वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • देवाच्या शिस्तीत मुलांना वाढवणे
    सावध राहा!—२००५ | जानेवारी ८
    • शिस्तीचा खरा अर्थ

      शिस्त लावण्यासंबंधी आईवडिलांची काय भूमिका असावी याबद्दल बायबलमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ इफिसकर ६:४ [NW] म्हणते: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर शिस्तीत व यहोवाच्या शिक्षणात त्यांना वाढवा.” मुलांची काळजी घेण्याच्या संदर्भात, खासकरून वडिलाने पुढाकार घ्यावा असे हे शास्त्रवचन सुचवते. अर्थात आईसुद्धा या कार्यात आपल्या पतीला सहयोग देते.

      या विषयावर दी इन्टरप्रेटर्स डिक्शनरी ऑफ द बायबल यात म्हटले आहे: “बायबलनुसार, शिस्त लावणे यात एकमेकांशी निगडीत असलेल्या दोन पैलूंचा समावेश आहे; एक पैलू प्रशिक्षण, बोध व ज्ञान याजशी तर दुसरा ताडन, सुधारणूक व शिक्षा याजशी संबंधित आहे. शिस्त लावणे या अर्थाच्या शब्दांचा सहसा मुलांना दिल्या जाणाऱ्‍या प्रशिक्षणाच्या संदर्भात वापर केला जातो.” त्याअर्थी, शिस्त लावणे हे केवळ ताडन देण्यापुरतेच सीमित नाही. तर मुलांचा सर्वांगीण विकास होण्याकरता आवश्‍यक असलेले सर्व प्रशिक्षण त्यांना पुरवण्याचा यात अंतर्भाव आहे. पण मुलांना चीड येणार नाही अशा पद्धतीने आईवडिलांना हे कसे करता येईल?

      सहानुभूतीशील असा

      मुलांना चीड का येते? असे समजा, की तुम्ही जेथे काम करता तेथे तुमच्यासोबत, अतिशय तापट स्वभावाचा एक माणूस काम करतो. तो सतत तुमच्यावर रागावत असतो. उठता बसता तुमच्या वागण्याबोलण्यात काही न काही चुका काढत असतो. तुम्ही केलेले काम त्याला सहसा पसंत पडत नाही आणि तो तुम्हाला अगदीच पाण्यात पाहतो. तुम्हाला त्याच्या अशा वागण्याची चीड येणार नाही का व तुम्ही हताश होणार नाही का?

      आईवडील जेव्हा सतत मुलांच्या मागे लागून त्यांचे दोष दाखवत राहतात व त्यांना रागावत राहतात तेव्हा मुले देखील चिडतात व हताश होतात. मुले वेळोवेळी चुका करतात तेव्हा त्यांच्या चुका सुधारणे आवश्‍यक असून बायबलही आईवडिलांना असे करण्याची परवानगी देते. पण कठोर व क्रूर वागणूक देऊन मुलांना चीड आणल्यामुळे भावनात्मक, आध्यात्मिक व शारीरिक हानी देखील होऊ शकते.

  • देवाच्या शिस्तीत मुलांना वाढवणे
    सावध राहा!—२००५ | जानेवारी ८
    • [२१ पानांवरील चौकट/चित्र]

      “यहोवाच्या शिक्षणात”

      इफिसकर ६:४ यात “यहोवाच्या शिक्षणात” मुलांना वाढवण्याविषयी उल्लेख केला आहे. “शिक्षणात” असे येथे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक शब्दाचे वेगवेगळ्या बायबल भाषांतरांत “जाणीव,” “सल्ला,” “मार्गदर्शन,” असे भाषांतर केलेले आढळते. या सर्व शब्दांवरून हेच सूचित होते की आईवडिलांनी आपल्या मुलांसोबत केवळ बायबल वाचणे किंवा एखाद्या बायबल आधारित प्रकाशनातून यांत्रिकपणे नियमितरित्या काही भाग विचारात घेणे पुरेसे नाही. आपल्या मुलांना देवाच्या वचनाचा अर्थ कळतो; तसेच, आज्ञापालनाचे महत्त्व, यहोवाला त्यांच्याबद्दल असलेले प्रेम, आणि जे संरक्षण तो त्यांना देऊ करतो या सर्व गोष्टींचीही त्यांना जाणीव आहे, याची आईवडिलांनी खात्री केली पाहिजे.

      हे कसे काय साध्य करता येईल? तीन मुलांची आई असलेल्या ज्यूडीला जाणीव झाली की आपल्या मुलांना देवाच्या तत्त्वांची केवळ वारंवार आठवण करून देणे पुरेसे नव्हते. “मी त्याच त्या गोष्टी, त्याच त्या पद्धतीने सांगू लागले की त्यांना ते आवडत नाही हे माझ्या लक्षात आले. तेव्हा त्यांना वेगळ्या पद्धतीने कसे शिकवता येईल याचा मी विचार करू लागले. सावध राहा! नियतकालिकांतील लेख पडताळून पाहिल्यावर, तेच मुद्दे अगदी नवीन पद्धतीने कसे सादर करता येतील हे मला शिकायला मिळाले. अशारितीने, मुलांना चीड येणार नाही याची काळजी घेऊन, त्यांना आवश्‍यक असलेल्या सूचना पुरवणे मला शक्य झाले.”

      ॲन्जेलो यांच्या कुटुंबाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे; आपण आपल्या मुलींना देवाच्या वचनावर मनन करण्यास कसे शिकवले याविषयी ते सांगतात: “आम्ही बायबलमधील काही वचने एकत्र मिळून वाचल्यावर मी विशिष्ट वाक्यांशांकडे लक्ष वेधून माझ्या मुलींच्या परिस्थितीशी त्यांचा कसा संबंध आहे यावर खुलासा करायचो. नंतर जेव्हा त्या वैयक्‍तिक बायबल वाचन करायच्या तेव्हा मला त्या अगदी गहन विचार करताना, [देवाच्या वचनाचे] आपल्या जीवनात काय तात्पर्य आहे यावर मनन करताना दिसायच्या.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा