-
‘आत्म्यात आवेशी असा’टेहळणी बुरूज—२००९ | ऑक्टोबर १५
-
-
९. पौल अभिषिक्त ख्रिश्चनांची तुलना शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांशी का करतो?
९ रोमकर १२:४, ५, ९, १० वाचा. पौल अभिषिक्त ख्रिश्चनांची तुलना शरीराच्या निरनिराळ्या अवयवांशी करतो, जे मस्तक असलेल्या ख्रिस्ताच्या अधीन राहून ऐक्याने सेवा करतात. (कलस्सै. १:१८) आत्म्याने अभिषिक्त असलेल्या या ख्रिश्चनांना तो याची आठवण करून देतो, की शरीरात अनेक अवयव असले आणि ते सर्व वेगवेगळी कार्ये करत असले, तरीसुद्धा ते “पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर” आहेत. इफिसस येथील अभिषिक्त ख्रिश्चनांनाही पौलाने अशाच प्रकारचा सल्ला दिला: “आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे. त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे, सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते, आणि प्रत्येक अंग आपआपल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धि करून घेते.”—इफिस. ४:१५, १६.
-
-
‘आत्म्यात आवेशी असा’टेहळणी बुरूज—२००९ | ऑक्टोबर १५
-
-
११. आपले ऐक्य कशामुळे शक्य होते आणि पौलाने आणखी कोणता सल्ला दिला?
११ अशा प्रकारचे ऐक्य प्रेमामुळे शक्य होते, जे “पूर्णता करणारे बंधन” आहे. (कलस्सै. ३:१४) रोमकरांस पत्रातील १२ व्या अध्यायात पौल या गोष्टीवर भर देतो. तो म्हणतो, की आपल्या प्रेमात “ढोंग नसावे” आणि “बंधुप्रेमाच्या बाबतीत” आपण “एकमेकांना खरा स्नेहभाव” दाखवला पाहिजे. असे केल्यामुळे आपल्या मनात एकमेकांबद्दल आदर निर्माण होईल. प्रेषित पौल म्हणतो: “तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” पण, मंडळीची शुद्धता कायम राखण्याच्या बाबतीत आपण कोणतीही तडजोड करू नये. भावनांच्या आहारी जाणे म्हणजे प्रेम नाही हे आपण आठवणीत ठेवले पाहिजे. प्रेमाविषयी सल्ला देताना पौल म्हणतो: “वाइटाचा वीट माना; बऱ्याला चिकटून राहा.”
-