वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १०/१५ पृ. २०-२४
  • पिता व वडील—या दोन्ही भूमिका निभावणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पिता व वडील—या दोन्ही भूमिका निभावणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पिता व वडील
  • ‘मुले सत्यात असली पाहिजेत’
  • ‘सत्यात नसलेल्या पत्नीशी’ विवाहित
  • ‘आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणे’
  • संतुलित देखरेख
  • उत्तम पिता तसेच उत्तम वडील
  • वडील आपल्याला प्रिय वाटले पाहिजेत
  • पती व वडील—या जबाबदाऱ्‍यांमध्ये संतुलन राखणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • तुम्ही सेवा करण्यास पात्र आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • देवाच्या कळपाचे स्वेच्छेने पालन करा
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • वडीलांनो आपला विश्‍वस्तपणा सांभाळून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १०/१५ पृ. २०-२४

पिता व वडील—या दोन्ही भूमिका निभावणे

“ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा संभाळ कसा करील?” —१ तीमथ्य ३:५.

१, २. (अ) कशाप्रकारे पहिल्या शतकात, सडे पर्यवेक्षक व मुले नसलेले विवाहित पर्यवेक्षक आपल्या बांधवांची सेवा करू शकत होते? (ब) अक्विल्ला व प्रिस्किल्ला कशाप्रकारे आज अनेक विवाहित जोडप्यांकरता कित्ता आहेत?

आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीतील पर्यवेक्षक, सडे पुरुष किंवा अपत्य नसलेले अथवा अपत्य असलेले विवाहित पुरुष असू शकतात. सडे राहण्याविषयी प्रेषित पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्राच्या ७ व्या अध्यायात दिलेला सल्ला काही ख्रिस्ती अनुसरू शकले यात काही शंका नाही. येशूने म्हटले होते: “स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणास नपुंसक करून घेतले असे नपुंसक आहेत.” (मत्तय १९:१२) अशाप्रकारचे सडे पुरुष, उदाहरणार्थ पौल आणि कदाचित त्याचे इतर प्रवासी सोबती, आपल्या बांधवांना मदत करण्याकरता प्रवास करण्यास मोकळे असणार होते.

२ बर्णबा, मार्क, सीला, लूक, तीमथ्य व तीत, सडे पुरुष होते की नव्हते याबद्दल बायबल काही सांगत नाही. ते विवाहित असल्यास, विविध नेमणुकींकरता दूरदूरच्या प्रवासाला जाण्यासाठी ते त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांपासून पुरेशा प्रमाणात स्वतंत्र होते हे स्पष्ट आहे. (प्रेषितांची कृत्ये १३:२; १५:३९-४१; २ करिंथकर ८:१६, १७; २ तीमथ्य ४:९-११; तीत १:५) पेत्र आणि ‘इतर प्रेषितांप्रमाणे’ यांनीही ठिकठिकाणी जाताना कदाचित आपल्यासोबत आपल्या पत्नींना नेले असावे. (१ करिंथकर ९:५) अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला हे विवाहित जोडपे एक उत्तम उदाहरण होते जे इतर ठिकाणी राहावयास, पौलासोबत करिंथमधून इफिसला, मग रोमला व पुन्हा एकदा इफिससला येण्यास तयार होते. त्यांना मुले होती की नव्हती याविषयी बायबल काही सांगत नाही. आपल्या बांधवांकरता त्यांनी जी भक्‍तिमान सेवा केली त्यामुळे ‘परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्या’ त्यांच्याबद्दल कृतज्ञ होत्या. (रोमकर १६:३-५; प्रेषितांची कृत्ये १८:२, १८; २ तीमथ्य ४:१९) यात काही शंका नाही, की आज अशी अनेक जोडपी आहेत जी अक्विल्ला आणि प्रिस्किल्लासारखे इतर मंडळ्यांमध्ये, कदाचित जेथे जास्त गरज आहे त्या ठिकाणी जाऊन सेवा करू शकतात.

