-
‘देवाच्या महत्कृत्यांनी’ प्रेरितटेहळणी बुरूज—२००२ | ऑगस्ट १
-
-
कार्य करण्याकरता उत्प्रेरित!
४. योएलची कोणती भविष्यवाणी सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी पूर्ण झाली?
४ पवित्र आत्मा मिळाल्यावर जेरुसलेममधील शिष्यांनी जराही उशीर न करता इतरांना ही तारणाची सुवार्ता सांगितली. त्या सकाळी तेथे जमलेल्या लोकांपासूनच त्यांनी सुरवात केली. त्यांच्या प्रचार कार्यामुळे एका उल्लेखनीय भविष्यवाणीची पूर्णता झाली, जी पथूएलाचा पुत्र योएल याने आठ शतकांआधी अभिलिखित केली होती: ‘मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील. तुमचे दास व दासी यांवरही, परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन.’—योएल १:१; २:२८, २९, ३१; प्रेषितांची कृत्ये २:१७, १८, २०.
५. पहिल्या शतकातील ख्रिश्चन कोणत्या अर्थाने संदेष्टे होते? (तळटीप पाहा.)
५ याचा अर्थ परमेश्वर भविष्यातील घटना भाकीत करण्यासाठी दावीद, योएल आणि दबोरा यांच्याप्रमाणे स्त्री व पुरुष संदेष्ट्यांची एक सबंध पिढी निर्माण करणार होता का? नाही. ख्रिस्ती ‘पुत्र व कन्या, दास व दासी’ यांना यहोवाने केलेल्या आणि पुढेही तो करील अशा ‘महत्कृत्यांविषयी’ घोषणा करण्यास त्याच्या आत्म्याद्वारे प्रेरित केले जाणार होते; या अर्थाने ते संदेश देणार होते. त्याअर्थी ते परात्पर देवाच्या वतीने बोलणार होते.a पण लोकांनी त्यांच्या संदेशाला कसा प्रतिसाद दिला?—इब्री लोकांस १:१, २.
-
-
‘देवाच्या महत्कृत्यांनी’ प्रेरितटेहळणी बुरूज—२००२ | ऑगस्ट १
-
-
a यहोवाने मोशे व अहरोन यांना आपल्या लोकांच्या वतीने फारोशी बोलण्याकरता नियुक्त केले, तेव्हा त्याने मोशेला सांगितले: “तुला मी फारोचा देव करितो; आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल.” (तिरपे वळण आमचे.) (निर्गम ७:१) अहरोन एक संदेष्टा होता, भविष्य भाकीत करण्याच्या अर्थाने नव्हे तर मोशेचा प्रवक्ता म्हणून तो कार्य करत होता या अर्थाने.
-