वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ३/१५ पृ. १०-१५
  • यहोवाचे भय बाळगण्यात आनंद मिळवण्याचे शिकणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे भय बाळगण्यात आनंद मिळवण्याचे शिकणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काहींजवळ ते आहे आणि इतरांजवळ नाही असे का
  • एक आकर्षक आमंत्रण
  • तुम्ही श्रम घ्याल का?
  • तुमचे अंतःकरण समाविष्ट आहे
  • ईश्‍वरी भय आपल्या अंतःकरणात कसे रुजवले जाते
  • यहोवाचे भय मानणारे हृदय उत्पन्‍न करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • खऱ्‍या देवाचे भय बाळगण्याचे फायदे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवाचे भय धरा व त्याच्या आज्ञा पाळा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवाचे भय धरा व त्याच्या पवित्र नामाचे गौरव करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ३/१५ पृ. १०-१५

यहोवाचे भय बाळगण्यात आनंद मिळवण्याचे शिकणे

“मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हाला परमेश्‍वराचे भय धरायला शिकवीन.” —स्तोत्र ३४:११.

१. देवाच्या राज्याद्वारे भय कसे काढून टाकण्यात येईल, परंतु त्याचा अर्थ सर्वच प्रकारचे भय काढण्यात येईल असा आहे का?

सगळीकडे लोक भय—गुन्हेगारी आणि हिंसेचे भय, बेरोजगारीचे भय, गंभीर आजाराचे भय—यापासून मुक्‍तता मिळवण्याची वाट पाहून आहेत. देवाच्या राज्यामध्ये मुक्‍तता ही वास्तविक गोष्ट बनल्यावर तो किती महान दिवस ठरेल! (यशया ३३:२४; ६५:२१-२३; मीखा ४:४) तरीसुद्धा, त्या वेळी सर्वच प्रकारचे भय नाहीसे केले जाणार नाही. तथापि, आपणही सर्वच प्रकारचे भय आपल्या जीवनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करू नये. चांगले आणि वाईट असे भय आहे.

२. (अ) कोणत्या प्रकारचे भय वाईट आहे आणि कोणत्या प्रकारचे इष्ट आहे? (ब) ईश्‍वरी भय काय आहे आणि उल्लेखिलेली शास्त्रवचने ते कसे दाखवून देतात?

२ भय हे मानसिकरित्या एक विष असू शकते व ते एखाद्या व्यक्‍तीच्या कारणमीमांसा करण्याच्या क्षमतेला निकामी बनवू शकते. ते धैर्य खचवू शकते आणि आशा नष्ट करू शकते. शत्रूकडून शारीरिकरित्या धमकावलेली व्यक्‍ती असे भय अनुभवू शकते. (यिर्मया ५१:३०) कोणा विशिष्ट प्रभावी मानवांची स्वीकृती मिळवण्याला अधिक महत्त्व देणारी व्यक्‍ती याचा अनुभव घेऊ शकते. (नीतीसूत्रे २९:२५) परंतु, हितकारक भय देखील आहे. ते अशाप्रकारचे भय आहे जे आपल्याला अविचारीपणाने एखादी गोष्ट करण्यापासून व स्वतःला इजा पोहंचवण्यापासून आळा घालते. ईश्‍वरी भयामध्ये यापेक्षाही अधिक काही गोवलेले आहे. ते यहोवाबद्दलचे आदरयुक्‍त भय, त्याच्याबद्दल गाढ श्रद्धा व त्यासोबत त्याला निराश न करण्याची हितकारक भीती हे आहे. (स्तोत्र ८९:७) देवाची नापसंती ओढवून घेण्याचे हे भय, त्याची प्रेमळ-कृपा आणि चांगुलपणा याबद्दल वाटणाऱ्‍या कृतज्ञतेमधून निर्माण होते. (स्तोत्र ५:७; होशेय ३:५) यहोवा परम शास्ता आणि सर्वशक्‍तीमान आहे व त्याची अवज्ञा करणाऱ्‍यांना शिक्षा देण्याची, इतकेच नव्हे तर मृत्युदंडही देण्याची शक्‍ती ज्याच्याजवळ आहे अशी जाणीव राखणे देखील यात समाविष्ट आहे.—रोमकर १४:१०-१२.

३. यहोवाचे भय हे काही मूर्तीपूजक दैवतांशी संबंधित असलेल्या भयाच्या विपरीत कसे आहे?

३ ईश्‍वरी भय हितकारक असून, क्षुब्ध करणारे नाही. ते एखाद्याला योग्य ते करण्यासाठी स्थिर राहण्यास व चूक करण्याद्वारे हातमिळवणी न करण्यास त्या दैवताचे वर्णन दहशत निर्माण करणारे दुष्ट दैवत असे करण्यात आले आहे. तसेच कालीमाता या हिंदू देवीशी संबंधित असणाऱ्‍या भयाप्रमाणेही ते नाही. तिला काही वेळा रक्‍तपिपासू व प्रेते, सर्प आणि कवट्यांचा अलंकार म्हणून उपयोग करणारी असे चित्रित केले आहे. ईश्‍वरी भय आकर्षित करते; अपकर्षित करत नाही. ते प्रीती व कृतज्ञता यांनी गुंफलेले आहे. अशाप्रकारे, ईश्‍वरी भय आपल्याला यहोवाजवळ आणते.—अनुवाद १०:१२, १३; स्तोत्र २:११.

काहींजवळ ते आहे आणि इतरांजवळ नाही असे का

४. प्रेषित पौलाने दाखवल्याप्रमाणे, मानवजात कोणत्या परिस्थितीप्रत खालावली आहे आणि त्याचे कारण काय आहे?

४ सबंध मानवजात ईश्‍वरी भयाच्या गुणाने प्रवृत्त होत नाही. रोमकर ३:९-१८ मध्ये, मानव मूळ परिपूर्णतेपासून किती दुरावलेले आहेत याचे वर्णन प्रेषित पौल देतो. सर्वजण पापी आहेत असे सांगितल्यावर, पौल स्तोत्रांमधून उद्धृत करून असे म्हणतो: “नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही.” (पहा स्तोत्र १४:१.) त्यानंतर, देवाचा शोध झटून करण्यात मानवजातीचा निष्काळजीपणा, सत्कर्मे करण्याचा अभाव, त्यांचे कपट, शाप आणि रक्‍तपात अशा गोष्टींचा उल्लेख करून तो तपशील देतो. ते आजच्या जगाचे किती अचूकतेने वर्णन देते! बहुतांशी लोकांना देव आणि त्याच्या उद्देशांमध्ये काहीच रस नाही. सत्कर्माचा आभास बहुतेकवेळा त्यापासून काही प्राप्त करावयाचे असेल तरच, विशिष्ट प्रसंगांपुरताच राखून ठेवलेला असतो. खोटे बोलणे आणि अश्‍लील भाषा या सर्वसामान्य आहेत. रक्‍तपात केवळ बातमीपत्रांमध्येच नव्हे तर मनोरंजनातही दाखवला जातो. अशा परिस्थितीला कोणती गोष्ट कारणीभूत आहे? हे खरे की, आपण सर्व पापी आदामाचे वंशज आहोत, परंतु प्रेषित पौलाने वर्णिलेल्या गोष्टींना लोक आपले जीवनाक्रमण बनवतात तेव्हा त्यामध्ये यापेक्षाही अधिक गोष्टींचा समावेश असतो. ते काय आहे याचे स्पष्टीकरण देताना अठरावे वचन म्हणते: “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.”—पहा स्तोत्र ३६:१.

५. काही लोकांना ईश्‍वरी भय आहे तर इतरांना नाही असे का?

५ तथापि, काही लोकांना ईश्‍वरी भय आहे आणि इतरांना ते नाही असे का? सोप्या भाषेत सांगावयाचे तर, काही लोक त्यास विकसित करतात तर इतरजण तसे करत नाहीत. आपल्यापैकी कोणालाही ते जन्मतः प्राप्त झालेले नाही, पण आपल्या सर्वांजवळ त्यास सामावून घेण्याची शक्‍ती आहे. ईश्‍वरी भय आपण शिकलेच पाहिजे. मग, आपल्या जीवनात ते भय प्रवृत्त करणारी प्रभावी शक्‍ती असावी म्हणून आपल्याला ते विकसित करावयास हवे.

एक आकर्षक आमंत्रण

६. स्तोत्र ३४:११ मध्ये लिखित असलेले निमंत्रण आपल्याला कोण देत आहे आणि ईश्‍वरी भय शिकून घेतले पाहिजे असे हे वचन कसे दाखवून देते?

६ स्तोत्र ३४ मध्ये यहोवाचे भय बाळगण्यास शिकण्याचे आकर्षक आमंत्रण आपल्याला देण्यात आले आहे. हे दाविदाचे स्तोत्र आहे. आणि दावीद कोणाला पूर्वचित्रित करत होता? प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय इतर कोणालाही नाही. या स्तोत्राच्या २० व्या वचनात प्रेषित योहानाने विशेषतः येशूला लागू केलेली भविष्यवाणी नोंदवलेली आहे. (योहान १९:३६) आपल्या दिवसात, ११ व्या वचनातील निमंत्रणाप्रमाणे येशू एक निमंत्रण देत आहे: “मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हाला परमेश्‍वराचे भय धरावयाला शिकवीन.” हे स्पष्टपणे दाखवून देते की, ईश्‍वरी भय शिकण्याजोगी गोष्ट आहे, तसेच येशू ख्रिस्त आपल्याला शिकवण्यास अगदीच उत्तमरित्या पात्र आहे. तसे का बरे?

७. विशेषतः, येशूकडूनच ईश्‍वरी भय का शिकून घ्यावे?

७ येशू ख्रिस्ताला ईश्‍वरी भयाचे महत्त्व ठाऊक आहे. इब्रीयांस ५:७ त्याच्याविषयी म्हणते: “आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात, मोठा आक्रोश करीत व अश्रु गाळीत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्‌भक्‍तीमुळे ऐकण्यात आली.” येशू ख्रिस्ताने अशाप्रकारचा ईश्‍वरी भय हा गुण, यातना स्तंभावरील मृत्यूचा सामना करण्याआधी देखील प्रदर्शित केला. लक्षात ठेवा की, नीतीसूत्रे ८ व्या अध्यायामध्ये देवाच्या पुत्राला बुद्धीचे प्रत्यक्ष स्वरुप म्हणून वर्णिले आहे. तसेच नीतीसूत्रे ९:१० येथे आपल्याला सांगितले जाते: “परमेश्‍वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय.” तर अशाप्रकारे, पृथ्वीवर येण्याच्या पुष्कळ काळाआधी हे ईश्‍वरी भय देवाच्या पुत्राच्या व्यक्‍तिमत्वाचा एक मूलभूत भाग असे होते.

८. यशया ११:२, ३ येथे आपण यहोवाचे भय याविषयी काय शिकतो?

८ त्याशिवाय, मशीही राजा या नात्याने येशूविषयी यशया ११:२, ३ म्हणते: “परमेश्‍वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्‍वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर राहील; परमेश्‍वराचे भय त्याला सुगंधमय होईल.” त्याचे किती सुरेखपणे वर्णन केले आहे! यहोवाचे भय अप्रिय नाही. ते सकारात्मक आणि उभारणी करणारे आहे. राजा या नात्याने ख्रिस्त ज्या सबंध राज्यावर अधिपत्य गाजवीत आहे त्यास व्यापून टाकील असा तो गुण आहे. तो आता राज्य करीत आहे, आणि त्याची प्रजा या नात्याने जे एकत्र केले जात आहेत त्यांना तो यहोवाचे भय बाळगून सूचना देत आहे. कसे?

९. येशू ख्रिस्त आपल्याला यहोवाचे भय कसे शिकवीत आहे आणि आपण त्याबद्दल काय शिकावे असे तो इच्छितो?

९ आपल्या मंडळीच्या सभा, संमेलने आणि अधिवेशनांद्वारे येशू, मंडळीचा नियुक्‍त मस्तक आणि मशीही राजा या नात्याने ईश्‍वरी भय काय आहे आणि ते इतके फायद्याचे का आहे हे स्पष्टपणे समजण्यास मदत करतो. अशाप्रकारे, त्याच्याबद्दल आपली गुणग्राहकता वाढवण्यासाठी तो प्रयत्न करतो जेणेकरून त्याच्यासारखे आपणही यहोवाचे भय बाळगण्यात आनंदी होण्याचे  शिकू.

तुम्ही श्रम घ्याल का?

१०. ख्रिस्ती सभांना उपस्थित असताना, आपल्याला यहोवाचे भय समजून घ्यावयाचे असेल तर आपण काय करावे?

१० अर्थात, केवळ बायबल वाचन करणे किंवा राज्य सभागृहात सभांना उपस्थित राहणे या गोष्टी आपल्याला ईश्‍वरी भय आहे याची खात्री देणार नाहीत. आपल्याला खरोखर यहोवाचे भय समजून घ्यावयाचे असल्यास काय करण्याची गरज आहे त्याकडे लक्ष द्या. नीतीसूत्रे २:१-५ म्हणते: “माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारिशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेविशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारिशील, सुज्ञतेची आराधना करिशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करिशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर परमेश्‍वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.” यास्तव, सभांना उपस्थित राहतेवेळी, आपल्याला काय सांगितले जात आहे त्याकडे लक्ष देण्यास, मन एकाग्र करण्यास आणि मुख्य विचार लक्षात ठेवण्यास मनःपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच, आपण यहोवाबद्दल जो विचार करतो याचा दिल्या जाणाऱ्‍या सल्ल्याबद्दल आपली जी मनोवृत्ती आहे त्यावर कसा प्रभाव व्हावा याचा खोल विचार करण्याची देखील गरज आहे—होय, आपले अंतःकरण खुले केले पाहिजे. मग आपल्याला यहोवाचे भय समजेल.

११. ईश्‍वरी भय विकसित करण्यासाठी आपण मनःपूर्वकतेने आणि वारंवार काय केले पाहिजे?

११ स्तोत्र ८६:११ आपले लक्ष दुसऱ्‍या महत्त्वपूर्ण बाबीकडे म्हणजेच प्रार्थनेच्या बाबीकडे वेधते. स्तोत्रकर्त्याने प्रार्थना केली, “हे परमेश्‍वरा, तुझा मार्ग मला दाखीव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त [अंतःकरण] एकाग्र कर.” यहोवाने ती प्रार्थना स्वीकारली, कारण त्याने तिची नोंद बायबलमध्ये होऊ दिली. ईश्‍वरी भय विकसित करण्यासाठी, आपल्याला देखील यहोवाकडे त्याच्या मदतीकरता प्रार्थना करण्याची गरज आहे आणि आपण मनःपूर्वक तसेच वारंवार प्रार्थना केल्यास त्याचा लाभ आपल्याला होईल.—लूक १८:१-८.

तुमचे अंतःकरण समाविष्ट आहे

१२. अंतःकरणाकडे विशेष लक्ष का दिले जावे आणि यामध्ये काय गोवलेले आहे?

१२ आपण लक्ष दिले पाहिजे अशी आणखी एक गोष्ट स्तोत्र ८६:११ येथे आहे. स्तोत्रकर्ता, देवाच्या भयाची मागणी केवळ बौद्धिक आकलन होण्यासाठी करत नव्हता. तो त्याच्या अंतःकरणाविषयी सांगतो. ईश्‍वरी भय विकसित करण्यामध्ये लाक्षणिक अंतःकरणाचा समावेश होतो. त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, कारण आपल्या जीवनाच्या कार्यहालचालींमध्ये प्रदर्शित होणारी ती आंतरिक व्यक्‍ती आहे तसेच त्यामध्ये आपले विचार, आपल्या मनोवृत्ती, आपल्या इच्छा, आपल्या प्रवृत्त्या, आपली ध्येये यांचा समावेश होतो.

१३. (अ) एखाद्या व्यक्‍तीचे अंतःकरण विभाजित आहे हे कशावरून दिसू शकते? (ब) आपण ईश्‍वरी भय विकसित करतो तसे कोणते ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे?

१३ बायबल आपल्याला ईशारा देते की, एखाद्या व्यक्‍तीचे अंतःकरण कदाचित विभाजित असू शकते. ते कपटी देखील असू शकते. (स्तोत्र १२:२; यिर्मया १७:९) ते आपल्याला हितकारक कार्यहालचाली—मंडळीच्या सभांना आणि क्षेत्र सेवेत जाणे—यामध्ये सहभाग घेण्यास प्रवृत्त करू शकते, परंतु कदाचित ते जगिक जीवनाक्रमणाच्या विशिष्ट पैलूंचा आनंदही घेऊ शकते. ही गोष्ट, आपल्याला खरोखर संपूर्ण जिवाने राज्य आस्थेला हातभार लावण्यापासून मागे ओढू शकते. मग कपटी अंतःकरण आपल्याला हे पटवण्याचा प्रयत्न करील की, शेवटी इतर पुष्कळजण करू शकतात तितकेच आपणही करत आहोत. किंवा कदाचित शाळेत वा ऐहिक कामाच्या ठिकाणी या अंतःकरणावर मनुष्याच्या भयाचा प्रभाव पडू शकतो. परिणामतः, त्या परिस्थितींमध्ये आपण स्वतःची ओळख यहोवाचे साक्षीदार म्हणून करून देण्यास मागेपुढे करत असू आणि कदाचित ख्रिश्‍चनांसाठी अनुचित असणाऱ्‍या गोष्टीही करू. तथापि, नंतर आपला विवेक आपल्याला त्रास देतो. आपल्याला त्या प्रकारची व्यक्‍ती व्हावयाचे नाही. यास्तव, आपण स्तोत्रकर्त्यासोबत यहोवाला अशी प्रार्थना करतो: “तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त [अंतःकरण] एकाग्र कर.” आपल्या जीवनाच्या कार्यहालचालींमधून प्रदर्शित होणाऱ्‍या संपूर्ण आंतरिक व्यक्‍तीने, आपण ‘देवाचे भय धरतो व त्याच्या आज्ञा पाळतो’ याचा पुरावा द्यावा अशी आपली इच्छा आहे.—उपदेशक १२:१३.

१४, १५. (अ) बॅबिलोनच्या दास्यातून इस्राएलाला पूर्ववत करण्याचे भाकीत करताना, यहोवाने आपल्या लोकांना काय देण्याचे अभिवचन दिले? (ब) आपल्या लोकांच्या अंतःकरणांमध्ये देवाचे भय रुजवण्यासाठी यहोवाने काय केले? (क) इस्राएल यहोवाच्या मार्गांपासून दूर का वळाले?

१४ यहोवाने अभिवचन दिले की, तो त्याच्या लोकांना अशाप्रकारचे ईश्‍वरी भय बाळगणारे अंतःकरण देईल. त्याने इस्राएलाच्या पुनर्स्थापनेबद्दल भाकीत केले आणि यिर्मया ३२:३७-३९ मध्ये आपण वाचतो त्याप्रमाणे असे म्हटले: “मी या स्थली त्यांस परत आणीन व सुरक्षित बसवीन; ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन; त्यांचे व त्यांच्या नंतर त्यांच्या वंशजांचे हित व्हावे म्हणून त्यांनी सदा माझे भय बाळगावे यासाठी मी त्यांस एकच हृदय व एकच मार्ग देईन.” चाळिसाव्या वचनात देवाचे अभिवचन अधिक मजबूत करण्यात येते: “मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्‍न करीन, म्हणजे ते मजपासून माघार घेणार नाहीत.” यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणे सा. यु. पू. ५३७ मध्ये त्याने त्यांना जेरूसलेममध्ये पुन्हा आणले. परंतु, ‘त्याचे भय बाळगावे यासाठी तो त्यांस एकच हृदय देईल’—या उर्वरित अभिवचनाबद्दल काय? यहोवाने इस्राएल लोकांना बॅबिलोनमधून पुन्हा आणल्यावरही इस्राएलाचे प्राचीन राष्ट्र त्याच्यापासून दूर का गेले जेणेकरून त्यांच्या मंदिराचा सा. यु. ७० मध्ये नाश झाला आणि त्याची पुनर्बांधणी कधीही झाली नाही?

१५ यहोवाला कोणतेही अपयश मिळाल्यामुळे हे घडले नाही. निश्‍चितच, यहोवाने त्याच्या लोकांच्या अंतःकरणांमध्ये देवाचे भय उत्पन्‍न करण्यासाठी पावले उचलली होती. बॅबिलोनमधून त्यांची सुटका करण्यात आणि त्यांना त्यांच्या मायदेशी पूर्ववत आणण्यात त्याने दाखवलेल्या दयेमुळे त्यांनी त्याच्याकडे गाढ श्रद्धेने पाहावे म्हणून त्याने त्यांना भरपूर पुरावा दिला होता. देवाने हाग्गय, जखऱ्‍या आणि मलाखी या संदेष्ट्यांकडून, शिक्षक या नात्याने पाठवलेल्या एज्राद्वारे, राज्यपाल नहेम्याद्वारे आणि देवाच्या स्वतःच्या पुत्राद्वारे स्मरणिका, सल्ला आणि वाग्दंड देऊन त्या गोष्टींना मजबूत केले. काहीवेळा लोकांनी ऐकले. त्यांनी हाग्गय आणि जखऱ्‍या यांनी आर्जवल्यावर यहोवाचे मंदीर बांधले तेव्हा आणि एज्राच्या दिवसात आपल्या विदेशी बायका पाठवून दिल्या तेव्हा तसे केले. (एज्रा ५:१, २; १०:१-४) परंतु, बहुतेकवेळा त्यांनी ऐकले नाही. लक्ष देण्याबाबतीत ते अढळ नव्हते; ते नेहमीच सल्ला ग्रहण करीत राहिले नाहीत; त्यांनी आपली अंतःकरणे खुली केली नाहीत. इस्राएली लोक ईश्‍वरी भय विकसित करीत नव्हते आणि परिणामतः त्यांच्या जीवनातील ती प्रवृत्त करणारी प्रभावी शक्‍ती ठरली नाही.—मलाखी १:६; मत्तय १५:७, ८.

१६. यहोवाने कोणाच्या अंतःकरणांमध्ये ईश्‍वरी भय रुजवले आहे?

१६ तरी देखील, आपल्या लोकांच्या अंतःकरणात ईश्‍वरी भय घालण्याचे यहोवाचे अभिवचन अपयशी ठरले नाही. त्याने आध्यात्मिक इस्राएलाशी नवीन करार स्थापिला. ते असे ख्रिस्ती होते ज्यांना त्याने स्वर्गीय आशा दिली. (यिर्मया ३१:३३; गलतीकर ६:१६) सन १९१९ मध्ये, मोठी बाबेल, म्हणजेच खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य हिच्या दास्यातून देवाने त्यांना पूर्ववत केले. त्यांच्या अंतःकरणांमध्ये त्याने त्याचे भय भक्कमपणे रुजवले. यामुळे त्यांना तसेच राज्याची पार्थिव प्रजा अशी जीवनाची आशा असणाऱ्‍या ‘मोठ्या लोकसमुदायाला’ देखील त्याचे समृद्ध आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. (यिर्मया ३२:३९; प्रकटीकरण ७:९) त्यांच्या अंतःकरणांमध्येही यहोवाचे भय निर्माण झाले आहे.

ईश्‍वरी भय आपल्या अंतःकरणात कसे रुजवले जाते

१७. यहोवाने आपल्या अंतःकरणांमध्ये ईश्‍वरी भय कसे घातले आहे?

१७ यहोवाने हे ईश्‍वरी भय आपल्या अंतःकरणांमध्ये कसे रुजवले आहे? त्याच्या आत्म्याच्या कार्याद्वारे. तसेच पवित्र आत्म्याचे फळ असणारी कोणती गोष्ट आपल्यापाशी आहे? बायबल, देवाचे प्रेरित वचन. (२ तीमथ्य ३:१६, १७) यहोवाने गतकाळात जे केले आहे, त्याच्या भविष्यसूचक वचनाच्या पूर्णतेत आपल्या सेवकांशी त्याचा आताचा व्यवहार आणि येणाऱ्‍या गोष्टींच्या भविष्यवाण्या याद्वारे तो ईश्‍वरी भय निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांना योग्य आधार पुरवतो.—यहोशवा २४:२-१५; इब्रीयांस १०:३०, ३१.

१८, १९. अधिवेशने, संमेलने आणि मंडळीच्या सभा आपल्याला ईश्‍वरी भय प्राप्त करण्यासाठी कशी मदत करतात?

१८ हे लक्षणीय आहे की, अनुवाद ४:१० येथील अहवालाप्रमाणे यहोवाने मोशेला असे म्हटले: “ते इहलोकी असेपर्यंत त्यांनी माझे भय बाळगावयाला शिकावे व आपल्या मुलाबाळांनाहि तसे शिकवावे म्हणून ह्‍या लोकांना माझ्याजवळ जमीव म्हणजे मी आपली वचने त्यांना ऐकवीन.” अशाप्रकारे, आज यहोवाने आपल्या लोकांना त्याचे भय बाळगण्यास मदत करण्यासाठी विपुल तरतूदी पुरवल्या आहेत. अधिवेशने, संमेलने आणि मंडळीच्या सभांमध्ये आपण यहोवाची प्रेमळ कृपा आणि त्याचा चांगुलपणा याच्या पुराव्यांचे कथन करतो. सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाचा अभ्यास करताना आपण तेच करत होतो. त्या अभ्यासाचा तुमच्यावर आणि यहोवाबद्दल असणाऱ्‍या तुमच्या मनोवृत्तीवर कसा परिणाम झाला? आपल्या स्वर्गीय पित्याच्या महान व्यक्‍तिमत्वाचे विविध पैलू त्याच्या पुत्रामध्ये प्रतिबिंबित होत असल्याचे तुम्ही पाहिल्यावर, देवाला कधीही नाखूष न करण्याच्या तुमच्या इच्छेला या गोष्टीने बळकट केले नाही का?—कलस्सैकर १:१५.

१९ आपल्या सभांमध्ये, गतकाळात यहोवाने त्याच्या लोकांना मुक्‍त केल्याच्या अहवालांचाही आपण अभ्यास करतो. (२ शमुवेल ७:२३) प्रकटीकरण या बायबलच्या पुस्तकाचा अभ्यास आपण प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! या पुस्तकाद्वारे करतो तेव्हा, आपण या २० व्या शतकात आधीच पूर्ण झालेल्या भविष्यसूचक दृष्टांतांबद्दल आणि भविष्यात होणाऱ्‍या भयप्रद घटनांबद्दल शिकतो. देवाच्या या सर्व कृत्यांबद्दल स्तोत्र ६६:५ म्हणते: “अहो, या, देवाची कृत्ये पाहा; तो आपल्या कृतींनी मानवजातीस धाक बसवितो.” होय, योग्य दृष्टिकोन बाळगल्यास ही देवाची कृत्ये आपल्या अंतःकरणांमध्ये यहोवाचे भय, गाढ श्रद्धा रुजवतात. अशाप्रकारे यहोवा देव आपले अभिवचन कसे पूर्ण करतो हे आपण पाहू शकतो: “मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्‍न करीन, म्हणजे ते मजपासून माघार घेणार नाहीत.”—यिर्मया ३२:४०.

२०. आपल्या अंतःकरणांमध्ये ईश्‍वरी भय खोल रुजवण्यासाठी आपल्या परीने काय करण्याची गरज आहे?

२० तथापि, आपल्या परीने प्रयत्न न करता ईश्‍वरी भय आपल्या अंतःकरणांमध्ये निर्माण होत नाही हे उघड आहे. त्याचे परिणाम आपोआप घडत नाहीत. यहोवा आपली भूमिका निभावतो. आपण ईश्‍वरी भय विकसित करून आपली भूमिका निभावली पाहिजे. (अनुवाद ५:२९) स्वाभाविक इस्राएल ते करण्यास अपयशी ठरले. परंतु, यहोवावर विसंबून राहिल्याने, देवाचे भय बाळगणाऱ्‍यांना मिळणारे पुष्कळ फायदे आधीच आध्यात्मिक इस्राएल तसेच त्यांचे सहकारी अनुभव घेत आहेत. पुढील लेखात आपण यातील काही फायद्यांचा विचार करणार आहोत.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ ईश्‍वरी भय काय आहे?

◻ यहोवाचे भय बाळगण्यात आनंद मिळवण्यासाठी आपल्याला कसे शिकवण्यात येत आहे?

◻ ईश्‍वरी भय बाळगण्याकरता, आपल्या परीने कोणते परिश्रम करण्याची गरज आहे?

◻ ईश्‍वरी भय संपादन करण्यामध्ये आपल्या लाक्षणिक हृदयाचे सर्व पैलू का गोवलेले आहेत?

[१२, १३ पानांवरील चित्रं]

यहोवाचे भय समजण्याकरता परिश्रमपूर्वक अभ्यास करण्याची आवश्‍यकता आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा