देवाच्या नव्या जगात तुमचे कुटुंब बचावून जाण्यासाठी परिश्रम घ्या
“हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.], तू त्यांस संभाळशील; ह्या पिढीपासून तू त्यांचा कायमचा बचाव करिशील.”—स्तोत्रसंहिता १२:७.
१, २. (अ) या शेवटल्या काळाच्या दबावामध्ये काही कुटुंबांचे कसे चालले आहे? (ब) ख्रिस्ती कुटुंब बचावाचा कसा प्रयत्न करू शकते?
“आज माझे अंतःकरण आनंदाने भरून गेले आहे.” असे योहान नावाच्या एका वडीलाने म्हटले. या आनंदाचे कारण? “माझा १४ वर्षे वयाचा मुलगा व १२ वर्षे वयाची मुलगी यांचा आज बाप्तिस्मा झाला आहे,” असे ते म्हणतात. पण एवढ्यावरच त्यांचा आनंद संपला नव्हता. “माझ्या १७ वर्षे वयाच्या मुलाने आणि १६ वर्षे वयाच्या मुलीने गेल्या वर्षात साहाय्यक पायनियरींगचे काम केले आहे,” असे ते पुढे म्हणाले.
२ आम्हामधील पुष्कळ कुटुबांनी पवित्र शास्त्राचा अवलंब केल्यामुळे अशा सुंदर परिणामांचा अनुभव घेतला आहे. तरीपण काही जणांपाशी समस्या आहेत. “आम्हाला पाच मुले आहेत,” असे एक ख्रिस्ती जोडपे लिहिते, “आणि त्यांना आम्हाला संभाळणे मोठे मुष्किलीचे होत आहे. आम्ही आधीच आमचे एक मूल या जुन्या व्यवस्थीकरणाला गमावलो आहोत. आमची युवावस्थेतील मुले ही सध्या सैतानाचे खास लक्ष्य बनली आहेत असे दिसते.” तसेच, काही अशी कुटुंबे आहेत जेथे वैवाहिक झगडे होत राहतात आणि याचा परिणाम विभक्त होण्यात किंवा सूटपत्र देण्यात होतो. तरीदेखील, ख्रिस्ती गुणांना विकसित करणाऱ्या कुटुंबांचा “मोठे संकट” यातून बचाव होईल आणि अशांना देवाच्या नव्या जगात सुरक्षितपणे नेले जाईल. (मत्तय २४:२१; २ पेत्र ३:१३) तर मग, तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला काय करता येण्याजोगे आहे?
दळणवळण वाढवणे
३, ४. (अ) कौटुंबिक जीवनात दळणवळण हे केवढे महत्त्वाचे आहे, पण याबद्दलच्या समस्या नेहमी का येतात? (ब) पतींनी चांगले ऐकणारे असण्याचा का प्रयत्न केला पाहिजे?
३ चांगले दळणवळण हे सुदृढ कुटुंबाचे जीवनी रक्त आहे; ते कमी असल्यास काळजी व त्रास वाढतो. “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात,” असे नीतीसूत्रे १५:२२ म्हणते. एक विवाह सल्लागार म्हणतेः “मी ज्या स्त्रियांना सल्ला देते, त्यांच्याकडून मला साधारणपणे हीच तक्रार ऐकायला मिळते की, ‘ते मजशी बोलत नाहीत,’ आणि ‘ते माझं ऐकूनच घेत नाहीत.’ आणि जेव्हा मी ती तक्रार त्यांच्या पतीपुढे मांडते तेव्हा ते देखील माझे ऐकत नाहीत.”
४ अशी ही दळणवळणाची उणीव का बरे? एक गोष्ट म्हणजे पुरुष व स्त्रिया वेगवेगळ्या घडणीचे आहेत आणि त्यांच्यामध्ये दळणवळणाच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत. एका लेखाने असे दर्शविले की, पतीचा आपल्या संभाषणात “सरळ व व्यावहारिक असण्याकडे कल असतो,” तर बायकोला “इतर गोष्टीपेक्षा ज्याची अधिक गरज असते ती आहे सहानुभूतिने ऐकणाऱ्याची.” तुमच्या विवाहात जर हीच समस्या आहे तर ती सुधारण्यासाठी कामाला लागा. हे करण्यासाठी कदाचित ख्रिस्ती पतीला अधिक चांगले ऐकणारे बनण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. “प्रत्येक मनुष्य ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश” असावा असे याकोब म्हणतो. (याकोब १:१९) तुमच्या बायकोची “समसुखदुःखी” होण्याची इच्छा आहे तेव्हा तिला आज्ञा करण्याचे, सल्ला देण्याचे आणि भाषण देण्यापासून स्वतःला आवरण्याचे शिकून घ्या. (१ पेत्र ३:८) “जो मित भाषण करितो त्याच्या अंगी शहाणपण असते,” असे नीतीसूत्रे १७:२७ म्हणते.
५. पतींना आपले विचार व भावना व्यक्त करण्याच्या बाबतीत कोणत्या मार्गाने सुधारणा करता येतील?
५ पण तेच, दुसऱ्या बाजूस पाहता, “बोलण्याचा समय” देखील असतो व तुम्ही आपले विचार व भावना अधिक व्यक्त करण्याचे शिकून घेण्यास हवे. (उपदेशक ३:७) उदाहरणार्थ, तुमच्या बायकोने जे काम पूर्ण करून दाखवले आहे त्याबद्दल तुम्ही तिची औदार्याने स्तुती करता का? (नीतीसूत्रे ३१:२८) तुम्हाला साहाय्य देण्यामध्ये तसेच घरची काळजी घेण्यात ती जे परिश्रम उचलते त्याबद्दलची कृतज्ञता तिला व्यक्त करता का? (पडताळा कलस्सैकर ३:१५.) किंवा कदाचित तुम्ही आपले बोल अधिक “मधुर” बनविण्याची गरज असेल. (गीतरत्न १:२) अशाप्रकारे वागणे प्रथमतः तुम्हाला विचित्र वाटेल, पण यामुळे तुमच्या बायकोला तुमच्या प्रेमात सुरक्षित वाटत असल्याचा परिणाम दीर्घ पल्ल्याचा ठरू शकतो.
६. स्त्रियांना कुटुंबातील दळणवळणात कशी सुधारणा करता येईल?
६ आता ख्रिस्ती पत्नींबद्दल काय? एका पत्नीने एकदा असे सांगितले की, मला त्यांची कदर वाटते हे ते जाणून आहेत व यामुळे मी त्याबद्दल त्यांना काहीएक सांगण्याची जरुरी नाही. तथापि, पुरुषांना देखील रसिकतापूर्ण बोल, प्रशंसा व स्तुती यांची आवड असते हेही लक्षात घ्या. (नीतीसूत्रे १२:८) तुम्हाला याबाबतीत अधिक स्पष्ट होण्याची गरज आहे का? दुसऱ्या बाजूला बघता, कदाचित तुम्ही कसे ऐकता त्याबाबतीत अधिक लक्ष देण्याची गरज असेल. तुम्हाला असे दिसते की, तुमच्या पतींना त्यांची समस्या सांगण्याची कठीणता, भीती व काळजी वाटते तर तुम्ही, त्यांनी तुम्हासोबत मोकळेपणाने बोलावे म्हणून त्यांना दयेने व चतुरपणे चालना देण्याचे शिकून घेतले आहे का?
७. कशामुळे विवाहात भांडणे उद्भवतात, पण यांना कसे आवरता येऊ शकेल?
७ हे खरे की, सर्वसाधारणपणे चांगल्या पद्धतीने वागणाऱ्या जोडप्यांना देखील कधी काळी दळणवळण खुंटल्याचा अनुभव येईल. कदाचित भावना विचारांवर प्रभूत्व गाजवू लागेल आणि शांत चर्चेचा उद्रेक तप्त वादावादीत होईल. (नीतीसूत्रे १५:१) “आपण सगळेच पुष्कळ गोष्टीविषयी चुकतो” हे खरे; तथापि, क्षणिक भांडण हे विवाहाचा अंत करू शकत नाही. (याकोब ३:२) परंतु, “कलकलाट व अभद्र भाषण” या गोष्टी अयोग्य असून त्या कोणत्याही नातेसंबंधाला हानिकारक आहेत. (इफिसकर ४:३१) अंतःकरणास दुखविण्याजोगी बाचाबाची झाली असल्यास लगेच शांती समेट घडविण्याचे प्रयत्न करा. (मत्तय ५:२३, २४) तुम्ही दोघांनी पौलाने इफिसकर ४:२६ मधील सूचना अनुसरली तर भांडणे सुरवातीलाच संपुष्टात येऊ शकतात. तेथे म्हटले आहेः “तुम्ही रागावला असता सूर्य मावळू नये.” होय, समस्येचे स्वरुप लहान व प्रमाणबद्ध असतानाच त्याबद्दल बोला; आपल्या भावना प्रदीप्त होऊन भडका होईपर्यंत थांबून राहू नका. दर दिवशी काळजी वाटणाऱ्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी काही क्षण दिल्यास दळणवळणास अधिक चालना मिळेल व यामुळे गैरसमज टळेल.
‘यहोवाकडील मानसिक बोध’
८. काही युवक सत्यापासून का दूर जातात?
८ काही पालक आपल्या मुलांना थोडे फार मार्गदर्शन देऊन त्यांची वाढ करतात असे आढळते. मुले सभांना येतात आणि क्षेत्रकार्याला देखील जातात; पण त्यांनी देवासोबत आपले नातेसंबंध जोडलेले नसतात. मग, काही काळातच यांना “देहाची वासना, डोळ्यांची वासना” आकर्षून घेते व यामुळे पुष्कळ युवक सत्यापासून दूर गेले आहेत. (१ योहान २:१६) आर्मगिदोन आल्यावर पालक मात्र बचावलेले दिसत आहेत आणि त्यांची मुले, पालकांनी गत काळी दुर्लक्ष केले म्हणून त्यात नष्ट झालेली आहेत हे बघणे किती दुःखाचे असेल!
९, १०. (अ) मुलांना ‘यहोवाचे शिक्षण व मानसिक बोध’ यात वाढवण्यामध्ये कशाचा समावेश आहे? (ब) मुलांना आपले विचार मोकळेपणाने बोलून देण्याची मुभा द्यावी हे महत्त्वाचे का आहे?
९ पौलाने असे लिहिलेः “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांस चिडवू नका; तर प्रभूचे [यहोवा, न्यू.व.] शिक्षण व मानसिक बोध यांच्या योगे त्यांचा प्रतिपाल करा.” (इफिसकर ६:४, न्यू.व.) हे करण्यासाठी प्रथम, तुम्ही स्वतः यहोवाच्या दर्जांसोबत पूर्णपणे परिचित असले पाहिजे. मनोरंजन, व्यक्तिगत अभ्यास, सभांची उपस्थिती आणि क्षेत्रसेवा याबद्दल तुम्ही स्वतः योग्य उदाहरण मांडले पाहिजे. पौलाचे शब्द आणखी सूचित करतात की, पालकांनी (१) आपल्या मुलांकडे धूर्तपणाने लक्ष दिले पाहिजे आणि (२) त्यांच्याशी चांगले दळणवळण ठेवावे. तेव्हाच, मुलांना कोणत्या बाबतीत “मानसिक बोध” देण्याची गरज आहे ते तुम्हाला कळू शकेल.
१० वयात येणारी मुले थोडेफार स्वतंत्र होण्याची धडपड करतात हे स्वाभाविक आहे. तरीपण त्यांचे बोलणे, विचार, पेहराव व केशभूषा यात जगीक प्रभावाच्या स्पष्टरित्या दिसून येणाऱ्या लक्षणांच्या बाबतीत तुम्ही दक्ष असले पाहिजे. नीतीसूत्रे २३:२६ मध्ये एका सूज्ञ बापाने असे म्हटलेः “माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे.” तुमच्या मुलांना आपले विचार व कल्पना यांची सहभागी तुमच्यासोबत करण्यास मोकळेपणा वाटतो का? आपल्याला लागलेच तंबी मिळत नाही याची खात्री वाटल्यावरच मुले सहली, भेटीगाठी, उच्च शिक्षण किंवा पवित्र शास्त्रीय सत्य याबद्दल त्यांना वाटणाऱ्या गोष्टी खरेपणाने तुम्हापुढे प्रदर्शित करतील.
११, १२. (अ) जेवणाची वेळ कुटुंबातील दळणवळण वाढीस लावण्यासाठी कशी वापरता येईल? (ब) मुलांसोबत दळणवळण वाढीस लावण्याच्या पालकांच्या पराकाष्ठेच्या प्रयत्नांचा परिणाम कशात दिसू शकतो?
११ पुष्कळ देशात कुटुंबाने एकत्र जेवण करणे ही साधारण प्रथा आहे. यामुळे रात्रीचे जेवण हे सर्वांसाठी उभारणीकारक संभाषणात सहभागी होण्याची संधि देते. तथापि, सहसा असे दिसते की, जेवणाचा बहुतेक वेळ दूरदर्शनवरील कार्यक्रम व इतर गोष्टीकडे लक्ष देण्यात खर्च होतो. मुले दिवसभर शाळेत राहतात आणि त्यांना सतत जगीक विचारांना सामोरे जावे लागते. यासाठी जेवणाची वेळ ही तुमच्या मुलांसोबत वैचारिक दळणवळण करण्यासाठी चांगली असते. एक आई म्हणतेः “आम्ही जेवणाच्या वेळी दिवसभर ज्या गोष्टी घडल्या त्याबद्दलची चर्चा करण्यात घालवतो.” तथापि, जेवणाची वेळ ही पेच निर्माण करणारी, शिस्त लावणारा तास किंवा उलट-तपासणीची वेळ व्हावयास नको. ती आरामाची व आनंदाची वेळ ठेवा.
१२ मुलांनी मोकळेपणाने संभाषण करावे हे तुम्हासाठी आव्हानात्मक असेल व यासाठी अपूर्व सहनशीलतेची गरज असेल. तरी, काही काळानंतर तुम्हाला याचे परिणाम पहावयास मिळतील. “आमच्या १४ वर्षाच्या मुलाला निराश व टाकून दिल्यासारखे वाटत होते,” असे एका काळजी करणाऱ्या मातेने म्हटले. “तथापि, आमच्या प्रार्थना व सहनशीलतेमुळे तो आता मोकळेपणाने बोलू लागला आहे!”
उभारणी करणारा कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यास
१३. मुलांना आरंभीच शिक्षण देणे का महत्त्वाचे आहे, आणि हे कसे साध्य करता येईल?
१३ “मानसिक बोध” यामध्ये देवाच्या वचनाचे तोंडी शिक्षण देखील समाविष्ट आहे. तीमथ्याप्रमाणेच ही तालीम “बालपणापासून” सुरु होण्यास हवी. (२ तीमथ्य ३:१५) आरंभीचे शिक्षण मुलांना शालेय वर्षात वाढदिवस, राष्ट्रीयवादी समारंभ, किंवा धार्मिक सण या प्रकारच्या विश्वासाच्या परिक्षांना तोंड द्यावे लागेल तेव्हा दृढ ठेवील. अशा परिक्षांची तयारी न ठेवल्यास मुलांचा विश्वास धुळीस मिळेल. यासाठीच वॉचटावर संस्थेने खासपणे मुलांसाठी थोर शिक्षकाचे ऐका आणि माय बुक ऑफ बायबल स्टोरिज् अशांसारखी जी प्रकाशने प्रसिद्ध केली आहेत त्यांचा लाभ घ्या.a
१४. कौटुंबिक अभ्यास कसा नियमित राखता येऊ शकतो, आणि तो नियमित राखण्याकरता तुम्ही काय केले आहे?
१४ कौटुंबिक अभ्यास हे एक आणखी लक्ष देण्याजोगे क्षेत्र आहे. तो सहजपणे अनियमित किंवा कंटाळवाणा व तांत्रिक स्वरुपाचा बनू शकतो आणि पालक व मुले या दोघांना कठीण वाटू शकतो. याबाबतीत काय सुधारणा करता येऊ शकते? प्रथम, अभ्यासासाठी ‘संधि साधून घेतली पाहिजे,’ व ती दूरदर्शनवरील कार्यक्रम व इतर आकर्षणे यांनी विचलीत होऊ देऊ नये. (इफिसकर ५:१५-१७) “आम्हाला आमचा कौटुंबिक अभ्यास नियमित राखण्याची समस्या होती,” असे एक बाप म्हणतो. “आम्ही वेगवेगळ्या वेळी तो घेऊन पाहिला व शेवटी संध्याकाळनंतरची अशी एक वेळ आम्हाला मिळाली जी सर्वांना व्यावहारिक होती. आता आमचा कौटुंबिक अभ्यास नियमित आहे.”
१५. तुमच्या कुटुंबाच्या गरजांना अनुलक्षून तुम्ही आपला कौटुंबिक अभ्यास कसा ठेवू शकता?
१५ पुढे, तुमच्या कुटुंबाची जी विशिष्ट गरज आहे त्याकडे लक्ष द्या. पुष्कळ कुटुंबांना दर आठवडी टेहळणी बुरुजचा अभ्यास एकत्र बसून तयार करण्यात आनंद वाटतो. तरीपण वेळोवेळी तुमच्या कुटुंबाला विशिष्ट गरजा सविस्तरपणे चर्चा करण्याची गरज राहील. यात शाळेत येणाऱ्या समस्याही असतील. याबाबतीत क्वश्चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक व द वॉचटावर आणि अवेक! यात प्रसिद्ध होणारे लेख ही गरज पूर्ण करू शकतात. एक बाप म्हणतोः “आमच्या मुलांठायी काळजी करण्याजोगी एखादी प्रवृत्ती वाढत असल्याचे आम्हाला दिसते तेव्हा आम्ही यंग पीपल आस्क या पुस्तकातील त्या विषयाबद्दल असणारा अध्याय काढतो व त्याचा अभ्यास करतो.” त्यांची बायको म्हणतेः “आम्ही लवचिक असण्याचा प्रयत्न ठेवतो. आम्ही अभ्यासासाठी एखादी योजना आधीच आखली असेल, पण दुसऱ्याच एखाद्या विषयाची चर्चा करण्याची गरज उद्भवते तेव्हा आम्ही गरजेप्रमाणे आमचा अभ्यास बदलतो.”
१६. (अ) मुले काय शिकतात याची तुम्हाला कशी खात्री करता येईल? (ब) कौटुंबिक अभ्यास करताना कोणत्या गोष्टी सहसा टाळल्या पाहिजेत?
१६ मुलांना जे शिकवले जाते ते त्यांना खरेच समजते याचा तुम्ही कसा पडताळा करू शकता? थोर शिक्षक येशूने “तुला कसे वाटते?” यासारखे दृष्टिकोणात्मक प्रश्न विचारले. (मत्तय १७:२५) हेच करण्याद्वारे तुम्हाला तुमच्या मुलांना खरेच काय वाटते ते शोधून पाहण्याचा प्रयत्न करता येईल. प्रत्येक मुलाला स्वतःच्या शब्दात उत्तर देण्याचे प्रोत्साहन द्या. तुम्ही त्यांच्या प्रामाणिक वक्तव्याच्या मध्येच तोंड घालून राग किंवा धक्का बसल्यासारखा आविर्भाव व्यक्त केला तर पुन्हा तुमच्या बरोबर मोकळेपणाने बोलण्याआधी मुले एकदा नव्हे दोनदा विचार करतील. यास्तव, शांत राहा. कौटुंबिक अभ्यासाचे पर्यावसान कानउघाडणी करण्याच्या प्रसंगात होऊ देण्याचे टाळा. तो अभ्यास आनंदविणारा व उभारणीकारक असला पाहिजे. “माझ्या मुलांपैकी एकाला काही समस्या आहे असे आढळल्यास त्याबद्दल मी त्याच्याशी स्वतंत्रपणे बोलतो,” असे एक पिता म्हणतो. आई पुढे म्हणतेः “अशाप्रकारे, जेव्हा मुलाला स्वतंत्रपणे बोलले जाते तेव्हा त्याला विचित्र वाटत नाही व तो अधिक मोकळेपणाने बोलू लागतो. हे कौटुंबिक अभ्यासादरम्यान त्याला सल्ला दिल्यास साध्य होऊ शकत नाही.”
१७. कौटुंबिक अभ्यास अधिक मनोरंजक बनविण्यासाठी काय करता येईल, आणि तुमच्या कुटुंबासाठी कोणती गोष्ट चांगली असल्याचे दिसून आले?
१७ मुलांना कौटुंबिक अभ्यासात सहभागी करून घेणे हे मोठे आव्हान आहे. जेथे वेगवेगळ्या वयाची मुले अभ्यासात बसलेली असतात तेथे तर अधिकच मोठे आव्हान येते. लहान मुले काही वेळातच चुळबुळ सुरु करतील, ती बेचैन होतील व इकडेतिकडे लक्ष घालू लागतील. अशावेळी तुम्हाला काय करता येईल? अभ्यासाचे वातावरण खेळकर ठेवण्याकडे लक्ष द्या. तुमच्या मुलांचे लक्ष लवकर विचलीत होत आहे असे दिसते तर अभ्यासाची वेळ कमी ठेवा; पण तो अधिक वेळा घ्या. तुम्ही उत्साहीपणे तो चालवला तर अधिक मदत होते. ‘सभा चालविणाऱ्याने ती आस्थेने चालवावी.’ (रोमकर १२:८) सर्वांना समाविष्ट करा. लहान मुलांना चित्रांवर बोलता येईल किंवा सोप्या प्रश्नांची उत्तरे देता येतील. वयात येणाऱ्या युवकांना अधिक संशोधन करण्यास सांगावे किंवा जे साहित्य विचाराधीन आहे त्याचा व्यावहारिक अवलंब अनुसरण्यास सांगावे.
१८. पालकांना हरप्रसंगी देवाचे वचन कसे बिंबवता येईल, आणि याचा काय परिणाम घडेल?
१८ तथापि, आध्यात्मिक सूचना प्रदान करण्याची मर्यादा आठवड्यातील केवळ एका तासापुरती राखू नका. हरप्रसंगी तुमच्या मुलांमध्ये देवाचे वचन बिंबवीत राहा. (अनुवाद ६:७) त्यांचे ऐकून घेण्यासाठी वेळ द्या. आवश्यक ठिकाणी त्यांना बोध व समाधान द्या. (पडताळा १ थेस्सलनीकाकर २:११.) सहानुभूति व दयाळूपणा दाखवा. (स्तोत्रसंहिता १०३:१३; मलाखी ३:१७) असे केल्यामुळे तुम्हाला आपल्या मुलांठायी ‘हर्ष मिळेल’ व त्यांचा देवाच्या नव्या जगात बचाव होण्यासाठी तयारी करता येईल.—नीतीसूत्रे २९:१७.
“हसण्याचा समय”
१९, २०. (अ) कौटुंबिक जीवनात करमणूकीचे कोणते स्थान आहे? (ब) पालक आपल्या कुटुंबासाठी कोणकोणत्या करमणूकीची योजना आखू शकतील?
१९ “हसण्याचा समय . . . नृत्य करण्याचा समय” असतो. (उपदेशक ३:४) “हसणे,” यासाठी जो इब्री शब्द आहे त्याचे “नाचणे,” “खेळणे,” “करमणूक,” आणि “चांगला वेळ घालविणे” असेही भाषांतर करता येऊ शकते. (२ शमुवेल ६:२१; ईयोब ४१:५; शास्ते १६:२५; निर्गम ३२:६; उत्पत्ती २६:८) खेळ लाभदायक उद्दिष्ट साध्य करू शकतो व तो मुले व युवकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. पवित्र शास्त्र काळी पालकांनी आपल्या कुटुंबासाठी करमणूक व आरामाच्या वेळेची योजना केली होती. (पडताळा लूक १५:२५.) तुम्हीही हेच करता का?
२० “आम्ही बागेत फिरायला जातो,” असे एक ख्रिस्ती पती म्हणतो. “आम्ही काही तरुण बांधवांना एकत्र घेतो आणि चेंडूचा खेळ खेळतो व सहल काढतो. त्यांचा आनंदात वेळ जातो व त्यांना हितकारक सहवास मिळतो.” आणखी एक पालक म्हणतोः “आम्ही आमच्या मुलांसोबत एकत्रपणे काही तरी करण्याचे योजितो. आम्ही पोहायला जातो, चेंडू खेळतो, सुटीवर जातो. पण आम्ही करमणूकीला त्याच्या जागी ठेवतो. समतोल राखावा हे मी वारंवार सांगत असतो.” योग्य प्रकारचे मेळावे, किंवा प्राणीसंग्रहालयाला आणि वस्तु संग्रहालयाला भेट देणे यासारख्या गोष्टीमुळे मुलांना जगाच्या सुखविलासाच्या आहारी जाण्यापासून टाळता येईल.
२१. जगातील सणासुदीचे दिवस न आचरल्यामुळे वंचित झाल्याची भावना काढून टाकण्यासाठी पालक काय करू शकतील?
२१ तुमची मुले वाढदिवस किंवा ख्रिस्तेत्तर सण पाळीत नसल्यामुळे त्यांना वंचित झाल्याचे वाटू देऊ नका. तुम्ही काही योजना करून ठेवल्यास ते वर्षभरातून अनेक वेळा या आनंदाच्या वेळेकडे आपले डोळे लावू शकतील. आपले प्रेम भौतिक दृष्ट्या व्यक्त करण्यामध्ये चांगला पिता काही सुट्यांची सबब सांगणार नाही. उलटपक्षी, तो आपल्या स्वर्गीय पित्याप्रमाणे उत्स्फुर्ततेने ‘आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे समजतो.’—मत्तय ७:११.
आपल्या कुटुंबासाठी चिरकालिक भवितव्य मिळवणे
२२, २३. (अ) मोठे संकट जवळ येत असता, देवभिरु पालकांना कसली हमी राहील? (ब) देवाच्या नव्या जगात बचावून जाण्यासाठी कुटुंबांना काय करता येण्याजोगे आहे?
२२ स्तोत्रकर्त्याने असे प्रार्थिलेः “हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.], तू त्यांस संभाळशील; ह्या पिढीपासून तू त्यांचा कायमचा बचाव करशील.” (स्तोत्रसंहिता १२:७) सैतानाकडील दबाव खासपणे यहोवाच्या साक्षीदारांच्या कुटुंबाविरुद्ध निश्चितपणे वाढू शकेल. तरीही वाढत्या हल्ल्यामध्ये टिकून राहण्याचे साध्य होऊ शकते. यहोवाची मदत व सोबत पती, पत्नी आणि मुले यांजकडील पराकाष्ठेचा निश्चय व परिश्रम यामुळे तुमच्या कुटुंबासह इतर कुटुंबे येणाऱ्या मोठ्या संकटात निभावण्याची आशा राखू शकतील.
२३ तर मग, पती व पत्नींनो, तुम्हाला देवाने ज्या भूमिका प्रदान केल्या आहेत त्या पूर्ण करून तुमच्या वैवाहिक जीवनात शांती व मेळ घडवून आणा. पालकहो, तुमच्या मुलांसाठी उत्तम उदाहरण राखण्याचे चालू ठेवा; त्यांना अत्यंत आवश्यक असणारी तालीम व शिक्षण देण्यासाठी वेळ काढा. त्यांच्याशी बोला. त्यांचे ऐका. त्यांचे जीवन पणाला लागले आहे! मुलांनो, तुमच्या पालकांचे ऐका व त्यांच्या आज्ञांचे पालन करा. यहोवाच्या मदतीनेच तुम्ही देवाच्या येणाऱ्या नव्या जगात चिरकालिक भवितव्य मिळवून घेण्यासाठी यशस्वी व्हाल व स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल.
[तळटीपा]
a याच्या काही भाषेत ऑडिओ कॅसेटस् उपलब्ध आहेत.
तुम्हाला आठवते का?
▫ पती व पत्नीला त्यांच्यामधील दळणवळण कसे सुधारता येईल?
▫ पालकांना आपल्या मुलांना “यहोवाचे शिक्षण व मानसिक बोध” याजमध्ये कसे वाढवता येईल? (इफिसकर ६:४)
▫ कौटुंबिक अभ्यास अधिक उभारणीकारक व अधिक मनोरंजक बनविण्याचे काही मार्ग कोणते आहेत?
▫ आपल्या कुटुंबासाठी करमणूक व मनोरंजन याबद्दल पालकांना काय व्यवस्था आखता येईल?
[२७ पानांवरील चौकट]
संगीत—एक सामर्थ्ययुक्त प्रभाव
मुलांच्या संगोपनाबद्दल लिखाण करणारे एक लेखक असे म्हणतातः “मी एखाद्या सभागृहासमोर उभा राहिलो . . . व त्यांना मद्याने धुंद होण्याचा, कोकाईनने भरुन जाण्याचा किंवा इतर मनास वळविणारी मादक औषधे घेण्याचा सल्ला दिला तर लोक माझ्याकडे आश्चर्याने बघू लागतील. . . . [तरीही] पालक आपल्या मुलांना पैसे देऊन या सर्व गोष्टी करण्यासाठी उद्युक्त करणारे संगीत ऐकावे म्हणून तशा रेकॉर्ड घेण्यास मुभा देतात.” (रेसिंग पॉसिटिव्ह किडस् इन ए निगेटीव्ह वर्ल्ड, लेखक झिग झिग्लर) अमेरिकेत युवकांच्या तोंडात लैंगिकदृष्ट्या उद्युक्त करणाऱ्या गीतांच्या चाली ऐकण्यास मिळतात. तुम्ही, तुमच्या मुलांनी संगीताची निवड योग्य पद्धतीने करावी व त्याद्वारे दुरात्मिक पाश टाळावा म्हणून मदत देत आहात का?
[२६ पानांवरील चित्रं]
जेवणाची वेळ ही आनंदाचा प्रसंग ठरू शकते व यामुळे कौटुंबिक ऐक्य व दळणवळण साधले जाऊ शकते