‘यहोवा घर बांधीत नाही तर . . . ’
आपण कोठेही वस्तीस असा, तुमचे असे एक स्थळ असते, व ते म्हणजे घर. राहण्याच्या पद्धती व घर बांधण्याचे प्रकार वेगवेगळे असतात. मातीने लिपलेल्या तट्ट्याच्या झोपड्या, तर लाकडांची घरे आणि पूर्वरचित सुटे भाग काँक्रीटचे तयार करून त्यावर रचिलेली मजबूत घरे, इमारती वगैरे, व तशी यादी करीत राहिल्यास ती संपणार नाही. काही लोकांना त्यांच्या गवतांच्या घरात जेवढे बरे वाटते, जितके इतरांना इमारतीतील घरात वाटते. हे असे का असावे बरे?
तर आराम वाटणे, समाधानी असणे हे सर्व मुख्यत्वेकरून एखादा जो मित्रपरिवार जोडून असतो त्यावर अवलंबून असते. (नीती १८:२४) जग जरी एवढा झगझगाट आणि मोहकता सादर करीत आहे तरी घर हे एक असे स्थळ आहे जेथे शांती व दुःखपरिहारासाठी मनुष्य परत जाऊ इच्छितो. तरी आधुनिक काळातील घरगुती जीवनावरील अहवालांचे निष्कर्ष हेच दर्शवितात की एखाद्यास त्याच्या घरी हवी ती शांती व परिहार मिळण्याची शाश्वती नाही. कारण तसे पाहता—जे तुम्हाबरोबर राहात असतात—तुमचे कुटुंबीय—तेही तुमच्या शांतीचे, एक तर सहभागी होतील किंवा तिला पार धुळीस मिळवतील. मग, एक आनंदी, शांतताप्रिय घर उभारण्यामागील रहस्य काय असू शकेल?
घरबांधणी
“यहोवा घर बांधीत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत,” असे स्तोत्रसंहिता १२७ व्या अध्यायातील पहिलेच वचन म्हणते. जे सर्व खरा देव, यहोवा याच्यासाठी भक्तीस्थान उभारण्यात सहभागी होतात, त्यांना याच्या सत्यतेचा अनुभव आलेला आहे. जरी कुशल कारागीर, सुंदर राज्य सभागृह जलदीने उभारण्याच्या स्वयंसेवेत आपला वेळ व परिश्रम खर्च करीत असतात, तरी यहोवाचे आशीर्वाद हेच यशाची हमी देतात. एवढेच काय पण, तेथून जाता येता किंवा शेजारी बघणारेही वेळोवेळी पाहतात की, काही खासप्रकारचे काम चालू आहे. उदाहरणार्थ, या प्रकारच्या प्रकल्पाची बातमी देण्यात इंग्लंडमधील कॉलचेस्टरच्या मासिकाने हा निर्वाळा दिला की, “यहोवा घर उभारत आहे.”
तथापि, प्रत्यक्ष इमारत बांधणीच्या प्रकल्पाशिवाय इतर गोष्टीतही यशप्राप्ती ही यहोवाच्या आशीर्वादांवर अवलंबून असते. स्तोत्रसंहिता १२७ मधील तिसऱ्या वचनातील शलमोनाचे विचार लक्षात घ्याः “पाहा, संतती ही यहोवाने दिलेले धन आहे. पोटचे फळ ही त्याची देणगी आहे.” जेव्हा कुटुंबाकडे कल झुकतो तर तेथेही यहोवा एक सर्वोत्तम उभारक ठरतो, आणि पालकांना त्याचे संगतीत सहसेवक किंवा सोबतीचे परिश्रमक असण्याची उत्तम संधी असते.a (इब्रीयांस ११:१०) मग, या विशेष हक्काच्या भागीदारीचा फायदा ख्रिश्चन पालक कसे उचलू शकतात व एका आनंदी, शांतीचे वास्तव्य असलेल्या कुटुंबाची, की जे त्याच्या सृष्टीकर्त्या यहोवा देवास गौरव प्राप्त करून देईल अशा कुटुंबाची यशस्वीरित्या उभारणी कशी करील?
यशस्वी कौटुंबिक उभारणी
विश्वसनीय शिल्पकलेचा आराखडा किंवा निळ्या कागदावरील कलात्मक आखणी ही यशस्वी बांधकामाची गुरुकिल्ली आहे. देवाच्या युवक भक्तगणांची उभारणी करण्यास, त्याचा प्रेरित शब्द, पवित्र शास्त्र याच्याशिवाय अधिक चांगली निळी पत्रिका असू शकणार नाही. (२ तीमथ्य ३:१६, १७) शलमोनाने लिहिलेः “मुलाच्या स्थितीस अनुरुप असे शिक्षण त्याला दे; म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” (नीतीसूत्रे २२:६) ‘ज्या मार्गी’ त्याला शिक्षण देणे आहे तो यहोवाचा मार्ग असावा व पालकांनी तो अनुसरल्यास ते त्यांच्या युवक लेकरांठायी भावी काळातील यहोवाचे विश्वासू सेवक होण्याचे भवितव्याचे बीजारोपण करतील.
भक्कम इमारत उभारणी करिता विश्वसनीय बांधकाम मालाची गरज असते. एक आफ्रिकन पर्यटक युरोपात गेला व तेथे हे पाहून त्याचा या गोष्टीवर विश्वास बसेना की, काही इमारती शेकडो वर्षे जुन्या आहेत. या इमारती उभारण्यास टिकाऊ बांधकाम माल वापरण्यात आला होता. तेच जेव्हा बांधकाम करणारे कामचलाऊ माल उपयोगात आणतात, तेव्हा वेळोवेळी भयानक परिणाम एवढेच काय पण प्राणहानीही घडते. हेच लेकरांना वाढविण्याचे बाबतीतही घडू शकते.
जन्माचे वेळी, लेकरांना अपूर्णत्वातील अनुवंशीय गुण, पापात जन्म झाल्यामुळे येत असतात. (स्तोत्रसंहिता ५१:५) याचा अर्थ, ते अगदी सुरवातीपासून संगतीत असतात. यास्तव, ख्रिश्चन पालक त्यांच्या लेकरांठायी टिकाऊ आणि ईश्वरीय गुणांची सतत रूजवात करून त्याजशी सामना करतात. (१ करिंथकर ३:१०-१५) पालकांनी इतर गोष्टी करण्यात केवढेही परिश्रम उचलले जसे की, त्यांच्या मुलामुलींना उत्तम आहार दिला, कपडे व घरही दिले तरी हे न केल्यास आमचे उभारणी-प्रयत्न निष्फळ ठरणार.
या कारणास्तव, पालकांना, खास करून, बापांना हा ईश्वरीय सल्ला आहेः “यहोवाचे शिक्षण व बोध यांच्यायोगे त्यांचा [लेकरांचा] प्रतिपाल करा.” (इफिसकर ६:४) कारण यहोवाकडील शिक्षण व बोध यात सर्वोत्तम निळी आखणी आणि उभारणीचे उत्तम साहित्य समाविष्ठ आहे. ते सर्व उपयोगात आणिल्यास त्यायोगे सबंध कुटुंबाचे सार्वकालिक हित होत असल्याचे आढळेल.
प्रतिपाल करण्याचे कामगिरीवर
जरी उत्तम प्रकारे आपल्या प्रकल्पाची आखणी केली तरी बांधणीकामात नेहमी अनपेक्षित अडचणी उद्भवत असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या नित्याच्या कौटुंबिक जीवनात अनपेक्षित समस्या उद्भवणार या सरावाची स्वतःस सवय लावून त्यांना तोंड देण्यास सदैव तयार असावे. हे कसे करू शकतो?
दोन्ही पालकांमधील दळणवळण चांगले असणे महत्त्वाचे आहे. जेव्हा वडील व आई प्रार्थनापूर्वक एकमेकांसोबत घरातील तरुणतरुणी तसेच युवकांच्या प्रगतीबद्दल चर्चा करतात, त्यांना आढळेल की काही गोष्टींबद्दल प्रशंसा करणे जरुरीचे आहे तर इतर काही गोष्टीत अधिक “बांधणी” करण्याची गरज आहे. अशा कमतरता एकदा लक्षात आल्या की वेळीच पालक एकमेकांच्या संगतीत हालचालीस सुरवात करतील व त्याबद्दलची उचित पावले उचलतील.
कदाचित, तुमचे कुटुंब मोठे असेल व तुम्हास कदाचित काळजी वाटेलः ‘आम्ही आमच्या एवढ्या लेकरांतील प्रत्येकाच्या गरजेकडे कसे लक्ष पुरवू शकू?’ मग, प्रत्येक काम करतेवेळी, त्याची एकेकास तालीम का देऊ नये म्हणजे लेकरांना एकमेकांचे साहाय्य करता येईल? शिकाऊ कामगार कामे कुशलतेने करण्यास कारागिरांच्या हाताखाली अनेक वर्षे राबत असतात. कदाचित आपल्या कौटुंबिक अभ्यासात, तुम्ही तुमच्या अल्पवयीन लेकरांना काही विशिष्ट विषयाबद्दल त्यांच्या युवक भावंडांना स्पष्टीकरण देण्यात साहाय्य करू शकाल. जसे प्रामाणिकता, मित्रांची निवड, शाळेतील वाईट प्रभावांना तोंड देणे आणि यासारखे इतर विषयाबद्दल वयाने पुढे असलेले अल्पवयीन उपयुक्त चर्चा करू शकतील. वय वाढलेल्यांस जीवनातील असले विधायक प्रकल्प नेमून दिले तर त्यायोगे अल्पवयीनांना जी माहिती हवी ती देत असता त्यांची आकलनशक्ती तसेच शिक्षण देण्याची क्षमता वाढते. (इब्रीयांस ५:१४) शिवाय, आप्तजनात चांगले संबंध रुजविण्यातही मोठी फायदेकारक मदत होते.
कदाचित तुमचे कुटुंब छोटे असू शकेल, जेथे केवळ एकच मूल असेल. तर मग, आपल्या मुलास जाणण्यात व ओळखण्यात तुम्हापुढे अधिक सुसंध्या आहेत. पण तेच, मुलाला नेहमीच लक्ष देण्याजोगा केंद्रबिंदू बनवून तो वाईट होऊ शकेल हा धोका जाणून घ्या. तसे पाहता तुम्ही तिघेच आहात, होना? तर मग, सर्व गोष्टी एकत्रितपणे करा. हे त्याला इतरांशी दळणवळण करण्यामध्ये आणि आपले लक्ष इतरांकडेही देण्यात शिकवील व त्यामुळे तो एकलकोंडा होणार नाही.
कौटुंबिक एकता राखण्याचे ध्येय राखा
तसे पाहता, शास्त्राभ्यास, शिस्त लावणे आणि सूचना देणे यासोबत कुटुंबाची चांगली उभारणी करण्यावर भर द्यावा लागेल. शलमोनाने म्हटलेः “मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही.” (उपदेशक २:२४) भोजन जर अधिक अभिरुचीने तयार केलेले असेल तर कुटुंब मोठ्या स्वादाने त्याचा उपभोग घेते यात संशय नाही. आपण आपली जेवणे सबंध कुटुंब मिळून करण्याची व्यवस्था राबविता का? पण तेच, जर कुटुंबाचे काही सदस्य काम, शाळा किंवा इतर काही कामाने बाहेर असतील तर ते कदाचित नेहमी शक्य नसेल. असे जरी असले तरी, निदान दिवसाचे एक जेवण आपण सबंध कुटुंब मिळून करू शकता. अशा वेळी त्या कौटुंबिक मेजावर बलवर्धक वातावरण टिकविण्यात कशाने मदत होऊ शकेल?
एक बंधू अशा प्रसंगी सर्व उपस्थित त्या चर्चेत सहभागी होऊ शकतील असा एखादा पवित्र शास्त्रीय प्रश्न सर्वांसमोर मांडतो. अर्थात, ज्यांना कदाचित त्याचे उत्तर देता येत नसेल अशांना संकोचित करण्याचे तो टाळतो. इतर काही क्षेत्रसेवेचे अनुभव निवेदित करतात. आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष दिल्याने हा भोजनप्रसंग सबंध कुटुंबाचे उभारणीस उपयुक्त ठरतो. (पाहा, रोमकर १४:१९.) हे खरे की, जगातील काही भागातील लोक, जेवण चालू असता अधिक बोलत नाहीत. तरीही, आनंदी वातावरण टिकवून ठेवण्याचा भावपूर्ण प्रयत्न असणे हे अधिक महत्त्वाचे आहे. नीतीसूत्रे १५:१७ म्हणतेः “पोसलेल्या बैलाची मेजवानी देऊन मनात द्वेष वागविणे यापेक्षा प्रेमाची भाजीभाकरी बरी.”
आराम व गतीमध्ये वेळोवेळी केलेला फरक हाही ख्रिश्चन कौटुंबिक जीवनात आपले स्थान राखून असतो. सूज्ञ पालक अशा प्रसंगाचा एक मजबूत ईश्वरशासित कौटुंबिक गट उभारण्यात उपयोग करून घेतात. तो कसा?
तरूणांना बहकू देणे व त्यांच्या मर्जीप्रमाणे करू देणे हे जरी फार सोपे असले तरी त्यात फार मोठा धोका आहे. उदाहरणार्थ, आपल्या युवकांना क्रिडाक्षेत्रात अगदी खोलवर रूजू देणे केवढ्या असमंजसपणाचे ठरेल बरे, कारण त्यात जीवनास किंवा अवयवास धोका आहे. (१ तीमथ्य ४:८) शक्यतो, अशा हालचालींची निवड करा ज्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्य सामील होऊ शकेल. बाप, त्यांची मते व कल्पना ऐकून घेईल व पूर्वतयारीत जे काही करणे आहे त्यातील काहीतरी प्रत्येकास नेमून देईल.
कुटुंब या नात्याने आपल्या प्रेमात अधिक रुंद होऊन आपल्या कौटुंबिक आनंदाचे सहभागी होण्यास तुमच्या मंडळीतील इतर काही सदस्यांना आमंत्रित करू शकाल का? कौटुंबिक आत्म्यात सहभागी होण्याचा आनंद मंडळीतील वयस्करांना, खासकरुन जेव्हा की त्यांचे कौटुंबिक सदस्य जवळ उपलब्ध नसतील किंवा ते पवित्र शास्त्रीय तत्त्वानुरुप राहात नसतील अशावेळी, अधिक वाटत असतो. (याकोब १:२७) अनेक मंडळ्यातून एक पालकीय कुटुंबे आहेत. ईश्वरीय शासनपदाचे मस्तकपदास द्यावयाच्या परिशीलनार्थ व ख्रिश्चन गुणधर्मांचा आदर बाळगून वडीलवर्ग आणि इतर सर्व अशा कुटुंबातील सदस्यांना आध्यात्मिक निवारा पुरवतील. (यशया ३२:१) प्रौढ ख्रिश्चन वयस्करांनी प्रेमळ आस्था प्रदर्शित करण्याचे परिणामात आज अनेक “अनाथ” तरूण ख्रिश्चन कुटुंबप्रमुख बनले आहेत.—स्तोत्रसंहिता ८२:३.
ख्रिश्चन कुटुंबाची उभारणी करणे हे एक कठीण काम आहे. पण यहोवाच्या मदतीनेच आपणाठायी ही आवड खरोखरी रुजेल की, “संतति (मुले) ही यहोवाने दिलेले धन आहे. पोटचे फळ त्याची देणगी आहे.” (स्तोत्रसंहिता १२७:१, ३) कारण ते केवळ ख्रिश्चन पालकांकरिता नव्हे तर, सृष्टीकर्ता यहोवा देव याचेही गौरव स्थान होतील.
[२७ पानांवरील तळटीपा/चित्रं]
a खरे पाहता, “बांधणे” (वचन १) आणि “मुले” (वचन ३) यासाठी असणारे इब्री शब्द “बांधणी करणे” या मूळ अर्थापासून उद्भवले आहेत असे समजले जाते. तसेच, इब्री भाषेत “घर” हे कोणा “निवासस्थान” किंवा “कुटुंब” याला अनुलक्षून असू शकते. (२ शमुवेल ७:११, १६; मीखा १:५) अशाप्रकारे, घराची बांधणी करणे याचा संबंध कुटुंबाची वाढ करण्यासोबत करण्यात आला आहे. या दोन्ही कामात यहोवाचा आशीर्वाद जरूरीचा आहे.