वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १२/१ पृ. २४-२९
  • यहोवा आमचा अधिपती आहे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आमचा अधिपती आहे!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशू साक्षीदारांना आज्ञा देतो
  • यहोवा निवड करतो
  • पवित्र आत्म्याने भरले गेले!
  • पेत्र थरारक साक्ष देतो
  • यहोवा वृद्धी देतो
  • बरे करणे व त्याचा परिणाम
  • ते थांबणार नव्हते!
  • प्रार्थना ऐकली गेली!
  • लबाडांना उघड केले गेले
  • माणसापेक्षा देवाची आज्ञा पाळावी
  • “अशिक्षित आणि सर्वसाधारण” माणसं
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • कोणतीच गोष्ट त्यांना थांबवू शकत नव्हती
    बायबलमधून शिकू या!
  • कोणाच्या व कशाच्या नावाने बाप्तिस्मा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • तुम्ही कोणाच्या आज्ञा मानता—देवाच्या की मनुष्याच्या?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १२/१ पृ. २४-२९

यहोवा आमचा अधिपती आहे!

“आम्ही मनुष्यांपेक्षा देवाला आपला अधिपती मानून त्याची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रे. कृत्ये ५:२९

१, २. जेव्हा लोक ईश्‍वरी ईच्छेच्या विरोधात आपल्या मागण्या सादर करतात तेव्हा यहोवाचे साक्षीदार कोणती प्रेषितीय भूमिका ग्रहण करतात?

ते १२ लोक उच्च न्यायालयापुढे उभे होते. यहोवाने तसे होण्यास परवानगी दिली होती. ते वर्ष इ. स. ३३ होते व ते न्यायालय यहुदी सन्हेद्रीन होते. येथे येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांची चौकशी सुरु होती. ऐका! ‘या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला सांगितले होते,’ प्रमुख याजकाने म्हटले, ‘तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे.’ तेव्हा पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिलेः “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाला आपला अधिपती मानून त्याची आज्ञा मानली पाहिजे.” (प्रे. कृत्ये ५:२७-२९) ते जणू हेच म्हणाले की, “यहोवा आमचा अधिपती आहे!”

२ होय, यहोवा हा येशूच्या खऱ्‍या अनुयायांचा अधिपती आहे. हे प्रेषितांची कृत्ये या पवित्र शास्त्र पुस्तकात स्पष्ट केले गेले आहे. हे पुस्तक इ. स. ६१ च्या सुमाराला रोममध्ये “प्रिय वैद्य लूक” याने लिहिले. (कलस्सैकर ४:१४) आजही, जेव्हा मानवी मागण्या ह्‍यांचे देवाच्या इच्छेशी दुमत होते तेव्हा यहोवाचे लोक प्रेषितांप्रमाणेच यहोवाला आपला स्वर्गीय अधिपती मानून त्याच्या आज्ञा पाळतात. तथापि, या प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून आपल्याला आणखी काय शिकायला मिळू शकते? (आपला व्यक्‍तीगत अभ्यास करताना आम्ही आपल्याला हे सुचवितो की, येथे या पुस्तकातील जी वचने ठळक अक्षरात दाखविण्यात आली आहेत ती तुम्ही काढून वाचावीत.)

येशू साक्षीदारांना आज्ञा देतो

३. येशूच्या अनुयायांचा “पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा” केव्हा झाला व त्यानंतर त्यांचे मुख्य लक्ष्य कोणते होते?

३ प्रेषितांची आध्यात्मिक दृष्ट्या मजबूती झाल्यामुळेच त्यांना देवासाठी हा इतका दृढ पवित्र घेता आला. ख्रिस्त वधस्तंभावर मृत्यु पावला होता, पण त्याचे पुनरुत्थान झाले आहे हे या प्रेषितांना ठाऊक होते. (१:१-५) येशूनेही “आपण जिवंत आहो हे दाखविले,” आणि वेगवेगळ्या रुपांतरीत शरीरात त्याने ४० दिवस आपल्या शिष्यांना राज्याविषयीची सत्ये शिकविली. त्याने या प्रेषितांना यरुशलेमात “पवित्र आत्म्या”चा बाप्तिस्मा व्हावा म्हणून थांबण्यास सांगितले. त्यानंतर प्रचार हे त्यांचे मुख्य लक्ष्य असणार होते, व हेच आज यहोवाच्या साक्षीदारांचे आहे.—लूक २४:२७, ४९; योहान २०:१९–२१:२४.

४. येशूच्या अनुयायांवर पवित्र आत्मा आल्यानंतर काय होणार होते?

४ त्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होण्याआधी त्यांनी हा चुकीचा विचार धरला होता की, पृथ्वीवरील राजवट रोमी सत्तेचा अंत करील; आणि याच कारणामुळे त्यांनी विचारलेः “प्रभुजी, ह्‍याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?“ (१:६-८) येशूने नाही, असे म्हटले; कारण ‘काळ व समय जाणणे हे त्यांच्या स्वाधीन नव्हते.’ ‘पवित्र आत्मा त्यांच्यावर आल्यानंतर,’ तो त्यांना पृथ्वीवरील नव्हे तर, देवाच्या स्वर्गीय राज्याविषयी साक्ष देण्यास सबळ करणार होता. ते यरुशलेम, यहूदीया, व शमरोन तसेच “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” प्रचार करणार होते. या शेवटल्या काळी यहोवाचे साक्षीदार आत्म्याच्या मदतीनेच अशा प्रकारातील काम पृथ्वीच्या परिघावर सर्वत्र करीत आहेत.

५. येशू जसा गेला तसाच परत कसा येणार होता?

५ आपले स्वर्गारोहण होण्याआधी येशूने जगभरात प्रचार करा अशी आज्ञा शिष्यांना दिली होती. मग, त्याला त्याच्या शिष्यांमधून वर घेण्यात आले व मग तो नंतर आपल्या स्वर्गीय अधिपतीच्या सम्मुख आला आणि आत्मिक क्षेत्रातील कार्यहालचालीत दाखल झाला. (१:९-११) येशूला एका मेघाने प्रेषितांच्या दृष्टीआड केल्यावर त्याने आपले रुपांतरीत शरीर सोडून दिले. दोन देवदूत दिसले व म्हणाले की, तो ‘त्याच पद्धतीने येईल.’ आणि तसेच झाले. येशूच्या शिष्यांनी त्याला जाताना पाहिले आणि आता केवळ यहोवाचे साक्षीदार त्याच्या अदृश्‍य स्थितीतील पुनरागमन झालेले ओळखत आहेत.

यहोवा निवड करतो

६. यहुदा इस्कर्योतच्या बदलीत कोणाची निवड झाली?

६ लवकरच प्रेषित यरुशलेमास परतले. (१:१२-२६) माडीवरल्या खोलीत (जे बहुधा मार्कची आई मरीया हिचे घर असावे), ११ निष्ठावंत प्रेषित येशूचे दूधभाऊ, त्याचे इतर शिष्य व त्याची आई मरीया यांजसोबत प्रार्थनेत मग्न झाले. (मार्क ६:३; याकोब १:१) पण यहुदाच्या “देखरेखीचा हुद्दा” कोणाला मिळणार होता? (स्तोत्रसंहिता १०९:८) त्यावेळी १२० शिष्य जमले असताना देवाने प्रेषितांची १२ ही संख्या पूर्ण राखावी म्हणून एकाला येशूचा विश्‍वासघाती यहुदा याच्या जागेवर नियुक्‍त केले. हा माणूस येशूच्या उपाध्यपणाच्या काळातील शिष्य तसेच त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी असणे जरुरीचे होते. तसेच या माणसाने यहोवाला आपला अधिपती असे खरेपणाने मानायचे होते. प्रार्थना झाल्यावर मत्थिया व योसेफ बर्सबा यांच्या नावाच्या चिठ्या काढल्या. तेव्हा देवाने मत्थियाची चिठ्ठी निघू दिली.—नीतीसूत्रे १६:३३.

७, (अ) यहुदाने “आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत कसे विकत घेतले”? (ब) यहुदाचा मृत्यु कसा घडला?

