ऑक्टोबर—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
२-८ ऑक्टोबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | दानीएल ७-९
“मसीहा प्रकट होईल अशी भविष्यवाणी दानीएलने केली”
(दानीएल ९:२४) “आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायिश्चत्त करावे, सनातन धार्मिकता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावे आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर यांसंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत.”
इन्साइट-२ पृ. ९०२ परि. २
सत्तर सप्तके
पातकाचा आणि पापाचा अंत. येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान होऊन तो पुन्हा स्वर्गात गेल्यामुळे, आज्ञाभंगाची समाप्ती आणि पातकांचा अंत झाला. त्यासोबतच पापाबद्दल प्रायश्चित्त करण्यात आलं. (दान ९:२४) मोशेच्या नियमशास्त्राने यहुदी लोकांना ते पापी असल्याचं दाखवून दोषी ठरवलं. नियमशास्त्राचं उल्लंघन केल्यामुळे ते शापित ठरले. एकीकडे मोशेच्या नियमशास्त्रामुळे पापांत वाढ झाली होती, म्हणजेच नियमशास्त्राने पापाला उजेडात आणून त्याचा पर्दाफाश केला होता; पण दुसरीकडे, मसीहाद्वारे देवाच्या दयेचा आणि कृपेचा आणखीनच जास्त “वर्षाव” झाला. (रोम ५:२०) मसीहाच्या बलिदानामुळे पश्चात्ताप दाखवणाऱ्या पापी जनांना त्यांच्या पातकांची आणि पापांची माफी मिळणं, आणि त्या अपराधांची शिक्षा रद्द केली जाणं शक्य होतं.
(दानीएल ९:२५) “हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त, अधिपती, असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके लोटल्यावर धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खंदक यांसह बांधतील.”
इन्साइट-२ पृ. ९०० परि. ७
सत्तर सप्तके (वर्षांची)
६९ सप्तकांनंतर मसीहा प्रकट झाला. “बासष्ट सप्तके” (दान ९:२५) सत्तर सप्तकांचाच भाग आहेत. त्यांचा उल्लेख ७ सप्तकांच्यानंतर येतो कारण त्यांची सुरुवात ७ सप्तके संपल्यानंतर होते. म्हणजेच यरुशलेमला पुन्हा बांधण्याची आज्ञा झाल्यापासून “अभिषिक्त अधिपती” (मसीहा) येईपर्यंत ६२ आणि ७ मिळून, एकूण ६९ सप्तके जातील. जर आपण इ.स.पू. ४५५ पासून ही ६९ सप्तके, म्हणजेच ४८३ वर्षं मोजायला सुरुवात केली, तर आपण इ.स. २९ मध्ये येऊन पोचतो. त्या वर्षी म्हणजेच इ.स. २९ मध्ये येशूचा पाण्यात बाप्तिस्मा झाला आणि त्याचा पवित्र आत्म्याने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर त्याने अभिषिक्त अधिपती किंवा मसीहा म्हणून आपल्या सेवेची सुरुवात केली.—लूक ३:१, २, २१, २२.
(दानीएल ९:२६, २७क) “बासष्ट सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल, व त्याला काही उरणार नाही; आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्रस्थान उध्वस्त करतील; त्याचा अंत पुराने होईल; युद्ध अंतापर्यंत चालेल; सर्व काही उजाड होण्याचे ठरले आहे. तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा पक्का करार करील; अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील.”
इन्साइट-२ पृ. ९०१ परि. २
सत्तर सप्तके
७० व्या सप्तकाच्या मध्यात “वध होईल.” गब्रिएल दानीएलला पुढे म्हणाला: “बासष्ट सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल, व त्याला काही उरणार नाही.” (दानीएल ९:२६) ७ आणि ६२ सप्तके संपल्यानंतर काही काळाने, म्हणजेच जवळजवळ साडेतीन वर्षांनंतर, ख्रिस्ताला वधस्तंभावर मारून टाकण्यात आलं. अशा रीतीने त्याने मानवांसाठी खंडणी म्हणून आपल्याजवळ असलेलं सर्वकाही अर्पण केलं. (यश ५३:८) पुराव्यांवरून कळतं, की या ७० व्या सप्तकाच्या सुरुवातीला येशूने आपलं सेवाकार्य केलं. इ.स. ३२ या वर्षी त्याने एक उदाहरण देऊन यहुदी राष्ट्राची तुलना एका अशा अंजिराच्या झाडासोबत केली ज्याला तीन वर्षांपासून फळं आली नव्हती. (पडताळा मत्त १७:१५-२०; २१:१८, १९, ४३.) तेव्हा माळी द्राक्षमळ्याच्या मालकाला म्हणाला: “मालक, आणखी एक वर्ष हे झाड राहू द्या. मी त्याच्याभोवती खणून खत घालीन. जर पुढे त्याला फळ आलं तर ठीक; नाहीतर ते कापून टाका.” (लूक १३:६-९) या उदाहरणात येशू त्याच्या सेवाकार्याच्या कालावधीबद्दल बोलत असावा. त्याने आतापर्यंत जवळजवळ तीन वर्षं प्रचार करूनही यहुदी राष्ट्राने प्रतिसाद दिला नव्हता. यानंतर चौथ्या वर्षाच्या काही काळापर्यंत त्याचं सेवाकार्य चालू राहणार होतं.
इन्साइट-२ पृ. ९०१ परि. ५
सत्तर सप्तके
“अर्ध सप्तक” म्हटलेला काळ सात वर्षांच्या मधोमध, म्हणजेच त्या ७० व्या सप्तकातली साडेतीन वर्षं गेल्यानंतर असणार होता. ७० व्या सप्तकाची सुरुवात इ.स. २९ मध्ये जेव्हा येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचा अभिषेक झाला, तिथून होते. यामुळे या सप्तकाचा अर्धा भाग म्हणजेच साडेतीन वर्षांचा काळ हा इ.स. ३३ च्या वल्हांडण सणापर्यंत (निसान १४) चालला. ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे, तो इ.स. ३३ चा १ एप्रिल हा दिवस असावा. प्रेषित पौलने म्हटलं, की देवाची “इच्छा पूर्ण करण्यासाठी” येशू आला होता. देवाची अशी इच्छा होती, की ‘दुसरे स्थापण्यासाठी पहिले [नियमशास्त्रानुसार असलेली बलिदाने आणि अर्पणे] नाहीसे करावे.’ येशूने आपलं स्वतःचं शरीर बलिदान म्हणून अर्पण देऊन देवाची ही इच्छा पूर्ण केली.—इब्री १०:१-१०.
१६-२२ ऑक्टोबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | होशेय १-७
(होशेय २:१८) “त्या दिवशी इस्राएलांकरता मी वनपशू, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव यांबरोबर करार करीन; देशातून धनुष्य, तरवार युद्ध ही मोडून टाकीन व ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन.”
अवेक!०५ ९/८ पृ. १२ परि. २
संपूर्ण जगात जेव्हा शांती असेल
एक अनोख्या प्रकारची शांती त्या वेळी या पृथ्वीवर असेल. कारण देव स्वतः आपल्या एकनिष्ठ मानवी प्रजेला त्यांच्या घराची, म्हणजेच या पृथ्वीची काळजी कशी घ्यावी हे शिकवेल. तो सर्व हिंस्र प्राण्यांसोबत जणू एक करार करेल. त्यामुळे हे प्राणी मानवांच्या अधीन राहतील आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान करणार नाहीत. —होशेय २:१८; उत्पत्ति १:२६-२८; यशया ११:६-८.
२३-२९ ऑक्टोबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | होशेय ८-१४
“तुमचं सर्वोत्तम यहोवाला अर्पण करा”
(होशेय १४:२) “तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा; त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर; कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू.”
टेहळणी बुरूज०७-E ४/१ पृ. २० परि. २
यहोवाला आनंदित करतील अशी अर्पणं देणं
बायबलमध्ये सांगितलं आहे, की आपण यहोवाची जी स्तुती करतो तीसुद्धा त्याला दिलेल्या अर्पणांसारखी आहे. होशेय संदेष्ट्याने म्हटलं, “आम्ही आपले ओठ वासरे असे अर्पू.” (होशेय १४:२, पं.र.भा.) यावरून कळतं, की आपण आपल्या ओठांनी केलेली देवाची स्तुती, हे त्याच्या दृष्टीने सगळ्यात उत्तम प्रकारचं अर्पण आहे. प्रेषित पौलने इब्री ख्रिश्चनांना असं प्रोत्साहन दिलं: “आपण येशूच्या द्वारे नेहमी देवाला स्तुतीचे बलिदान, म्हणजेच त्याच्या नावाची जाहीर रीत्या घोषणा करणाऱ्या आपल्या ओठांचे फळ अर्पण करू या.” (इब्री लोकांना १३:१५) आज यहोवाचे साक्षीदार आनंदाच्या संदेशाची घोषणा करण्यात आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना बायबलमधून शिकवण्याच्या कार्यात आवेशाने सहभाग घेत आहेत. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) ते सबंध पृथ्वीवर रात्रंदिवस देवाला स्तुतीची अर्पणं देत आहेत.—प्रकटीकरण ७:१५.
(होशेय १४:९) “जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल; परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत; त्यांनी धार्मिक चालतील आणि पातकी त्यांत अडखळून पडतील.”
जेहोवाज डे पृ. ८७ परि. ११
यहोवाच्या उच्च स्तरांप्रमाणे त्याची सेवा करा
होशेय १४:९ हे वचन योग्य मार्गाने चालत राहण्याच्या फायद्यांकडे आपलं लक्ष वेधतं. देवाच्या आज्ञांप्रमाणे चालत राहिल्याने बरेच आशीर्वाद आणि फायदे मिळू शकतात. आपला निर्माणकर्ता या नात्याने यहोवाला आपली घडण माहीत आहे. आपल्याकडून तो ज्या गोष्टींची अपेक्षा करतो, त्या आपल्या भल्यासाठीच असतात. देवासोबत आपल्या नातेसंबंधाबद्दल समजून घेण्यासाठी आपण एक गाडी आणि तिचं उत्पादन करणाऱ्याचं उदाहरण पाहू शकतो. गाडी बनवणाऱ्याला माहीत असतं, की तिची रचना कशा प्रकारे करण्यात आली आहे. गाडीतलं ऑईल वेळोवेळी बदलण्याची गरज आहे, हे त्याला माहीत असतं. पण, गाडी तर नीट चालतेय असा विचार करून जर तुम्ही या सूचनेकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल? गाडीचं इंजिन बिघडून आज ना उद्या ते बंद पडेल. मानवांच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. आपल्या निर्माणकर्त्याने आपल्याला काही आज्ञा दिल्या आहेत. त्यांचं पालन करणं हे आपल्याच फायद्याचं आहे. (यशया ४८:१७, १८) ही गोष्ट जर आपण समजून घेतली, तर आपल्याला त्याच्या स्तरांनुसार जगण्याची, त्याच्या आज्ञांचं पालन करण्याची आणखीनच प्रेरणा मिळेल.—स्तोत्र ११२:१.
३० ऑक्टोबर–५ नोव्हेंबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योएल १-३
“तुमची मुलं आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील”
(योएल २:२८, २९) “यानंतर असे होईल की मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृध्दांस स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील. तुमचे दास व दासी यांवरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन.”
जेहोवाज डे पृ. १६७ परि. ४
“राष्ट्रांमध्ये हे जाहीर करा”
यहोवा देवाने योएल संदेष्ट्याला एका अशा काळाबद्दल सांगितलं, जेव्हा सर्व प्रकारचे लोक देवाचे संदेश सांगतील: “यानंतर असे होईल की मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांस दृष्टान्त होतील.” (योएल २:२८-३२) इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी, यरुशलेममध्ये एका माडीवरच्या खोलीत एकत्र आलेल्या लोकांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव करण्यात आला. यानंतर, ते सर्व “देवाच्या अद्भुत गोष्टींबद्दल” घोषणा करू लागले. तेव्हा प्रेषित पेत्रने योएलच्या भविष्यावाणीतले वरील शब्द त्यांच्या बाबतीत पूर्ण झाले आहेत, असं म्हटलं. (प्रेषितांची कार्ये १:१२-१४; २:१-४, ११, १४-२१) आता आपल्या काळाचा विचार करा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून योएलच्या भविष्यवाणीची मोठ्या प्रमाणात पूर्णता होत आहे. तेव्हापासून, आत्म्याने अभिषिक्त झालेल्या ख्रिस्ती स्त्रीपुरुषांनी, वृद्धांनी आणि तरुणांनी “देवाच्या अद्भुत गोष्टींबद्दल,” “संदेश” सांगायला सुरुवात केली. देवाचं राज्य आता स्वर्गात स्थापन झालं आहे या आनंदाच्या संदेशाचाही यात समावेश आहे.