वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • आपण “वाट पाहत” राहण्याची वृत्ती कशी जोपासू शकतो?
    टेहळणी बुरूज—२०१३ | नोव्हेंबर १५
    • ९-११. १ थेस्सलनीकाकर ५:३ या वचनात केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली आहे का? स्पष्ट करा.

      ९ पहिले थेस्सलनीकाकर ५:१-३ वाचा. लवकरच, राष्ट्रे “शांती आहे, निर्भय आहे” अशी घोषणा करतील. पण या फसवणुकीला बळी पडू नये म्हणून, आपण “जागे व सावध” राहिले पाहिजे. (१ थेस्सलनी. ५:६) आध्यात्मिक रीत्या जागृत राहण्यासाठी आपण अशा काही घटनांची उजळणी करू या ज्यांनी “शांती आहे, निर्भय आहे” ही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याकरता जणू मार्ग मोकळा केला आहे.

      १० दोन्ही विश्‍वयुद्धांनंतर राष्ट्रे शांतीची मागणी करू लागली. पहिल्या विश्‍वयुद्धानंतर, शांती आणण्याच्या उद्देशाने राष्ट्रसंघाची (लीग ऑफ नेशन्स) स्थापना करण्यात आली. दुसऱ्‍या विश्‍वयुद्धानंतर जगात शांती यावी म्हणून संयुक्‍त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. या दोन्ही संघटना मानवजातीसाठी शांती आणतील या आशेने सरकार आणि धार्मिक पुढारी या संस्थांकडे डोळे लावून होते. उदाहरणार्थ, संयुक्‍त राष्ट्रसंघाने १९८६ हे आंतरराष्ट्रीय शांतीचे वर्ष म्हणून घोषित केले. त्या वर्षी, अनेक राजकीय आणि धार्मिक पुढारी, शांती यावी यासाठी इटलीतील असीसीमधील कॅथलिक चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी एकत्रित जमले होते.

      ११ पण, शांतीबद्दल करण्यात आलेल्या या घोषणांमुळे १ थेस्सलनीकाकर ५:३ मध्ये सांगितलेली भविष्यवाणी पूर्ण झाली नाही. का? कारण, पूर्वभाकीत केलेला “अकस्मात नाश” अद्यापही आलेला नाही.

      १२. “शांती आहे, निर्भय आहे,” या घोषणेबद्दल आपल्याला काय माहीत आहे?

      १२ भविष्यात “शांती आहे, निर्भय आहे,” ही महत्त्वाची घोषणा कोण करेल? ख्रिस्ती धर्मजगतातील आणि इतर धर्मांतील पुढाऱ्‍यांची यात काय भूमिका असेल? अनेक राजकीय पुढारी या घोषणेत कसा सहभाग घेतील? याबद्दल शास्त्रवचनांत काहीही सांगण्यात आलेले नाही. पण आपल्याला एवढेच माहीत आहे की ही घोषणा कशीही करण्यात आली आणि लोकांना ती कितीही खरी वाटली, तरी ती फक्‍त एक फसवणूक असेल. ही जुनी व्यवस्था सैतानाच्या हातातच असेल. ही व्यवस्था निरुपयोगी आहे आणि ती आहे तशीच राहील. ख्रिस्ती या नात्याने आपण जर सैतानाच्या या घोषणेवर विश्‍वास ठेवला आणि त्यात सहभागी झालो तर खरेच ही एक दुःखाची गोष्ट ठरेल!

  • आपण “वाट पाहत” राहण्याची वृत्ती कशी जोपासू शकतो?
    टेहळणी बुरूज—२०१३ | नोव्हेंबर १५
    • १४. मोठ्या बाबेलचा विनाश अगदी जवळ आला आहे हे कशावरून दिसून येते?

      १४ खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य असलेली मोठी बाबेल नाशास पात्र आहे; आणि लवकरच तिचा नाश केला जाईल. मोठ्या बाबेलचा नाश होईल तेव्हा “लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे,” तिला साहाय्य करू शकणार नाहीत. तिचा नाश जवळ आल्याची चिन्हेदेखील दिसू लागली आहेत. (प्रकटी. १६:१२; १७:१५-१८; १८:७, ८, २१) खरे पाहता, आजही प्रसार माध्यमांतून धर्मांवर आणि धार्मिक पुढाऱ्‍यांवर टीका केली जाते तेव्हा मोठ्या बाबेलला पाठिंबा नसल्याचे दिसून येते. पण तरीही या पुढाऱ्‍यांना वाटते की ते सुरक्षित आहेत. किती मोठा गैरसमज! “शांती आहे, निर्भय आहे,” ही घोषणा झाल्यानंतर, सैतानाच्या जगातील सरकारे खोट्या धर्मावर अचानक हल्ला करतील आणि त्याचा कायमचा नाश करतील. मोठ्या बाबेलचा नेहमीसाठी नाश केला जाईल! अशा थरारक घटना पाहण्यासाठी धीराने वाट पाहणे योग्यच नाही का?—प्रकटी. १८:८, १०.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा