वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • आज्ञाधारकपणा महत्त्वाचे बाळकडू?
    टेहळणी बुरूज—२००१ | एप्रिल १
    • “तुझे कल्याण व्हावे”

      पौलाने आज्ञाधारकतेचा आणखी एक फायदा दाखवून दिला; त्याने लिहिले: “‘आपला बाप व आपली आई ह्‍यांचा मान राख, ह्‍यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे.’ अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.” (इफिसकर ६:२, ३; निर्गम २०:१२) पालकांची आज्ञा मानल्याने आपले कल्याण कसे होऊ शकेल?

      पालकांचे वय, त्यांचा अनुभव यामुळे त्यांना जास्त माहिती आहे हे खरे नाही का? कदाचित त्यांना कम्प्युटर किंवा शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्‍या इतर विषयांबद्दल फारशी माहिती नसेल पण जीवनाविषयी आणि जीवनातल्या समस्यांचा सामना करण्याविषयी त्यांना बरीच माहिती आहे. परंतु, प्रौढ झाल्यावर संतुलित विचार करण्याची जी क्षमता प्राप्त होते ती तरुण लोकांमध्ये नसते. त्यामुळे, ते सहसा अविचारीपणाने निर्णय घेतात, वाईट गोष्टी करण्यासाठी सोबत्यांच्या दबावाला बळी पडतात आणि कधीकधी स्वतःच्याच पायावर कुऱ्‍हाड मारून घेतात. म्हणूनच बायबल म्हणते: “बालकाच्या हृदयांत मूर्खता जखडलेली असते; शासनवेत्र त्याच्यापासून तिला घालवून देते.”—नीतिसूत्रे २२:१५.

      आज्ञाधारक राहण्याचे फायदे केवळ पालक आणि मुलांमधील संबंधांपुरतेच सीमित नाहीत. मानवी समाज सुरळीत चालण्यासाठी आणि फलदायी असण्यासाठी सहकार्याची गरज असते आणि त्यासाठी काही प्रमाणात आज्ञाधारकतेची आवश्‍यकता आहे. उदाहरणार्थ, वैवाहिक जीवनात नेहमी स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आणि इतरांचे हक्क किंवा त्यांच्या भावनांबद्दल कदर न दाखवण्याऐवजी नमते घेण्याची तयारी असली तरच शांती, सुसंगतता आणि आनंद असू शकतो. कोणताही व्यापार किंवा धंदा यशस्वी होण्यासाठी कामगारांनी अधीनता दाखवण्याची गरज आहे. सरकारी कायदे-कानून पाळल्याने फक्‍त शिक्षा टळत नाही तर काही प्रमाणात संरक्षण आणि बचावही मिळतो.—रोमकर १३:१-७; इफिसकर ५:२१-२५; ६:५-८.

      अधिकाराला न जुमानणारे तरुण लोक सहसा समाजकंटक बनतात. त्या उलट, बालपणापासून मिळालेले आज्ञाधारकपणाचे बाळकडू संपूर्ण जीवनभर फायदेकारक ठरू शकते. त्यामुळे हे बालपणीच शिकणे किती फायदेकारक आहे!

  • आज्ञाधारकपणा महत्त्वाचे बाळकडू?
    टेहळणी बुरूज—२००१ | एप्रिल १
    • प्रेषित पौलाने काय म्हटले ते आपण आठवू या; तो म्हणाला होता की, पालकांच्या आज्ञेत राहण्याचे दोन फायदे आहेत अर्थात “तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे.” नीतिसूत्रे ३:१, २ येथे या अभिवचनाला पुष्टी दिली आहे: “माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत; कारण त्यांपासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धि व कल्याण ही तुला प्राप्त होतील.” आज्ञाधारक राहणाऱ्‍यांना सध्या तर यहोवासोबत एक व्यक्‍तिगत नातेसंबंध लाभतोच पण शांतीमय नवीन जगात त्यांना सार्वकालिक जीवनाचे भव्य प्रतिफळही मिळेल.—प्रकटीकरण २१:३, ४.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा