वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/१२ पृ. १
  • योग्य दिशेने प्रयत्न करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योग्य दिशेने प्रयत्न करा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • वैयक्‍तिक क्षेत्राचा फायदा
    आमची राज्य सेवा—२०१३
  • तुमच्याकडे वैयक्‍तिक क्षेत्र आहे का?
    आमची राज्य सेवा—२००६
  • उत्तम परिणाम मिळतील अशा तऱ्‍हेने सेवा करा
    आमची राज्य सेवा—१९९८
  • बायबल विद्यार्थ्यांनो, तुम्ही प्रचारक बनायला तयार आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
आमची राज्य सेवा—२०१२
km १/१२ पृ. १

योग्य दिशेने प्रयत्न करा

१. पहिले करिंथकर ९:२६ हे वचन आपल्या सेवाकार्याला कसे लागू होते?

१ प्रेषित पौलाने लिहिले: “मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्‍चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करितो, म्हणजे वाऱ्‍यावर मुष्टिप्रहार करीत नाही.” (१ करिंथ. ९:२६) आध्यात्मिक ध्येये गाठण्यासाठी पौलाने कशा प्रकारे आपले लक्ष केंद्रित केले त्याविषयी तो बोलत होता. असे असले तरी त्याच्या शब्दांतील तत्त्व, आपल्या सेवाकार्यालाही लागू होते. आपणही योग्य दिशेने “मुष्टिप्रहार” किंवा प्रयत्न केले तर सेवाकार्यात आपल्याला यश मिळेल. तर मग, आपण योग्य दिशेने प्रयत्न कसे करू शकतो?

२. कोणत्या वेळी व कोणत्या ठिकाणी प्रचार कार्य करावे हे ठरवताना आपण पौलाचे व पहिल्या शतकातील सुवार्तिकांचे अनुकरण कसे करू शकतो?

२ जेथे लोक असतील तेथे जा: जेथे लोक भेटण्याची शक्यता होती तेथे पौलाने व पहिल्या शतकातील इतर सुवार्तिकांनी जाऊन प्रचार कार्य केले. (प्रे. कृत्ये ५:४२; १६:१३; १७:१७) आपल्या क्षेत्रात जर जास्त लोक संध्याकाळच्या वेळी घरी असतील तर त्या वेळी घरोघरचे साक्षकार्य करणे जास्त फायदेकारक ठरेल. बस स्थानकावर किंवा रेल्वे स्टेशनवर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी लोकांची जास्त गर्दी असते का? तुमच्या क्षेत्रातील बाजारपेठेत कोणत्या वेळी जास्त लोक भेटण्याची शक्यता आहे? त्या वेळी रस्त्यावरील साक्षकार्य करणे सगळ्यात परिणामकारक ठरेल.

३. आपण ज्या प्रकारे आपले क्षेत्र उरकतो त्याबाबतीत आपण योग्य दिशेने प्रयत्न कसे करू शकतो?

३ क्षेत्रात विचारपूर्वक कार्य करा: आपण ज्या प्रकारे आपले क्षेत्र उरकतो त्याबाबतीतही योग्य दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, एकाच क्षेत्रात जर मोठा गट गेला तर गटाचे नियोजन करण्यात व त्यातील प्रत्येकाला क्षेत्र वाटून देण्यात बराच वेळ जाऊ शकतो; त्याऐवजी छोटे गट करून जाणे जास्त उपयोगी ठरेल. तसेच ग्रामीण भागात सेवाकार्य करताना जर गट छोटा असेल तर आपल्याला क्षेत्र लवकर उरकता येईल व लोकांशी बोलण्याच्या जास्त संधी मिळतील. दूरच्या क्षेत्रात जाण्या-येण्याचा वेळ वाचवण्यासाठी आपण घराजवळचे क्षेत्र मागून घेऊ शकतो का?

४. कोणती गोष्ट आपल्याला यशस्वी “माणसे धरणारे” होण्यास मदत करेल?

४ येशूने सुवार्तिकांची तुलना मासे धरणाऱ्‍यांशी केली. (मार्क १:१७) मासे धरणाऱ्‍याचा उद्देश फक्‍त पाण्यात जाळे टाकणे इतकाच नसतो तर मासे धरणे हा असतो. त्यामुळे, ज्या ठिकाणी व ज्या वेळी मासे असण्याची जास्त शक्यता असते त्या ठिकाणी व त्या वेळी यशस्वी मासे धरणारे जातात व वेळ न घालवता मासे धरतात. होय, ते योग्य दिशेने प्रयत्न करतात. तशीच आस्था व मेहनती वृत्ती आपणही आपल्या सेवाकार्यात दाखवू या.—इब्री ६:११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा