उपाध्य सेवक यहोवाच्या लोकांसाठी एक आशीर्वाद
“त्यांचीही अगोदर पारख व्हावी; आणि अदूष्य ठरल्यास त्यांनी सेवकपण करावे.”—१ तिमथ्यी ३:१०.
१. मंडळीचा आनंद व ऐक्यतेविषयीची मदत देण्यात कोण खात्री देतात?
यहोवा हा “आनंदी देव” आहे. आपल्या सेवकांनी आनंदी असावे अशी त्याची इच्छा आहे. (१ तिमथ्यी १:११) याकरता त्याने आपल्या लोकांच्या आशीर्वादास्तव वडील व उपाध्य सेवकांची योजना पुरविली आहे. ही जबाबदार माणसे लाभदायक उद्देशास्तव सेवा करतात आणि ख्रिस्ती मंडळयातील आनंद, ऐक्यता आणि सुलभ कार्यवहनाची खात्री बाळगतात. देवाच्या इश्वरशासित संघटनेतील या नियुक्तांकरवी जी प्रेमळ व मदतगार सेवा पुरविली जाते त्याबद्दल यहोवाचे साक्षीदार केवढे ऋणी आहेत!
२. वडील व उपाध्य सेवकांनी कोणती मनोवृत्ती ठेवावी, पण त्यांनी कशाला कधीही नजरेआड करू नये?
२ वडील व उपाध्य सेवक मंडळीसाठी महत्वपूर्ण सहभाग देत असले तरी देखील त्यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेचा मोठेपणा वागवू नये. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना नम्र राहण्याचे सांगितले होते हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्याने एकदा त्यांना म्हटले होते: “जो कोणी स्वतःला या बाळकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय.” (मत्तय १८:४) तसेच शिष्य याकोबाने लिहिले: “यहोवासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील.” (याकोब ४:१०; रोमकर १२:३) नम्र वृत्ती राखणे याचा अर्थ वडील व उपाध्य सेवकांनी आपल्या कामाच्या महत्वालाही कमी प्रतीचे लेखावे असे नाही. स्वतः नम्र राहिले तरी त्यांना कार्याच्या हालचालीमध्ये पुढाकार घेता येऊ शकेल. आपल्या कार्यामुळे जे लाभदायक उद्देश साध्य केले जातात त्यांना त्यांनी कधीही नजरेआड करता कामा नये पण सोबत आपली कर्तव्येही त्यांनी नेहमी स्मरणात ठेवावीत. यहोवा देव व आपले ख्रिस्ती बांधव यांच्या अनुषंगाने असणारी ही कर्तव्ये पूर्ण करण्यात त्यांनी होता होईल तितके चांगले केले पाहिजे.
३. यहोवाच्या साक्षीदारांमधील एकतेच्या कार्याची तुलना कशासोबत करता येईल, आणि असे हे ऐक्य व राज्य आस्थेची वाढ करणे समर्पित पुरुषांना कसे जमेल?
३ यहोवाच्या साक्षीदारांत आज केल्या जाणाऱ्या ऐक्याच्या कार्याची तुलना मानवी शरीरात जी ऐक्यता आढळते तिच्यासोबत करता येईल. खरे पाहता, प्रेषित पौलाने ख्रिस्ताच्या आध्यात्मिक देहाला विविध अंगांनी मिळून बनलेल्या मानवी शरीराची उपमा देऊ केली. (१ करिंथकर १२:१२–३१) या दृष्टीकोणातून पाहता, नियुक्त वडील व उपाध्य सेवक हे यहोवाच्या लोकांसाठी खराच आशीर्वाद आहेत कारण हे पुरूष आज ख्रिस्ती मंडळीच्या ऐकतेच्या कार्यवहनास वाढीचा हातभार देत आहेत. (पडताळा कलस्सैकर २:१८, १९.) “देखरेख्याच्या पदापर्यंत पाहोचण्याचा” प्रयत्न करून यहोवाच्या संघटनात्मक व्यवस्थेला पाठबळ देणारा मंडळीतील समर्पित पुरुषवर्ग ख्रिस्ती ऐक्यास आणि राज्य आस्थेच्या वाढीस मोठा सहभाग देत असतो. (१ तिमथ्यी ३:१) पण प्रथमतः आपण हे बघू या की एखाद्या ख्रिस्ती पुरूषाला उपाध्य सेवक पदासाठी कसे लायक होता येईल?
“अगोदर पारख व्हावी”
४. (अ)संभाव्य उपाध्य सेवकांची “अगोदर पारख व्हावी” हे का उचित आहे? (ब) या पुरुषांनी काय करण्याची इच्छा धरावी?
४ पुरुषांची उपाध्य सेवक या अर्थी नेमणूक होण्याआधी त्यांच्याबाबत कशाची अपेक्षा करावयाची असते ते प्रेषित पौलाने तिमथ्यी या त्याच्या सह–कामकऱ्यास सांगितले. इतर गोष्टींसमवेत पौलाने हे असे लिहिले: “ त्यांचीही अगोदर पारख व्हावी; आणि अदूष्य ठरल्यास त्यांनी सेवकपण करावे.” (१ तिमथ्यी ३:१०) ही गोष्ट लाचक नसलेल्या पुरूषांना, विशिष्ट शास्त्रवचनीय गरजा पुऱ्या करू न शकणाऱ्यांची नियुक्ति होण्यापासून निर्बंध आणते. शिवाय हीच गोष्ट संभाव्या उपाध्य सेवकांचे हेतु निश्चित करण्यात पुरेसा वेळ प्रदान करते. आपली प्रतिष्ठा व्हावी, मानमरातब मिळावा या कारणास्वत या पुरुषांना प्रेरणा मिळता कामा नये कारण तसे झालेच तर ते नम्रतेची उणीव असल्याचे स्पष्ट करील. उलटपक्षी यांनी देवास होणारे ख्रिश्चनांचे समर्पण हे बिनशर्त असते व त्यात सर्व काही समाविष्ट असते ही जाणीव राखूनच आपल्याला यहोवा त्याच्या संस्थेत ज्या क्षमतेत वापरण्याचे पसंद करून आहे त्या जागेवर सेवा करण्याची स्वेच्छा बाळगण्यास हवी. होय, संभाव्य उपाध्य सेवकांनी विश्वासू यशयाप्रमाणेच सेवा करण्याची तयारी दाखवावी, ज्याने असे म्हटले की, “हा मी आहे, मला पाठीव.”—यशया ६:८.
५. (अ) पहिले तिमथ्यी ३:८ मध्ये उपाध्य सेवकांसाठी कोणत्या गरजा आखून दिलेल्या आहेत? (ब) “गंभीर” असणे याचा काय अर्थ होतो? (क) उपाध्य सेवकांनी “दुतोंडये” असू नये असे म्हणण्यात पौलाचा कोणता अर्थ असावा?
५ “सेवकहि गंभीर असावे. ते दुतोंडये, मद्यपानासक्त व अनीतीने पैसा मिळविणारे नसावेत, “असे पौलाने विवेचीत केले. (१ तिमथ्यी ३:८) काही उपाध्य सेवक तुलनात्मकरित्या वयाने लहान असले तरी ते युवक नसतात, त्यांनी “गंभीर” असावयास हवे. महत्वपूर्ण गोष्टींकडे गंभीरतेने बघण्याचे त्यांनी शिकून घेण्यास हवे. (पडताळा नीतिसूत्रे २२:१५) ते विश्वासार्ह व जाणीव राखणारे असावेत, त्याची वृत्ती जबाबदाऱ्यांस हलकी समजणाऱ्या माणसांसारखी नसावी. खरे म्हणजे ते भरवासापात्र असावयास हवे व त्यांनी आपली कर्तव्ये गंभीरतेने पूर्ण केली पाहिजे. एकंदरीत देवास सादर केल्या जाणाऱ्या पवित्र सेवेशिवाय आणखी गंभीरतापूर्वक गोष्ट कोणती असणार? कारण ती गोष्ट त्यांच्या स्वतःसाठी व इतरांसाठी जीवन व मरणाची असणार. (पडताळा १ तिमथ्यी ४:१६) आणखी पौलाने जे म्हटले की उपाध्य सेवक “दुतोंडये” नसावेत याचा अर्थ हा होतो की त्यांनी सरळ व सत्य असावे; चहाडखोर, दांभिक किंवा आडमार्गी असू नये.—नीतिसूत्रे ३:३२.
६. उपाध्य सेवकांनी समतोलपणा प्रदर्शित केला पाहिजे असे काही मार्ग कोणते आहेत?
६ उपाध्य सेवकांच्या पदासाठी लायक ठरणाऱ्या पुरूषांच्या व्यक्तिगत जीवनास चांगला तोल असलाच पाहिजे. पौलाच्या मनात हेच होते की त्यांनी अतिमद्यप्राशन, लोभ आणि अप्रामाणिकता टाळावी म्हणूनच त्याने म्हटले की, ते “मद्यपानासक्त व अनीतीने पैसा मिळविणारे लोभी नसावे.” आपण सुखविलास व भौतिक गोष्टींच्या बाबत अति आस्थेवाईक आहोत अशी छापही देण्याचे या ख्रिस्ती पुरूषांनी टाळले पाहिजे. त्यांनी आपल्या जीवनात नेहमी आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याकरवी त्यांना सह मानवापुढे, पण महत्वपूर्णतेने देवाच्या दृष्टीने “शुद्ध विवेक” राखण्याची मदत होईल.—१ तिमथ्यी ३:८, ९.
७. (अ) उपाध्य सेवकांच्या जबाबदाऱ्या युवकांना अनुलक्षून नाहीत असे का म्हणता येते? (ब) एखादा उपाध्य सेवक सडा आहे ही गोष्ट त्याच्याबद्दल काय प्रकट करील?
७ उपाध्य सेवकांवर पडणाऱ्या भारी जबाबदाऱ्या युवकांसाठी नाही. शास्त्रवचनात या पुरूषांच्या बाबतीत असे म्हणण्यात आले आहे की त्यांचे वय साधारणपणे विवाह होऊन कुटुंब असण्याच्या स्थितीचे असावयास हवे. अशा परिस्थितीत त्यांनी “आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावे. (१ तिमथ्यी ३:१२) याचा अर्थ असा होतो का की एखादा तरूण आहे तर जोपर्यंत त्याचे लग्न होत नाही व त्याचे कुटुंब स्थापित होत नाही तोपर्यंत त्याला उपाध्य सेवक होता येणार नाही? नाही, तसे नाही. खरे म्हणजे तयारी अपुरी आहे किंवा सुयोग्य असा बाप्तिस्मा झालेला सोबती पहावयाचा आहे म्हणून त्याने लग्नाची घाई करण्यास दिलेला नकार आपल्या व्यक्तिगत व्यवहाराची काळजी करण्यासाठी तसेच अधिक गंभीर अशा मंडळीच्या जबाबदाऱ्या पेलण्यास आवश्यक असणारी प्रौढता काही अंशी त्याच्यात आहे हे प्रगटवील.
८. पहिले तिमथ्यी ३:१३ व मत्तय २४:१४च्या बाबतीत उपाध्य सेवकांवर कोणती जबाबदारी येते?
८ पौलाने म्हटले की, “ज्यांनी सेवकपण चांगले चालविले ते आपणासाठी चांगली योग्यता आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासात बोलण्याचे मोठे निर्भिडपण मिळवितात.” (१ तिमथ्यी ३:१३) आवश्यक असणारे “बोलण्याचे . . . निर्भिडपण” ते “राज्याची ही सुवार्ता” याचा प्रचार करण्यामध्ये क्रियाशील भाग घेण्याकरवी व्यक्त करू शकतात. (मत्तय २४:१४) घरोघरच्या कार्यातील प्रचारात तसेच उपाध्यपणाच्या इतर प्रकारात सहभागी होण्यात नेतृत्व घेण्याच्या जबाबदारीत यांना वडीलांसोबत सहभाग घ्यावयाचा आहे ही त्यांनी जाणीव ठेवायला हवी. (प्रे. कृत्ये ५:४२; २०:२०, २१) सैतानाचे दुष्ट व्यवस्थीकरण आता त्वरेने संपुष्टात येत असता प्रचाराचे कार्य अधिक निकड घेते. तद्वत, उपाध्य सेवकांनी क्षेत्र कार्यात स्वतःचे व्यक्तिगत उदाहरण राखण्याद्वारे मंडळीपुढे राज्याच्या प्रचारकार्याची निकड समोर ठेवण्यास हवी.
पूर्ण वेळेच्या उपाध्यपणाद्वारे मदत मिळते
९. आमच्या काळाची निकड ओळखून पुष्कळ ख्रिश्चनांनी कोणती सेवा निवडून घेतली आहे?
९ आमच्या कठीण काळाची निकड ओळखून पुष्कळ ख्रिस्ती स्त्री पुरूषांनी पूर्ण वेळेचे उपाध्यपण सुरु केले. यांना पायनियर्स असे म्हटले जाते व ते दरदिवशी प्रचारकार्यात साधारणपणे दोन ते पाच तासांचे प्रचारकार्य करतात. यांच्यापैकी काही परदेशात सुवार्तिक आहेत. इतर काही जण वॉचटावर संस्थेच्या मुख्यालयात वा पृथ्वीभर पसरलेल्या त्याच्या शाखा दप्तरात पूर्ण वेळेचे कार्य करतात. त्यांची सेवा त्यांना आनंद व समाधान देते. व ज्यांची ते सेवा करतात त्यांना कित्येक प्रकरणात यापूर्ण वेळेच्या सेवेने पुरूषांना मंडळीत उपाध्य सेवक या अर्थी फायदेकारक सेवा सादर करण्यासाठी आवश्यक ती गुणवत्ता प्राप्त करून देण्यात मदत दिली.
१०, ११. पूर्ण वेळेची सेवा उपाध्य सेवक बनण्याची इच्छा धरणाऱ्या पुरूषांना कशी लाभदायक ठरू शकते हे येथे निदर्शित केलेल्या व्यक्तिगत उद्गारांवरून कसे दिसते?
१० जर्मनीतील बर्लिनच्या मंडळीत पूर्वीचे उपाध्य सेवक पण आता वडील असणारे एक बंधू पूर्वी युवकावस्थेत त्यांनी जे पायनियरींगचे कार्य सुरु केले होते त्याबद्दल सांगताना म्हणतात: “मी असे म्हणू शकतो की मी ते असे पाऊल उचलले ज्याची मला कधीही खत वाटली नाही. यहोवाने मला अशीर्वादित केले आहे. माझे त्याच्याबरोबरील नातेसंबंध आता खूप जवळचे झाले आहे.” होय, इतर हजारों प्रमाणेच याबंधूना हे आढळले की पूर्ण वेळेचे उपाध्यपण यहोवासोबतचा एखाद्याचा नातेसंबंध अधिक दृढ करते व त्याची ख्रिस्ती प्रौढतेप्रत वेगाने प्रगती करते.
११ आणखी एक दीर्घ काळचा पायनियर त्याल पूर्ण वेळेच्या सेवेने कशी मदत दिली त्याविषयी सांगतो. “उतावळे निर्णय घेण्याच्या बाबतीत मी मंद व अधिक समतोल झालो,” तो म्हणतो. “मी अधिक आनंदी बनलो आणि वेगवेगळया लोकांबरोबरील व्यवहारात अधिक लवचिक बनलो.” या सर्व गुणवत्ता उपाध्यसेवक या नात्याने सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या पुरूषांच्या बाबतीत अपेक्षित नाही का?
१२. (अ) पूर्ण वेळेच्या उपाध्यपणात सहभागी होण्याच्या कोणत्या सुसंधि आहेत? (ब) पूर्ण वेळेच्या उपाध्यपणात सहभागी होण्यासाठी कोणत्या क्षमता जरूरीच्या आहेत ज्या उपाध्य सेवकाला त्याची कर्तव्ये पूर्ण करण्यात मदतगार ठरतील?
१२ शास्त्रवचनीय जबाबदाऱ्यांनी मुभा दिली तर पूर्ण वेळेच्या उपाध्यपणात सहभागी होणे ख्रिस्ती पुरूषांच्या बाबतीत “अगोदर पारख व्हावी” या गुणवत्तेसंबंधाने मुबलक संधि प्रस्तुत करते. काही हे उपाध्यपण कायमच्या तत्वावर तर इतर ते अधून मधून घेऊ शकतात. युवकांना हे कार्य आपल्या शाळेच्या सुट्टीदरम्यान तर प्रौढांना त्यांच्या सुट्टी समयी वा वर्षाच्या योग्य समयी करता येणे शक्य आहे. पूर्ण वेळेच्या सेवेत सहभागी होण्याकरता अर्थातच समतोल व काळजीपूर्वक योजना करणे जरूरीचे आहे. या क्षमता उपाध्य सेवकांठायी असणे जरूरीचे आहे, त्या त्याला त्याची कर्तव्ये पूर्ण करण्यास मदत देतील. कोणती कर्तव्ये?
उपाध्य सेवकांची कर्तव्ये
१३. उपाध्य सेवकांच्या कामाचा प्रकार कोणता असतो त्याबद्दल प्रे. कृत्ये ६:१–६ काय सूचित करतो?
१३ प्रेषितांची कृत्ये ६:१–६ उपाध्य सेवकांच्या नेमणूकीला थेटपणे लागू होणारे नसले तरी येथे जे म्हणण्यात आले आहे ते उपाध्य सेवकांना साधारणपणे जी कामे नेमून दिली जातात त्याचा प्रकार वा वर्ग सूचित करतो. त्या काहीं निवडलेल्या “सात प्रतिष्ठित माणसे” यांनी समविश्वासूंना शिक्षण देण्याद्वारे नव्हे तर अन्नाचे वाटप करण्याद्वारे प्रेषितांना ‘प्रार्थना व वचनाच्या सेवेत तत्पर राहण्यासाठी मोकळे केले. अशाच स्वरूपाची कर्तव्ये आज पार पाडल्यामुळे उपाध्य सेवक वडीलांना मेंढपाळकत्व करण्यासाठी व “देवाच्या कळपास” शिक्षण देण्यासाठी अधिक वेळ पुरवू शकतात.—१ पेत्र ५:२, ३.
१४. उपाध्य सेवकांना कोणती विविध कामे नेमून दिली जाऊ शकतात?
१४ उपाध्य सेवकांच्या कर्तव्यासंबंधाने ऑर्गनायझ्ड टू अकम्प्लीश आवर मिनिस्ट्री हे पुस्तक म्हणते: “आम्हाला वैयक्तिक वापरासाठी व क्षेत्रकार्यासाठी जी प्रकाशने लागतात ती उपलब्ध करण्यासाठी मंडळीच्या प्रकाशन साठयावर एका उपाध्य सेवकांची नेमणूक करावी. दुसरा मंडळीच्या मासिक साठयाची काळजी घेईल. इतरांना मंडळीचा जमाखर्च, क्षेत्राची नेमणूक यासारख्या नोंदी ठेवण्याच्या कर्तव्याची नेमणूक असते तर इतर काही मायक्रोफान हाताळणी ध्वनिक्षेपणाचे साहित्य हाताळणे, व्यासपीठाची देखरेख किंवा इतर कोणत्यातरी मार्गी वडीलांना मदतीची कामे करतात. राज्य सभागृहाची निगा राखण्याचे, त्याची स्वच्छता व टापटीप ठेवण्याचे बरेच काम आहे त्यामुळेच या जबाबदाऱ्यात मदत करण्याची हाक वेळोवेळी उपाध्य सेवकांना दिली जाते. उपाध्य सेवकांना मंडळीच्या सभांच्या बाबतीत सेवकाचे काम करण्याची, नव्या लोकांचे स्वागत करण्याची तसेच सभेत सुव्यवस्था राखण्याची नेमणूक मिळते.”—पृष्ठे ५७–८.
१५. (अ) उपाध्य सेवक या अर्थी कार्यक्षम ठरण्यासाठी व्यावहारिक क्षमतेशिवाय आणखी कशाची गरज असते? (ब) उपाध्य सेवक विविध गोष्टींची काळजी करीत असले तरी त्यांचे मुख्य लक्ष्य कोणते असावे?
१५ ज्याच्यापाशी व्यावहारिक क्षमता आहे असा कोणीही बांधव ही कामे करू शकतो का? नाही. कारण पहिल्या शतकात यरूशलेम मध्ये जी “प्रतिष्ठित माणसे” निवडण्यात आली होती ती ‘आत्म्याने व सूज्ञानाने पूर्ण” होती; किंवा ती “व्यवहारिक व आध्यात्मिक मनाची” होती. (प्रे. कृत्ये ६:३, फिलिप्स) ते यहोवाच्या लोकात आधीच वडील जन होते तरी त्यांना अशी कामे नेमण्यात आली होती जी आज बहुधा उपाध्य सेवकांरवी केली जातात. यास्तव, सध्याच्या काळातील उपाध्य सेवकांना त्यांची कर्तव्ये परिणामकारकरित्या पार पाडावयाची असतील तर त्यांनी “व्यावहारिक व आध्यात्मिक मनाचे असले पाहिजे. ते संघटनात्मक कामाकडे लक्ष देत असले तरी लोकांची सेवा करताना त्यांचे प्रमुख लक्ष्य त्यांना आध्यात्मिकरित्या लाभदायक मार्गी मदत द्यावी असे असावे.
१६. मंडळीत पुरेसे वडील उपलब्ध नसल्यास उपाध्य सेवकांना कोणती कामे नेमून दिली जाऊ शकतात?
१६ उपाध्य सेवकांनी आध्यात्मिक मनाचे असावयास हवे असल्यामुळे त्यांना कधी कधी जी कामे बहुधा वडीलांकरवी केली जातात त्याकरता वापरले जाऊ शकते. ऑर्गनायझ्ड टू अकम्प्लीश आवर मिनिस्ट्री (५८–६९ पृष्ठावर) विवेचीत करते: “मंडळीचा पुस्तक अभ्यास चालविण्याकरता पुरेसे वडील उपलब्ध नसल्यास अधिक प्रशिक्षित उपाध्य सेवकांपैकी काहींचा नेमलेल्या गटाकरता पुस्तक अभ्यास चालक या अर्थी वापर केला जातो. त्यांना सेवा सभा व इश्वरशासित शाळेत हाताळण्याकरता काही भाग नेमून दिले जाऊ शकतात, तसेच स्थानिक मंडळीत जाहीर व्याख्यान देण्यासाठीही त्यांचा वापर करता येईल. इतर काही हक्क काही उपाध्य सेवकांना जेथे विशेष गरज आहे तेथे नेमून दिले जाऊ शकतात पण त्या विशिष्ट नेमणूकीच्या आवश्यक गरजा त्यांनी पूर्ण करण्यास हव्या.—पडताळा १ पेत्र ४:१०.”
१७. स्तेफन कशाप्रकारचा मनुष्य होता व यामुळे उपाध्य सेकांच्या बाबतीत कोणते प्रश्न उद्भवतात?
१७ पवित्र शास्त्र काळातील “सात प्रतिष्ठित मनुष्यांपैकी” स्तेफन हा “विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरूष” होता. (प्रे. कृत्ये ६:५) विश्वासू हुतात्मा असे मरण्याआधी स्तेफनाने यहुदी सन्हेद्रीनपुढे मोठी थरारक साक्ष दिली. तो अहवाल वाचून पहा आणि तुम्हाला याची खात्री पटेल की तो आध्यात्मिक मनोवृत्तीचा, देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद देणारा उल्लेखनीय साक्षी व आपले जीवन देवाच्या सेवेस्तव स्वेच्छेने देणारा असा होता. (प्रे. कृत्ये ६:८–७:६०) तुम्ही उपाध्य सेवक आहात तर स्तेफनाने जसे आपल्या जबाबदाऱ्या व सत्य बोलण्याचा हक्क गंभीरतेने पूर्ण केला त्याप्रमाणे तुम्हीही आपल्या मंडळीतील जबाबदाऱ्या आणि क्षेत्र कार्य त्याच्याप्रमाणेच गंभीरपणे पूर्ण करता का?
ते कसे भरत आहेत?
१८. पुष्कळ उपाध्य सेवकांच्या कामाविषयी काय म्हटले जाऊ शकते व त्यांना कशाची हमी दिलेली आहे?
१८ पुष्कळ उपाध्य सेवक ख्रिस्ती जीवनाचे उत्तम उदाहरण मांडीत आहेत, ते मंडळीतील आपल्या जबाबदाऱ्या अगदी उत्तम तऱ्हेने पार पाडीत आहेत त्याचप्रमाणे क्षेत्र कार्यातही चांगले नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या कामाची रसिकता सह उपासकांकरवी मोठया प्रमाणात जाणली जात आहे व शिवाय याबद्दल त्यांना यहोवाकरवी प्रतिफळ मिळाल्यावाचून राहणार नाही, कारण इब्री ख्रिश्चनांना याची हमी देण्यात आली होती की: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीती हे विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्रीयांस ६:१०.
१९. (अ) प्रत्येक उपाध्य सेवक स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकतो? (ब) काही उपाध्य सेवकांकरवी ज्या समस्या अनुभवल्या जात आहेत त्यांची चर्चा करणे लाभदायक का ठरेल?
१९ तथापि, प्रत्येक उपाध्य सेवकाने स्वतःला हे विचारणे बरे ठरेल की, शास्त्रवचनांच्या गरजांसंबंधाने मी कसा भरत आहे? मंडळीच्या ऐक्यास मी खरोखरी हातभार लावीत आहे का? मी मला नेमून दिलेली कर्तव्ये चोखपणे व मेहनतीने पार पाडीत आहे का? मी क्षेत्र सेवेच्या बाबतीत उत्तम उदाहरण ठेवीत आहे का? उपाध्य सेवकांच्या बाबतीत ज्या अपेक्षा आहेत त्याबद्दलच्या काही समस्या काहींना आडव्या आल्या. यासाठी काही समस्यांची आपण चर्चा करू या. त्यामुळे प्रत्येक उपाध्य सेवकाला “आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा” करता येईल. (गलतीकर ६:४) यामुळे प्रेमाचे जे परिश्रम या पुरुषांकरवी घेतले जातील त्याविषयीची रसिकता अधिक वाढविली जाईल कारण हे लोक यहोवाच्या साक्षीदारांमध्ये लाभदायक उद्देशाकरता सेवा करीत असल्यामुळे ते देवाच्या लोकांसाठी खरा आशीर्वाद आहेत.
तुम्हास विवेचीत करता येईल का?
◻ उपाध्य सेवक यहोवाच्या लोकांसाठी आशीर्वाद असे कसे आहेत?
◻ उपाध्य सेवक बनण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्याकरता पूर्ण वेळेचे उपाध्यपण कसे मदत देऊ शकते?
◻ उपाध्य सेवकांनी “व्यावहारिक व आध्यात्मिक मनाचे” का असले पाहिजे?
◻ विश्वासू स्तेफन उपाध्य सेवकांसाठी उत्तम उदाहरण कसा ठरला?
[२२ पानांवरील चित्र]
वडील व उपाध्य सेवक मंडळीला आशीर्वाद असे आहेत
[२४ पानांवरील चित्र]
उपाध्य सेवक बनण्याची ज्यांची इच्छा आहे त्याकरता पायनियर सेवा एक उत्तम तालीम आहे