वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ७/१ पृ. १०-१५
  • आनंदी व्हा पीडितांवर दया दाखवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आनंदी व्हा पीडितांवर दया दाखवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आम्हासाठी उत्तम नमुना
  • जसा बाप, तसा मुलगा
  • पौल—एक आनंदी उदाहरण
  • आम्हास आनंदी होता येईल का?
  • येशूचे अनुकरण करा आणि गरिबांबद्दल काळजी दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • लवकरच जगातून गरिबी नाहीशी होईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • लवकरच कोणीही दरिद्री नसेल!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • येशूप्रमाणे तुम्हीही लोकांना मदत करण्यास उत्सुक आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ७/१ पृ. १०-१५

आनंदी व्हा पीडितांवर दया दाखवा

“जो आपल्या सहमानवाचा तिरस्कार करतो तो पापी होय, पण गरिबांवर दया करतो तो धन्य होय.”—नीतीसूत्रे १४:२१.

१, २. तीन फिलिपाईन्स कुटुंबाच्या बाबतीत काय घडले व त्या करवी कोणते प्रश्‍न सामोरे येतात?

तीन फिलिपाईन्स कुटुंबे पँगासिनन प्रांतात ख्रिस्ती सभांना गेल्यावर त्यांच्या राहत्या घरी आकस्मिकरित्या आग लागून सर्वांची घरे आगीत जळून भस्मसात झाली. परतल्यावर या कुटुंबांना आपण बेघर झालो आहोत, अन्‍न नाही, निवारा नाही असे दिसले. या विपत्तीचे वृत्त कळताच सह ख्रिश्‍चन बांधव लगेच आहारानिशी तेथे आले व त्यांनी या कुटुंबाची मंडळीतील इतरांच्या घरी त्यांच्यासोबत राहण्याची व्यवस्था केली. या बंधुप्रेमामुळे शेजाऱ्‍यांना खूपच विस्मय वाटला. त्या तीन पिडीत कुटुंबावर सुद्धा चांगला परिणाम घडला. अग्निने त्यांची घरे बेचिराख केली होती, पण त्यांचा विश्‍वास व इतर ख्रिस्ती गुण अशा प्रेमळ प्रतिसादामुळे टिकून राहिले व बहरू लागले.—मत्तय ६:३३; पडताळा १ करिंथकर ३:१२–१४.

२ अशा स्वरूपाचे अनुभव हृदयास उबवीत नाही का? ते मानवी दयेवरील आपला विश्‍वास वाढवतात आणि खऱ्‍या ख्रिश्‍चनत्वाचे सामर्थ्य दृढ करतात. (प्रे. कृत्ये २८:२) तर मग, आपल्याला ‘सर्वांचे व विशेषतः आपल्या विश्‍वास बंधूंचे बरे करण्याविषयीचा’ जो शास्त्रवचनीय आधार आहे त्याविषयीची रसिकता वाटते का? (गलतीकर ६:१०) शिवाय आम्हाला व्यक्‍तिशः याबाबतीत अधिक ते करता येणे शक्य आहे का?

आम्हासाठी उत्तम नमुना

३. यहोवा आम्हाबद्दल व्यक्‍त करीत असलेल्या काळजीसंबंधाने आम्हाला कोणती खात्री बाळगता येईल?

३ शिष्य याकोब आम्हाला सांगतो: “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे.” (याकोब १:१७) हे किती खरे आहे! यहोवा आम्हास आध्यात्मिक व शारिरीक भल्यासाठी विपुलपणे पुरवठा करून आहे. पण तो कोणत्या गोष्टीला प्राधान्य देऊन आहे? आध्यात्मिक गोष्टीला. उदाहरणार्थ, त्याने आम्हाला पवित्र शास्त्र आध्यात्मिक मार्गदर्शन व आशा प्राप्ती साठी दिले आहे. ही आशा त्याच्या पुत्राच्या देणगीभोवती केंद्रित आहे. त्याचे यज्ञार्पण आमच्या पापांची क्षमा होण्यात व आम्हाला चिरकालिक जीवनाचे भवितव्य प्राप्त होण्याचा आधार देते.—योहान ३:१६; मत्तय २०:२८.

४. देव आमच्या भौतिक गरजासंबंधाने आस्थेवाईक आहे हे कसे दिसून येते?

४ यहोवाला आमच्या भौतिक कल्याणाविषयीही रस वाटतो. याबद्दल प्रेषित पौलाने प्राचीन लिस्त्राच्या लोकांसोबत विवाद केला. ते खरे उपासक नव्हते तरी निर्माणकर्त्याने ‘उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु आम्हास दिले, आणि अन्‍नाने व हर्षाने आम्हास अंतःकरण भरून तृप्त केले’ ही गोष्ट त्यांना अमान्य करता येत नव्हती. (प्रे. कृत्ये १४:१५–१७) प्रीती असल्यामुळे यहोवा आमच्या आध्यात्मिक व शारिरीक जीवनासाठी तरतूद करतो. असे केल्यामुळेच तो “आनंदी देव” राहतो असे तुम्हाला वाटत नाही का?—१ तिमथ्यी १:११.

५. देवाने प्राचीन इस्राएलांसोबत राखलेल्या व्यवहारामुळे आम्हाला काय शिकता येते?

५ देवाने प्राचीन इस्राएलांसोबत राखलेला व्यवहार, त्याने त्याच्या उपासकांच्या आध्यात्मिक गरजा व भौतिक स्थिती याविषयी राखलेल्या समतोलाकडे आपले लक्ष वेधवितो. पहिली गोष्ट ही की त्याने आपल्या लोकांना नियमशास्त्र उपलब्ध करून दिले. त्याच्या राजांना नियमशास्त्राची एक व्यक्‍तिगत प्रत तयार करावी लागे. लोक त्याच्या नियमशास्त्राचे केलेले वाचन ऐकण्यासाठी वेळोवेळी हजर राहत. (अनुवाद १७:१८; ३१:९–१३) नियमशास्त्राने निवासमंडप वा मंदिर आणि यज्ञार्पणे हाताळण्यासाठी याजकवर्गाची व्यवस्था आखून दिली. यामुळे लोकांना देवाची संमति मिळवता येत होती. इस्राएली लोक त्यांच्या वार्षिक उपासनेकरता आध्यात्मिक मेळाव्यास नियमाने येत. (अनुवाद १६:१–१७) या सर्वांमुळे प्रत्यके इस्राएलाला देवाच्या सम्मुख आध्यात्मिक समृद्धता प्राप्त करता येऊ शकत होती.

६, ७. देवाने नियमशास्त्रात इस्राएलांच्या भौतिक गरजांसंबंधाने कशी काळजी व्यक्‍त केली होती?

६ तथापि, नियमशास्त्राने आणखी हे दाखवून दिले की देव आपल्या सेवकांच्या भौतिक परिस्थितीविषयी केवढा रस बाळगून आहे. यावेळेला तुमच्या मनात ज्या गोष्टी येतील त्या देवाने इस्राएलाना आरोग्यविषयक दिलेले कायदे व संसर्ग पसरू नये याकरता दाखविलेली पावले ह्‍या होत. (अनुवाद १४:११–२१, २३:१०–१४) तरीपण देवाने गरीब व पीडितांच्या मदतीसाठी जी खास तरतूद केली होती ती विसरून चालणार नाही. ढासळते आरोग्य किंवा आग वा पूर यामुळे ओढावलेल्या विपत्तीमुळे कोणा इस्राएलास गरीबावस्था प्राप्त होत असे. प्रत्यक्षात नियमशास्त्रात देवाने हे स्पष्ट केले होते की सर्वजण एकाच आर्थिक स्थितीवर नसणार. (अनुवाद १५:११) त्यामुळेच त्याने अशा गरीब व पीडितांच्या बाबतीत नुसती सहानुभूति व्यक्‍त करण्यापेक्षा अधिक केले. त्याने त्यांच्या मदतीची व्यवस्था केली.

७ अशा लोकांची तातडीची गरज अन्‍न ही असते. याकरताच त्यांने इस्राएलांना मार्गदर्शित केले की त्यांनी अशा गरीबांना शेत, द्राक्षीच्या बागा वा जैतुनाची झाडे येथून सरवा वेचू द्यावा. (अनुवाद २४:१९–२२; लेवीय १९:९, १०; २३:२२) काम करण्याची शक्यता आहे अशा लोकांना आळशी बनण्याचे वा इतर लोकांपुढे हात पसरण्याचे देवाने प्रोत्साहन दिले नाही. सरवा वेचणाऱ्‍या इस्राएलाला परिश्रमाचे काम करावे लागे, दिवसभरात उन्हातान्हात आपले अन्‍न गोळा करावे लागे. याद्वारे देवाने विचारशीलतेने गरीबांना तरतूद पुरविली होती हे आपल्याला नजरेआड करता येणार नाही.—पडताळा रूथ २:२–७; स्तोत्रसंहिता ६९:३३; १०२:१७.

८. (अ) यहुद्यांना वैयक्‍तिकपणे आपल्या बांधवांसंबंधाने काय करण्यासाठी आर्जविण्यात आले होते? (पडताळा यिर्मया ५:२६, २८.) (ब) देवाने यहुद्यांना जी प्रवृत्ति प्रदर्शित करण्याविषयी म्हटले होते तिची तुलना आज सर्वसाधारणपणे जे दिसते त्याच्या सोबत कशी होते?

८ पीडितांसंबंधाने वाटणाऱ्‍या आस्थेविषयी यहोवाने यशया ५८:६, ७ मध्ये आणखी भर दिला. काही आत्मसंतुष्ट इस्राएल लोक उपासाचे ढोंग दाखवीत होते त्यावेळी देवाच्या संदेष्ट्याने त्यांना जाहीर केले: ‘जाचलेल्यांस मुक्‍त करावे, सगळे जोखड मोडावे . . . तू आपले अन्‍न भुकेल्यांस वाटावे, तू लाचारांस व निराश्रितांस आपल्या घरी न्यावे. उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच मला पसंत असा उपास नव्हे काय?” आज काही लोक स्वतःला ‘सीमाबद्ध’ ठेवतात. त्यांचे म्हणणे आहे की, आपल्याला वैयक्‍तिक असा त्याग करावा लागत नाही किंवा आपली कुचंबणा होत नाही तेवढ्यापर्यंत आपली गरजवंतांना मदत करण्याची तयारी आहे. पण, देवाने यशयामार्फत आपल्या वचनामध्ये वेगळयाच आत्म्यावर केवढा जोर दिला होता बरे!—पहा यहेज्केल १८:५–९.

९. कर्जा बाबतीत नियमशास्त्रात कोणती सूचना होती आणि देवाने कोणत्या प्रवृत्तीस उत्तेजन दिले?

९ गरीब इस्राएली बांधवांना कर्जासंबंधाने काळजी दाखवण्याची शक्यता असे. व्यापारामध्ये लावण्यासाठी वा तो वाढविण्यासाठी कर्ज देताना इस्राएल माणूस व्याजाची आकारणी करू शकत होता. तरीपण गरीब माणसाला पैशांची विवंचना असते आणि उद्विग्न स्थितीमुळे तो चुकीची कामे करण्याच्या मोहात पडतो याकारणामुळे त्यांना दिल्या जाणाऱ्‍या कर्जावर व्याज आकारू नये असे यहोवाने म्हटले होते. (निर्गम २२:२५; अनुवाद १५:७, ८, ११; २३:१९, २०; नीतीसूत्रे ६:३०, ३१) देवाने दुर्देवी लोकांच्या बाबतीत दाखविलेली वृत्ति त्याच्या लोकांसाठी नमुना होणार होती. आम्हाला असेही आवर्जून सांगितले गेले: “जो दरिद्‌य्रावर दया करतो तो यहोवाला उसने देतो: त्याच्या सत्कृत्याची तो फेड करील.” (नीतीसूत्रे १९:१७) जरा विचार करा—यहोवास उसने देणे व त्याच्या कडून त्याची भरपूर भरपाई मिळणे हे केवढे चित्तथरारक वाटते!

१०. देवाच्या उदाहरणाचा विचार केल्यावर तुम्ही स्वतःला काय विचारू शकाल?

१० आम्ही सर्वांनी स्वतःला याप्रकारे विचारण्यास हवे: पीडितांच्या बाबतीत देवाने व्यक्‍त केलेला दृष्टिकोण आणि वागणूक यांचा मजसाठी काय अर्थ होतो? त्याच्या परिपूर्ण उदाहरणावरून मी शिकून घेऊन त्याचे अनुकरण करीत आहे का? याप्रकारात मला देवाच्या प्रतिरूपाचे होण्यासाठी काही सुधारणा करता येईल का?—उत्पत्ती १:२६.

जसा बाप, तसा मुलगा

११. येशूने व्यक्‍त केलेली काळजी त्याच्या पित्याने दाखविलेल्या काळजीसोबत कशी तुल्य होती? (२ करिंथकर ८:९)

११ येशू ख्रिस्त हा “[यहोवाच्या] गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे.” (इब्रीयांस १:३) या कारणास्तव, खऱ्‍या उपासनेविषयी आस्थेवाईक असणाऱ्‍यांची काळजी पिता जशी व्यक्‍त करतो तशीच त्याचा पुत्रही व्यक्‍त करील अशी आम्ही अपेक्षा धरू शकतो. त्याने ते केले आहे. येशूने दाखविले की ज्या दारिद्‌य्राचा प्रथमावस्थेत ऱ्‍हास होण्यास हवा ते आध्यात्मिक दारिद्‌य्र आहे. “आध्यात्मिक गरजांविषयी जाणीव राखणारे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” (मत्तय ५:३; पडताळा लूक ६:२०.) ख्रिस्ताने असेही म्हटले की, “मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्षी द्यावी.” (योहान १८:३७) याकारणास्तव, त्याची अद्‌र्भित कृत्ये करणारा कार्यकर्ता किंवा बरे करणारा असे नव्हे तर शिक्षक या अर्थी ख्याति झाली. (मार्क १०:१७–२१; १२:२८–३३) याबद्दल मार्क ६:३०–३४ लक्षात घ्या. येशू थोडी विश्रांती मिळावी याकरता एकांत शोधत होता. पण त्याने “लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ज्या मेंढरास मेंढपाळ नाही त्यांच्या सारखे ते होते.” त्याने कोणती प्रतिक्रिया दर्शविली? “तो त्यांस बहुत गोष्टी शिकवू लागला.” होय, येशूने त्यांच्या सर्वथोर गरजेकडे—ज्याकरवी ते सदासर्वकाळ जगू शकत होते ते सत्य—याबद्दलचा प्रतिसाद व्यक्‍त करण्यात स्वतःला देऊ केले.—योहान ४:१४; ६:५१.

१२. मार्क ६:३०–३४ आणि मार्क ६:३५–४४ मधून आम्हाला येशूच्या दृष्टिकोणाविषयी काय शिकता येते?

१२ गरीब यहुद्यांच्या आध्यात्मिक गरजांकडे येशूने आपले लक्ष एकवटले होते तरी त्याने त्यांच्या भौतिक गरजांकडे दुर्लक्ष केले नाही. खरोखरीच शारिरीक आहाराच्या बाबतीत येशू केवढा जागृत होता त्याविषयी मार्कचा अहवाल आपल्याला कळवितो. प्रेषितांनी येशूला सुचविले की लोकसमुदायाने “आपणाकरिता खाण्यास काही विकत घ्यावे म्हणून त्यांस निरोप” द्यावा. पण येशूने त्याला संमति दाखवली नाही. तेव्हा प्रेषितांनी ही शक्यता बोलून दाखवली की ते आपणासोबत जो निधी वागवत होते त्यातून काही अन्‍न विकत आणता येईल. तरीपण, येशूने एक अद्‌र्भित चमत्कार करण्याचे ठरविले की ज्याकरवी भाकरी व मासे हे मुलभूत अन्‍न ५००० पुरूष व त्या व्यतिरिक्‍त स्त्रिया व बालके खाऊ शकतील. आज काहींना वाटेल की येशूने इतक्या मोठ्या समुदायाला अद्‌र्भितरितीने भरविले ते त्याच्यासाठी अगदी सहजसोपे होते. तरी त्याला लोकांबद्दल खरा कळवळा वाटत होता व त्यानुरूप त्याने हालचाल दर्शविली होती हे आम्ही नजरेआड होऊ देता कामा नये.—मार्क ६:३५–४४; मत्तय १४:२१.a

१३. लोकांच्या कल्याणासाठी आस्थेवाईक असण्याविषयी येशूने आणखी कोणता पुरावा दाखवून दिला?

१३ येशूने गरीबांच्या पुढे जाऊन दुर्देव्यांसाठी आपला कळवळा व्यक्‍त केला हे तुम्हाला शुभवर्तमान अहवालात वाचायाला मिळाले असेल. त्याने आजारी व पीडितांनाही मदत दिली. (लूक ६:१७–१९; १७:१२–१९; योहान ५:२–९; ९:१–७) शिवाय जे जवळ होते त्यांनाच त्याला बरे करता आले असाही काही प्रकार नव्हता. कधी कधी तर त्याने आजाऱ्‍यांना बरे करावे म्हणून बराच लांबचा प्रवास केला.—लूक ८:४१–५५.

१४, १५. (अ) येशूने जो कळवळा व्यक्‍त केला तसाच तो आपल्या शिष्यांकडून अपेक्षित होता हे आम्ही खात्रीने का सांगू शकतो? (ब) आम्ही स्वतःला काय विचारणे बरे ठरेल?

१४ अद्‌र्भित चमत्काराकरवी मुक्‍तता प्रदान करणाऱ्‍यांनी केवळ गरीब व पीडित शिष्यांच्या (वा सत्य शोधकांच्या) संबंधानेच चिंता व्यक्‍त करायची होती का? नाही. यात येशूच्या सर्व शिष्यांचा समावेश होता. उदाहरणार्थ, सार्वकालिक जीवन इच्छिणाऱ्‍या एका श्रीमंत माणसाला येशूने आर्जविले: ‘तुझे जे काही आहे ते विकून दरिद्‌य्रांस वाटून दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल.” (लूक १८:१८–२२) येशूने अशीही सूचना केली: “तू मेजवानी करशील तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व अंधळे यांस आमंत्रण कर म्हणजे तू धन्य होशील. तुझी फेड करावयास त्यांजजवळ काही नाही; तरी धार्मिकांच्या पुनरूत्थान समयी तुझी फेड होईल.”—लूक १४:१३, १४.

१५ ख्रिस्ती हा ख्रिस्ताचा अनुयायी असतो त्यामुळे आम्हा प्रत्येकाने स्वतःला विचारावे: गरीब, पीडीत व दुर्देवी लोकांसंबंधाने मी, येशूने दाखविलेल्या मनोवृत्तीचे कितपत अनुकरण करीत आहे? प्रेषित पौलाने जे म्हटले त्या प्रमाणेच मी प्रामाणिकपणे म्हणू शकतो का: “जसा मी ख्रिस्ताचा अनुकारी आहे तसे तुम्ही माझे अनुकारी व्हा”?—१ करिंथकर ११:१.

पौल—एक आनंदी उदाहरण

१६. प्रेषित पौलाला कोणती गोष्ट मोठ्या आवडीची वाटत होती?

१६ पौलाबद्दलचा विषय येथे चर्चेला घेणे अगदी योग्यच आहे कारण तो अनुसरण्यास उत्तम उदाहरण होता. त्याचेही ध्येय इतरांच्या आध्यात्मिक गरजांकडे लक्ष देणे हेच होते. तो ‘ख्रिस्ताच्या वतीने वकिली करीत, “देवाबरोबर समेट केलेले . . . व्हा” अशी विनंति करीत होता.’ (२ करिंथकर ५:२०) पौलाला मिळालेली खास नेमणूक यहुद्देत्तरांमध्ये प्रचार करून मंडळ्‌या उभारणे ही होती. त्याने लिहिले: “बेसुंती लोकांस [सुवार्ता] सांगण्याचे काम मला सोपविले आहे.”—गलतीकर २:७.

१७. पौलाने भौतिक काळजीकडेही लक्ष दिले हे आपल्याला कसे कळते?

१७ पौलाने म्हटले की तो ख्रिस्ताचा अनुकारी होता तर त्याने (यहोवा वा येशू प्रमाणे) आपल्या सह उपासकांच्या शारिरीक पीडा वा अडचणींकडे लक्ष दिले का? स्वतः पौलालाच याचे उत्तर देऊ द्या. गलतीकरांस पत्र २:९ मध्ये पुढे तो म्हणतो: ‘याकोब, केफा [पेत्र] व योहान . . . यांनी मला व बर्णबाला . . . उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, यासाठी की आम्ही विदेश्‍याकडे . . . जावे.” आता अगदी पुढल्याच वचनात पौल सांगतो: “आम्ही गरीबांची आठवण करावी असे ठरले, आणि तेच करावयाला मी स्वतः उत्कंठित होतो.” (गलतीकर २:१०) याप्रकारे पौलाने जाणले की तो सुवार्तिक–प्रेषित होता व त्याला पुष्कळ मंडळयांविषयीच्या जबाबदाऱ्‍या होत्या तरी आपल्या बंधुभगिनींच्या भौतिक कल्याणासंबंधाने आस्था व्यक्‍त करता येणार नाही इतके कामात राहून चालणार नव्हते.

१८. गलतीकर २:१० मध्ये पौल कोणत्या ‘गरीबां’विषयी बोलत असावा व यांच्याकडे का लक्ष दिले जाण्यास हवे होते?

१८ ज्या “गरीबां”बद्दल पौलाने गलतीकरांस पत्र २:१० मध्ये म्हटले ते मुख्यत्वे यरूशलेम व यहुदीया येथील यहुदी ख्रिस्ती होते. आरंभाला “हेल्लेणी यहुद्यांनी इब्री लोकांसंबंधाने कुरकूर केली [होती], कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.” (प्रे. कृत्ये ६:१) तद्वत, आपण राष्ट्रांसाठी प्रेषित आहे असे म्हणताना पौलाने स्पष्ट केले की तो ख्रिस्ती बंधुत्वात असणाऱ्‍या कोणासही नजरेआड करीत नव्हता. (रोमकर ११:१३) बांधवांची शारिरीक काळजी घेतली जाण्यास हवी याची जाण त्याला होती व तसा आशय त्याने या शब्दात समाविष्ट केला: “शरीरात फुट नसावी, तर अवयवांनी एकमेकांची सारखी काळजी घ्यावी. एक अवयव दुःखित झाला तर त्याबरोबर सर्व अवयव दुःखित होतात.”—१ करिंथकर १२:२५, २६.

१९. पौल व इतरांनी गरिबांच्या काळजीविषयी हालचाल केली याविषयीचा कोणता पुरावा आमच्याकडे आहे?

१९ यरूशलेम व यहुदीया येथील ख्रिश्‍चनांना गरीबी, स्थानिकरित्या दुष्काळ वा छळ याकरवी त्रास उद्‌भवला त्यावेळी दूरवरील मंडळयांनी प्रतिसाद दिला. आपल्या गरजवंत बांधवांची प्रार्थनेत आठवण काढून त्यांना देवाचा आधार व सांत्वन मिळावे अशी प्रार्थनाही केली असावी. पण ते येथवर थांबले नाही. पौलाने लिहिले की, “यरूशलेमातील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी मासेदोनिया व अखया यांनी वर्गणी करण्याची मेहरबानी केली आहे.” (रोमकर १५:२६, २७) आपल्या पीडित बांधवांना आर्थिक साह्‍य देणारे “सर्व गोष्टींनी धनसंपन्‍न [होतात] व, त्या . . . वरून आमच्या द्वारे देवाचे आभारप्रदर्शन होते.” (२ करिंथकर ९:१–१३) तर मग हे त्यांना आनंदी बनविण्याजोगे कारण नाही का?

२०. ‘गरीबां’च्या मदतीकरता निधि देणारे बांधव आनंदी का होते?

२० “यरूशलेमातील पवित्र जनातल्या गोरगरीबांसाठी” आपल्याकडील निधीची सहभागी करणाऱ्‍या बांधवांना आनंदी असण्याजोगे आणखी कारण होते. पीडितांसंबंधाने त्यांनी व्यक्‍त केलेल्या काळजीमुळे त्यांना देवाची कृपापसंती लाभणार होती. हे असे का असावे ते, रोमकर १५:२६ आणि २ करिंथकर ९:१३ मध्ये “वर्गणी” या शब्दासाठी जो ग्रीक शब्द वापरण्यात आला त्यात जी कल्पना समाविष्ट आहे ते पाहिल्याने कळते. त्यामध्ये “सहकाराचे चिन्ह, बंधुत्वाच्या ऐक्याचा पुरावा, देणगी” ही कल्पना अंतर्भूत आहे. हा शब्द इब्रीयांस १३:१६ मध्ये वापरला आहे जे म्हणते: “परोपकार व दानधर्म करणे विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.”

आम्हास आनंदी होता येईल का?

२१. आनंदाच्या प्राप्तीसाठी कोणता आधार योग्य ठरेल असे आम्ही मानावे?

२१ आमच्या या चर्चेत आम्ही पाहिले आहे की यहोवा देव, येशू ख्रिस्त आणि प्रेषित पौलाने पीडितांची काळजी वाहिली. याशिवाय आमच्या हेही लक्षात आले की त्या सर्वांनी, प्रथमतः आध्यात्मिक गरजांकडे लक्ष देण्यावर प्रामुख्यत्वे भर दिला होता. तरीपण, त्यांनी गरीब, आजारी व वाईट स्थिती अनुभवीत असलेल्यांच्या बाबतीत व्यावहारिक मार्गाने आपला कळवळा व्यक्‍त केला हेही खरे आहे. व्यावहारिक मदत देण्यात त्यांना आनंद वाटला. तर मग आमच्या बाबतीत काही कमी असावे का? प्रेषित पौलाने आम्हाला आर्जविले की, “‘घेण्यापेक्षा देणे ह्‍यात धन्यता आहे’ असे जे प्रभु येशू स्वतः म्हणाला या वचनाची आठवण ठेवावी.”—प्रे. कृत्ये २०:३५.

२२. या विषया संबंधाने आणखी कोणता विचार व्हावयाचा आहे?

२२ तथापि, तुम्हाला विचारता येईल: मला याबाबतीत व्यक्‍तिशः काय करता येणे शक्य आहे? खरे गरजवंत कोण आहेत ते मला कसे कळेल? ज्याकरवी आळशीपणाला प्रोत्साहन मिळणार नाही पण जी मदत दयावंत, खरी, इतरांच्या भावना समजून घेणारी आणि सुवार्तेचा प्रचार करण्याच्या माझ्या ख्रिस्ती कर्तव्यासोबत समतुल्य राहील ती मला कशी देता येईल? या विषयाबद्दल पुढील लेख अशी माहिती प्रस्तुत करील जिच्या वाचनाने तुम्हाला अधिक आनंदाची प्राप्त करण्याचा आधार मिळेल.

[तळटीपा]

a  या सोबतच हेही लक्षात घेणे चित्तवेधक आहे की दुसऱ्‍यांकडून आर्थिक सहाय्य स्विकारण्यामध्ये येशूला कुचंबणा वा उद्दामपणाचे वाटले नाही.—लूक ५:२९; ७:३६, ३७; ८:३.

तुम्ही लक्षात आणले का?

◻ आमच्या आध्यात्मिक तसेच शारिरीक गरजांच्या बाबतीत देव आपली आस्था कशी दाखवितो?

◻ लोकांना सत्याविषयीचे शिक्षण देण्याची मदत करण्यापेक्षा येशूला अधिक गोष्टींची चिंता वाटत होती हे कसे दिसते?

◻ गरिबांबद्दल पौलाने कोणत्या प्रकारचे उदाहरण राखले?

◻ यहोवा, येशू व प्रेषित पौलाच्या उदाहरणाचा विचार केल्यावर तुम्हाला काय करण्याची गरज दिसते?

[१३ पानांवरील चित्रं]

येशूने लूक १४:१३, १४ मध्ये दिलेल्या सूचनेचा अवलंब ख्रिस्ती वडील व इतरांनी केला पाहिजे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा