वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr19 जुलै पृ. १
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०१९
  • उपशिर्षक
  • १-७ जुलै
  • ८-१४ जुलै
  • १५-२१ जुलै
  • २२-२८ जुलै
  • २९ जुलै–​४ ऑगस्ट
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०१९
mwbr19 जुलै पृ. १

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

१-७ जुलै

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-२ पृ. १६९ परि. ३-५

देवाचं राज्य

“त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात.” येशूला स्वर्गात घेतल्याच्या दहा दिवसांनंतर म्हणजे इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टला, येशूने त्याच्या शिष्यांवर पवित्र आत्मा ओतला. यामुळे येशूला “देवाच्या उजव्या हाताला उंचावण्यात आलं” आहे, याचा पुरावा त्याच्या शिष्यांना मिळाला. (प्रेका १:८, ९; २:१-४, २९-३३) अशा प्रकारे “नवा करार” लागू करण्यात आला आणि ते एका नवीन ‘पवित्र राष्ट्राचे’ म्हणजे आत्मिक इस्राएलचे पहिले सदस्य बनले.​​—इब्री १२:२२-२४; १पेत्र २:९, १०; गल ६:१६.

येशू आता त्याच्या पित्याच्या उजव्या हाताला बसला होता आणि ख्रिस्ती मंडळीचं मस्तक या नात्याने कार्य करत होता. (इफि ५:२३; इब्री १:३; फिलि २:९-११) शास्त्रवचनं दाखवून देतात की इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्ट नंतर येशूच्या शिष्यांवर एका स्वर्गीय राज्याची स्थापना करण्यात आली. पहिल्या शतकात, कलस्सै इथल्या ख्रिश्‍चनांना लिहितानासुद्धा प्रेषित पौलने आधीच स्थापित झालेल्या येशूच्या या राज्याबद्दल सांगितलं. त्याने म्हटलं: “[देवाने] अंधाराच्या अधिकारातून आपली सुटका करून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आपल्याला आणले.”​​—कल १:१३; प्रेका १७:६, ७ पडताळा.

इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्ट पासून स्वर्गात असणारं ख्रिस्ताचं राज्य आत्मिक इस्राएलवर राज्य करत आहे. हे आत्मिक इस्राएल अशा ख्रिश्‍चनांनी मिळून बनलं आहे, ज्यांना पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त करण्यात आलं आणि त्यामुळे ते देवाचे आत्मिक पुत्र बनले. (योह ३:३, ५, ६) आत्म्याने अभिषिक्‍त असणाऱ्‍या या ख्रिश्‍चनांना जेव्हा स्वर्गातल्या जीवनाचं प्रतिफळ मिळतं, तेव्हा ते या ख्रिस्ताच्या राज्याच्या अधीन असणाऱ्‍या पृथ्वीवरील प्रजेचा भाग न राहता स्वर्गात ख्रिस्तासोबत सहराजे बनतात.​​—प्रक ५:९, १०

८-१४ जुलै

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-१ पृ. ८६३-८६४

अनैतिक लैंगिक कृत्य

अनैतिक लैंगिक कृत्य एक असं गंभीर पाप आहे, ज्यामुळे एका व्यक्‍तीला ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केलं जाऊ शकतं. (१कर ५:९-१३; इब्री १२:१५, १६) प्रेषित पौलने सांगितलं की अनैतिक लैंगिक कृत्य करणारी व्यक्‍ती आपल्या लैंगिक अवयवांचा गैरवापर करून स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करत असते. यामुळे देवासोबत असलेल्या तिच्या नातेसंबंधावर गंभीर परिणाम होतो, देवाची मंडळी अशुद्ध होते आणि तिला लैंगिक संबंधातून होणाऱ्‍या रोगांचा धोका निर्माण होतो. (१कर ६:१८, १९) जेव्हा एक व्यक्‍ती अनैतिक लैंगिक कृत्य करते, तेव्हा ती (१) मंडळीत घृणास्पद अशुद्धपणा आणून मंडळीच्या नावाला कलंक लावते (इब्री १२:१५, १६), (२) जिच्याबरोबर अनैतिक कृत्य घडलं आहे तिच्या शुद्ध विवेकाला डागाळते आणि जर ती व्यक्‍ती अविवाहित असेल तर शुद्ध विवेकाने विवाह करण्यापासून तिला वंचित करते, (३) नैतिकतेच्या बाबतीत स्वतःच्या कुटुंबाचं नाव खराब करते आणि (४) जिच्याबरोबर अनैतिक कृत्य घडलं आहे तिच्या पालकांच्या, पतीच्या किंवा ज्या व्यक्‍तीसोबत तिचं लग्न ठरलं आहे तिच्याविरुद्ध पाप करते. या सर्व गोष्टींमुळे ती व्यक्‍ती आपल्या ख्रिस्ती बांधवांच्या हक्कांचा गैरफायदा घेत असते. (१थेस ४:३-७) अशा प्रकारचं गंभीर पाप करणारी व्यक्‍ती माणसाचा नाही, तर उच्च नैतिक स्तर असणाऱ्‍या आणि योग्य न्याय करणाऱ्‍या देवाचा अपमान करत असते.​—१थेस ४:८.

१५-२१ जुलै

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|२ थेस्सल­नीकाकर १-३

“अनीतिमान मनुष्याचं प्रकट होणं”

इन्साइट-१ पृ. ९७२-९७३

देवाची उपासना

इथे आणखी एक रहस्य लपलेलं आहे. हे रहस्य यहोवाच्या ‘पवित्र रहस्याच्या’ विरुद्ध कार्य करणारं असून त्याला ‘अनीतीचं रहस्य’ असं म्हटलं आहे. खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी हे एक रहस्य असण्याचं कारण म्हणजे प्रेषित पौलच्या काळात स्पष्टपणे ओळखता येईल अशा गटात ‘अनीतिमान मनुष्याचं’ अस्तित्व अजून तयार झालं नव्हतं. आणि जरी हा ‘मनुष्य’ अस्तित्वात आला तरी त्याला ओळखणं बऱ्‍याच जणांसाठी एक रहस्यच असणार होतं, कारण तो त्याची दुष्ट कामं ढोंगीपणाने, देवाच्या उपासनेच्या नावाखाली करणार होता. खरंतर हा खऱ्‍या उपासनेविरुद्ध करण्यात आलेला धर्मत्याग असणार होता. पौलने पुढे म्हटलं की या ‘अनीतीच्या रहस्याचं’ कार्य त्याच्या दिवसात आधीच सुरू झालं होतं. कारण ख्रिस्ती मंडळीवर अनतीचा प्रभाव होत असल्यामुळे तिच्यातून धर्मत्यागी लोकांचा एक गट पुढे तयार होणार होता. पण शेवटी येशू ख्रिस्त आपली उपस्थिती प्रकट करून या गटाला नष्ट करणार होता. सैतानाच्या प्रभावाखाली असणारा “मनुष्य” म्हणजे हा धर्मत्यागी लोकांचा गट “देव समजल्या जाणाऱ्‍या प्रत्येकापेक्षा व पूज्य समजल्या जाणाऱ्‍या प्रत्येक वस्तूपेक्षा स्वतःला वरचढ” (ग्रीक, सेबास्मा) करणार होता. अशा प्रकारे सैतानाचा हस्तक म्हणून कार्य करणारा हा देवाचा विरोधक अतिशय फसवा आणि दिशाभूल करणारा असणार होता. आणि जे त्याच्यामागे जातील ते यामुळे स्वतःवर नाश ओढवून घेणार होते. या ‘अनीतिमान मनुष्याचा’ प्रभाव अतिशय परिणामकारक असणार होता, कारण त्याची दुष्ट कार्यं ढोंगीपणाने केलेल्या देवाच्या उपासनेच्या आड लपलेली असणार होती.​—२थेस २:३-१२; मत्त ७:१५, २१-२३ पडताळा.

इन्साइट-२ पृ. २४५ परि. ७

असत्य

जे लोक येशूबद्दल असणारी आनंदाची बातमी न ऐकता ‘असत्यावर विश्‍वास ठेवण्याची’ निवड करतात, अशांची यहोवा ‘फसव्या प्रभावामुळे दिशाभूल’ होऊ देतो. (२थेस २:९-१२) कित्येक शतकांआधी इस्राएलचा राजा अहाब याच्या बाबतीत जे घडलं, त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते. खोट्या संदेष्ट्यांनी अहाब राजाला अशी खात्री करून दिली की रामोथ-गिलादविरुद्ध जर त्यानं युद्ध केलं, तर त्याला विजय मिळेल. पण यहोवाचा संदेष्टा मीखायाने आधीच सांगितलं होतं की असं केल्यामुळे त्याच्यावर संकट कोसळेल. कारण एका दृष्टान्तात यहोवाने मीखायाला असं दाखवलं, की त्याने एका देवदूताला अहाबच्या सगळ्या संदेष्ट्यांना खोटं बोलायला लावण्याकरता पाठवलं आहे. यावरून कळतं की यहोवाच्या त्या देवदूताने आपल्या ताकदीचा वापर करून त्या संदेष्ट्यांना जे सत्य आहे ते नव्हे, तर इतर संदेष्ट्यांना सांगायला जे आवडत होतं, आणि अहाब राजाला ऐकायला जे आवडणार होतं, ते खोटं बोलण्यास भाग पाडलं. पण आधीच धोक्याची सूचना देऊनसुद्धा अहाब राजाने त्या संदेष्ट्यांच्या खोट्या गोष्टीवर विश्‍वास ठेवून स्वतःची फसवणूक करून घेतली आणि याची किंमत म्हणून त्याला आपला जीव गमवावा लागला.​​—१रा २२:१-३८; २इत १८.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-१ पृ. ८३४ परि. ५

अग्नी

पेत्रने म्हटलं: “सध्या अस्तित्वात असलेले आकाश आणि पृथ्वी अग्नीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.” या आणि इतर वचनांचा संदर्भ लक्षात घेतल्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की इथे करण्यात आलेला अग्नीचा उल्लेख शब्दशः नसून सार्वकालिक विनाशाला सूचित करतो. नोहाच्या दिवसातल्या जलप्रलयामुळे खरोखरच्या स्वर्गाचा आणि पृथ्वीचा नाश झाला नाही तर फक्‍त पापी लोकांचा नाश झाला. त्याचप्रमाणे प्रभू येशू आपल्या सामर्थ्यशाली देवदूतांसोबत अग्नीच्या ज्वालेत प्रकट होईल, तेव्हा फक्‍त सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा आणि त्यात सामील असणाऱ्‍या पापी लोकांचा कायमचा नाश केला जाईल.​—२पेत्र ३:५-७, १०-१३; २थेस १:६-१०; यशया ६६:१५, १६, २२, २४ पडताळा.

इन्साइट-१ पृ. १२०६ परि. ४

प्रेरणा

“प्रेरित संदेश”​​—खरा आणि खोटा. प्रेषितांनी त्यांच्या लिखाणात न्यूमा (आत्मा) या ग्रीक शब्दाचा काही वेळा एका खास अर्थाने वापर केला आहे. उदाहरणार्थ, २ थेस्सलनीकाकर २:२ या वचनात प्रेषित पौल थेस्सलनीका इथल्या आपल्या बांधवांना असा आर्जव करतो: “यहोवाचा दिवस आला आहे असे सुचवणाऱ्‍या कोणत्याही प्रेरित संदेशामुळे [शब्दशः “आत्म्यामुळे”], तोंडी सांगितलेल्या संदेशामुळे किंवा आमच्याकडून आहे असे भासणाऱ्‍या पत्रामुळे लगेच गोंधळून जाऊ नका किंवा घाबरू नका.” यावरून कळतं की पौलने न्यूमा (आत्मा) हा शब्द ‘तोंडी सांगितलेल्या संदेशासारखं’ किंवा ‘पत्रासारखं’ असणारं एक संभाषणाचं साधन म्हणून वापरला. या कारणामुळेच, लँजे यांच्या कॉमेंट्री ऑन द होली स्क्रिप्चर्स (पृ. १२६) नावाच्या एका पुस्तकात याबद्दल असं म्हटलं आहे, की “या शब्दाचा वापर करण्याद्वारे प्रेषिताला, एखादी गोष्ट दैवी स्रोताकडून आहे, घडणाऱ्‍या गोष्टीची पूर्वसूचना आहे किंवा ती संदेष्ट्याकडून आहे, असं सुचवायचं होतं.” यासोबतच विन्सेंट यांच्या वर्ड स्टडीज इन द न्यू टेस्टमेंट या पुस्तकात म्हटलं आहे, की “ख्रिस्ती सभांमध्ये एखादा आत्म्याने संदेश सांगत आहे, असं म्हणण्याचा अर्थ त्याला देवाकडून काहीतरी प्रकट करण्यात आलं आहे असा होता.” त्यामुळे काही भाषांतरांमध्ये या आणि यासारख्या इतर ठिकाणी न्यूमा या शब्दाचं “आत्म्यामुळे” असं भाषांतर केलं आहे, तर काही भाषांतरांमध्ये “आत्म्याचा संदेश” (द बायबल-अमेरिकन ट्रान्सलेशन), “भाकीत” (द जेरूसलेम बायबल), “प्रेरित” (डी’ऑस्टरवर्ल्ड; सिगॉण्ड [फ्रेंच]) आणि “प्रेरित संदेश” (ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर) असे वेगवेगळे शब्द वापरण्यात आले आहेत.

२२-२८ जुलै

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|१ तीमथ्य १-३

“चांगल्या कामासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करा”

आपली राज्य सेवा-E ९/७८ पृ. ४ परि. ७

‘चांगलं नाव कमावणारे’

७ पौलने मंडळीत चांगल्या प्रकारे सेवा करणाऱ्‍या पुरुषांबद्दल, ते “आपल्यासाठी चांगले नाव कमावतात” असं का म्हटलं आहे, हे समजण्यासारखं आहे. काही जणांना वाटतं त्याप्रमाणे पौल इथे चर्चमध्ये एकानंतर एक दिल्या जाणाऱ्‍या पदव्यांबद्दल बोलत नव्हता. उलट, मंडळीत सहायक सेवक म्हणून चांगल्या प्रकारे सेवा करणाऱ्‍या बांधवांना यहोवा आणि येशूचे आशीर्वाद मिळतील आणि संपूर्ण मंडळीकडून त्यांना सहकार्य आणि सन्मान दिला जाईल असं आश्‍वासन पौल इथे देत होता. मंडळीत कार्य करणारे असे बांधव साहजिकच “ख्रिस्त येशूवर असलेल्या विश्‍वासासंबंधी अगदी मोकळेपणाने” बोलू शकत होते. यासोबतच आपल्या जबाबदारशी प्रामाणिक असल्यामुळे, चांगल्या कामाबद्दल त्यांची नक्कीच कदर केली जाते. त्यांचा विश्‍वास भक्कम असल्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता किंवा कोणाच्याही निंदेला न घाबरता ते आपल्या विश्‍वासाबद्दल इतरांना सांगतात.

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-१ पृ. ९१४-९१५

वंशावळ

या गोष्टींचा अभ्यास आणि त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. आणि खासकरून अशा काळात जेव्हा पौलने तीमथ्यला याबद्दल लिहिलं. देवासाठी ख्रिस्ती मंडळीतले यहुदी आणि विदेशी सारखेच होते, त्यामुळे एखादा कोणत्या वंशावळीतून आला आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या वंशावळीच्या नोंदी सांभाळून ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. (गल ३:२८) तसंच ख्रिस्ताचं येणं दावीदच्या वंशातून होईल हे वंशावळीच्या अहवालांतून आधीच स्पष्ट झालं होतं. पौलने हा इशारा देणं योग्यच होतं, कारण त्यानंतर अगदी थोड्या काळातच यरुशलेमचा नाश होणार होता आणि त्यासोबत यहुदी वंशावळींच्या सर्व नोंदीसुद्धा नष्ट होणार होत्या. आणि आपल्याला हे माहीतच आहे की देवाने कोणत्याही प्रकारे त्या राखून ठेवल्या नाहीत. त्यामुळे तीमथ्य आणि मंडळीतले इतर जण स्वतःच्या वंशावळीचं संशोधन करण्यात आणि त्यावर वाद घालण्यात विनाकारण वेळ वाया घालवतील आणि स्वतःची दिशाभूल करून घेतील अशी चिंता पौलला होती. कारण त्यांच्या ख्रिस्ती विश्‍वासाला याचा काहीच फायदा होणार नव्हता. त्यामुळे येशूच मसीहा आहे हे सिद्ध करण्यासाठी बायबलमध्ये नमूद असलेला वंशावळीचा अहवाल पुरेसा होता. आणि हाच अहवाल ख्रिश्‍चनांसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. बायबलमधल्या इतर वंशावळींच्या अहवालांबद्दल म्हटलं, तर त्यामुळे बायबल अहवालांची सत्यता सिद्ध होते आणि त्यावरून बायबलमधला इतिहास विश्‍वास ठेवण्याइतका खरा आहे हे स्पष्ट होतं.

यहोवा के करीब अध्या. १ परि. १५

“देखो, हमारा परमेश्‍वर यही है”

१५ “सनातन राजा” एक और उपाधि है जो सिर्फ यहोवा के लिए इस्तेमाल होती है। (१ तीमुथियुस १:१७; प्रकाशितवाक्य १५:३) इसका मतलब क्या है? अपनी सीमाओं की वजह से हमारे दिमाग के लिए यह बात समझना मुश्‍किल है। मगर सच्चाई यह है कि यहोवा सनातन है, यानी भूतकाल और भविष्यकाल दोनों ही दिशाओं में वह युग-युग से है और युग-युग तक रहेगा। भजन १०:२ कहता है: “अनादिकाल से अनन्तकाल तक तू ही ईश्‍वर है।” इसलिए यहोवा की कोई शुरूआत नहीं है; वह हमेशा ही वजूद में रहा है। तभी उसे “अति प्राचीन” कहा गया है और यह सही भी है। इस दुनिया में किसी भी चीज़ या किसी भी शख्स के पैदा होने से बहुत पहले से वह अस्तित्त्व में है! (दानिय्येल ७:९, १३, २२) तो फिर, कौन है जो यहोवा के महाराजाधिराज होने के हक पर सवाल उठाने की जुर्रत कर सकता है?

२९ जुलै–​४ ऑगस्ट

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|१ तीमथ्य ४-६

“देवाची उपासना की धन-संपत्ती?”

सावध राहा!-E ६/०७ पृ. ६ परि. २

श्रीमंतीचा ध्यास​​—तुमच्यावर होणारा परिणाम

हे खरं आहे, की श्रीमंतीचा ध्यास घेतला म्हणून कोणी लगेच मरत नाही. पण श्रीमंत बनण्याच्या ध्येयापोटी मात्र आपलं आयुष्य कसं निघून गेलं हे कदाचित एखाद्याला कळणारही नाही. एवढंच नाही, तर कामाच्या किंवा आर्थिक गोष्टींच्या तणावामुळे होणारा तीव्र मानसिक त्रास, झोपेची उणीव, गंभीर स्वरूपाची डोकेदुखी किंवा अल्सर यांसारख्या आजारांमुळे एखाद्याचं आयुष्य कमी होऊ शकतं. आणि श्रीमंतीने पछाडलेला एखादा जरी मध्येच जागा झाला आणि त्याला आपली ध्येयं बदलून जीवनात बदल करावासा वाटला, तरी बराच वेळ निघून गेलेला असेल. तोपर्यंत कदाचित त्याच्या विवाहसोबत्याचा त्यावरचा विश्‍वास उडालेला असेल, त्याच्या मुलांची बरीच भावनिक हानी झालेली असेल आणि त्याचं आरोग्यही खालावलेलं असेल. हो, हे खरं आहे की यातल्या काही गोष्टी कदाचित सावरता येतीलही, पण त्यासाठी पुन्हा बरीच मेहनत घ्यावी लागेल. म्हणूनच म्हटलं आहे की, अशांनी “स्वतःला अनेक दुःखांनी भोसकून” घेतलं आहे.”​​—१ तीमथ्य ६:१०.

सजग होइए! १/०९ पृ. ६ परि. ४-६

सच्ची कामयाबी पाने के छः गुर

जैसा कि हमने पहले लेख में देखा, कई लोग सोचते हैं कि खूब सारा पैसा होना ही कामयाबी की निशानी है, मगर असल में धन-दौलत एक धोखा है। इसके पीछे भागने से लोगों को कामयाबी के बजाय नाकामी हाथ लगती है और उन्हें दुख के आँसू बहाने पड़ते हैं। मिसाल के लिए, लोग अकसर धन के देवता की वेदी पर अपने सारे रिश्‍ते और दोस्ती को बलि चढ़ा देते हैं। दूसरे ऐसे हैं, जिनका काम या चिंता की वजह से रातों की नींद उड़ जाती है। बाइबल की एक किताब, सभोपदेशक ५:१२ कहता है: “परिश्रम करनेवाला चाहे थोड़ा खाए, या बहुत, तौभी उसकी नींद सुखदाई होती है; परन्तु धनी के धन के बढ़ने के कारण उसको नींद नहीं आती।”

पैसा सिर्फ एक बेरहम मालिक ही नहीं, बल्कि बड़ा धोखेबाज़ भी होता है। यीशु मसीह ने भी ‘धन के धोखे’ की बात कही थी। (मरकुस ४:१९) यानी, हमें लगता है कि धन से हमें खुशी मिलेगी, लेकिन ऐसा होता नहीं। उलटा वह पैसे की भूख बढ़ाता है। सभोपदेशक ५:१० (NHT) कहता है: “जो रुपये-पैसे से प्रेम करता है वह रुपये-पैसे से संतुष्ट नहीं होगा।”

चंद शब्दों में कहें तो पैसे का लोभ करना अपने पैरों पर कुल्हाड़ी मारना है। इससे निराशा और नाकामी के सिवा कुछ नहीं मिलता। यहाँ तक कि एक इंसान जुर्म की अंधी गली में भी जा सकता है। (नीतिवचन २८:२०) लेकिन सच्ची कामयाबी और खुशी का दारोमदार प्यार, दरियादिली, दूसरों को माफ करने के रवैए, शुद्ध चरित्र और परमेश्‍वर के साथ एक अच्छे रिश्‍ते पर है।

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-२ पृ. ७१४ परि. १-२

सार्वजनिक वाचन

ख्रिस्ती मंडळीत. पहिल्या शतकात बायबल लिखाणांच्या प्रती खूप कमी लोकांकडे उपलब्ध होत्या. त्यामुळे सार्वजनिक वाचन आवश्‍यक होतं. ख्रिस्ती सभांमध्ये आपल्या पत्रांचं सार्वजनिक वाचन व्हावं अशी आज्ञा प्रेषित पौलने दिली होती. तसंच ही पत्रं इतर मंडळ्यांसोबत अदला-बदल करून वाचावीत असंही त्याने सांगितलं होतं. (कल ४:१६; १थेस ५:२७) याबरोबरच पौलने मंडळ्यांमध्ये पर्यवेक्षकाचं काम करणाऱ्‍या तरुण तीमथ्यलाही “सार्वजनिक वाचन, मार्गदर्शन देणे व शिकवणे यांत स्वतःला वाहून” घ्यायला सांगितलं.​—१ती ४:१३.

सार्वजनिक वाचन करताना वाचणाऱ्‍याने ते अगदी सहजपणे वाचलं पाहिजे. (हब २:२) तसंच, सार्वजनिक वाचन इतरांच्या शिक्षणासाठी असल्यामुळे वाचन करणाऱ्‍याला आपण काय वाचत आहोत ते पूर्णपणे माहीत असलं पाहिजे. तसंच त्यामागे लेखकाचा काय उद्देश आहे याची त्याला स्पष्ट समज असणं गरजेचं होतं. याबरोबरच वाचन करताना ऐकणाऱ्‍यांना चुकीचा अर्थ जाणार नाही याची दक्षतासुद्धा त्याला घ्यायची होती. प्रकटीकरण १:३ या वचनात सांगितल्यानुसार भविष्यवाणी मोठ्याने वाचणारा आणि ते ऐकून त्याप्रमाणे वागणारा आनंदित होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा