वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • देवाच्या मार्गानुसार चालत राहा
    टेहळणी बुरूज—१९९९ | मे १५
    • ६, ७. इस्राएल लोक यहोवा देवाचे उपासक होते, तरी कोणत्या प्रसंगी ते पापवर्तनात पडले आणि का?

      ६ पौलाने दाखवून दिल्याप्रमाणे प्राचीन इस्राएलमध्ये हेच घडले. त्याने लिहिले: “ह्‍या गोष्टी आपल्या उदाहरणादाखल झाल्या, अशा हेतूने की, त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते तसे तुम्ही होऊ नका; लोक खावयाला प्यावयाला बसले, नंतर नाच-तमाशा करावयास उठले असे शास्त्रात लिहिलेले आहे. त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले; तेव्हा आपण जारकर्म करू नये.”—१ करिंथकर १०:६-८.

      ७ सियोन पर्वताच्या पायथ्याशी इस्राएल लोकांनी सोन्याच्या वासराची उपासना केली त्या प्रसंगाचा उल्लेख पौल पहिल्यांदा करतो. (निर्गम ३२:५, ६) काही आठवड्यापूर्वीच त्यांनी ज्या ईश्‍वरी आज्ञाचे पालन करण्याचे मान्य केले होते त्या आज्ञेचे हे थेटपणे उल्लंघन होते. (निर्गम २०:४-६; २४:३) त्यानंतर पौल, इस्राएल लोक मवाबी कन्यांसोबत बआलपुढे नतमस्तक झाले त्या प्रसंगाचा उल्लेख करतो. (गणना २५:१-९) अतिशय चैनबाजी आणि नाच-तमाशा ही वासराच्या उपासनेची वैशिष्ट्ये होती.a बआल उपासनेत धडधडीत लैंगिक अनैतिकता आचरली जात असे. (प्रकटीकरण २:१४) इस्राएल लोकांनी ही पातके का केली? कारण मूर्तिपूजेच्या स्वरूपात असोत अथवा व्यभिचारी चालिरीतींच्या स्वरूपात असोत—त्यांनी अशा ‘वाईट गोष्टींचा लोभ धरण्याकरता’ त्यांच्या अंतःकरणाला मुभा दिली.

      ८. इस्राएलच्या अनुभवांवरून आपण काय शिकू शकतो?

      ८ आपण या घटनांवरून शिकावे असे पौलाने दाखवून दिले. काय शिकावे? सोन्याच्या वासरापुढे किंवा प्राचीन मोआबी दैवतापुढे नतमस्तक होण्याचा विचार एखाद्या ख्रिश्‍चनाच्या मनात येणार देखील नाही. पण, अनैतिकता आणि अमर्याद चैनबाजीविषयी काय? या गोष्टी जगात आज सामान्य आहेत आणि या गोष्टींविषयी आपण आपल्या मनात इच्छा जागृत केली तर त्या आपण आणि यहोवा यांमध्ये आडकाठी येऊ शकते. याचा परिणाम मूर्तिपूजा केल्यामुळे होणाऱ्‍या परिणामापेक्षा वेगळा नसेल—आपण देवापासून दुरावले जाऊ. (पडताळा कलस्सैकर ३:५; फिलिप्पैकर ३:१९.) पौल या घटनांचा समारोप सहख्रिश्‍चनांना असा आर्जव करून करतो: “मूर्तिपूजेपासून दूर पळा.”—१ करिंथकर १०:१४.

  • देवाच्या मार्गानुसार चालत राहा
    टेहळणी बुरूज—१९९९ | मे १५
    • a ‘नाच-तमाशा’ असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा उल्लेख करताना एक टीकाकार असे म्हणतो, की हा शब्द मूर्तिपूजक सणांच्या वेळी होणाऱ्‍या नाचण्याला सूचित होतो. तो टीकाकार पुढे असे म्हणतो: “यांपैकी अनेक नाच सर्वात अनैतिक वासना जागृत करण्याच्याच उद्देशाने बसवलेले होते हे सर्वज्ञात आहे.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा