तारले जाण्यासाठी आपण काय करावे?
एकदा एका माणसाने येशूला विचारले: “प्रभुजी, तारणप्राप्ति होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” येशूचे उत्तर काय होते? ‘मला केवळ तुमचा प्रभू व तारक म्हणून स्वीकारले तर तुम्ही तारले जाल’ असे त्याने म्हटले का? नाही! येशू म्हणाला: “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा; कारण मी तुम्हास सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही.”—लूक १३:२३, २४.
येशूने त्या माणसाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले का? नाही, त्या माणसाने, तारले जाणे किती कठीण असेल हे विचारले नव्हते; तर संख्या कमी असेल का असे विचारले होते. या कारणास्तव येशूने केवळ, अपेक्षित असतील त्यापेक्षा कमी लोक हा महान आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेटाने यत्न करतील असे सूचित केले.
‘मला असे सांगण्यात आले नव्हते,’ असे काही वाचक तक्रार करतील. ते योहान ३:१६ हे वचन उद्धृत करतील जे म्हणते, “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” तथापि, आपण उत्तर देतो: ‘तर मग, आपण काय विश्वास करावा? येशू खरोखर जिवंत होता, असा? अर्थात. तो देवाचा पुत्र आहे, असा? निश्चितच! तसेच, बायबल येशूला “गुरु” व “प्रभू” असे संबोधिते या कारणास्तव, आपण त्याने जे शिकविले त्यावर विश्वास ठेवायला, त्याचे आज्ञापालन व त्याचे अनुकरण सुद्धा करायला नको का?’—योहान १३:१३; मत्तय १६:१६.
येशूचे अनुकरण करणे
नेमकी येथेच समस्या उद्भवते! ‘तारण झाल्याचे’ सांगण्यात आलेल्या अनेक लोकांचा, येशूचे अनुकरण करण्याचा अथवा त्याचे आज्ञापालन करण्याचा मुळीच इरादा नसतो. खरे तर एका प्रॉटेस्टंट पाळकांनी म्हटले: “अर्थात, ख्रिस्तावर असलेला आपला विश्वास अखंड असला पाहिजे. परंतु, तो असलाच पाहिजे अथवा तो कोणत्याही परिस्थितीत असतोच, या दाव्याला बायबलमध्ये कोणताही आधार नाही.”
याउलट बायबल, स्वतःला “तारण झालेले” समजणाऱ्या लोकांमध्ये सामान्य असलेल्या अनैतिक कृत्यांची यादी देते. अशी कृत्ये करणे सुरूच ठेवले होते अशा एका व्यक्तीबद्दल बायबलने ख्रिश्चनांना निर्देशन दिले: “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.” दुष्ट लोकांचे देवाच्या ख्रिस्ती मंडळीला दूषित करणे हे त्याला नक्कीच आवडणार नाही!—१ करिंथकर ५:११-१३.
तर मग, येशूचे अनुकरण करणे याचा काय अर्थ होतो व आपण ते कशा प्रकारे करू शकतो? येशूने काय केले बरे? तो अनैतिक होता का? व्यभिचारी? मद्यपी? खोटे बोलणारा? व्यवहारात अप्रामाणिक, होता का? नक्कीच नाही! कदाचित तुम्ही विचाराल ‘पण या सर्व गोष्टी माझ्या जीवनातून काढणे अनिवार्य आहे का?’ याचे उत्तर हवे असल्यास, इफिसकर ४:१७ ते ५:५ विचारात घ्या. आपण काहीही केले तरी देव आपला स्वीकार करील असे ते म्हणत नाही. त्याउलट, ते आपल्याला जगिक राष्ट्रांपेक्षा वेगळे असण्यास सांगते ज्यांची “बुद्धि अंधकारमय झाली आहे, . . . परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही . . . तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा . . . चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये . . . पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये; . . . जारकर्मी, अशुद्ध कृति करणारा किंवा लोभी हा मूर्तिपूजक आहे; असल्या कोणासहि ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहा.”
आपण येशूच्या उदाहरणाच्या सुसंगतेत जगण्याचा निदान प्रयत्न देखील करत नसलो तरी आपण त्याचे अनुकरण करीत आहोत का? आपले जीवन अधिकाधिक ख्रिस्तासारखे करण्यासाठी आपण कार्य करायला नको का? “जसे आहात तसे—आताच ख्रिस्ताकडे या,” असे, एका धार्मिक हस्तपत्रिकेप्रमाणे म्हणणारे लोक या महत्त्वपूर्ण प्रश्नाचा फारच क्वचित विचार करतात.
येशूच्या शिष्यांपैकी एकाने अशी ताकीद दिली की काही अभक्त माणसे “आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात; आणि आपला एकच स्वामी व प्रभु येशू ख्रिस्त ह्याला . . . नाकारतात.” (यहूदा ४) खरे पाहता, आपण कशा प्रकारे “देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप” देऊ शकतो? आपण ज्या मानवी अपूर्णतेच्या पापांवर विजय मिळवू पाहतो त्यांऐवजी, आपण करत राहू इच्छितो अशा हेतुपुरस्सर पापांना येशूचे यज्ञार्पण झाकते, हे गृहित धरण्याद्वारे आपण असे करू शकू. तुम्ही “शुद्धिकरण, त्याग किंवा परिवर्तन” करावे हे अनिवार्य नाही, असे म्हणणाऱ्या अमेरिकेच्या सुप्रसिद्ध सुवार्तिकाशी सहमत होण्यास आपल्याला नक्कीच आवडणार नाही.—प्रेषितांची कृत्ये १७:३०; रोमकर ३:२५; याकोब ५:१९, २० यांची तुलना करा.
विश्वास कृतीला चालना देतो
“येशूवर विश्वास ठेवणे” ही केवळ एकदाच केलेली कृती असून आज्ञापालनास चालना देण्याइतपत आपला विश्वास दृढ असण्याची आवश्यकता नाही, असे अनेक लोकांना सांगण्यात आले आहे. परंतु, बायबल याच्या एकमतात नाही. जे लोक ख्रिस्ती जीवनक्रमाने जगणे सुरू करतात ते तारले जातात असे येशूने म्हटले नाही. त्याऐवजी त्याने म्हटले: “जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.” (मत्तय १०:२२) बायबल आपल्या ख्रिस्ती मार्गाक्रमणाची तुलना एका स्पर्धेसोबत करते जिच्या अंतास तारण हे बक्षिस आहे. तसेच ते आम्हास आर्जविते: “असे धावा की तुम्हाला ते मिळेल.”—१ करिंथकर ९:२४.
अशा प्रकारे, “ख्रिस्ताला स्वीकारणे” यात, येशूच्या सर्वश्रेष्ठ यज्ञार्पणाद्वारे मिळणाऱ्या आशीर्वादांचा स्वीकार करण्याशिवाय आणखी कितीतरी अधिक समाविष्ट आहे. आज्ञापालन अपेक्षिले जाते. न्यायनिवाड्यास “देवाच्या घरापासून” आरंभ होतो असे प्रेषित पेत्र म्हणतो व “तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेला आज्ञाधारक नसलेल्यांचा शेवट काय होईल?,” असेही तो म्हणतो. (१ पेत्र ४:१७, NW) यामुळे आपण केवळ ऐकणे व विश्वास ठेवणे यांपेक्षा अधिक केले पाहिजे. बायबल म्हणते की, ‘आपण वचनाप्रमाणे आचरण करणारे असावे, केवळ ऐकणारे असू नये; अशाने आपण स्वतःची फसवणूक करतो.’—याकोब १:२२.
येशूचे स्वतःचे संदेश
प्रकटीकरण या बायबलच्या पुस्तकात, येशूने योहानाद्वारे सात प्रारंभिक ख्रिस्ती मंडळ्यांना प्रसारित केलेले संदेश आहेत. (प्रकटीकरण १:१, ४) या मंडळ्यांतील लोकांनी येशूला आधीच “स्वीकारले” असल्यामुळे तेवढेच पुरेसे होते असे त्याने म्हटले का? नाही. त्याने त्या लोकांचे कार्य, त्यांचे परिश्रम व त्यांचा धीर याची प्रशंसा केली व त्यांचे प्रेम, विश्वास व सेवा याबद्दल तो बोलला. पण दियाबल त्यांची परीक्षा घेईल, तसेच “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे” प्रतिफळ देण्यात येईल असेही त्याने म्हटले.—प्रकटीकरण २:२, १०, १९, २३.
अशा प्रकारे, लोकांनी एका धार्मिक सभेत येशूचा ‘स्वीकार केल्यावर’ लगेचच, त्यांचे तारण एक “पूर्ण झालेले कार्य” होते असे त्यांना सांगण्यात आले तेव्हा, लोक समजू शकले त्यापेक्षा कितीतरी मोठ्या जबाबदारीचे वर्णन येशूने केले. येशूने म्हटले: “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो, तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल.”—मत्तय १६:२४, २५.
स्वतःचा त्याग करावा? येशूला सतत अनुसरावे? यासाठी परिश्रम करावे लागतील. यामुळे आपल्या जीवनात बदल घडतील. तरीसुद्धा, आम्हापैकी काहींना येशूसाठी ‘आपल्या जिवास मुकावे’ लागेल—त्यासाठी मरावे लागेल, असे त्याने खरोखरच म्हटले का? होय, त्या प्रकारचा विश्वास, केवळ देववचनाच्या अभ्यासाद्वारे तुम्ही शिकू शकता अशा उदात्त गोष्टींच्या ज्ञानानेच उत्पन्न होतो. स्तेफनास धर्मवेड्यांकरवी दगडमार करण्यात आला त्या दिवशी हे स्पष्ट झाले. या धर्मवेड्यांना, स्तेफन ‘ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना . . . तोंड देववेना.’ (प्रेषितांची कृत्ये ६:८-१२; ७:५७-६०) तसेच, अशाप्रकारचा विश्वास आपल्या काळात स्वतःच्या बायबल-प्रशिक्षित विवेकाविरुद्ध न जाता नात्सी छळछावण्यांत मरण पावलेल्या शेकडो यहोवाच्या साक्षीदारांकरवी प्रदर्शित करण्यात आला आहे.a
ख्रिस्ती आवेश
आपण आपल्या ख्रिस्ती विश्वासाला धरून राहिले पाहिजे कारण, तुम्हाला काही चर्चमध्ये किंवा धार्मिक दूरदर्शन कार्यक्रमांत जे ऐकावयास मिळाले असले तरीसुद्धा, बायबल असे म्हणते की आपण पडू शकतो. ते आम्हास अशा ख्रिश्चनांविषयी सांगते ज्यांनी आपला “सरळ मार्ग” सोडला. (२ पेत्र २:१, १५) या कारणास्तव, आपण “भीत व कापत आपले तारण साधून” घेतले पाहिजे.—फिलिप्पैकर २:१२; २ पेत्र २:२०.
ज्या लोकांनी येशू व त्याच्या प्रेषितांना शिकवताना ऐकले त्या पहिल्या-शतकातील ख्रिश्चनांनी देखील या बाबतीत अशीच समजूत बाळगली का? होय. त्यांना काहीतरी करायचे होते हे त्यांना माहीत होते. येशूने म्हटले: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा, . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा.”—मत्तय २८:१९, २०.
येशूने हे म्हणण्याच्या काही आठवड्यांनंतर, एकाच दिवशी ३,००० लोकांचा बाप्तिस्मा झाला. विश्वास करणाऱ्यांची संख्या लवकरच ५,००० पर्यंत वाढली. ज्यांनी विश्वास केला त्यांनी इतरांना शिकविले. छळाने त्यांची पांगापांग केली त्यामुळे त्यांचा संदेश पसरविण्यातच मदत झाली. केवळ थोडे पुढाकार घेणारेच नव्हे, तर “ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले” असे बायबल म्हणते. यामुळेच सुमारे ३० वर्षांनी, सुवार्तेची “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत . . . घोषणा झाली” असे प्रेषित पौल लिहू शकला.—प्रेषितांची कृत्ये २:४१; ४:४; ८:४; कलस्सैकर १:२३.
‘येशूचा आता स्वीकार करा व तुमचे सर्वकाळासाठी तारण होईल’ असे म्हणणाऱ्या काही टी. व्ही. सुवार्तिकांसारखे पौलाने लोकांचे धर्मांतर केले नाही. तसेच, “किशोरवयीन असतानाच . . . माझे तारण झालेले होते,” असे म्हणणाऱ्या अमेरिकन पाळकाचा आत्मविश्वास त्याच्याठायी नव्हता. राष्ट्रांच्या लोकांकडे ख्रिस्ती संदेश नेण्यासाठी येशूने पौलाची व्यक्तिगतरित्या निवड केल्यावर २० वर्षांपेक्षा अधिक काळानंतर, या परिश्रमी प्रेषिताने लिहिले: “मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्यांस घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.”—१ करिंथकर ९:२७; प्रेषितांची कृत्ये ९:५, ६, १५.
तारण, यहोवाकडून मोफत मिळणारी देणगी आहे. ते कमवता येऊ शकत नाही. तरीसुद्धा त्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोणीतरी तुम्हाला एक मोलवान भेटवस्तू दिल्यास तुम्ही जर ती उचलून तुमच्यासोबत नेण्याइतकीही गुणग्राहकता दाखवली नाही तर, तुमच्या कृतज्ञतेच्या अभावामुळे भेटवस्तू देणाऱ्या व्यक्तीला कदाचित ती आणखी कोणाला द्यावी असे वाटेल. तर मग, येशू ख्रिस्ताचे रक्त किती मोलवान आहे? ती एक मोफत देणगी आहे, परंतु आपण त्यासाठी मनःपूर्वक गुणग्राहकता दर्शविली पाहिजे.
खरे ख्रिस्ती एका तारण झालेल्या अवस्थेत आहेत, म्हणजेच ते देवासमोर अनुमोदित स्थितीत आहेत. एक समूह या नात्याने त्यांचे तारण निश्चित आहे. वैयक्तिकपणे त्यांनी देवाच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. तथापि, आपण अपेशी ठरू शकतो, कारण येशूने म्हटले: “कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो.”—योहान १५:६.
‘देवाचे वचन सजीव आहे’
आधीच्या लेखाच्या सुरवातीला उल्लेखिलेले संभाषण, जवळजवळ ६० वर्षांपूर्वी घडले होते. तारण केवळ येशू ख्रिस्तामार्फत शक्य आहे असा जॉनीचा अजूनही विश्वास आहे, परंतु, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात याची त्याला जाणीव आहे. बायबल मानवजातीसाठी, आशेच्या एकमात्र वास्तविक उगमाकडे निर्देश करते व आपण, या अद्भुत पुस्तकाचा अभ्यास करावा, त्याने प्रेरित व्हावे व त्यास आपल्याला प्रेम, विश्वास, दया, आज्ञाधारकता आणि धीराची कृत्ये करण्यास, प्रवृत्त करू द्यावे याबद्दल त्याला खात्री आहे. त्याने त्याची मुले याच विश्वासात लहानाची मोठी केली आहेत व आता ती त्यांच्या मुलांनासुद्धा याचप्रकारचे वळण लावीत आहेत हे पाहून तो आनंदी आहे. सर्वांचा अशाच प्रकारचा विश्वास असावा अशी त्याची इच्छा आहे व तो इतरांच्या अंतःकरणांवर व मनांवर बिंबवण्यासाठी त्याला जे जे शक्य होईल ते करतो.
‘देवाचे वचन सजीव व सक्रिय आहे,’ असे लिहिण्यास प्रेषित पौल प्रेरित झाला होता. (इब्रीयांस ४:१२) ते जीवन बदलू शकते. ते तुम्हाला प्रेम, विश्वास व आज्ञाधारकतेची मनःपूर्वक कृत्ये करण्यास प्रवृत्त करू शकते. पण बायबल जे म्हणते त्याचा केवळ मानसिकदृष्ट्या “स्वीकार” करण्यापेक्षा अधिक काही करण्याची आवश्यकता आहे. त्याचा अभ्यास करा व त्यास तुमच्या अंतःकरणाला प्रवृत्त करू द्या. त्याच्या सुज्ञानास तुमचे मार्गदर्शन करू द्या. जवळजवळ ५०,००,००० यहोवाचे स्वेच्छिक साक्षीदार २३० पेक्षा अधिक राष्ट्रांत मोफत गृह बायबल अभ्यास देतात. अशा अभ्यासातून तुम्ही काय शिकू शकता हे जाणण्यासाठी, या नियतकालिकाच्या प्रकाशकांशी संपर्क साधा. तुम्हाला लाभणारा विश्वास व आध्यात्मिक बळाने तुम्ही हर्षित व्हाल!
[तळटीपा]
a डॉ. क्रिस्टीन इ. किंग हिने तिच्या, नात्सी राष्ट्र व नवीन धर्म: विरोधाच्या पाच उदाहरणांचा अभ्यास (इंग्रजी) या पुस्तकात असा अहवाल दिला: “दर दोन जर्मन [यहोवाच्या] साक्षीदारांतून एकास अटक करण्यात आली व दर चार लोकांपैकी एकाने त्याचा जीव गमावला.”
[७ पानांवरील चौकट]
‘विश्वास राखण्यास फार का झटावे’?
यहूदा हे बायबलचे पुस्तक “ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक,” यांस संबोधलेले आहे. त्यांनी ‘येशूला स्वीकारले’ असल्यामुळे त्यांचे तारण निश्चित होते असे हे पुस्तक म्हणते का? नाही, यहूदाने अशा ख्रिश्चनांना, ‘विश्वास राखण्यास फार झटावे’ असे सांगितले. असे करण्यासाठी त्याने त्यांना तीन कारणे दिली. पहिले, “प्रभूने मिसर देशांतून आपल्या लोकांना निभावून नेले,” परंतु, त्यांपैकी अनेकजण नंतर विश्वासहीन झाले. दुसरे, देवदूतसुद्धा बंड करून दुरात्मे बनले. तिसरे, देवाने सदोम व गमोरा या शहरांत आचरण्यात आलेल्या गंभीर लैंगिक अनैतिकतेमुळे त्या शहरांस नष्ट केले. यहूदा हे बायबल अहवाल “उदाहरणादाखल” देतो. होय, ‘येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेल्या’ विश्वासू लोकांनासुद्धा खऱ्या विश्वासातून पडून जाऊ नये याची काळजी घ्यावी लागते.—यहूदा १-७.
[८ पानांवरील चौकट]
कोणते उचित आहे?
बायबल म्हणते: “नियमशास्त्रातील कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो.” ते असेही म्हणते: “केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो.” कोणते उचित आहे? आपण विश्वासाद्वारे नीतिमान ठरतो की क्रियांद्वारे?—रोमकर ३:२८; याकोब २:२४.
बायबलमधील सुसंगत उत्तरानुसार दोन्ही उचित आहेत.
देवाने मोशेला दिलेल्या नियमाने, शतकानुशतके यहुदी उपासकांकडून, त्यांनी विशिष्ट यज्ञे व अर्पणे करावी, सणाचे दिवस पाळावे व पथ्य व इतर अटी पाळाव्या अशी अपेक्षा केली. येशूने परिपूर्ण यज्ञार्पण पुरवल्यावर, असे “नियमशास्त्रातील कर्म,” किंवा केवळ “क्रिया” अनावश्यक बनल्या.—रोमकर १०:४.
परंतु, येशूच्या श्रेष्ठ यज्ञार्पणाने मोशेच्या नियमशास्त्राधीन करण्यात आलेल्या कर्मांची जागा घेतल्यामुळे आपण बायबलच्या निर्देशनांकडे दुर्लक्ष करू शकतो असा याचा अर्थ होत नाही. ते म्हणते: “ख्रिस्ताचे रक्त आपली सद्सद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी [जुन्या] निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?”—इब्रीयांस ९:१४.
आपण ‘जिवंत देवाची सेवा’ कशा प्रकारे करतो? इतर बाबींशिवाय, बायबल आम्हास देहाच्या कर्मांविरुद्ध लढा देण्यास, जगाच्या अनैतिकतेचा प्रतिकार करण्यास व त्याचे पाश टाळण्यास सांगते. ते म्हणते: ‘विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते करा’ व आपण “सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे; आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे.” तसेच आपली “मने खचून,” आपण “थकून जाऊ नये” असे बायबल आपल्याला आर्जवते.—१ तीमथ्य ६:१२; इब्रीयांस १२:१-३; गलतीकर ५:१९-२१.
असे केल्याने आपण तारण कमवत नाही, कारण इतक्या आश्चर्यकारक आशीर्वादाच्या लायक होण्याइतपत पुरेसे कार्य कोणताही मानव कधीही करू शकत नाही. तथापि, बायबलनुसार देव व ख्रिस्त आपल्याकडून अपेक्षितात त्या गोष्टी करून आपले प्रेम व आज्ञाधारकपणा प्रदर्शित करण्यात अपेशी ठरल्यास, आपण ही अद्वितीय देणगी मिळविण्यास लायक नाही. आपला विश्वास प्रदर्शित करणाऱ्या कर्मांशिवाय, येशूला अनुसरत असल्याचा आपला दावा अपूर्ण ठरेल कारण बायबल स्पष्टपणे म्हणते: “विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे.”—याकोब २:१७.
[७ पानांवरील चित्रं]
बायबलचा अभ्यास करा व त्याने प्रेरित व्हा