पिता व वडील

३. पहिल्या शतकातील अनेक वडील, कुटुंब असलेले विवाहित पुरुष होते हे कोणती गोष्ट सुचवते?

३ असे दिसत होते, की सा. यु. पहिल्या शतकात, बहुसंख्य ख्रिस्ती वडील, मुले असलेले विवाहित पुरुष होते. पौलाने, ‘पर्यवेक्षकाचे काम करू’ पाहणाऱ्‍याकडून अपेक्षिल्या जाणाऱ्‍या योग्यता सांगितल्या तेव्हा त्याने म्हटले, की असा ख्रिस्ती मनुष्य, “आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीडमर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा.”—१ तीमथ्य ३:१, ४.

४. मुले असलेल्या विवाहित वडिलांकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा करण्यात आली होती?

४ आपण पाहिल्याप्रमाणे, एखाद्या पर्यवेक्षकाला मुले असणे किंवा तो विवाहित असणे हे बंधनकारक नव्हते. पण विवाहित असलाच तर वडील किंवा सेवा-सेवक म्हणून योग्यता प्राप्त करण्यासाठी एखाद्या ख्रिश्‍चनाला आपल्या पत्नीवर योग्य व प्रेमळ मस्तकपण चालवायचे होते तसेच आपल्या मुलांना योग्य अधीनतेत ठेवण्यास तो शक्‍त असल्याचे दाखवायचे होते. (१ करिंथकर ११:३; १ तीमथ्य ३:१२, १३) एखाद्या बांधवाने आपल्या घरची व्यवस्था ठेवण्यात कोणतीही गंभीर कमतरता दाखवल्यास मंडळीतील खास विशेषाधिकारांकरता त्याला अपात्र ठरवले जाऊ शकते. असे का? पौल स्पष्टीकरण देतो: “ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा संभाळ कसा करील?” (१ तीमथ्य ३:५) त्याच्या स्वतःच्या घरातील लोक त्याच्या देखरेखीच्या अधीन राहू इच्छित नाहीत तर इतर जण कशी प्रतिक्रिया दाखवतील?

‘मुले सत्यात असली पाहिजेत’

५, ६. (अ) मुलांच्या बाबतीत कोणत्या अपेक्षेबद्दल पौलाने तीताला सांगितले? (ब) मुले असलेल्या वडिलांकडून काय अपेक्षिले जाते?

५ क्रेटन मंडळ्यांमध्ये पर्यवेक्षकांना नियुक्‍त करण्याविषयी पौलाने तीताला मार्गदर्शन देताना अशी अट घातली: ‘ज्याला नेमावयाचे तो अदूष्य, एका स्त्रीचा पती असावा; त्याची मुले सत्यात असावीत. त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी. पर्यवेक्षक हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो अदूष्य असला पाहिजे.’ ‘मुले सत्यात असणे’ या अपेक्षेचा काय अर्थ होतो?—तीत १:६, ७.

६ ‘सत्यातील मुले’ ही संज्ञा, यहोवास आपले जीवन आधीच समर्पित केलेल्या व बाप्तिस्मा घेतलेल्या किंवा समर्पण व बाप्तिस्मा घेण्याकरता प्रगती करत असलेल्या लहान मुलांना लागू होते. मंडळीचे सदस्य बहुधा, वडिलांच्या मुलांकडून सुसभ्य व आज्ञाधारक असण्याची अपेक्षा करतात. वडील आपल्या मुलांचा विश्‍वास वाढवण्याकरता होता होईल तितका प्रयत्न करीत आहे हे स्पष्ट दिसले पाहिजे. राजा शलमोनाने लिहिले: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” (नीतिसूत्रे २२:६) पण जर का असे प्रशिक्षण मिळाल्यानंतरही एखादा युवक यहोवाची सेवा करण्यास नकार देतो अथवा गंभीर चूक करतो तेव्हा काय?

७. (अ) नीतिसूत्रे २२:६ पक्का नियम मांडत नाही हे का स्पष्ट आहे? (ब) एखाद्या वडिलाच्या मुलाने यहोवाची सेवा करण्याचे निवडले नाही तर ते वडील आपोआप त्यांचे विशेषाधिकार का गमावणार नाहीत?

७ वर उल्लेखलेले नीतिवचन पक्का नियम मांडत नाही हे स्पष्ट आहे. ते स्वतंत्र इच्छेच्या तत्त्वाला रद्द करीत नाही. (अनुवाद ३०:१५, १६, १९) एखादा मुलगा अथवा मुलगी जबाबदारी पेलण्याच्या वयास पोहंचते तेव्हा समर्पण व बाप्तिस्मा याविषयी त्याने किंवा तिने व्यक्‍तिगत निर्णय घेतला पाहिजे. एखाद्या वडिलाने आवश्‍यक ती आध्यात्मिक मदत, मार्गदर्शन व शिस्त दिल्यावरही युवक यहोवाची सेवा करण्यास निवडत नाही तेव्हा पर्यवेक्षक या नात्याने सेवा करण्यापासून पिता आपोआप अपात्र ठरत नाही. दुसऱ्‍या बाजूला पाहता, जर एखाद्या वडिलांची अनेक अज्ञानी मुले आहेत आणि ती एकापाठोपाठ आध्यात्मिकरीत्या आजारी पडतात व समस्यांमध्ये गुरफटतात तेव्हा कदाचित ते ‘घरची व्यवस्था चांगली न ठेवणारे’ समजले जातील. (१ तीमथ्य ३:४) येथे मुद्दा असा आहे, की एखादा पर्यवेक्षक ‘आपल्या मुलांना बेतालपणा केल्याचा आरोप नसलेली अथवा अनावर नसलेली व विश्‍वास बाळगणारी’ असा बनवण्याचा होता होईल तितका प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट दिसले पाहिजे.a

‘सत्यात नसलेल्या पत्नीशी’ विवाहित

८. एखाद्या वडिलाने सत्य न मानणाऱ्‍या आपल्या पत्नीशी कशा व्यवहार करावा?

८ सत्य न मानणाऱ्‍यांसोबत विवाहित असलेल्या ख्रिस्ती पुरुषांविषयी पौलाने लिहिले: ‘जर कोणाएका बंधूची पत्नी सत्यात नसली आणि ती त्याच्याजवळ नांदावयास राजी असली, तर त्याने तिला सोडू नये. ख्रिस्ती पतीच्या द्वारे सत्यात नसलेली पत्नी पवित्र झाली आहे; असे नसते तर तुमची मुलेबाळे अशुद्ध असती; परंतु आता ती पवित्र आहेत. कारण हे पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाही काय ठाऊक?’ (१ करिंथकर ७:१२-१४, १६) ‘सत्यात नसणे’ हे शब्द, कोणतेही धार्मिक विश्‍वास नसलेल्या पत्नीला सूचित होत नाहीत तर यहोवास समर्पण न केलेल्या स्त्रीला लागू होतात. ती कदाचित एक यहुदी किंवा खोट्या दैवतांवर विश्‍वास ठेवणारी असावी. आज, एखादा वडील, वेगळ्या धर्माचे आचरण करणाऱ्‍या, अज्ञेयवादी अथवा नास्तिक स्त्रीशी विवाहित असेल. ती त्याच्या बरोबर राहू इच्छित असल्यास, केवळ भिन्‍न विश्‍वासांमुळे त्याने तिला सोडू नये. त्याने ‘आपल्या पत्नीबरोबर, ती अधिक नाजूक पात्र आहे असे समजून सुज्ञतेने सहवास’ ठेवून तिला वाचवण्याच्या आशेने तिच्यासोबत राहिले पाहिजे.—१ पेत्र ३:७; कलस्सैकर ३:१९.

९. ज्या राष्ट्रांमध्ये कायदा पती व पत्नीस आपल्या मुलांना आपले धार्मिक विश्‍वास शिकवण्याची परवानगी देतो तेथे एका वडिलांनी काय करावे आणि याचा त्याच्या विशेषाधिकारांवर कोणता प्रभाव पडेल?

९ एखाद्या पर्यवेक्षकांना मुले असल्यास, ते ‘प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवताना’ पतीचे व पित्याचे योग्य मस्तकपण चालवतील. (इफिसकर ६:४) अनेक देशांमध्ये, कायदा दोन्ही वैवाहिक सोबत्यांना आपल्या मुलांना धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकार देतो. अशा वेळी, पत्नी मुलांना तिचे धार्मिक विश्‍वास आणि रूढी शिकवण्याच्या तिच्या अधिकाराची मागणी करील, ज्यामध्ये त्यांना तिच्या चर्चला घेऊन जाणे समाविष्ट असू शकते.b अर्थात, खोट्या धार्मिक समारंभात भाग न घेण्याविषयी मुलांनी आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकानुसार कार्य केले पाहिजे. कुटुंब प्रमुख या नात्याने, पिता, आपल्या मुलांसोबत अभ्यास करण्याच्या स्वतःच्या अधिकाराचा वापर करील आणि शक्य असेल तेव्हा त्यांना राज्य सभागृहात नेईल. स्वतः निर्णय घेऊ शकण्याच्या वयात पोहंचल्यावर आपण कोणत्या मार्गाचे अनुसरण करावे हे मुले स्वतः ठरवतील. (यहोशवा २४:१५) त्यांचे सहवडील आणि मंडळीतील इतर सदस्य जर, कायदा त्यांना अनुमती देतो त्याप्रमाणे आपल्या मुलांना सत्याच्या मार्गात योग्यप्रकारे प्रशिक्षण देण्यात सर्वंकष प्रयत्न करीत आहेत हे पाहू शकतात तेव्हा ते पर्यवेक्षक या नात्याने अपात्र ठरणार नाही.

‘आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणे’

१०. कुटुंब असलेला मनुष्य वडील असल्यास, त्याचे प्रमुख कर्तव्य कोणते आहे?

१० पिता असलेल्या व सहख्रिस्ती पत्नी असलेल्या वडिलांना देखील, आपली पत्नी, मुले आणि मंडळीच्या जबाबदाऱ्‍यांमध्ये योग्यप्रकारे आपल्या वेळेचे व अवधानाचे संविभाजन करणे इतके सोपे नसते. शास्त्रवचने स्पष्टपणे सांगतात, की आपल्या पत्नीची आणि मुलांची काळजी घेणे हे ख्रिस्ती पित्याचे कर्तव्य आहे. पौलाने लिहिले: ‘जर कोणी स्वकीयांची व विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे; तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.’ (१ तीमथ्य ५:८) ज्या विवाहित पुरुषांनी स्वतःला उत्तम पती आणि पिता शाबीत केले आहे केवळ त्यांचीच पर्यवेक्षक म्हणून शिफारस केली जावी असे पौलाने त्याच पत्रात म्हटले.—१ तीमथ्य ३:१-५.

११. (अ) एखाद्या वडिलाने कोणत्या प्रकारे आपल्या ‘स्वकीयांची तरतूद’ केली पाहिजे? (ब) यामुळे एखाद्या वडिलाला त्याच्या मंडळीच्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्यास मदत कशी होऊ शकते?

११ एखाद्या वडिलांनी स्वकीयांची केवळ आर्थिकबाबतीतच नव्हे तर आध्यात्मिक व भावनिक बाबतीतही “तरतूद” केली पाहिजे. सुज्ञ राजा शलमोनाने लिहिले: “तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर, मग आपले घर बांध.” (नीतिसूत्रे २४:२७) तेव्हा, आपल्या पत्नीच्या व मुलांच्या आर्थिक, भावनिक व मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करताना पर्यवेक्षकांनी त्यांना आध्यात्मिकतेत देखील वाढवले पाहिजे. यासाठी वेळ लागतो—असा वेळ जो ते मंडळीच्या बाबींसाठी खर्च करू शकणार नाहीत. परंतु, वेळच केवळ कौटुंबिक सौख्य व आध्यात्मिकतेच्या रुपात समृद्ध लाभांश देऊ शकतो. कालांतराने, वडिलांचे कुटुंब आध्यात्मिकरीत्या बळकट असल्यास, कुटुंबाच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना कदाचित कमी वेळ खर्च करावा लागेल. यामुळे मंडळीच्या बाबींची काळजी घेताना त्यांच्या मनावर अधिक ताण राहणार नाही. उत्तम पती आणि उत्तम पिता या नात्याने त्यांचे उदाहरण मंडळीच्या आध्यात्मिक लाभाचे ठरेल.—१ पेत्र ५:१-३.

१२. कोणत्या कौटुंबिक बाबींमध्ये वडील असलेल्या पित्यांनी उदाहरणीय असावे?

१२ घरची चांगली व्यवस्था ठेवण्यामध्ये, कौटुंबिक अभ्यासाची व्यवस्था करण्याकरता वेळापत्रक बनवण्याचा समावेश होतो. याबाबतीत वडिलांनी उदाहरणीय असणे विशेष महत्त्वाचे आहे, कारण दृढ कुटुंबांमुळे मंडळ्या दृढ होतात. एखाद्या पर्यवेक्षकांचा वेळ सेवेच्या इतर विशेषाधिकारांमध्ये नियमितपणे इतका ग्रासलेला नसावा की ज्यामुळे त्यांना आपल्या पत्नी व मुलांसोबत अभ्यास करण्यास वेळच उरत नाही. असे असल्यास त्यांनी त्यांचे वेळापत्रक पुन्हा तपासावे. इतर गोष्टींकरता ते खर्च करीत असलेल्या वेळेमध्ये त्यांना कदाचित फेरफार किंवा कपात करावी लागेल, काही प्रसंगी विशिष्ट विशेषाधिकारही त्यांना नाकारावे लागतील.

संतुलित देखरेख

१३, १४. ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाने’ कुटुंब असलेल्या वडिलांना कोणता सल्ला दिला आहे?

१३ कौटुंबिक व मंडळीच्या जबाबदाऱ्‍यांमध्ये संतुलन राखण्याविषयीचा सल्ला काही नवखा नाही. वर्षानुवर्षे ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दास’ याबाबतीत वडिलांना सल्ला देत आला आहे. (मत्तय २४:४५) ३७ पेक्षा अधिक वर्षांआधी, सप्टेंबर १५, १९५९ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी), नियतकालिकाने पृष्ठे ५५३ व ५५४ वर असा सल्ला दिला: “वेळेच्या या सर्व मागण्यांमध्ये संतुलन दाखवण्याची खरोखर ही बाब नाही का? या संतुलनात तुमच्या कुटुंबाच्या हितांवर योग्य भर दिला जावा. एखाद्याने आपला सर्व वेळ मंडळीच्या कामकाजात वापरावा, आपल्या बांधवांना आणि शेजाऱ्‍यांना तारण मिळवण्यास मदत करण्यात घालवून स्वतःच्या घरच्या तारणासाठी काहीच करू नये अशी अपेक्षा यहोवा देव निश्‍चितच त्यांच्याकडून करणार नाही. मनुष्याची पहिली जबाबदारी त्याची पत्नी आणि मुले ही आहे.”

१४ टेहळणी बुरूज (इंग्रजी), नोव्हेंबर १, १९८६, पृष्ठ २२ वर असा सल्ला दिला आहे: “क्षेत्र सेवेमध्ये कुटुंब या नात्याने भाग घेतल्याने तुम्ही एकत्र येता, तरीदेखील, मुलांच्या असाधारण गरजांकरता तुमचा खासगी वेळ व भावनिक शक्‍ती देण्याचीही आवश्‍यकता आहे. यास्तव, मंडळीच्या कर्तव्यांकरता त्यासोबतच ‘तुमच्या स्वकीयांची’ आध्यात्मिक, भावनिक व आर्थिक काळजी घेण्याकरता तुम्ही केवढा वेळ वापरू शकता, हे ठरवण्यासाठी संतुलनाची आवश्‍यकता आहे. [एका ख्रिश्‍चनाने] ‘प्रथम [आपल्या] घरच्यांबरोबर सुभक्‍ती आचरण्यास’ शिकले पाहिजे. (१ तीमथ्य ५:४, ८)”

१५. पत्नी व मुले असलेल्या वडिलाला सुज्ञता व समजबुद्धीची आवश्‍यकता का आहे?

१५ एक शास्त्रवचनीय नीतिवचन म्हणते: “सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते.” (नीतिसूत्रे २४:३) होय, आपले ईश्‍वरशासित कर्तव्य पूर्ण करण्यासोबत घरच्यांची उभारणी करण्यासाठी पर्यवेक्षकांना निश्‍चितच सुज्ञता व समजबुद्धीची आवश्‍यकता आहे. शास्त्रवचनीयदृष्ट्या त्यांच्याकडे देखरेखीची एकापेक्षा अधिक क्षेत्रे आहेत. यामध्ये त्यांचे कुटुंब आणि मंडळीतील त्यांच्या जबाबदाऱ्‍या समाविष्ट आहेत. यामध्ये संतुलन राखण्यासाठी त्यांना समजबुद्धीची आवश्‍यकता आहे. (फिलिप्पैकर १:९, १०) त्यांच्या प्राथमिकता मांडण्यासाठी त्यांना सुज्ञतेची गरज आहे. (नीतिसूत्रे २:१०, ११) परंतु, मंडळीतील आपल्या विशेषाधिकारांची काळजी घेण्याबद्दल ते जबाबदार असल्याचे त्यांना कितीही वाटले तरी, पती व पिता या नात्याने आपल्या कुटुंबाची काळजी घेणे व त्यांचे तारण ही त्यांची पहिली देव-प्रदत्त जबाबदारी आहे हे त्यांनी जाणले पाहिजे.

उत्तम पिता तसेच उत्तम वडील

१६. एखादा वडील पिता देखील असल्यास त्यांना कोणता फायद होतो?

१६ सुचरित्र मुले असलेले वडील अस्सल ठेवा ठरू शकतात. ते जर आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घेण्यास शिकले आहेत तर मंडळीतील इतर कुटुंबाना मदत करण्यासाठी देखील ते योग्य स्थितीत असतात. ते त्यांच्या समस्या योग्यप्रकारे समजू शकतात व स्वतःच्या अनुभवावरून त्यांना सल्ला देऊ शकतात. संपूर्ण जगभरात हजारो वडील पती, पिता व पर्यवेक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.

१७. (अ) पिता व वडील असलेल्या मनुष्याने कोणती गोष्ट केव्हाही विसरता कामा नये? (ब) मंडळीतील इतर सदस्यांनी कशाप्रकारे सहानुभूती दाखवावी?

१७ कुटुंब असलेल्या एखाद्या मनुष्याने वडील असण्याकरता प्रगल्भ ख्रिस्ती असले पाहिजे, जो आपल्या पत्नीची व मुलांची काळजी घेत असताना स्वतःचे कामकाज अशा प्रकारे संघटित करू शकतो जेणेकरून, तो मंडळीतील इतरांसाठी वेळ आणि अवधान देऊ शकेल. त्याच्या मेंढपाळकत्वाच्या कार्याची सुरवात घरापासूनच होते हे त्याने कधीही विसरता कामा नये. पत्नी व मुले असलेल्या वडिलांवर आपले कुटुंब आणि आपली मंडळी या दोघांची जबाबदारी असते याची जाणीव राखून मंडळीतील सदस्य त्यांच्याकडून वेळेची अवाजवी मागणी करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या वडिलांना दुसऱ्‍या दिवशी सकाळी शाळेला जाणारी मुले असल्यास, त्यांना नेहमीच सभा संपल्यावर काही वेळेपर्यंत थांबणे शक्य नसेल. मंडळीतील इतर सदस्यांनी हे समजून घेऊन समसुखदुःखी असले पाहिजे.—फिलिप्पैकर ४:५.

वडील आपल्याला प्रिय वाटले पाहिजेत

१८, १९. (अ) १ करिंथकराच्या ७ व्या अध्यायाच्या परिक्षणामुळे आपल्याला काय जाणण्यास मदत मिळाली? (ब) अशा ख्रिस्ती पुरुषांना आपण कसे लेखावे?

१८ करिंथकरांना लिहिलेल्या पौलाच्या पहिल्या पत्राच्या ७ व्या अध्यायाच्या परिक्षणामुळे आपल्याला, पौलाचा सल्ला अनुसरून अनेक सडे पुरुष त्यांच्या स्वातंत्र्याचा उपयोग राज्य आस्थेच्या सेवेसाठी करत असल्याचे पाहणे शक्य झाले. मुले नसलेले असे हजारो विवाहित बांधव देखील आहेत जे आपल्या पत्नींकडे वाजवी लक्ष देत असताना प्रांत, विभाग, मंडळ्या व वॉच टावर शाखांमध्ये उत्तम पर्यवेक्षक या नात्याने कार्य करत आहेत व त्यांच्या पत्नी त्यांना सहकार्य देतात ही प्रशंसनीय गोष्ट आहे. शेवटी, यहोवाच्या लोकांच्या सुमारे ८०,००० मंडळ्यांमध्ये, असे अनेक पिता आहेत जे केवळ आपल्या पत्नींची व मुलांची प्रेमळ काळजीच घेत नाहीत तर चिंता करणारे मेंढपाळ म्हणून आपल्या बांधवांचीसुद्धा सेवा करण्यासाठी वेळ काढतात.—प्रेषितांची कृत्ये २०:२८.

१९ प्रेषित पौलाने लिहिले: “जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवितात, विशेषेकरून जे उपदेश व शिक्षण ह्‍या बाबतीत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे.” (१ तीमथ्य ५:१७) होय, आपल्या घरांमध्ये व मंडळीमध्ये उत्तम प्रकारे देखरेख करणारे वडील आपली प्रीती व आदर यांच्या पात्र आहेत. ‘असे पुरुष आपल्याला खरोखर प्रिय वाटले पाहिजेत.’—फिलिप्पैकर २:२९.

[तळटीपा]

a टेहळणी बुरूज (इंग्रजी), फेब्रुवारी १, १९७८, पृष्ठे ३१-२ पाहा.

b टेहळणी बुरूज डिसेंबर १, १९६०, पृष्ठे ७३५-६ पाहा.

उजळणीद्वारे

◻ सा. यु. पहिल्या शतकातील पुष्कळ वडिलांची कुटुंबे होती हे आपल्याला कसे माहीत होते?

◻ मुले असलेल्या विवाहित वडिलांकडून कोणती गोष्ट अपेक्षिली जाते व का?

◻ ‘मुले सत्यात असणे’ याचा काय अर्थ होतो पण जर एखाद्या वडिलाच्या मुलाने यहोवाची सेवा करण्यास निवडले नाही तर काय?

◻ कोणत्या बाबतीत एखाद्या वडिलाने ‘आपल्या स्वकीयांची तरतूद’ केली पाहिजे?

[२३ पानांवरील चित्रं]

दृढ कुटुंबांमुळे मंडळ्या दृढ होतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा