-
शोक करणाऱ्यांसोबत शोक कराटेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१७ | जुलै
-
-
१४. दुःख किंवा शोक करत असलेल्या व्यक्तीचं आपण कोणत्या शब्दांत सांत्वन करू शकतो?
१४ शोक करत असलेल्या व्यक्तीचं कोणत्या शब्दांत सांत्वन करावं हे समजणं अवघड जाऊ शकतं. पण बायबल आपल्याला सांगतं: “सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” (नीति. १२:१८) सांत्वन देताना नेमकं काय बोलावं यासाठी अनेकांना, जब आपका कोई अपना मर जाए . . . या माहितीपत्रकातून मदत मिळाली आहे.d असं असलं, तरी सांत्वन देताना ‘रडणाऱ्यांसोबत रडल्यानेही’ त्यांना अधिक मदत होऊ शकते. (रोम. १२:१५) गॅबी नावाच्या आपल्या एका बहिणीचं उदाहरण घ्या; तिने आपल्या पतीला मृत्यूमध्ये गमावलं आहे. ती म्हणते, की कधीकधी भावना व्यक्त करण्याचा एकच मार्ग तिला दिसतो, तो म्हणजे रडणं. पुढे ती म्हणते: “त्यामुळेच माझे मित्रमैत्रिणी जेव्हा माझ्यासोबत रडतात तेव्हा मला काही प्रमाणात सांत्वन मिळतं. त्या वेळी मला, माझ्या दुःखात मी एकटी पडल्यासारखं वाटत नाही.”
-
-
शोक करणाऱ्यांसोबत शोक कराटेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१७ | जुलै
-
-
२०. यहोवाने दिलेलं अभिवचन सांत्वन देणारं का आहे
२० लवकरच “सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव,” यहोवा मेलेल्यांचं पुनरुत्थान करण्याद्वारे दुःख आणि शोक यांचा अंत करेल. ही गोष्ट खरंच किती सांत्वन देणारी आहे! (योहा. ५:२८, २९) यहोवा अभिवचन देतो की “तो मृत्यू कायमचा नाहीसा” करेल आणि “सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू” पुसेल. (यश. २५:८) त्यानंतर, ‘रडणाऱ्यांसोबत रडाण्याऐवजी,’ पृथ्वीवरचे सर्व जण “आनंद करणाऱ्यांसोबत आनंद” करतील.—रोम. १२:१५.
-