७ यहुदा ईस्कर्योतने यहोवाला आपला अधिपती असे खरेपणाने मानले नव्हते. त्याने तर केवळ ३० चांदीच्या तुकड्यासाठी देवाच्या पुत्राचा विश्‍वासघात केला होता. यहुदाने ते पैसे प्रमुख याजकाला परत दिले, पण पेत्र म्हणाला की, या विश्‍वासघातक्याने “आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत विकत घेतले.” ते कसे काय? वस्तुतः त्याने ते पैसे दिले आणि त्यामागील कारण हे “रक्‍ताचे शेत” विकत घेणे हे झाले. हे शेत हिन्‍नोम दरीच्या दक्षिण भागाकडे आहे. यहुदाने आपल्या स्वर्गीय अधिपत्याबरोबर आपले नाते भंगविले व स्वतःला “गळफास लावला.” (मत्तय २७:३-१०) जेथे गळफास घेतला ते झाड किंवा ती दोरी तुटली असावी व डोंगराच्या कोपराला ‘तो पालथा पडला आणि त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली.’ असा हा खोटा बंधू आम्हापैकी कोणीही न होवो!

पवित्र आत्म्याने भरले गेले!

८. येशूच्या शिष्यांचा पवित्र आत्म्याने केव्हा बाप्तिस्मा झाला व कोणता परिणाम घडला?

८ आता पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होण्याच्या अभिवचनाविषयी काय? तो इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या वेळी, म्हणजे येशूचे स्वर्गारोहण झाल्यावर दहा दिवसांनी घडला. (२:१-४) बाप्तिस्म्याचा हा प्रसंग केवढा थरारक होता! त्यावेळेचा जरा विचार करा. १२० शिष्य वरच्या खोलीत असताना ‘अकस्मात वाऱ्‍याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व तो घरभर भरला.’ तो वारा नव्हता पण त्याचा आवाज मात्र वाऱ्‍यासारखा होता. “अग्नी”च्या एक एक जिभा प्रत्येक शिष्य व प्रेषितावर बसल्या. “ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि . . . निरनिराळ्या भाषातून बोलू लागले.” जेव्हा हा बाप्तिस्मा घडला, त्याचवेळी त्यांचा पवित्र आत्म्याने जन्म होऊन अभिषेक झाला व त्यांजवर आध्यात्मिक वतनदारीचा शिक्कामोर्तब केला गेला.—योहान ३:३, ५; २ करिंथकर १:२१, २२; १ योहान २:२०.

९. आत्म्याने भरलेल्या प्रेषितांनी काय सांगितले?

९ यरुशलेमात “आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातून” आलेल्या यहुदी व धर्मांतरीत लोकांवर या घटनेमुळे मोठा प्रभाव घडला गेला. (२:५-१३) ते गोंधळून गेले व त्यांनी विचारलेः “आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे?” ती कदाचित मेदी (यहूदीयाचा पूर्व भाग), फ्रुगिया (आशिया मायनरमधील), आणि रोम (युरोपातील) येथील भाषा असावी. शिष्य विविध भाषेत “देवाची महत्कृत्ये” सांगू लागले तेव्हा श्रोते आश्‍चर्यचकित झाले, पण थट्टेखोर लोक म्हणाले की ते झिंगलेल्या अवस्थेत आहेत.

पेत्र थरारक साक्ष देतो

१०. इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या घटनेने कोणत्या भविष्यवादाची पूर्णता घडवून आणली, आणि याची आधुनिक काळातील काही समांतरता आहे का?

१० पेत्राने आपली साक्ष देण्यास आरंभ केला. तो म्हणाला की सकाळची ही नऊ वाजण्याची वेळ काही पिऊन झिंगण्याची नव्हे. (२:१४-२१) तर ही घडलेली घटना, देवाने आपल्या लोकांवर पवित्र आत्मा ओतण्याचे जे अभिवचन दिले होते त्याची पूर्णता आहे. देवाने पेत्राला प्रेरणेने आमच्या काळाकडे निर्देश करावयास लावून “शेवटल्या काळी” व “ते संदेश देतील,” हे शब्द जोडले. (योएल २:२८-३२) यहोवा आपला भयंकर दिवस आणण्याआधी आकाशात अद्‌भुते व भूमीवर चिन्हे घडवणार होता, आणि जे विश्‍वासाने त्याच्या नावाचा धावा करणार केवळ अशांचाच तो बचाव करणार. आज अभिषिक्‍तांवर अशाच प्रकारच्या आत्म्याचे ओतणे घडल्यामुळे त्यांना मोठ्या शक्‍तीने व प्रभावीपणे “संदेश” देण्यास समर्थ बनविण्यात आले आहे.

११. येशूच्या बाबतीत यहुद्यांनी व देवाने काय केले?

११ पेत्राने यानंतर मशीहाविषयीची ओळख करून दिली. (२:२२-२८) देवाने येशूला महत्कृत्ये, अद्‌भुते व चिन्हे घडवून आणण्यास समर्थ करून त्याच्या मशीहापदाची खात्री दिली. (इब्रीयांस २:३, ४) पण यहुद्यांनी त्याला धरून “अधर्म्यांच्या हातांनी” खांबावर खिळिले. रोमी लोक देवाच्या कायद्यास मानीत नव्हते. येशू “देवाच्या संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार . . . स्वाधीन झाला,” याचा अर्थ हा की, ती ईश्‍वरी इच्छा होती. तथापि, देवाने येशूला मरणातून उठविले, त्याचे मानवी शरीर नष्ट केले ते या पद्धतीने की त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही.—स्तोत्रसंहिता १६:८-११.

१२. दाविदाने कोणती गोष्ट आधीच बघितली, आणि तारण कशावर अवलंबून आहे?

१२ पेत्राने आपली साक्ष चालू ठेविली तशी मशीहाच्या भविष्यवादांना अधिक पुष्टी मिळाली. (२:२९-३६) तो म्हणाला की, दाविदाला आपल्या या सर्वथोर पुत्राचे, येशू मशीहाचे पुनरुत्थान होणार हे आधीच दिसून आले होते. आता स्वर्गात देवाच्या उजव्या हाती उच्चपदावर राहून येशूने त्याला पित्यापासून मिळालेला पवित्र आत्मा ओतिला होता. (स्तोत्रसंहिता ११०:१) पेत्राच्या श्रोत्यांनी, प्रेषितांच्या डोक्यावर अग्नीसारख्या जिव्हा बसताना आणि त्यांनी बोललेली विदेशी भाषा ऐकून त्याचे कार्यवहन ‘पाहिले व ऐकले’ होते. त्याने आणखी म्हटले की, येशूला प्रभु व मशीहा असे स्वीकारल्यामुळे तारणप्राप्ती होणार होती.—रोमकर १०:९; फिलिप्पैकर २:९-११.

यहोवा वृद्धी देतो

१३. (अ) बाप्तिस्मा योग्य प्रकाराने होण्यासाठी यहुदी तसेच धर्मपरिवर्तितांना काय कबूल करण्याची गरज होती? (ब) किती जणांचा बाप्तिस्मा झाला व याचा यरुशलेमात काय परिणाम झाला?

१३ पेत्राचे बोल किती प्रभावी ठरले! (२:३७-४२) श्रोत्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली आणि त्यांनी मशीहाचा वध करण्याची आपली संमती दाखविली होती हे जाणून त्यांचे जणू काळीज चिरले. पेत्राने त्यांना आर्जविलेः “पश्‍चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.” यहुदी व धर्मांतरीत यहुदी हे यहोवाला देव या अर्थी जाणून होते, तसेच ते त्याच्या पवित्र आत्म्याची गरजही ओळखून होते. आता जर त्यांचा पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने (म्हणजे या प्रत्येकाचा दर्जा किंवा कार्य) बाप्तिस्मा व्हावयाचा आहे तर त्यांनी पश्‍चाताप करून येशूला मशीहा म्हणून स्वीकारणे जरूरीचे होते. (मत्तय २८:१९, २०) अशाप्रकारे पेत्राने त्या यहुदी व धर्मपरिवर्तितांना साक्ष देऊन, त्याला येशूने ज्या आध्यात्मिक किल्ल्या दिल्या होत्या त्यातील पहिलीचा वापर केला. ही आध्यात्मिक किल्ली विश्‍वास ठेवणाऱ्‍या यहुद्यांसाठी स्वर्गीय राज्यात प्रवेश करण्याच्या ज्ञानास व संधीला उघडे करणारी होती. (मत्तय १६:१९) त्या एका दिवशी ३,००० लोकांचा बाप्तिस्मा झाला! यरुशलेमाच्या त्या लहानशा क्षेत्रावर यहोवाचे इतके साक्षीदार प्रचार करीत आहेत याची कल्पना करा!

१४. विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांचे “सर्व काही समाईक” का व कोणत्या प्रकारे होते?

१४ आपला मुक्काम अधिक काळ वाढवावा लागल्यामुळे पुष्कळांची शिधासामग्री संपली होती, पण यांची अधिक काळ तेथे राहून आपल्या नव्या विश्‍वासाविषयी आणखी शिकून घेऊन इतरांना प्रचार करण्याची उत्कंठा वाढली होती. या कारणामुळे येशूच्या आरंभीच्या अनुयायांनी एकमेकांची प्रेमळपणे मदत केली, हेच आज यहोवाचे साक्षीदार करीत आहेत. (२:४३-४७) विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांमध्ये तात्पुरते “सर्व काही समाईक होते.” काहींनी आपली मालमत्ता विकली आणि मिळालेल्या पैशांद्वारे गरजवंतांचे साहाय्य केले. अशामुळे मंडळीला चांगली सुरवात लाभली, आणि यहोवानेही ‘तारणप्राप्ती होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घातली.’

बरे करणे व त्याचा परिणाम

१५. पेत्र व योहान मंदिरात जात असता काय घडले व लोकांवर त्याचा कसा प्रभाव पडला?

१५ येशूच्या अनुयायांकरवी “चिन्हे” घडवून यहोवाने त्यांना आपले पाठबळ दिले. (३:१-१०) पेत्र व योहान साधारणपणे दुपारी ३ वाजता मंदिरात, सायंकाळच्या अर्पणाच्या तासाभराच्या प्रार्थनेसाठी आत शिरताना त्यांना सुंदर नावाच्या दरवाजाजवळ जन्मापासून पांगळा असलेला एक माणूस ‘भीक मागत’ असल्याचे दिसले. “माझ्याजवळ सोनेरुपे काही नाही,” असे पेत्राने म्हटले, “पण जे आहे ते तुला देतोः नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग!” तो मनुष्य लागलेच बरा झाला! तो माणूस त्यांच्यासहीत ‘उड्या मारीत व देवाची स्तुती करीत मंदिरात गेला’ तेव्हा लोकांना “फार आश्‍चर्य व विस्मय वाटला.” यापैकी काहींना, “लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील” हे शब्द आठवले असावे.—यशया ३५:६.

१६. त्या पांगळ्या माणसाला प्रेषित कसे बरे करू शकले?

१६ आश्‍चर्यचकित झालेले लोक मंदिराच्या पूर्वभागाला आच्छादित असलेल्या शलमोनाची देवडी या विभागाकडे गोळा झाले. तेथे पेत्राने साक्ष दिली. (३:११-१८) त्याने दाखविले की, देवाने आपला गौरवी सेवक येशूद्वारे प्रेषितांना या पांगळ्या माणसाला बरे करण्याचे सामर्थ्य दिले. (यशया ५२:१३–५३:१२) यहुद्यांनी त्या “पवित्र व नीतीमान” माणसाला नाकारले; तरीही यहोवाने त्याचे पुनरुत्थान केले. लोक व त्यांच्या अधिपतींनी, आपण मशीहाला ठार करीत आहोत हे जाणले नसले, तरी “ख्रिस्ताने दुःख सहन करावे” हे भविष्यवादित शब्द देवाने त्याकरवी पूर्ण केले.—दानीएल ९:२६.

१७. (अ) यहुद्यांनी कोणती हालचाल करायची होती? (ब) आमच्या काळात ‘ख्रिस्ताला पाठविल्यामुळे’ काय घडले?

१७ मशीहाला जी वागणूक यहुद्यांनी दिली होती त्याप्रीत्यर्थ आता त्यांनी काय करावे हे पेत्राने दाखविले. (३:१९-२६) त्यांनी “पश्‍चाताप” करण्याची किंवा आपल्या पापाविषयी दुःख व्यक्‍त करण्याची, मग ‘वळण्याची’ किंवा परिवर्तन होण्याची, उलट दिशा धरण्याची गरज होती. त्यांनी येशूवर मशीहा या नात्याने विश्‍वास ठेवला, त्याच्या खंडणीचा स्वीकार केला तर यहोवाकडून त्यांच्या पातकांची क्षमा घडून त्यांना तजेला मिळणार होता. (रोमकर ५:६-११) ते कराराचे पुत्र आहेत व हा करार देवाने त्यांचा पूर्व अब्राहामाशी केला होता याचे स्मरण यहुद्यांना तेथे देण्यात आले. देवाने अब्राहामाला म्हटले होतेः “तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होती.” या कारणामुळे देवाने पश्‍चातापी यहुद्यांची मुक्‍तता करण्यासाठी आपल्या मशीही सेवकाला पाठविले. याचप्रमाणे १९१४ मध्ये स्वर्गीय राज्यसत्तेत ‘ख्रिस्ताला पाठवून’ देवाने सत्याचे पुनर्वसन तसेच यहोवाच्या साक्षीदारांमध्ये ईश्‍वरशासित संघटन घडवून आणून तजेला दिला.—उत्पत्ती १२:३; १८:१८; २२:१८.

ते थांबणार नव्हते!

१८. यहुदी बांधणाऱ्‍यांनी कोणता “धोंडा” नापसंत केला होता, आणि केवळ कोणाकडून तारण आहे?

१८ पेत्र व योहान यांनी येशूच्या पुनरुत्थानाविषयी प्रचार केला हे ऐकून प्रमुख याजक, मंदिराचे अधिकारी व सदुकी यांना खूप राग आला व त्यांनी त्यांना चौकीत ठेवले. (४:१-१२) सदूक्यांचा पुनरुत्थानावर विश्‍वास नव्हता, पण इतर पुष्कळ जणांनी विश्‍वास ग्रहण केला आणि यामध्ये पुरुषांचीच केवळ संख्या ५,००० होती. यरुशलेमाच्या उच्च न्यायालयात प्रेषितांची चौकशी झाली तेव्हा पेत्राने म्हटले की, ज्याला त्यांनी वधस्तभावर खिळून मारिले, पण ज्याला देवाने पुनरुत्थित केले त्या “नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने” तो मनुष्य बरा झाला होता. यहुदी “बांधणाऱ्‍यांनी” हा “धोंडा” नापसंत केला होता पण तोच आता “कोनशिला” बनला आहे. (स्तोत्रसंहिता ११८:२२) याशिवाय, पेत्र पुढे म्हणालाः “तारण दुसऱ्‍या कोणाकडूनही नाही.”

१९. प्रचार करण्याचे बंद करा असा आदेश दिल्यावर प्रेषितांनी काय उत्तर दिले?

१९ असला प्रचार बंद पाडावा म्हणून प्रयत्न केला गेला. (४:१३-२२) तो बरा झालेला मनुष्य तेथे उपस्थित असल्यामुळे तो झालेला “चमत्कार” नाकारता येत नव्हते; तरीही पेत्र व योहानाला ताकीद देण्यात आली की, ‘येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका.’ तेव्हा यांनी काय उत्तर दिले? ‘आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते न बोलणे आम्हाला शक्य नाही.’ त्यांनी यहोवाला आपला अधिपती मानले होते!

प्रार्थना ऐकली गेली!

२०. शिष्यांनी कशासाठी प्रार्थना केली, व याचा कोणता परिणाम दिसला?

२० यहोवाचे साक्षीदार आपल्या सभेत जशी प्रार्थना म्हणतात, तसेच प्रेषितांनी सुटका झाल्यावर इतर शिष्यांना काय घडले त्याचे वर्तमान कळवल्यावर शिष्यांनी प्रार्थना केली. (४:२३-३१) प्रार्थनेत हे लक्षात आणले गेले की, हेरोद अंतिपा आणि पंतय पिलात हे अधिकारी विदेशी, रोमी तसेच इस्राएल लोकांसमवेत मशीहाविरुद्ध उठले होते. (स्तोत्रसंहिता २:१, २; लूक २३:१-१२) प्रार्थना संपवल्यावर, त्याचे उत्तर म्हणून यहोवाने या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरविले व यामुळे ते देवाचे वचन निर्भिडपणे बोलू लागले. त्यांनी देवाला छळ समाप्त करावा अशी विनवणी केली नाही तर त्यामध्ये धैर्याने प्रचार करण्याचे बळ द्यावे अशी याचना केली.

२१. बर्णबा कोण होता, व त्याच्याठायी कोणते गुण होते?

२१ विश्‍वास ग्रहण केलेले सर्व गोष्टी समाईकपणे घेत, आणि त्यातला कोणीही गरजवंत राहिला नाही. (४:३२-३७) दान करणाऱ्‍यांमध्ये कुप्र येथील योसेफ लेवी हा होता. प्रेषितांनी त्याला, तो मदत देणारा व कनवाळू असल्यामुळे बर्णबा म्हणजे “सांत्वनदायक पुत्र” हे आडनाव दिले. होय, आम्ही सर्वांनीच या व्यक्‍तीसारखे बनण्याची इच्छा धरावी.—प्रे. कृत्ये ११:२२-२४.

लबाडांना उघड केले गेले

२२, २३. हनन्या व सप्पीरा यांनी कोणते पातक केले, आणि त्यांच्या अनुभवाकडून आपण कोणता धडा घेऊन शकतो?

२२ तथापि, हनन्या व त्याची बायको सप्पीरा यांनी यहोवाला आपला अधिपती असे ओळखण्याचे नाकारले. (५:१-११) त्यांनी शेत विकले व काही पैका आपणाजवळ ठेवला, पण प्रेषितांना असे भासविले की, त्यांनी विक्रीचे सर्व पैसे त्यांना दिले आहेत. देवाच्या आत्म्याने पेत्राला ज्ञान दिले व त्यामुळे त्याला त्यांचा ढोंगीपणा दिसून आला. यामुळे त्या दोघांचा मृत्यु घडला. जे सैतानाकरवी कुबुद्धीने वागण्याचा डाव रचतात अशांना केवढा हा इशारा!—नीतीसूत्रे ३:३२; ६:१६-१९.

२३ या घटनेनंतर कोणालाही प्रेषितांना वाईट हेतूने येऊन मिळण्याचे धाडस झाले नाही. इतरांनीही विश्‍वास ग्रहण केला. (५:१२-१६) आजारी तसेच अशुद्ध आत्म्यांकरवी त्रासलेले यांनी देवाच्या सामर्थ्यावर विश्‍वास ठेवला तेव्हा ‘ते सर्व बरे झाले.’

माणसापेक्षा देवाची आज्ञा पाळावी

२४, २५. यहुदी नेत्यांनी प्रेषितांचा छळ का केला, पण त्या विश्‍वासू जणांनी यहोवाच्या सर्व सेवकांसाठी कोणता दर्जा तेथे प्रस्थापित केला?

२४ जी वाढ होत होती तिला सदुकी व प्रमुख याजकाने खीळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्व प्रेषितांना तुरुंगात टाकले. (५:१७-२५) पण त्याच रात्री देवाच्या दूताने त्यांची सुटका केली. सकाळ झाली तेव्हा प्रेषित परत मंदिरात प्रचार करताना दिसले! छळ देवाच्या सेवकांना कधीही थोपवू शकत नाही.

२५ प्रेषितांना परत सन्हेद्रीनपुढे आणण्यात आले तेव्हा त्यांच्यावर दबाव घालण्यात आला. (५:२६-४२) त्यांनी प्रचार थांबवावा असा आदेश दिला गेला, पण प्रेषितांनी म्हटलेः “आम्ही मनुष्यापेक्षा देवास आपला अधिपती मानून त्याची आज्ञा मानली पाहिजे.” अशाप्रकारे येशूच्या शिष्यांसाठी एक दर्जा तेथे प्रस्थापित झाला; तोच आज यहोवाचे साक्षीदार अनुसरीत आहेत. गमलियेल या कायदेपंडिताकडून इशारा मिळाल्यावर धर्मनेत्यांनी प्रेषितांना मार दिला, प्रचार थांबविण्याची ताकीद दिली व सोडून दिले.

२६. प्रेषितांच्या उपाध्यपणाची आजच्या यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याशी कशी तुलना जुळते?

२६ येशूच्या नामासाठी आपण अपमान सहन करण्यास लायक असे गणलो गेलो याविषयी प्रेषितांना धन्यता वाटली. “आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.” होय, त्यांनी घरोघरी सुवार्ता सांगितली. तसेच देवाचे आजचे साक्षीदारही तेच करीत आहेत. यांना त्याचा आत्मा मिळाला आहे, कारण ते “यहोवा आमचा अधिपती आहे!” असे म्हणतात व त्याच्या आज्ञा पाळतात.

तुमचा काय प्रतिसाद असेल?

◻ येशूच्या प्राचीन व अर्वाचीन अनुयायांनी कोणती नेमणूक पूर्ण केली पाहिजे?

◻ इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या वेळी काय घडले?

◻ येशूने दिलेली पहिली आध्यात्मिक किल्ली पेत्राने केव्हा व कोठे वापरली?

◻ हनन्या व सप्पीरा यांच्या अनुभवावरून आपण काय शिकू शकतो?

◻ प्रचार करण्याचे थांबवा असा आदेश दिला गेला तेव्हा प्रेषितांनी यहोवाच्या सर्व साक्षीदारांसाठी कोणता दर्जा घालून दिला?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा