वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १/१५ पृ. १५-२०
  • उल्लसित अंतःकरणाने यहोवाची सेवा करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उल्लसित अंतःकरणाने यहोवाची सेवा करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “उल्हासित [अंतःकरणाने]” सेवा कशी करावी
  • उल्हास नसतो त्यावेळी
  • उल्हासाने थांबून राहणे
  • छळ असतानाही उल्हास
  • ‘हर्षाने यहोवाची सेवा करा’
  • तुमच्या आशेने हर्षित व्हा
  • आनंद—देवाकडून मिळवता येणारा गुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • यहोवाविषयीचा आनंद आपला आश्रयदुर्ग आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवाची सेवा आनंदाने करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • “परमेश्‍वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १/१५ पृ. १५-२०

उल्लसित अंतःकरणाने यहोवाची सेवा करा

“हे सर्व शाप तुला लागतील . . . कारण . . . तू आनंदाने व उल्हासित [अंतःकरणाने] आपला देव परमेश्‍वर [यहोवा, NW] ह्‍याची सेवा केली नाही.”—अनुवाद २८:४५-४७.

१. यहोवाची सेवा करणारे कोठेही त्याची सेवा करत असले, तरी उल्लसित आहेत याचा काय पुरवा आहे?

यहोवाचे सेवक त्याची इच्छा स्वर्गात किंवा पृथ्वीवर कोठेही करत असले तरी उल्लसित आहेत. पृथ्वीचा पाया घातला तेव्हा देवदूतीय ‘प्रभातनक्षत्रांनी’ उल्लसित होऊन जयजयकार केला आणि स्वर्गीय देवदूतांची अयुते उल्हासाने ‘देवाच्या वचनाप्रमाणे चालतात’ यात काहीच शंका नाही. (ईयोब ३८:४-७; स्तोत्र १०३:२०) यहोवाचा एकुलता एक पुत्र स्वर्गात एक “कुशल कारागीर” होता आणि पृथ्वीवर येशू ख्रिस्त या मानवाच्या रुपात ईश्‍वरी इच्छा करण्यात त्याला आनंद प्राप्त झाला. त्याशिवाय, “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.”—नीतीसूत्रे ८:३०, ३१; इब्रीयांस १०:५-१०; १२:२.

२. इस्राएल लोकांनी आशीर्वाद अनुभवले की शाप अनुभवले हे कशावरून ठरवण्यात आले?

२ इस्राएल लोकांनी देवाला संतुष्ट केले तेव्हा ते उल्लसित झाले. परंतु त्यांनी त्याचा आज्ञाभंग केल्यास काय? त्यांना इशारा दिला होता: “तुझ्यावर व तुझ्या संततीवर हे शाप निरंतर चिन्ह व विस्मय असे होतील. कारण सर्व गोष्टींची समृद्धि असताना तू आनंदाने व उल्लसित [अंतःकरणाने] आपला देव [यहोवा] ह्‍याची सेवा केली नाही, म्हणून तू भुकेला, तान्हेला, नग्न आणि सर्व बाबतीत गरजवंत होऊन, ज्या तुझ्या शत्रुंना [यहोवा] तुझ्यावर पाठवील त्यांचे तुला दास्य करावे लागेल; तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जूं ठेवील.” (अनुवाद २८:४५-४८) आशीर्वाद आणि शाप यांनी यहोवाचे सेवक कोण होते आणि कोण नव्हते हे स्पष्ट केले. या शापांमुळे, देवाची तत्त्वे व उद्देश यांना थट्टेवारी नेले जाऊ शकत नाही किंवा त्यांना तुच्छ लेखले जाऊ शकत नाही हे देखील निश्‍चित केले गेले. यहोवाने नाशाबद्दल आणि अरण्यवासाबद्दल दिलेल्या इशाऱ्‍यांकडे इस्राएल लोकांनी लक्ष देण्याचे नाकारल्यामुळे, जेरूसलेम “पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शापमूलक” असे झाले. (यिर्मया २६:६) यास्तव आपण देवाची आज्ञा पाळू या आणि त्याची कृपा उपभोगत राहू या. धार्मिक जण अनुभवणाऱ्‍या पुष्कळ ईश्‍वरी आशीर्वादांपैकी उल्हास हा एक आहे.

“उल्हासित [अंतःकरणाने]” सेवा कशी करावी

३. लाक्षणिक अंतःकरण काय आहे?

३ इस्राएल लोकांना “आनंदाने व उल्लसित [अंतःकरणाने]” यहोवाची सेवा करावयाची होती. देवाच्या आधुनिक दिवसातील सेवकांनीही तसेच केले पाहिजे. उल्हास करणे म्हणजे, “खूष असणे; आनंदी असणे.” शास्त्रवचनांमध्ये शारीरिक अंतःकरणाचा उल्लेख केला आहे, तरी ते प्रत्यक्षात विचार किंवा तर्क करीत नाही. (निर्गम २८:३०) शरीराच्या पेशींचे पोषण करणारे रक्‍त पुरवणे हे त्याचे प्रमुख कार्य आहे. तथापि, बहुतांश उल्लेखांमध्ये, बायबल लाक्षणिक अंतःकरणाला सूचित करते. ते स्नेह, चेतना आणि बुद्धी यांचे केंद्र असण्यापेक्षाही अधिक आहे. ते “सामान्यपणे केंद्र भागासाठी, अंतरंगासाठी आणि आंतरिक मनुष्य त्याच्या इच्छा, प्रेम, भावना, वासना, उद्देश, त्याचे विचार, आकलन, कल्पना, त्याची बुद्धी, ज्ञान, कला, त्याचे विश्‍वास आणि तर्क, त्याची स्मरणशक्‍ती आणि जाणीव या विविध कार्यहालचालींमध्ये स्वतःला प्रदर्शित करत असण्याला सूचित होत असल्याचे म्हटले जाऊ शकते.” (बायबल साहित्य आणि विवरण संस्थेचे नियतकालिक, १८८२, पृष्ठ ६७) आपल्या लाक्षणिक अंतःकरणात संवेदना आणि भावना तसेच उल्हास यांचा समावेश होतो.—योहान १६:२२.

४. यहोवा देवाची सेवा उल्लसित अंतःकरणाने करण्यासाठी आपल्याला काय मदत करू शकते?

४ यहोवाची सेवा उल्लसित अंतःकरणाने करण्यास आपल्याला काय मदत करू शकते? आपल्या आशीर्वादांचा आणि देवाने प्रदान केलेल्या विशेषाधिकारांचा सकारात्मक आणि कृतज्ञतापूर्वक दृष्टिकोन मदतदायक आहे. उदाहरणार्थ, खऱ्‍या देवाची ‘पवित्र सेवा’ करण्याच्या आपल्या विशेषाधिकाराबद्दल आपण उल्हासाने विचार करू शकतो. (लूक १:७५) त्यासोबतच यहोवाचे साक्षीदार या नात्याने त्याचे नाव धारण करण्याचा विशेषाधिकार आहे. (यशया ४३:१०-१२) देवाच्या वचनाचे अनुकरण केल्याने आपण त्याला संतुष्ट करीत आहोत हे जाणण्याच्या उल्हासाची भर आपण त्यात घालू शकतो. तसेच आध्यात्मिक प्रकाश परावर्तीत करण्यात आणि अशाप्रकारे पुष्कळांना अंधकारातून बाहेर येण्यास मदत करण्यात किती उल्हास आहे!—मत्तय ५:१४-१६; पडताळा १ पेत्र २:९.

५. ईश्‍वरी उल्हासाचा उगम काय आहे?

५ तरीसुद्धा, यहोवाची सेवा उल्लसित अंतःकरणाने करणे यात केवळ सकारात्मक पद्धतीने विचार करणेच गोवलेले नाही. दृष्टिकोनात सकारात्मक असणे फायदेकारक आहे. परंतु ईश्‍वरी उल्हास व्यक्‍तिमत्वाच्या विकासाद्वारे उत्पन्‍न केली जाणारी गोष्ट नाही. ते यहोवाच्या आत्म्याचे फळ आहे. (गलतीकर ५:२२, २३) आपल्याजवळ अशाप्रकारचा उल्हास नसल्यास, देवाच्या आत्म्याला दुःखित करील अशा अशास्त्रवचनीय पद्धतीचा विचार किंवा कृती करण्याचे टाळण्यासाठी आपल्याला काही तडजोडी करण्याची आवश्‍यकता असेल. (इफिसकर ४:३०) तथापि, यहोवाला समर्पित असलेले या नात्याने काही प्रसंगी मनःपूर्वक उल्हासाचा अभाव हा ईश्‍वरी अस्वीकृतीचा पुरावा आहे असे भय आपण बाळगू नये. आपण अपरिपूर्ण आहोत आणि दुःख, खिन्‍नता व कधीकधी औदासिन्य अनुभवतो, पण यहोवा आपली स्थिती जाणतो. (स्तोत्र १०३:१०-१४) यास्तव, आपण त्याच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करू या व हे लक्षात ठेवू या की, त्याच्या उल्हासाचे फळ देवाकडून आहे. आपला प्रेमळ स्वर्गीय पिता अशा प्रार्थनांचे उत्तर देईल आणि उल्लसित अंतःकरणाने त्याची सेवा करण्यास समर्थ करील.—लूक ११:१३.

उल्हास नसतो त्यावेळी

६. देवाला करत असलेल्या आपल्या सेवेत उल्हास नसेल, तर आपण काय केले पाहिजे?

६ आपल्या सेवेत उल्हास नसेल तर, यहोवाची सेवा करण्यातील आपला आवेश नाहीसा होऊ शकतो किंवा त्याला अविश्‍वासू देखील होऊ शकतो. यास्तव, नम्रपणे व प्रार्थनापूर्वकतेने आपल्या हेतूंबद्दल विचार करणे आणि आवश्‍यक बदल करणे सुज्ञतेचे ठरेल. देवाने प्रदान केलेला उल्हास असण्यासाठी, आपण प्रेमामुळे आणि संपूर्ण अंतःकरणाने, जीवाने व मनाने त्याची सेवा केली पाहिजे. (मत्तय २२:३७) आपण स्पर्धात्मक मनोवृत्तीने सेवा करू नये, कारण पौलाने लिहिले: “आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.” (गलतीकर ५:२५, २६) इतरांपेक्षा श्रेष्ठ असण्यासाठी किंवा स्तुती मिळवण्यासाठी आपण सेवा करत असलो, तर आपल्याजवळ खरा उल्हास नसेल.

७. आपण आपल्या अंतःकरणाचा उल्हास पुन्हा प्रज्वलित कसा करू शकतो?

७ यहोवाला केलेल्या समर्पणानुरुप कार्य करण्यामध्ये एक उल्हास आहे. आपण देवाला नव्याने समर्पित झालो होतो तेव्हा, आपण ख्रिस्ती जीवनाच्या मार्गाचा आवेशाने आरंभ केला होता. आपण शास्त्रवचनांचा अभ्यास केला आणि सभांमध्ये नियमितरित्या सहभाग घेतला. (इब्रीयांस १०:२४, २५) या गोष्टीने आपल्याला सेवेत सहभाग घेण्यासाठी उल्लसित केले. परंतु, आपला उल्हास नाहीसा झाला असल्यास काय? बायबल अभ्यास, सभांची उपस्थिती, सेवाकार्यात सहभाग—खरे म्हणजे, ख्रिस्ती विश्‍वासाच्या प्रत्येक पैलूतील सहभागितेने—आपल्या जीवनाला आध्यात्मिक स्थैर्यता दिली पाहिजे आणि सुरवातीला असणारे प्रेम तसेच पूर्वीचे उल्लसित अंतःकरण या दोन्ही गोष्टी दिल्या पाहिजेत. (प्रकटीकरण २:४) मग आपण काहीसे उदासीन आणि बहुतेकवेळा आध्यात्मिक साहाय्याची आवश्‍यकता असलेल्यांप्रमाणे नसू. मदत देण्यासाठी वडील आनंदी आहेत परंतु आपण व्यक्‍तिगतपणे देवाला केलेले समर्पण पूर्ण केले पाहिजे. आपल्यासाठी इतर कोणीही हे करू शकत नाही. यास्तव, यहोवाला केलेले समर्पण पूर्ण करण्यासाठी आणि खरा उल्हास मिळवण्यासाठी आपण सर्वसामान्य ख्रिस्ती नित्यक्रम अनुसरण्याचे ध्येय ठेवू या.

८. आपल्याला उल्लसित राहावयाचे आहे तर शुद्ध विवेक महत्त्वाचा का आहे?

८ आपल्याला देवाच्या आत्म्याचे फळ असणारा उल्हास मिळवावयाचा असल्यास, आपल्याठायी शुद्ध विवेक असला पाहिजे. इस्राएलचा दावीद राजा आपले पाप झाकून टाकण्याचा प्रयत्न करेपर्यंत दुःखित होता. वस्तुतः, त्याच्या जीवनातील ओलावा जणू सुकून गेला होता आणि तो शारीरिकरित्या आजारी झाला असावा. पश्‍चात्ताप आणि कबूली दिल्यावर त्याला किती दिलासा मिळाला! (स्तोत्र ३२:१-५) आपण कोणतेही गंभीर पाप लपवत असू तर आपण उल्लसित राहू शकत नाही. त्यामुळे आपण निश्‍चितच त्रस्त जीवन व्यतीत करू. नक्कीच, उल्हास अनुभवण्याचा तो मार्ग नाही. परंतु कबुली आणि पश्‍चात्ताप केल्याने दिलासा मिळतो व उल्लसित आत्मा पूर्ववत होतो.—नीतीसूत्रे २८:१३.

उल्हासाने थांबून राहणे

९, १०. (अ) अब्राहामाला कोणते अभिवचन मिळाले होते, परंतु त्याचा विश्‍वास आणि उल्हास यांची परीक्षा कशी घेण्यात आली असेल? (ब)आपण अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या उदाहरणांवरून लाभ कसा मिळवू शकतो?

९ आपण प्रथम ईश्‍वरी उद्देशाबद्दल शिकतो तेव्हा उल्हास मिळवणे एक गोष्ट आहे परंतु वर्षे उलटतात तसे उल्लसित राहणे वेगळीच गोष्ट आहे. हे विश्‍वासू अब्राहामाच्या बाबतीत स्पष्ट केले जाऊ शकते. देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याने आपला पुत्र, इसहाक याला अर्पण करण्याचा प्रयत्न केल्यावर, एका देवदूताने हा संदेश दिला: “परमेश्‍वर [यहोवा, NW] म्हणतो, ‘मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले; आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही; यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धिच वृद्धि करून तुझी संतति आकाशातील ताऱ्‍यांइतकी, समुद्रातीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन; तुझी संतति आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील; तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व रा तुझ्या संततीच्याद्वारे आशीर्वादित होतील.’” (उत्पत्ती २२:१५-१८) यात काहीच शंका नाही की, या अभिवचनामुळे अब्राहाम अति उल्लसित झाला.

१० अभिवचन दिलेले आशीर्वाद ज्याद्वारे येतील ती “संतति” इसहाक असेल अशी अपेक्षा अब्राहामाने केली असावी. परंतु वर्ष उलटत जाऊन इसहाकाद्वारे कोणतीच अद्‌भुत गोष्ट साध्य न झालेली पाहून अब्राहाम व त्याच्या कुटुंबाच्या विश्‍वासाची आणि उल्हासाची परीक्षा झाली असावी. देवाने इसहाकाला आणि त्यानंतर त्याचा पुत्र याकोब याला दिलेल्या अभिवचनाच्या निश्‍चिततेमुळे, संततीचे आगमन भविष्यात होते याची खात्री त्यांना मिळाली. या गोष्टीने त्यांना त्यांचा विश्‍वास आणि उल्हास टिकवून ठेवण्यास मदत दिली. परंतु, देवाने त्यांना केलेल्या अभिवचनांची पूर्तता न पाहताच अब्राहाम, इसहाक आणि याकोब मरण पावले. परंतु ते यहोवाचे उदास सेवक नव्हते. (इब्रीयांस ११:१३) आपण देखील त्याच्या अभिवचनांच्या पूर्ततेची वाट पाहत राहून यहोवाची सेवा विश्‍वासाने व उल्हासाने करत राहू शकतो.

छळ असतानाही उल्हास

११. आपण छळ होत असतानाही उल्लसित कसे असू शकतो?

११ यहोवाचे सेवक या नात्याने, आपण छळ सहन करताना देखील यहोवाची सेवा उल्लसित अंतःकरणाने करू शकतो. येशूने त्याच्यासाठी छळ सहन केलेल्यांना आनंदी असे घोषित केले, आणि प्रेषित पेत्राने म्हटले: “ज्याअर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहा त्याअर्थी आनंद करा; म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसहि तुम्ही उल्लास व आनंद कराल. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहा; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे.” (१ पेत्र ४:१३, १४; मत्तय ५:११, १२) तुम्ही छळ सहन करत असाल आणि धार्मिकतेसाठी दुःख भोगीत असाल, तर तुम्हाला यहोवाचा आत्मा आणि त्याची स्वीकृती मिळते व ती गोष्ट निश्‍चितच उल्हास वाढवते.

१२. (अ) आपण विश्‍वासाच्या परीक्षांना उल्हासाने तोंड का देऊ शकतो? (ब) अरण्यवासातील एका विशिष्ट लेव्याच्या उदाहरणावरून कोणता मूलभूत धडा शिकता येऊ शकतो?

१२ देव आपला आश्रयस्थान असल्यामुळे, आपण उल्लसित होऊन विश्‍वासाच्या परीक्षांना तोंड देऊ शकतो. हे स्तोत्र ४२ आणि ४३ मध्ये स्पष्ट केले आहे. काही कारणासाठी, एक लेवी अरण्यवासात होता. देवाच्या पवित्रस्थानातील उपासनेची त्याला इतकी आठवण येत होती की, कोरड्या व नापीक भागात पाण्यासाठी लुलपणाऱ्‍या तान्हेलेल्या मृगाप्रमाणे किंवा हरिणीप्रमाणे त्याला वाटले. तो यहोवासाठी आणि देवाच्या पवित्रस्थानी त्याची उपासना करण्यासाठी “तान्हेला” होता किंवा त्याला उत्कंठा होती. (स्तोत्र ४२:१, २) या अरण्यवासीच्या अनुभवाने आपल्याला, यहोवाच्या लोकांसोबत आपण उपभोगतो त्या सहवासाबद्दल कृतज्ञता प्रदर्शित करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. छळामुळे होणाऱ्‍या तुरुंगवासासारख्या परिस्थितीने त्यांच्यासोबत असण्याला तात्पुरता आळा घातला, तर त्याच्या उपासकांसोबत नियमित कार्यात आपल्याला पूर्ववत करेपर्यंत ‘देवाची आशा धरून’ असता आपण पवित्र सेवेत एकत्र असतानाच्या गतकाळातील उल्हासांबद्दल विचार करू या आणि सहनशक्‍तीसाठी प्रार्थना करू या.—स्तोत्र ४२:४, ५, ११; ४३:३-५.

‘हर्षाने यहोवाची सेवा करा’

१३. देवाला आपण देत असलेल्या सेवेचे वैशिष्ट्य उल्हास असला पाहिजे हे स्तोत्र १००:१, २ कसे दाखवते?

१३ उल्हास देवाच्या आपल्या सेवेतील एक वैशिष्ट्य असले पाहिजे. हे उपकारस्तुतीच्या गीतामध्ये दिसून आले. त्यात स्तोत्रकर्त्याने गायिले: “अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, [यहोवाचा] जयजयकार करा, हर्षाने परमेश्‍वराची सेवा करा. गीत गात त्याच्यापुढे या.” (स्तोत्र १००:१, २) यहोवा हा ‘आनंदी देव’ आहे आणि त्याच्या सेवकांनी त्याला समर्पित होण्याशी निगडित असणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यात उल्हास प्राप्त करावा अशी त्याची इच्छा आहे. (१ तीमथ्य १:११) सर्व राष्ट्रातील लोकांनी यहोवामध्ये आनंद केला पाहिजे आणि विजयी सैन्याच्या ‘जयजयकाराप्रमाणे’ आपल्या स्तुतीच्या अभिव्यक्‍ती जोरदार असल्या पाहिजेत. देवाची सेवा तजेला देणारी असल्यामुळे, त्यासोबत हर्ष असला पाहिजे. यास्तव, स्तोत्रकर्त्याने, लोकांना “[उल्हासाने] गीत गात” देवाच्या उपस्थितीत यावयास आर्जवले.

१४, १५. स्तोत्र १००:३-५ आज यहोवाच्या उल्लसित लोकांना कसे लागू होते?

१४ स्तोत्रकर्त्याने पुढे म्हटले: “[यहोवा] हाच देव आहे हे जाणा [ओळखा, कबूल करा]. त्यानेच आम्हाला उत्पन्‍न केले. आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो.” (स्तोत्र १००:३) यहोवा आपला निर्माणकर्ता असल्यामुळे, मेंढपाळ आपल्या मेंढरांचा मालक असल्याप्रमाणे तो आपला मालक आहे. देव आपली काळजी इतक्या चांगल्यारीतीने घेतो की आपण कृतज्ञतेने त्याचे स्तवन करतो. (स्तोत्र २३) यहोवाबद्दल स्तोत्रकर्त्याने असेही गायिले: “त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकारस्मरण करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण [यहोवा] चांगला आहे; त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यान्‌पिढ्या टिकते.”—स्तोत्र १००:४, ५.

१५ आज सर्व राष्ट्रातील उल्लसित लोक आभार आणि स्तुती सादर करण्यास यहोवाच्या पवित्रस्थानाच्या अंगणात येत आहेत. यहोवाबद्दल नेहमीच चांगले बोलून आपण देवाच्या नावाला उल्लसित होऊन गौरव देतो. त्याचे महान गुण आपल्याला त्याची स्तुती करण्यास प्रवृत्त करतात. तो पूर्णपणे चांगला आहे आणि त्याची प्रेमळ दया किंवा त्याच्या सेवकांबद्दलची कनवाळू चिंता यावर नेहमीच विसंबून राहिले जाऊ शकते कारण ते अनंतकाळापर्यंत राहते. त्याची इच्छा करणाऱ्‍यांवर प्रीती दाखवण्यात यहोवा “पिढ्यान्‌पिढ्या” विश्‍वासू आहे. (रोमकर ८:३८, ३९) मग निश्‍चितच, आपल्याला ‘हर्षाने यहोवाची सेवा करण्यासाठी’ चांगले कारण आहे.

तुमच्या आशेने हर्षित व्हा

१६. ख्रिस्ती कोणत्या आशेबद्दल आणि भवितव्यांबद्दल आनंद करू शकतात?

१६ पौलाने लिहिले: “आशेने हर्षित व्हा.” (रोमकर १२:१२) देवाने त्याच्या पुत्राद्वारे उपलब्ध करून दिलेल्या अमर स्वर्गीय जीवनाच्या वैभवी आशेबद्दल येशू ख्रिस्ताचे अभिषिक्‍त अनुयायी आनंद करतात. (रोमकर ८:१६, १७; फिलिप्पैकर ३:२०, २१) पृथ्वीवरील नंदनवनात चिरकालिक जीवनाची आशा बाळगणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना देखील आनंद करण्यास आधार आहे. (लूक २३:४३) यहोवाच्या सर्व विश्‍वासू सेवकांना राज्याच्या आशेबद्दल आनंद करण्यास निमित्त आहे, कारण ते एकतर त्या स्वर्गीय सरकाराचा भाग असतील किंवा पृथ्वीवरील त्याच्या राज्यात राहतील. किती आनंददायक आशीर्वाद!—मत्तय ६:९, १०; रोमकर ८:१८-२१.

१७, १८. (अ) यशया २५:६-८ मध्ये काय भाकीत केले होते? (ब) यशयाची ही भविष्यवाणी आता कशी पूर्ण होत आहे तसेच भविष्यातील तिच्या पूर्णतेबद्दल काय?

१७ यशयाने देखील आज्ञाधारक मानवजातीसाठी एका आनंददायक भविष्याचे भाकीत केले. त्याने लिहिले: “सेनाधीश [यहोवा] ह्‍या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्‍नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे; उत्कृष्ट मिष्टान्‍नाची व राखून ठेविल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे, सर्व लोकांस झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांस आच्छादून टाकणारे आच्छादन, तो या डोंगरावरून उडवून देत आहे. तो मृत्यु कायमचा नाहीसा करितो, प्रभु [यहोवा] सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रु पुशितो; तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करितो, कारण [यहोवा] हे बोलला आहे.”—यशया २५:६-८.

१८ यहोवाचे उपासक या नात्याने आपण सहभाग घेतो ती आध्यात्मिक मेजवानी खरोखरच एक आनंददायक मेजवानी आहे. खरे म्हणजे, नवीन जगासाठी देवाने अभिवचन दिलेल्या प्रत्यक्ष चांगल्या गोष्टींच्या मेजवानीची आपण वाट पाहत त्याची सेवा आवेशाने करतो तसा आपला उल्हास ओतप्रोत भरून वाहतो. (२ पेत्र ३:१३) यहोवा, येशूच्या बलिदानाच्या आधारावर आदामाच्या पापामुळे मानवजातीला झाकून टाकणारे “आच्छादन” काढून टाकील. पाप आणि मृत्यू काढून टाकलेले पाहणे किती उल्हासदायक असेल! पुनरुत्थित प्रियजनांचे स्वागत करणे, अश्रु नाहीसे झाल्याचे पाहणे आणि यहोवाच्या लोकांची निंदा न केली जाता दियाबल सैतान या महान निंदकाला ते उत्तर देण्यास देवाला वाव देतील अशा नंदनवनमय पृथ्वीवर राहणे किती आल्हाददायक आहे!—नीतीसूत्रे २७:११.

१९. यहोवाने त्याचे साक्षीदार या नात्याने आपल्यासमोर राखलेल्या भवितव्यांबद्दल आपण कशी प्रतिक्रिया दाखवावी?

१९ यहोवा त्याच्या सेवकांसाठी काय करील हे जाणल्यामुळे तुम्ही उल्हास आणि कृतज्ञतेने भरून जात नाही का? अर्थात, अशा दिव्य भवितव्यांमुळे आपल्या उल्हासाला हातभार लागतो! शिवाय, आपली आशीर्वादित आशा आपल्या आनंदी, प्रेमळ, उदार देवाकडे अशा भावनांनी पाहावयास प्रवृत्त करते: “पाहा! हा आमचा देव. याची आम्ही आशा धरून राहिलो. तो आमचे तारण करील. हाच [यहोवा] आहे. याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.” (यशया २५:९) मनात आपली भव्य आशा मजबूतरितीने बसवून आपण यहोवाची सेवा उल्लसित अंतःकरणाने करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न निर्देशित केला पाहिजे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ आपण यहोवाची सेवा “उल्हासित [अंतःकरणाने]” कशी करू शकतो?

▫ आपण देवाला देत असलेल्या सेवेत उल्हास नसल्यास आपण काय करू शकतो?

▫ छळ होत असतानाही यहोवाच्या लोकांना उल्हास का मिळू शकतो?

▫ आपल्या आशेबद्दल आनंद करण्यास आपल्याजवळ कोणती कारणे आहेत?

[१७ पानांवरील चित्रं]

ख्रिस्ती जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये सहभाग घेतल्याने आपला उल्हास वाढेल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा