अलेक्झांड्रियन कोडेक्स
द अलेक्झांड्रियन कोडेक्स, ही पवित्र शास्त्राची पहिली हस्तलिखित आवृत्ती, प्रामाण्यांना उपलब्ध झाली. तिच्या संशोधनाच्या प्राप्तीमुळे, ग्रीक पवित्र शास्त्र वचनाविषयी जी टिका उभारण्यात आली होती तिच्या अनुषंगाने पवित्र शास्त्राच्या अनुवादकांना मोठा लाभ मिळाला. पण हा कोडेक्स केव्हा व कसा उजेडात आला?
मिसरमधील अलेक्झांड्रियात राहणारा कायरिलोस लौकारिस या गृहस्थाला पुस्तके गोळा करण्याचा छंद होता. जेव्हा १६२१ मध्ये तो तुर्कस्थानातील कॉन्स्टँटिनोपल येथे आला तेव्हा आपल्यासोबत त्याने अलेक्झांड्रिनस कोडेक्स आणला. तथापि, मध्यपूर्वेत पसरलेल्या अस्थिर परिस्थितीमुळे तसेच हे हस्तलिखित मुस्लिमांच्या हाती पडल्यावर ते नष्ट होण्याची भीती यामुळे लौकारिसला वाटले की, ते इंग्लंडमध्ये अधिक सुरक्षित राहील. या कारणामुळे त्याने १६२४ मध्ये ती प्रत तुर्कस्थानातील ब्रिटीश राजदूतांच्या हवाली, इंग्लंडचा पहिला राजा जेम्स याला नजराणा म्हणून देण्यास सुपुर्द केली. तथापि, हे हस्तलिखित पोहचण्याआधीच राजाचा मृत्यु झाला म्हणून ते त्याचा वारस चार्लस् पहिला याला दिले गेले.
हे हस्तलिखित, कायरिलोस लौकारिस समजत होता तेवढे मूल्यवान होते का? होय. ते इ. स. च्या ५ व्या शतकातील आहे. अनेक नकलाकारांनी त्या लिखाणात सहभाग घेतला आहे; तसेच सबंध लिखाण सुधारीत आवृत्ती होते. ते मृदु चर्मपत्रावर, प्रत्येक पानावर दोन रकान्यात, शब्दांमध्ये जागा न सोडता सर्व मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे. मत्तयाच्या पुस्तकाचे बहुतेक भाग गहाळ झाले आहेत; तसेच उत्पत्ती, स्तोत्रसंहिता, योहान व २ रे करिंथकर यांचेही काही भाग नाहीत. आता त्याला कोडेक्स ए असा दर्जा अधिकृतपणे देण्यात आला आहे. त्यात ७७३ पाने असून जे उरले आहे ते अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींची आरंभाची साक्ष देतात.
पवित्र शास्त्राच्या जेवढ्या हस्तलिखित प्रती आहेत त्यांच्यातील साम्यता व समकालीनता यामुळे त्यांचे गटवारीत तसेच संघटनात्मक विभाजन करता येते. नकलाकारांनी त्याच प्रतीच्या किंवा जवळच्या प्रतीतून नकला तयार केल्या तसतशा त्यांच्यात वाढ झाली. तरीपण अलेक्झांड्रियन कोडेक्सबाबत पाहता, वेगवेगळ्या गटवारीत आढळणाऱ्या वाचनपद्धतींच्या विविध हस्तलिखितांचे एकत्रीकरण करण्याचा नकलाकाराने प्रयत्न केला, यात हेतू हा होता की, होता होईल तितके अधिक सुंदर वचने सादर करता यावी. प्रत्यक्षात, ते सर्वात जुने व इतर कोणाही ग्रीक शास्त्रवचनांच्या हस्तलिखितांपेक्षा उत्तम असल्याचे शाबीत झाले; आणि याचाच १६११ ची किंग जेम्स आवृत्ती तयार करण्यासाठी उपयोग करण्यात आला.
अलेक्झांड्रियन प्रकाशित झाले तेव्हा १ ले तीमथ्य ३:१६ च्या लिखाणाविषयी मोठा वादंग माजला. येथे किंग जेम्स आवृत्ती मध्ये ख्रिस्त येशूच्या अनुषंगाने म्हटले आहेः “देव देहाने प्रकट झाला.” पण या प्राचीन काळच्या कोडेक्समध्ये “देव” या शब्दासाठी जे संक्षिप्त रुप आहे ते ΘC या दोन ग्रीक अक्षरात आहे, पण मुळात तो शब्द OC असा आहे ज्याचा अर्थ आहे “जो.” यामुळे हे कळते की, येशू हा “देव” नव्हता.
“जो” हा शब्द वचनात खरा आहे हे निश्चित ठरविण्यासाठी सुमारे २०० वर्षे तसेच इतर हस्तलिखित प्रतीचे संशोधन लागले. ब्रुक्स एम. मेटझ्गेर हे टेक्सट्यूअल कॉमेंट्री ऑन द ग्रीक न्यू टेस्टमेंट मध्ये म्हणतातः “आठव्या किंवा नवव्या शतकातील आरंभीच्या (पहिल्या लिखाणातील) ठळक अक्षरात θεός थिऑसʹ अशी अक्षरे दिसत नाहीत; पुरातन काळची सर्व लिखाणे ὅς किंवा ὅ अशीच माहिती देतात. गेल्या चार किंवा पाचव्या शतकातील कोणाही धर्मोपाध्याय लेखकाने θεός थिऑसʹ संबंधी वाचन केल्याचे कळवले नाही.” आज बहुतेक भाषांतरे या वचनात “देव” असा शब्दप्रयोग घालण्याचे टाळणे अधिक पसंद करतात.
१७५७ मध्ये राजाच्या रॉयल लायब्ररीचे वर्गीकरण ब्रिटीश लायब्ररीत झाले. हे उत्तम कोडेक्स आज ब्रिटीश संग्राहलयातील हस्तलिखाण प्रतींच्या प्रशस्त दालनात चटकन नजरेस दिसेल अशा स्थळी ठेवलेले आहे. खरोखरी एकदा तरी पहावे असे ते अनमोल धन आहे.