिकवलेल्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या?

      मंडळीच्या सभेत दोन साक्षीदार आनंदाच्या संदेशाचा प्रचार कसा करायचा याचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत.

      ६. देवाने आज्ञा दिली असल्यामुळे आम्ही प्रचार करतो

      पहिल्या शतकात विरोधकांनी येशूच्या अनुयायांना प्रचार करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला. पण सुरुवातीचे ते ख्रिस्ती, प्रचार करायच्या आपल्या हक्कासाठी लढले आणि त्यांनी ‘आनंदाच्या संदेशाला कायदेशीर मान्यता’ मिळवून दिली. (फिलिप्पैकर १:७) आज यहोवाचे साक्षीदारपण तेच करतात.a

      व्हिडिओ पाहा.

      व्हिडिओ: आनंदाच्या संदेशाचं कायदेशीर समर्थन  (२:२८)

      प्रेषितांची कार्यं ५:२७-४२ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

      • साक्षीदार कधीही प्रचार करण्याचं का थांबवणार नाहीत?—२९, ३८ आणि ३९ ही वचनं पाहा.

      कदाचित कोणी विचारेल: “यहोवाचे साक्षीदार घरोघरी का जातात?”

      • तुम्ही काय उत्तर द्‌याल?

      थोडक्यात

      येशूने आपल्या अनुयायांना सर्व राष्ट्रांच्या लोकांना जाऊन आनंदाचा संदेश सांगायची आज्ञा दिली होती. हे काम करण्यासाठी आज यहोवा आपल्या लोकांना मदत करत आहे.

      उजळणी

      • आनंदाच्या संदेशाचा प्रचार जगभरात कशा प्रकारे केला जात आहे?

      • आमचं लोकांवर प्रेम आहे हे प्रचाराच्या कामातून कसं दिसून येतं?

      • प्रचाराचं काम केल्यामुळे समाधान मिळतं असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्हाला असं का वाटतं?

      ध्येय

      हेसुद्धा पाहा

      मोठमोठ्या शहरांमध्ये यहोवाचे साक्षीदार प्रचार कसा करतात ते पाहा.

      पैरिस में सरेआम गवाही देने का खास इंतज़ाम  (५:११)

      यहोवाच्या साक्षीदारांनी शरणार्थींना प्रचार करण्यासाठी कोणते प्रयत्न केले आहेत?

      शरणार्थींची आध्यात्मिक तहान भागवणं  (५:५९)

      पूर्ण वेळेच्या सेवेमुळे किती समाधान मिळतं हे जाणून घ्या.

      हे करिअर निवडल्याचं मला समाधान आहे  (६:२९)

      काही महत्त्वाच्या खटल्यांमध्ये मिळालेल्या विजयामुळे प्रचाराचं काम कसं वाढलं ते जाणून घ्या.

      “राज के प्रचारक अदालत का दरवाज़ा खटखटाते हैं” (परमेश्‍वर का राज हुकूमत कर रहा हैं!,  अध्याय १३)

      a प्रचाराचं काम करण्याची आज्ञा देवाने दिली आहे. म्हणून, यहोवाच्या साक्षीदारांना आनंदाचा संदेश इतरांना सांगण्यासाठी मानवी अधिकाऱ्‍यांच्या परवानगीची गरज नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा