वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ९/१ पृ. २८-२९
  • “सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एकता व नैतिक शुद्धी महत्त्वाची
  • इतरांबद्दल समजदार असा
  • आदर प्रदर्शित करा व व्यवस्थितपणा राखा
  • सर्वदा सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा
  • “तुम्ही विश्‍वासात आहा किंवा नाही याविषयी आपली परिक्षा करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • सडेपण—अविचलित कार्याचे द्वार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवाचे वचन सजीव आहे करिंथकरांना लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • तुम्ही यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ९/१ पृ. २८-२९

“सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा”

पहिले करिंथकर पत्रातील ठळक मुद्दे

यहोवा देवाचे गौरव, हे जे सर्व त्याची भक्‍ती “आत्म्याने व खरेपणाने” करतात, त्यांचेसाठी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. (योहान ४:२३, २४) या कारणास्तव, प्रेषित पौलाने प्राचीन करिंथमधील समविश्‍वासू ख्रिश्‍चनांना उद्देशून म्हटलेः “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा.” (१ करिंथकर १०:३१) हे करीत राहण्यात आम्हास या जडवादीय अनैतिक व खोट्या धर्मात पार गढलेल्या जगात आमच्या समस्या सोडविण्यात यहोवा ज्या मार्गांचा उपयोग करीत आहे त्यांचा स्वीकार करण्यास हवा.

करिंथमधील ख्रिश्‍चनांना समस्या सोडविण्यात ईश्‍वरी साहाय्याची गरज होती, कारण ते भरभराटीस आलेल्या व खोट्या धर्मकल्पनांनी खच्चून भरलेल्या अनैतिक शहरात जीवन जगत होते. ग्रीस व पीलोपोनीसस्‌ यांच्या दरम्यानच्या संयोगभूमीवर वसलेले असता, करिंथ हे अखया या रोमी प्रांताची राजधानी होते. तेथील लोकसंख्या सुमारे ४,००,००० पर्यंत होती. पौलाने तेथे इ. स. ५० च्या सुमारास मंडळीची स्थापना केली.—प्रे. कृत्ये १८:१-११.

करिंथकरांनी पौलाला विवाह व मूर्तीला वाहिलेले मांस खाण्याविषयीचे प्रश्‍न विचारले होते. (७:१) त्यांच्यामध्ये फुटी व अनैतिकतेचे गंभीर पातक घडले असल्याचे बघून तो फार दुःखित झाला होता. प्रभुच्या सांजभोजनाचा विधि योग्यप्रकारे साजरा करण्याविषयीचा त्यांना सल्ला देण्याची गरज होती. एवढेच काय पण धर्मत्यागी वृत्ती आपले भयप्रद आव्हान देत होती. मंडळीला प्रीतीविषयीचा उपदेश मिळणे जरुरीचे होते. ह्‍या सर्व कारणास्तव पौलाने इफिसमधून इ. स. ५५ च्या सुमारास आपले पहिले प्रेरित पत्र करिंथकरांना लिहिले. पण आम्हालाही त्याकडून फायदा होऊ शकतो.

एकता व नैतिक शुद्धी महत्त्वाची

आम्ही ‘सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करीत असलो’ तर करिंथकरांना ज्या समस्येला तोंड द्यावे लागले त्याप्रमाणे आज मंडळीत जे कोणी फुट पाडू पाहतात अशांच्या मागे जाणार नाही. (१:१–४:२१) पौलाने त्यांना उपदेश केला की, ‘त्यांनी सर्वांनी सारखेच बोलावे व एकचित्ताने व एकमताने यथास्थित असावे.’ आम्ही हा उपदेश अनुसरला आणि आध्यात्मिक गुणवत्ता जोपासली तर एकता टिकून राहील. कोणाही पापी मनुष्याबद्दल गर्व न बाळगता आम्ही हे आठवणीत ठेवावे की, जरी आम्ही पेरतो व पाणी घालतो तरी देव त्याला आध्यात्मिकतेत वाढवीत असतो. करिंथमधील गर्विष्ठांकडे असे काही नव्हते जे त्यांना प्राप्त झाले होते. यास्तव आम्ही स्वतःला कधीही इतर समविश्‍वासू बांधवांपेक्षा अधिक चांगला, सुधारलेला, प्रवीण समजू नये. असली ही लीनवृत्ती एकता घडविते.

एकता नांदाविशी वाटते तर मंडळी आध्यात्मिक दृष्टीने शुद्ध ठेवण्यासाठी नेमस्त वडीलांनी सतत प्रयत्नशील असावे. (५:१–६:२०) “थोडे खमीर सगळ्या गोळ्याला फुगविते,” त्यामुळे सराव झालेले व्यभिचारी, लोभी, मूर्तिपूजक, निंदक, मद्यपी आणि वित्त हरण करणारे अशांना मंडळीतून बहिष्कृत केलेच पाहिजे. देवाच्या मंदिरास भ्रष्ट करणारी नैतिक अशुद्धता यहोवाच्या लोकांत सहन केली जाऊ नये. याउलट, त्यांनी देवाचे गौरव घडेल अशा गोष्टी केल्या पाहिजेत.

इतरांबद्दल समजदार असा

‘सर्वकाही देवाच्या गौरवार्थ करण्यात’ आम्हास पौलाने विवाहितांना तसेच जे सडे त्यांना जो उपदेश केला आहे तो पाळला पाहिजे. (७:१-४०) जे लग्नबंधनात एक झाले आहेत त्यांनी एकमेकांस समजदारीने वागून लैंगिक देणे द्यावे. विवाहीत ख्रिश्‍चनाने आपल्या विश्‍वासात नसलेल्या सोबत्यापासून अलग होऊ नये, कारण एकत्रपणे राहणे हे कदाचित त्यांची तारणप्राप्ती घडवून आणण्यात साहाय्य करू शकेल. विवाह जरी चिंता वाढवीत असला तरी सडेपणाचे फायदे एखाद्यास प्रभुच्या सेवेत इतरांना आध्यात्मिक रितीने मदत करण्यास सुलभता प्राप्त करून देते.

कोणी विवाहीत असो की सडे, इतरांच्या आध्यात्मिक सुदृढतेबद्दल समजदारी प्रदर्शित करणे ही सर्व ख्रिश्‍चनांवरील जबाबदारी आहे. (८:१–१०:३३) ह्‍या कारणास्तव करिंथकरांना हा सल्ला देण्यात आला की, त्यांनी इतरांस अडखळण बनू नये यासाठी मूर्तीला अर्पिलेले पदार्थ खाऊ नयेत. सुवार्तेचा स्वीकार करण्यात कोणालाही अडखळण होऊ नये यासाठी पौलाने हक्क होता तरी इतरांकडून भौतिक मदतीचा लाभ घेतला नाही. याशिवाय, ‘इतरांना घोषणा केल्यावर कदाचित आपणच अपात्र ठरू नये’ यासाठी त्याने ‘आपल्या शरीराला बुकलून दास करून ठेविले.’ अरण्यवासातील इस्राएलांचा पापमय अनुभव आपल्या अंतःकरणी लावून घेतल्यास तो आम्हास मूर्तिपूजा व वाईट कर्मे टाळण्यात मदत करील. याखेरीज, ‘सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करणे’ हे इतरांना अडखळण न बनण्यात साहाय्यक ठरेल.

आदर प्रदर्शित करा व व्यवस्थितपणा राखा

‘सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करणे आहे’ तर आम्ही योग्य तो आदर प्रदर्शित केलाच पाहिजे. (११:१-३४) पहिल्या शतकातील ख्रिस्ती स्त्रिया मंडळीत प्रार्थना किंवा भविष्यवाद करतेवळी मस्तकपणाविषयीचा आदर प्रदर्शित करण्यामध्ये आपल्या डोक्यावर आच्छादन घालीत असत. मस्तकपणाविषयीचा हाच आदर आजही धार्मिक स्त्रिया याचप्रकारे प्रदर्शित करतात. आणखी त्या करिंथमधील लोकांसारखे ताडण न मिळण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रभुच्या सांज भोजनास आदर प्रदर्शित केला पाहिजे.

‘सर्वकाही देवाच्या गौरवार्थ करण्यासाठी’ आम्ही आमच्या सभा सुव्यवस्थेत चालविल्या पाहिजेत. (१२:१–१४:४०) सुरवातीचे ख्रिस्ती सभेत येत तेव्हा अन्य भाषा बोलण्याच्या पवित्र आत्म्याच्या दानाचा वापर, त्यांचा उगम व उद्देशानुरुपची योग्य रसिकता बाळगून आदराने व आवडीने करावयाचा होता. आज जरी आम्हास ही दाने प्राप्त नाहीत तरी आम्ही ती प्रीती प्रदर्शित करू शकतो जी देवास अधिक गौरव देते व या सर्वांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. आम्ही आमच्या सभांची उत्तम संघटना करून व आदराने “सर्वकाही साजेल असे व्यवस्थितपणे” चालेल असे करून यहोवाचे अधिक गौरव करीत असतो.

‘सर्वकाही देवाच्या गौरवासाठी’ करण्यात आम्ही स्वतःस सतत पवित्र शास्त्रीय तत्त्वपालनाची आणि आध्यात्मिकतेत खंबीर राहण्याची आठवण देत राहावी. (१५:१–१६:२४) कदाचित ग्रीक शिकवणूकींचा काहीसा परिणाम तसाच मागे राहिल्यामुळे करिंथमधील मंडळीतील काहींचे म्हणणे होतेः “मेलेल्यांचे पुनरुत्थान होत नाही.” (पडताळा प्रे. कृत्ये १७:१८, ३२.) त्यांचा कदाचित पूर्व कलुषित धर्मभ्रष्ट मतावरील दृष्टीकोन कायम असावा की, भावी पुनरुत्थान होत नाही पण जिवंत ख्रिश्‍चनांना लाक्षणिक आध्यात्मिक पुनरुत्थानाचा अनुभव आला आहे. (२ तीमथ्यी २:१६-१८) पौलाने येशूचे उदाहरण देऊन त्याच्या खऱ्‍या आशेस पाठिंबा दिला, तसेच हेही स्पष्ट केले की, स्वर्गीय अमर जीवन मिळविण्यासाठी पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना मरणे भाग आहे. त्याचे बोल इतर मार्गानी आम्हाला धर्मत्याग टाळण्यात व “विश्‍वसात दृढ उभे राह”ण्यात आमचे बहुमोल साहाय्य करतात.

सर्वदा सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा

पौलाने करिंथकरांस पहिले पत्र यात दिलेला सल्ला जसा इ. सनातील पहिल्या शतकासाठी फायदेकारक होता तसाच तो आजही आहे. तो आजच्या दिवसातील यहोवाच्या साक्षीदारांना शुद्धता केलेले लोक यानाते एकजुटीत यहोवाची सेवा करण्याची चालना देतो. प्रेषिताच्या शब्दांनी आम्हास इतरांबद्दल समजदारी व आदर प्रदर्शित करण्याचे उत्तेजन द्यावे. पौलाने जे म्हटले ते आमचे धर्मत्यागी वृत्तीपासून स्वतःला दूर ठेवण्यात तसेच खऱ्‍या विश्‍वासात टिकवून ठेवण्यात साहाय्य करते.

खरेच, यहोवाच्या प्रत्येक निष्ठावंत सेवकाची ही ह्रदयपूर्वक इच्छा आहे की, यहोवाची स्तुती करावी, त्याच्या राज्याची घोषणा करावी व त्याचे पवित्र नाम गौरवावे. (स्तोत्रसंहिता १४५:१, २, १०-१३) प्रत्यक्षात, पौलाने करिंथकरांना लिहिलेले पहिले पत्र आमचे “सर्वकाही देवाच्या गौरवासाठी” करण्यात मदत करते.

[२८ पानावरील चौकट/चित्र]

नक्की मरणः पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात एकापेक्षा अधिक वेळा त्याने आखाड्यामधील मरणप्रसंग उद्‌भवल्याचा उल्लेख केला आहे. उदाहरणार्थ त्याने लिहिलेः “कारण मला वाटते, आम्हा प्रेषितांना शेवटच्या जागेचे व मरणास नेमलेल्यासारखे असे पुढे ठेविले आहे; कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूताला व मनुष्याला खेळ असे झालो आहो.” (१ करिंथकर ४:९) यावेळी पौलाच्या मनात बेस्टिआरी (हिंस्र पशुंसोबत लढणारी माणसे) तसेच कसलेले योद्धे (माणसा-माणसांची झुंज) याविषयीचे विचार असतील. काही धनलाभासाठी लढत, पण गुन्हेगारांना तर लढण्यास भाग पाडले जाई. सुरवातीस शस्त्रे देत, नंतर ती व वस्त्रेही काढून घेत आणि असहाय्यतेत मरण्यास सोडून देत.

केवळ मानवजातीचे “जग” नव्हे तर “देवदूत” व “मनुष्ये” यांच्या उपस्थितीतही प्रेषित अंतिम लढतीच्या देखाव्यात ज्यांना आता मरायचे आहे त्यासारखे सज्ज होते. पौलाने म्हटले की, “इफिसात मी श्‍वापदासोबत लढाई केली,” पण काहींना शंका वाटते की रोमी नागरिक असता त्याला हे सर्व कसे होणार, त्यामुळे कदाचित त्याने हिंस्र विरोधकांच्या आठवणीत असे म्हटले असावे. (१ करिंथकर १५:३२) तरीही पौलाने जे म्हटले की, देवाने त्याला आसियात, (जेथे इफिस आहे) “एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडविले,” ते मानवी विरोधकांपेक्षा आखाड्यातील हिंस्र श्‍वापदाची जी खरी झुंज होते त्याच्या अनुभवास दुजोरा देणारे ठरते.—२ करिंथकर १:८-१०; ११:२३; प्रे. कृत्ये १९:२३-४१.

[२९ पानावरील चौकट/चित्र]

बक्षिस दृष्टीपथात ठेवाः पौलाने ग्रीक खेळाच्या काही गोष्टींचा महत्त्वपूर्ण मुद्यांची स्पष्टता करण्यासाठी उपयोग केला. (१ करिंथकर ९:२४-२७) करिंथच्या जवळपास दर दोन वर्षी होणाऱ्‍या इश्‍थेमी स्पर्धेत धावणे, मुष्टीयुद्ध आणि इतर गोष्टी होत. या स्पर्धात सहभागी होण्यासाठी खेळाडूंना संयम करावा लागे, पथ्यकारी आहार घ्यावा लागे व साधारण दहा महिने द्राक्षारस वर्ज्य करावा लागे. या इश्‍थेमी स्पर्धात विजयी होणाऱ्‍या विजेत्यांना निस्तेज होणाऱ्‍या देवदार किंवा आइव्हि लतेपेक्षा फुलांची माळ घालण्यात येत असे. पण, अभिषिक्‍त ख्रिस्तीजन न कोमेजणारा असा अमर जीवनाचा मुकुट मिळविण्याची धडपड करतो. हे बक्षिस मिळविण्यासाठी त्याने आपले डोळे त्यावर लावले पाहिजे आणि आत्मसंयमन केले पाहिजे. हेच तत्त्व, चिरकालिक पृथ्वीवरील जीवन मिळविण्याची आशा धरणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांनाही लागू होणारे आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा